लेमन कर्ड कप

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
28 Apr 2015 - 2:24 am

साहित्यः

फिलो शीट्स = १ पॅक
अंडी = २
साखर = १ वाटी
बटर = १/४ वाटी आणि २ चमचे
लेमन = २
फेटलेले क्रिम = १/२ कप
कपकेक्सचा ट्रे
पुदिना सजावटीसाठी

कृती:

१. फिलो शीट्सचे छोटे चौकोन कापुन घ्यावेत. ह्या शीट्स लगेच कोरड्या होतात त्यामुळे ते एका ओल्या कापडाने झाकुन ठेवावेत.
२. २ चमचे बटर वितळवुन घ्यावे.
३. ट्रेला आतुन बटर लावुन घ्यावे. प्रत्येक चौकोनला दोन्ही बाजुने वितळलेले बटर लावुन घ्यावे.

1

४. प्रत्येक कपमधे ३-३ चौकोन ठेवावेत.

2

५. १८० degree celcius तापमानावर preheat करुन घ्यावा. त्यात ट्रे ठेवुन १० मिनिटे किंवा ब्राउन रंग येईपर्यंत बेक करुन घ्यावे.
६. १० मिनिटांनी ट्रे बाहेर काढुन गार होण्यासाठी बाजुला ठेवावा.

3

4

७. २ लिंबांचा फक्त पिवळा भाग किसुन घ्यावा व त्या लिंबांचा रस काढुन गाळुन घ्यावा.
८. एका मोठ्या बाउल मधे २ अंडी, साखर, १/४ कप बटर, २ लिंबाचे पाणी आणि त्या लिंबांची grate केलेली साले एकत्र घेउन चांगले फेटुन घ्यावे.
९. हे सर्व बॅटर डबल बॉयलर पद्धतीने गरम करण्यासाठी ठेवावे. (फोटोत दाखवल्याप्रमाणे).

5

१०. हे मिश्रण शिजण्यासाठी साधारण ८-१० मिनिटे लागतात. हे शिजत असताना ते continue हलवत रहावे.
११. मिश्रणाचा thickness खालील फोटोमधे दाखवल्या प्रमाणे असावा.

6

१२. मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करुन ते गार होईपर्यंत हलवत रहावे.
१३. गार झाल्यावर त्यावर clear foil लावुन १-२ तास फ्रीज मधे ठेवावे.

7

१४. दुसर्‍या एका मोठ्या भांड्यात क्रिम फेटुन घेउन पायपींग बॅगमधे भरुन घ्यावे.
१५. आता तयार झालेल्या कपांमधे चमच्याने किंवा पायपींग बॅगने लेमन कर्ड भरुन घ्यावे. त्यावर फेटलेली क्रिमने सजवावे.

8

9

१६. सजावटीसाठी वरती पुदिन्याचे पान ठेवावे. आवडत असल्यास वरुन तुम्ही वेगवेगळ्या बेरीजने देखिल सजवु शकता.

10

11

12

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

28 Apr 2015 - 2:46 am | श्रीरंग_जोशी

आकर्षक आहे पाककृती.
सादरीकरण जोरदार आहे.

एक सूचवणी - चित्रांची रुंदी कमाल ६४० असावी. नाहीतर चित्रे अतिक्रमण करतात... :-) .

हो.. मी ते चुकुन save केले. मला आता संपादनचा option मिळत नाहिये.

श्रीरंग_जोशी's picture

28 Apr 2015 - 3:19 am | श्रीरंग_जोशी

संपादक मदत करतात याबाबतीत. काळजी नसावी.

स्पंदना's picture

28 Apr 2015 - 5:44 am | स्पंदना

फोटोज रिसाइझ केले आहेत.
एक सूचना मुरना(किती दिवसांनी हे नाव घ्यायला मिळाले! सिंगापुरच्या एका सुंदर मैत्रीणीचं नाव होतं मृणालीनी, तिचा नवरा तिला मुरना म्हणायचा :) )
तर सूचना, फोटो मध्ये हाईट द्यायची गरज नसते. मिपा आपल्या आपण हाईट सिलेक्ट करते. फक्त विडथ देउन खालच्या बार मध्ये स्पेस मारली आणि ओके म्हंटल की काम होतं.

फोटो रीसाईझ करताना तोंडाला पाणी सुटुन हालत खराब झाली आहे.
एव्ह्ढे चांगले पदार्थ करावेच लागतात का तुम्हा लोकांना?

स्मिता श्रीपाद's picture

28 Apr 2015 - 11:48 am | स्मिता श्रीपाद

एव्ह्ढे चांगले पदार्थ करावेच लागतात का तुम्हा लोकांना?>>
स्पंदना ताई...तुझ्या पुपो च्या धाग्यावर हेच लिहुन येउ का मी ;-)....
तुम्ही सगळ्या सारख्याच ...
ती सानिका काय...मॄणालिनी काय न तु काय....छान छान काय काय बनवता...वर त्याचे फोटो काढता...आणि ईथे टाकुन आमची जळजळ करता.....

Mrunalini's picture

28 Apr 2015 - 1:41 pm | Mrunalini

थॅ़क्स स्पंदना.. :)
अगं हे मला माहित नव्हते. काल आणि आजही अजुनपण मला संपादनचा ऑप्शन येत नाहीये. समा प्लीज हेल्प.

आनन्दिता's picture

28 Apr 2015 - 4:22 am | आनन्दिता

डोळे दिड फुट मोठे झाले फोटो पाहून.. !! काय ते सादरीकरण! कम्माल..

रुपी's picture

28 Apr 2015 - 4:58 am | रुपी

शेवटचे तीन फोटो तर अगदीच कमाल!

ही पाकृ अंडी न घालता कशी करता येईल?

