काही नवे करावे म्हणून.

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in जनातलं, मनातलं
9 May 2015 - 5:51 pm
रत्नागिरी येथे पूर्वी अंगण नावाचे खाद्यगृह होते.जेवण झकासच असायचे.आपणपण इथे एक खाद्यगृह सुरु करूया, अशी इच्छा मनात धरून जागा शोधायला सुरुवात केली.जागांच्या अव्वाच्या सव्वा किंमती पाहून थंडावलो.पण तुमच्याकडे पैसे आहेत हे दलालांना समजले की,जागांच्या वेगवेगळ्या ऑफर्स यायला सुरुवात होते.त्यप्रमाणे कोणीतरी फणसोप येथी आंबाच्या बागेची माहिती सांगितली. जागा पाहून आलो तेव्हा ऐन मे महिना.झाडे रोपदळच पण आंबे लागलेले.सोबत आई होती.तिच्या माहेरी म्हणजे माझ्या आजोळी आंब्याचे उत्पन्न भरपूर.अनुभवही खूप."एकदा बाग घेतली तर पन्नास ते साठ वर्षे बघायला नको" असा तिचा शेरा.जागेत पाण्याची सोय नव्हती पण जवळच ओहोळाचे पाणी होते.एल टाइपचा प्लॉट होता.दोनही बागांना दगडी .कुंपण त्यावर पुरुषभर उंचीचे निवडून्गाचे कुंपण.दोन्ही बागेमधून पायवाट.श्री.प्रकाश जोशी या बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून काम करणारया गृहस्थांच्या पत्नीच्या नावे ही बाग होती.माझ्या वडीलांचे घर व नारळग भाटमिरया, रत्नागिरी येथे असल्याने मी शेतकरी कुटुंबातील आहे म्हणून मी तीजागा माझ्या नावावर घेऊ शकत होते.श्री.जोशी यांच्या बंधूच्या शिवाजीनगर इथल्या घरी जाऊन व्यवहाराची बोलणी झाली.सात बाराचा उतारा वगैरे जरुरी कागद पाहिले.त्यांच्यागोदर ती बाग मधुकर साळवी यांच्या नावावर वंश परंपरेने आलेली होती.श्री.जोशी यांचे मामाही फनणसोप येथेच राहत असल्याने त्यांना त्या बागेची सर्व माहिती होती.आता श्री.साळवी हयात नव्हते.त्यांनी दहा वर्षांपूर्वीच ही बाग विकली होती.त्यांचे घर गावात होते.पण त्यांचा मुलगाही वारल्यामुळे त्यांची पत्नीही मुलीकडे मुंबईलाच रहात होती.सगळी माहिती घेतली आणि जागा घेण्याचे ठरवले.यथावकाश कागदपत्रे होऊन व्यवहार झाला. आता सातत्बाराला नाव लावणे या प्रक्रियेला सुरुवात केली.शेत कारी कुटूबम्बतील व्यक्तीचे प्रमाणपत्र घेतेवेळी नायब तहसीलदार श्री.आंब्रे यांचा परिचय झाला होता.व्यवहाराची कागदपत्रे लावून मूळ अर्ज त्यांना सदर केला आणि प्रत मंडळ निरीक्षक आणि तलाठी यांच्याकडे सदर केला.तलाठी कार्यालयात आमचा नंबर येईपर्यंततिथे येणाऱ्या लोकाशी तलाठी महाशय कसे वागतात हे दिसत होते.येणाऱ्या माणसांकडे सिगारेट,गुटख्याची पाकिटे,जेवनाच डबा ई.ई.च्या मागण्या चालू होत्या.माझा अर्ज पाहून तहसिलदारहेबना द्यायची काही गरज नव्हती असा शेरा मिळाला. मी काही न बोलता पोच घेऊन निघाले. एक महिना झाला चौकशी केली तर आंब्रे म्हणाले,,"पाठवला आहे तुमचा अर्ज.अजून नाही मिळाला का सात बारा तुम्हाला?" मी म्हटलं, "नाही अजून"त्यंनी लगेच मंडळ अधिकारीना फोन केला.त्यांनी सांगितलं,"तलाठी कार्यायात जाऊन घ्ययला सांगा. कार्यवाही झालेली आहे.