वकिल

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
26 May 2015 - 12:24 pm
गाभा: 

एम.आय.डी.सी ला असताना एक चपळगावकर नावाचा मित्र होता ..
पेशाने वकिल पण वकिली चालली नाहि म्हणुन जोब भादरायच काम करायचा एका लहानश्या शेड मधे......
.
गप्पात एकदा त्याने सांगीतले...आपल्या कडे आपला कायदा नाहि.सायबाचा कायदा आपण उधार घेतला व त्याला " ईंडियन पिनल कोड" असे नाव देत तो आपण वापरत आहोत..
सायबान कायदा लिहिताना भारतिय माणुस मुळात चोर मनोवृत्तिचा आहे असे गृहित धरुन कायदा लिहिला आहे....
.
कश्या वरुन? असे विचारतात त्याने उदाहरण दिले.....
.
रेल्वेत इमरजंसी च्या वेळी चेन खेचण्याची सोय असते ज्या मुळे गाडी थांबते.... पण त्या पाटिवर हे पण लिहिले असते कि कारणाशिवाय चेन खेचली तर ५० रु दंड.....याचा अर्थ भारतिय नागरिक खोडसाळ पणे उगाचच चेन खेचतिल हे गृहित घरुन कायदा केला..
.
आपणास ह्या मुद्द्यात दम वाटतो का ?

प्रतिक्रिया

खेडूत's picture

26 May 2015 - 12:30 pm | खेडूत

मी पयला!

जोब भादरायच काम

हे काय असतं?

धाग्याचं शीर्षक कायदा हवं होतं असं वाटतं !

बाकी अनुभवाअभावी यावर काहीच वाटत नाही !

hitesh's picture

26 May 2015 - 12:35 pm | hitesh

वकिलि चाल्ली असाती तर हाच वकिल कायद्याचे गुणगान करत फिरला असता.

आदूबाळ's picture

26 May 2015 - 12:38 pm | आदूबाळ

अकु काका आssssssssले...

काळा पहाड's picture

26 May 2015 - 12:40 pm | काळा पहाड

आपणास ह्या मुद्द्यात दम वाटतो का ?

तुमचं काय मत आहे?

बाप रे. पण तसेही पेशात साम्य आहे. जॉबची बर काढण्याचे काम करत होते म्हणजे इथेही भादरताहेत आणि वकिली चालली असती तर अशिलाला पण भादरले असते :-)

नांदेडीअन's picture

26 May 2015 - 12:49 pm | नांदेडीअन

काका, फेसबुकवर केलेला कमेंट इकडे कॉपी-पेस्ट करू का ?

शि बि आय's picture

26 May 2015 - 12:50 pm | शि बि आय

रील शीर्षक आणि खालील मजकूर ह्यामध्ये ताळमेळ नाही हो… असो

मी कुठे तरी वाचले आहे कि इंडिअन ह्या शब्दाचा अर्थ मागासलेला असा घेत होते. आता अर्थात त्यात सुधारणा केली आहे. आता त्याचा अर्थ भारतीय असा घेत आहेत .
तसे हि भारतीय मनोवृत्ती खोडसाळपणाचीच आहेच. सार्वजनिक संपत्तीचा कसा आणि किती दुरुपयोग करता येईल ह्याचे उत्तम नमुने आपल्याकडेच बघायला मिळतील. त्यामुळे विनाकारण चेन खेचल्यास दंड लावले योग्यच आहे. हि पटी आज देखील लोकल मध्ये बघायला मिळेल फक्त दंडाची रक्कम रु. ५०/-
वरून रु ५००/- झाली आहे.

इथे प्रतिसाद आहे. अकुकाकांची एकतरी प्रतिक्रिया आली धाग्यावर की आपोआप दिसायला लागेल.

मदनबाण's picture

26 May 2015 - 1:42 pm | मदनबाण

नेहमीच येतो मग पावसाळा... मौसमी वारे वाहु लागले काय ? मान्सुन केरळ मधे दाखल झाला ?
तुम्हाला काय वाटते ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding

नाखु's picture

26 May 2015 - 2:42 pm | नाखु

चेन अवेळी+विनाकारण खेचणे वाईटच !
इती मुवीबाबाम्हाराज प्रवचने पान क्र २६ ओळ क्रं ८

सौन्दर्य's picture

26 May 2015 - 7:28 pm | सौन्दर्य

भारतीय म्हणजे खोडसाळच असे ठरवून कायदे केले गेले असतील असे वाटत नाही. आपण जसे लहान मुलांना सांगतो, की आगीला बोट लावू नकोस, बोट भाजेल, उड्या मारत जिने उतरू नकोस, पडलास तर हाड मोडेल, त्याचप्रमाणे विनाकारण चेन खेचल्यास दंड होईल, असा कायदा बनवला असावा. शेवटी एक गोष्ट खरी, पुढील परिणामांची भीती दाखविल्याशिवाय चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा करणे कठीणच आहे.

मार्मिक गोडसे's picture

26 May 2015 - 7:37 pm | मार्मिक गोडसे

देवबाप्पाचा जन्मही ह्याच कारणामुळे झाला.