आता काय करावं? नसत लचांड... :(

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
19 Aug 2008 - 3:32 pm

अगदी अनपेक्षितपणे एका वेगळ्याच समस्येत फसलोय. साधारण दोन वर्षापुर्वी मारुती ट्रू-व्हॅल्यू मधून सेकंड-हँड कार घेतली आणि ती चांगली चालली आहे . काल रजिस्टर पोस्टाने कोल्हापुरच्या हातकणंगले (? गावाचे नाव नक्की महित नाही) गावाहून पोलिसांकडून पत्र आले -- त्यात एका अपघाताचा उल्लेख आहे (तारीख आणि नक्की काय झाले त्याचा उल्लेख पत्रात नाही) आणि त्यासंदर्भात कागदपत्रे आणि गाडी घेऊन हातकणंगले इथे बोलावले आहे. मी गाडी कधीही पुण्याबाहेर नेली नाही, तसेच मी घेतल्यापासून तिला कुठलाही छोटा-मोठा अपघात झाला नाही. अर्थात मी घ्यायच्या आधी झाला असेल तर काही माहित नाही. कारचे रजिस्ट्रेशन कोल्हापूरचे (MH-09) आहे.

त्या पत्रातील तक्रार क्रमांकावरून (XX/०८) ही या वर्षातील तक्रार वाटते आहे. जर मी गाडी विकत घ्यायच्या आधीचा प्रॉब्लेम असेल तर मग ट्रान्सफर पेपर आणि गाडीचे कागदपत्र दाखवून प्रकरण संपेल असे वाटते. पण जर गेल्या २ वर्षातील अपघात असल्यास काय करू? तिथे मी कधी गेलोच नाही हे कसे सिद्ध करता येईल (केलेली गोष्ट एक वेळ सिद्ध करता येईल, पण न केलेली?) काहिही न करता फुकटच गळ्यात लचांड पडले आहे, मी हे गाव हातकणंगले कधी पाहिलेही नाही. माझी पुढच्या महिन्यात परिक्षा आणि कामही खूप आहे त्यामुळे तिथे जाणे शक्य नाही (आणि गाडी तिथे नेणे तर शक्यच नाही), आधीच डोक्याला भरपूर व्याप, ताप आहेत...काय करावे? कोणाला अशा प्रकरणाचा अनुभव आहे का? कोल्हापूरला पोलीसात कोणाची (जुजबी चौकशी करण्याइतपत) ओळख आहे का? आत्तापर्यंतचा पोलिसांचा अनुभव चांगला नाही, त्यामुळे पत्रात दिलेल्या नंबरवर अजून फोन केला नाही. अशा वेळी काय करता येईल? मला हे लवकरात लवकर संपवायला आवडेल, विनाकरण मनस्ताप होतोय....डोक्याला नुसता त्रास! :(

कोणी ह्या संदर्भात मदत केल्यास फार, फार आभारी राहीन.

जीवनमानचौकशी

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

19 Aug 2008 - 3:44 pm | आनंदयात्री

नसता त्रास आहे खरा !
१. त्या पोलिस स्टेशनाला फोन करा, सगळी माहिती काढुन घ्या.
२. जाणे खरेच गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले तर वकिलाशी बोला.

मनिष's picture

19 Aug 2008 - 3:58 pm | मनिष

पोलिस स्टेशनला डायरेक्ट फोन करण्याइतका विश्वास नाही पोलिसांवर...:(
कोणी ओळखीचे मिळाले नाही तर वकिलाशी बोलावेच लागेल.

रामदास's picture

19 Aug 2008 - 4:14 pm | रामदास

गाडीचे सगळे पेपर (फोटो कॉपीज) वकीलामार्फत रजी. पोस्टानी पाठवून द्या.शांत बसा. पुढची कार्यवाही होण्यासाठी दोन महिने जातील.तशीच गरज असल्यास पोलीस पंचनामा करून गाडी घेऊन जातील. समजा आलेच गाडी घेण्यासाठी तर त्यांनी तुमच्या लोकल पोलीस ठाण्याची परवानगी घेतली आहे का हे विचारून घ्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 Aug 2008 - 5:38 pm | डॉ.प्रसाद दाढे

माझ्या माहीतीत एक वकील आहेत, गरज पडली तर मनिष त्या॑चा सल्ला घेऊ शकतो

चतुरंग's picture

19 Aug 2008 - 5:46 pm | चतुरंग

गाडी घेण्याच्या अगोदरचा ऍक्सिडेंट असेल तर तुला काहीच प्रॉब्लेम नाही. तू दुसरा खरेदीदार आहेस एवड्।इ एकच गोष्ट पुरेशी आहे.
चांगल्या वकिलाचा सल्ला घे आणि कागदपत्रे पोस्टाने पाठवून द्यावीत असे वाटते. पण वकिलाचा सल्ला अवश्य घे..

चतुरंग

बबलु's picture

20 Aug 2008 - 3:07 am | बबलु

वकिलामार्फत सर्व गोष्टी कराव्यात. त्यांना बरोबर माहिती असते. त्यांचे कामच ते आहे.
आणि तुम्ही वर्णिलेला प्रोब्लेम common आहे. काळजी करू नका.
कोणाच्या ओळखीचे वकिल पहा अथवा yellow pages मध्ये खूप मिळतील.

....बबलु-अमेरिकन

मनिष's picture

20 Aug 2008 - 9:12 pm | मनिष

वकिलाशी बोलून घेतो, एकूण तिथे प्रत्यक्ष जावे लगेल असे दिसते. :(

विसोबा खेचर's picture

22 Aug 2008 - 12:08 am | विसोबा खेचर

घाबरू नकोस, अपघाताच्या तारखेनंतर तू गाडी खरेदी केली असल्यामुळे तुझा या अपघाताशी काहीच संबंध नाही हे सत्य तुला कुठच्याही अडचणीत येऊ देणार नाही....

सत्यमेव जयते!

(मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत सजा भोगलेला) तात्या.