आता तहसीलदार कार्यालय रत्नागिरीत आणि तलाठी कार्यालय फणसोपमध्ये.दोन्ही कार्यालयात जाण्यासाठी एस्टीशिवाय पर्याय नाही.म्हणजे मध्ये तासभर सहज मोडायचा.मधल्यावेळात मं .नि.महाशयांनी तलाठी महाष्ण फोन करून सांगितले,की,मी येतेय.मी तिथे पोचेपर्यंत तलाठी महाराज गायब.कार्यालयात चौशी केली तर ग्रुप ग्रामपंचायत असल्याने दुसऱ्यागावाला गेलेत असे समजले. "पण आज इथला दिवस आहे ना?" न राहवून मी विचारले."हो.पण वसुलीसाठी कधीही जाऊ शकतात."आता यातली मख्खी अशी कअशावेळी खिशातले पैसे भरून पावती दाखवली जाते. पण आपण काही बोलू शकत नाही."बर तर परत येतील न?""हो,हो,ती काय पिशवी आहे तिथेच.आणि गावातच राहतात ते."मी वाट पाहत बसले.दोन_तीन तासांनी महाराज उगवले.म्हटलं ,"मी मिसेस सावंत .सात बाराचा उतर घ्यायला आलेय." "हो,हो.हा काय तुमचा उतारा तयार आहपण फेरफार बुकावर मंडळ निरीक्षकांची सही नाही झालीये.त्यामुळे देता नाही येणार."मग आता ?""उद्या यांना ,मी उद्या त्याची सही घेऊन ठेवतो." या वर बोलाण्यासारखे काहीच नाही.मला त्याच दिवशी परत यायचे होते.त्यांना तसे न सांगता मी"ठीक आहे."म्हणून तिथला फोन नंबर घेऊन मी निघाले.विचार केला कीआता आपले उपद्रवमूल्य दाखवले पाहिजे.परत तहसीलदार कार्यालयात येऊन पहिले तर तहसिल्दार्साहेब अजून काम करत संधी घेतली तर तिचे चीज झाले.त्याच्याकडे जाऊन त्यांना सर्व सांगितले. तेही अवाक झाले. शपाई पाठवूनमं.नि.ना बोलावले तर ते घरी गेल्याचेसमजले. मला म्हणाले,"माफ करा,पण आता तुम्हाला उद्याच यावे लागेल."मी म्हरले",पण मला आज मुंबईला जायलाच लागेल कारण माझी रजा मी वाढवू शकत नाही.""नोकरी करता का तुम्ही?" इति तहसीलदार साहेब.मी,"हो न?"कुठे हो ?" तहसीलदार साहेब.मी,"मंत्रालय." एव्हापर्यंत कागदपात्रांवर सह्या करत माझ्याशी बोलत असलेल्या तहसीलदारसाहेबांनी वर पहिले. "काय म्हणता कय? मंत्रालय?" उत्तरादाखल माझे स्मितहास्य."कोणता विभाग?"इति तहसीलदार साहेब." सामान्य प्रशासन विभाग." मी ."आधी नाही बोललात?"." इति तहसीलदार साहेब."आधी गरज भासली नव्हती.तुम्ही तुमचे काम चोख केले होते." ते हसले.मला विचारले, आणि मिस्टर काय करतात?" मी,"तेही मंत्रालयातच.""मी त्यांना सांगितलं."मी तर आज चाले.उद्या भावाला पाठवते.चालेल ना" "हो.हो.जरूर. इति तहसीलदार साहेब.मी त्याच रात्री भावाला सूचना देऊन मुंबईला आले.दुसऱ्या दिवशी भावाचा फोन आला,"ताई,मी आज जाऊन आलो फणसोपला.तो चाफेरकर (तलाठी)काय म्हणाला म्हीतीय? तुमची बहिण आणि मेहुणे मंत्रालयात आहेत न?मग मग त्यांना माहिती नाही वटते काम कसे करतात?वजन कसे ठेवतात?मी त्याला सांगून आलोय की, ताई येऊन तुझ्या डोक्यावरच वजन मारेल म्हणून?" "ठीक आहे."असे म्हणून मी फोन ठेवला. (क्रमशः
जीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

9 May 2015 - 6:00 pm | यशोधरा

वाचते आहे..

