दोन-तीन दिवसांपूर्वी फैझ-अहमद-फैझ यांची एक अनुवादित कविता शेअर केली होती. फैझ ची आणखी एक सुंदर कविता 'सुबह-ए-आजादी'. मोह, ऐश-आराम यांच्या त्याग करून स्वातंत्र्याचं उदात्त ध्येय पुढे ठेवून चालत गेलेल्या तरुणांची शेवटी मिळालेल्या तथाकथित स्वातंत्र्याने कशी निराशा केली याबद्दलची हि कविता:
सुबह-ए-आजादी
स्वातंत्र्याची सकाळ
ये दाग़ दाग़ उजाला ये शब-गज़ीदा सहर
वो इंतज़ार था जिसका ये वो सहर तो नहीं
हा डागाळलेला प्रकाश, जिला रात्र डसलेली आहे अशी हि काळवंडलेली सकाळ
हि ती सकाळ तर नाहीच जिची आम्हाला प्रतीक्षा होती
ये वो सहर तो नहीं जिसकी आरज़ू लेकर
चले थे यार के मिल जाएगी कहीं न कहीं
फ़लक के दश्त में तारों की आख़िरी मंज़िल
ही ती सकाळी तर नाहीच जिची कामना करून
निघाले होते माझे मित्र (आणि मी) कि आकाशाच्या ओसाड वनात
कुठेतरी निश्चितच सापडेल चांदण्यांचा गाव
कहीं तो होगा शबे-सुस्त-मौज का साहिल
कहीं तो जाके रुकेगा सफ़ीना-ए-ग़मे-दिल
कुठे तरी नक्कीच असेल या अंधाराच्या संथ लाटेचा किनारा
कुठे तरी निश्चितच जाऊन थांबेल मनाच्या वेदनेचा शिकारा
जवाँ लहू की पुर-असरार शाहराहों से
चले जो यार तो दामन पे कितने हाथ पड़े
दियारे-हुस्न की बेसब्र ख़्वाबगाहों से
पुकारती रही बाहें बदन बुलाते रहे
तरुण रक्ताच्या रहस्यमय वाटांनी जेव्हा आम्ही साथीदार निघालो
तेव्हा किती हातांनी आमच्या बाह्या घट्ट धरून ठेवल्या
रूपाच्या दुनियेतील अधीर रंगमहालांतून गोऱ्या गोऱ्या बाहूंनी आक्रोश केला
कमनीय देह बोलवीत राहिले….
बहुत अज़ीज़ थी लेकीन रूखे-सहर की लगन
बहुत करीं था हसीनाने-नूर का दामन
फारच प्रिय होती पण प्रभातेच्या मंगल चेहऱ्याची ओढ
फारच निकट होता प्रकाश-सुंदरीचा पदर
सुबुक सुबुक थी तमन्ना दबी दबी थी थकन
मनीची इच्छा हलकीफुलकी होती
आलेला शीण जाणवतही नव्हता
सुना हैं हो भी चूका हैं फ़िराके-ज़ुल्मतों-नूर
सुना हैं हो भी चूका हैं विसाले-मंज़िलों-गाम
बदल चूका हैं बहुत अहले-दर्द का दस्तूर
निशाते-वस्ल हलाल ओ अज़ाबे-हिज्र हराम
आणि आता…
आम्ही तर असं ऐकतो आहोत की प्रकाश अंधारापासून मुक्त झालाही आहे
आणि असंही ऐकतो आहोत की पावलांचं गन्तव्याशी मिलनही झालेलं आहे
आमच्या कळकळीच्या मार्गदर्शकांचं, नेत्यांचं वागणं बरंच बदललं आहे….
आनंदोत्सवाचं वातावरण त्यांना हवं आहे, तक्रार, दुक्ख त्यांना नको आहे
जिगर कि आग नजर कि उमंग दिल कि जलन
किसीपे चारा- ए-हिज्रा का कुछ असर हि नहीं
कहाँ से आई निगारे-सबा किधर को गई
अभी चराग़े-सरे-रह को कुछ ख़बर ही नहीं
पेटलेलं काळीज, आसुसलेली नजर, जळणारं मन
यांच्यावर मात्र या विरहावरच्या मात्रेचा काहीच परिणाम झालेला नाहीय
कुठून आली पहाटेची थंड झुळूक नि कुठे निघून गेली
रस्त्यावरच्या दिव्याला अजून पत्ताच लागलेला नाहीय
अभी गिरानी-ए-शब में कमी नहीं आइ
नज़ाते-दीदा-ओ-दिल की घड़ी नहीं आइ
चले चलो के वो मंज़िल अभी नहीं आइ
अजूनही रात्रीचा भार कमी झालेला नाहीय
डोळ्यांच्या आणि हृदयाच्या मुक्तीचा क्षण अजूनही आलेला नाहीय
चालत रहा कारण ते ध्येय अजूनही प्राप्त झालेलं नाहीय
प्रतिक्रिया
30 Jun 2015 - 1:30 pm | एस
छान कविता. एक सुचवतो - भावानुवाद तर कराच, सोबतच उर्दू शब्दांचे मराठी अर्थही तळटिपेमध्ये देत गेल्यास रसिकांना सोयीचे होईल.
1 Jul 2015 - 8:12 pm | पथिक
धन्यवाद! सूचना लक्षात ठेवीन.
1 Jul 2015 - 8:37 pm | पैसा
छान लिहिताय!
7 Jul 2015 - 2:05 pm | पथिक
धन्यवाद!
लिखाणावर 'पैसा' प्रसन्न झाला म्हणजे मिळवलीच! :)
7 Jul 2015 - 2:20 pm | विशाल कुलकर्णी
छान...
7 Jul 2015 - 2:25 pm | पथिक
धन्यवाद! काही दुरुस्त्या करायच्या आहेत. त्या कशा करता येतील?
7 Jul 2015 - 2:34 pm | मधुरा देशपांडे
काय बदल करायचे आहेत ते व्यनिने मला कळवा.