चित्रकार पिंटू [बालकविता]

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
25 May 2015 - 12:43 pm

आमचा पिंटू चित्रकार छान
चित्र काढताना पाठीची कमान ..

जिराफाला असते गेंड्याची मान
उंटाला दिसती हत्तीचे कान ..

भूभूचे शेपूट सरळ असते
हम्माचे शेपूट वाकडे दिसते ..

मोरपिसारा कोंबड्याला असतो
कोंबड्याच्या तुऱ्याचा पत्ता नसतो ..

झुरळ असते काढलेले हातभर
मिशा त्याच्या फक्त चिमूटभर ..

इवल्याशा सशाला पाय कावळ्याचे
सिंहाला नेमके पाय बगळ्याचे ..

मुंगीचा डोळा वाघाला दिसतो
घुबडाचा डोळा चिमणीला असतो ..

चित्र रंगवताना डोलावतो मान
म्हणतो स्वत:च "वा वा छान"..

चित्रात भरताना विविध रंग
स्वत:चे भरतो रंगाने अंग

आमचा पिंटू चित्रकार छान
मोठ्ठा झाल्यावर होणार महान .. !
.

बालसाहित्यबालगीत

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 May 2015 - 4:08 pm | मदनबाण

मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer

नीलमोहर's picture

25 May 2015 - 8:45 pm | नीलमोहर

छोटू, पिंटू..
छान असतात तुमच्या बालकविता !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 9:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या चित्रकलाशैलीवर कविता केल्याबद्दल धन्यवाद. फार पुर्वी मी माकड काढायला घेतलं की घोडा किंवा गाढवसदृष्य प्राणी निघत असे ह्याची आठवण झाली/

विदेश's picture

26 May 2015 - 9:45 pm | विदेश

मदनबाण, नीलमोहर, कॅप्टन जॅक स्पॅरो ...

सर्वांचे आभार !