नगरीनिरंजन's picture

9 May 2015 - 6:04 pm | नगरीनिरंजन

मीसुद्धा वाचतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2015 - 6:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

सरकारी काम ! :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2015 - 6:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुढचा भाग लवकर टाका. त्या सायबाच्या डोक्यावर काय आणि कसे मारले त्याची उत्सुकता आहे !

यशोधरा's picture

9 May 2015 - 6:39 pm | यशोधरा

मलापण!

टवाळ कार्टा's picture

9 May 2015 - 6:51 pm | टवाळ कार्टा

+१११

स्वाती२'s picture

13 May 2015 - 3:58 am | स्वाती२

+१

सूड's picture

13 May 2015 - 5:12 pm | सूड

+१११११

बॅटमॅन's picture

13 May 2015 - 5:22 pm | बॅटमॅन

अगदी असेच!!!!!!!!

जेपी's picture

9 May 2015 - 6:06 pm | जेपी

मी पण..
वाचतो आहे.

बहुगुणी's picture

9 May 2015 - 6:11 pm | बहुगुणी

खरी-खुरी नावे देऊन सविस्तर लिहिताहात याची दाद द्यायलाच हवी! या अनुभवातून इतर लोकच नव्हे तर हे 'जनसेवक'ही काही शिकतील....

एस's picture

9 May 2015 - 7:18 pm | एस

+१.

पैसा's picture

9 May 2015 - 6:16 pm | पैसा

काय करायचं या !@#$%^ ना.

टवाळ कार्टा's picture

9 May 2015 - 6:16 pm | टवाळ कार्टा

अश्या कामांसाठी सध्ध्याचा रेट काय आहे?

sश्रिकान्त's picture

9 May 2015 - 7:24 pm | sश्रिकान्त

महाडला एक चाफेरकर तलाठी होते, त्यानी एका माजी सैिनकास ञास िदला होता., त्यानंतर तलाठी महा शयांची बदली झाली ते हेच का?

आनन्दिता's picture

9 May 2015 - 7:32 pm | आनन्दिता

वाचतेय !

मस्त ! वाचते आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या.

यांना कुनाचा काहह्ही फरक पडत नाही,भयानक लोचट आणी निर्लज्ज जमात आहे ही.

नूतन सावंत's picture

9 May 2015 - 8:25 pm | नूतन सावंत

चुका झाल्याहेत सांभाळून घ्या.
मिपावर लिहिण्याची पहिली वेळ आहे.दुसरा भाग लवकर टाकण्याच्या प्रयत्न करते.
@श्रीकांतजी तेच आहेत का माहीत नाही पण यांची शिक्षा नुसत्या बदलीची नाहीये.

हो का??

अतिशय उत्सुकता लागलीये... येऊद्या लवकर..

(मिपावर लई मोठ्या डायनॅमिक रेंजचे अनुभव येऊन राहिले राव . भटजी, नेव्ही, डॉक्टर, पेशंट, केंरापोद....

आने दो और...)

द-बाहुबली's picture

10 May 2015 - 11:32 am | द-बाहुबली

मंत्रालय ? हा हा हा... मस्त.

स्पंदना's picture

10 May 2015 - 11:56 am | स्पंदना

वा!
लगिन पहावं करुनच्या चालीवर
सरकारी काम करावी पाहून अस म्हणावं लागणार असं दिसतय.
झ्याक सुरवात हाय.
बहुतेक "त्या" सरकारी कामगारांना "हे" सरकारी कामगारपण :सरकतः सरकत काम करतात अस वाटले असावे.

कपिलमुनी's picture

10 May 2015 - 12:16 pm | कपिलमुनी

बाकी लक्ष असू द्या

आदूबाळ's picture

10 May 2015 - 1:36 pm | आदूबाळ

जबरी हानला... :)

चुकलामाकला's picture

10 May 2015 - 6:50 pm | चुकलामाकला

सही! पुभाप्र.

सविता००१'s picture

10 May 2015 - 10:11 pm | सविता००१

पुभाप्र.
पुढे काय झालं याची उत्सुकता वाढलीये

कविता१९७८'s picture

10 May 2015 - 10:15 pm | कविता१९७८

मस्त,पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

श्रीरंग_जोशी's picture

11 May 2015 - 7:49 am | श्रीरंग_जोशी

अनुभवकथनाची सुरुवात आवडली.

पुभाप्र.

मृत्युन्जय's picture

11 May 2015 - 5:38 pm | मृत्युन्जय

वाचतो आहे.

मंत्रालयात कामाला असुनसुद्धा तलाठी पैसे मागण्याची हिंमत दाखवतो म्हणजे त्याला मानलेच पाहिजे, इतकी डुक्कराची कातडी कमावणे ही काही सोपी गोष्ट नाही.

त्याच्या डोक्यावर मिर्‍या कश्या वाटल्या हे वाचायची उत्सुकता आहे

पैसा's picture

11 May 2015 - 10:12 pm | पैसा

हल्लीच आमच्या वकिलाकडून त्यांच्या स्वतःच्या जमिनीच्या संदर्भात काही कामाचे पैसे मामलेदार कचेरीत मागितल्याची कथा वकिलाकडून ऐकली आहे. तिथे हे वकील नेहमी जाणारे. सगळे चांगले ओळखीचे. तरी पैसे नाही दिले तर वेबकॅम मोडलाय, सर्व्हर बंद आहे असे काहीही सांगून ३ वेळा परत पाठवले. शेवटी वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांनी पैसे दिले. "हे लोक स्वतःच्या बापाकडूनही पैसे घेतील" - इति वकीलसाहेब. मग तुमची आमची काय कथा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2015 - 11:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

"हे लोक स्वतःच्या बापाकडूनही पैसे घेतील" - इति वकीलसाहेब.

ही अतिशयोक्ती नसून खरी वस्तूस्थिती आहे असे "कचेरीतल्या सायेबांच्या" एका नातेवाईकाकडून ऐकले आहे !

काळा पहाड's picture

11 May 2015 - 5:50 pm | काळा पहाड

सरकारी बाबूंचा "सत्कार" करणारी एखादी संस्था का नाही आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2015 - 11:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

जेपींना विचारा. सत्कारसमारंभांचा त्यांच्याइतका अभ्यास आणि अनुभव आखिल मिपावर इतर कोणाला नसावा ;) :)

रेवती's picture

11 May 2015 - 9:04 pm | रेवती

वाचतिये.

रुपी's picture

11 May 2015 - 11:16 pm | रुपी

पुभाप्र!

अनन्न्या's picture

13 May 2015 - 10:49 am | अनन्न्या

बाकी रत्नांग्रीस परत आल्यास व्यनि करा. मिपाकर किमान कोकम सरबताची तरी व्यवस्था करतील.

नूतन सावंत's picture

13 May 2015 - 2:47 pm | नूतन सावंत

जरूर . नक्की भेटेन.

..या सर्वातून अनेक वर्षे गेलो आहे..प्रचंड देजावू फीलिंग आले..पुढे काय झाले सांगा.

..या सर्वातून अनेक वर्षे गेलो आहे..प्रचंड देजावू फीलिंग आले..पुढे काय झाले सांगा.

नूतन सावंत's picture

13 May 2015 - 11:25 pm | नूतन सावंत

कौन्तेय यांच्या धाग्यावर तुमचे प्रतिसाद मी वाचले आहेत.म्हणूनच हे अनुभव लिहायला घेतले आहेत.पुढचा भाग टाकते लवकरच.

रातराणी's picture

14 May 2015 - 3:21 am | रातराणी

छान लिहिलंय. पु. भा. प्र. :)

सानिकास्वप्निल's picture

14 May 2015 - 2:01 pm | सानिकास्वप्निल

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

कविता१९७८'s picture

19 May 2015 - 11:03 am | कविता१९७८

मस्तच गं