सस्नेह's picture

28 Apr 2015 - 5:18 pm | सस्नेह

अंडी घालायची माहिती नाही आणि आवडतही नाही ;)
बाकी पाकृ आणि फोटो झकास !

अंडी न घालता तुम्ही हे लमन कर्ड करु शकता.

कॉर्नफ्लोवर, पाणी, साखर आणि थोडे बटर हे सगळे एकत्र करुन मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवुन घ्यायचे. त्यात लेमन ज्युस आणि लेमन झेस्ट मिक्स करायचे. अंड्याशिवाय लेमन कर्ड तयार आहे.
ह्याशिवाय तुम्ही ह्याच कप्स मधे नेहमीचे कस्टर्ड भरुन, वरुन मिक्स फ्रुट्सने सजवुन देखिल serve करु शकता.

रुपी's picture

28 Apr 2015 - 11:25 pm | रुपी

कस्टर्डची कल्पना मस्त आहे. बघते करुन लवकरच.

नंदन's picture

28 Apr 2015 - 5:18 am | नंदन

पाककृती आणि सादरीकरण - दोन्ही भन्नाट!

जुइ's picture

28 Apr 2015 - 7:44 am | जुइ

मला वाटते या कपांमधे तिखट सारणही भरलेले पाहिले आहे एका टीव्ही शो मधे.

अजया's picture

28 Apr 2015 - 8:07 am | अजया

देखणी पाकृ!

नूतन सावंत's picture

28 Apr 2015 - 9:05 am | नूतन सावंत

अफलातून....अफलातून.

नूतन सावंत's picture

28 Apr 2015 - 9:05 am | नूतन सावंत

अफलातून....अफलातून.

प्रचेतस's picture

28 Apr 2015 - 9:26 am | प्रचेतस

टेम्प्टींग एकदम.

वॉव ! भारी दिसतोय हा प्रकार !!!

पिलीयन रायडर's picture

28 Apr 2015 - 10:45 am | पिलीयन रायडर

अहाहाहाहाहा!!!!!!

मदनबाण's picture

28 Apr 2015 - 11:34 am | मदनबाण

मस्तच ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt

स्मिता श्रीपाद's picture

28 Apr 2015 - 11:45 am | स्मिता श्रीपाद

कसलं सुंदर दिसतय ग हे...
मस्तच...

पियुशा's picture

28 Apr 2015 - 11:49 am | पियुशा

यम्मी...

किसन शिंदे's picture

28 Apr 2015 - 12:10 pm | किसन शिंदे

एक नंबर पाककृती आणि सादरीकरणही.

पैसा's picture

28 Apr 2015 - 12:18 pm | पैसा

लै भारी!

सानिकास्वप्निल's picture

28 Apr 2015 - 12:24 pm | सानिकास्वप्निल

अहाहा! लेमनीशियस !

सुरेख पाकृ आणि जबरी फोटो :)
सिट्र्स फ्लेव्हरची मी पंखी आहे , मला डिझर्ट्मधे सिट्र्स फ्लेव्हर खूप आवडतं सो ही पाकृ खासचं आवडली.

कविता१९७८'s picture

28 Apr 2015 - 12:26 pm | कविता१९७८

मस्तच

सगळ्यांना धन्यवाद. मंडळ आपले आभारी आहे. :)

दिपक.कुवेत's picture

28 Apr 2015 - 1:45 pm | दिपक.कुवेत

डोळे मिटल्या गेल्या आहेत.....अप्रतिम, खल्लास!!

मधुरा देशपांडे's picture

28 Apr 2015 - 1:55 pm | मधुरा देशपांडे

फोटो आणि सादरीकरण एवढे सुंदर की पा़कृ वाचणे काही जमले नाही.

स्नेहानिकेत's picture

28 Apr 2015 - 1:58 pm | स्नेहानिकेत

आहाहा! भारीच दिसतयं हे !!!! मस्त एकदम.

नीलमोहर's picture

28 Apr 2015 - 5:01 pm | नीलमोहर

मस्त !!!

इतकी क्यूट पाकृ खाऊन टाकायची म्हणजे वाईट वाटेल.
खूपच छान फोटू व कृतीही.

अनन्न्या's picture

28 Apr 2015 - 7:07 pm | अनन्न्या

एकदम तोंपासू

स्वाती दिनेश's picture

28 Apr 2015 - 11:31 pm | स्वाती दिनेश

मृ, मस्तच दिसत आहेत ग कर्डकप्स.. क्लास!
स्वाती

इशा१२३'s picture

29 Apr 2015 - 1:12 pm | इशा१२३

मस्तच!

आहाहा...झककास पाकृ..यम यम..

अतिशय सुंदर !!!फक्त बघूच शकते ....करणे शक्यच नाही .. आम्ही आपले झटपट पदार्थ बनवणारे !!

थँक्स.. पण खरच खुप सोपे आहे. एकदा करुन बघ.

फारच सुंदर आहे हे - अर्थातच जमेल असे वाटत नाही, त्यामुळे फोटोवरच समाधान! :-)

माझीही शॅम्पेन's picture

19 Jul 2015 - 9:22 pm | माझीही शॅम्पेन

मुळात फिलो शीट्स हा प्रकार नक्की काय आहे ?

हा भारतात नक्की कुठे मिळतो ?

अजुन एक साधारण भारतीय घरात ओवन नसतो तर मग कस काय करता येईल ?

पद्मावति's picture

20 Jul 2015 - 11:20 am | पद्मावति

कप्स अगदी परफेक्ट बेक झालेले दिसताहेत.
आतलं लेमन कर्ड पण एकदम छान.

मला वाटते आपल्याकडे सुपर मार्केट्स मधे ह्या फिलो शीट्स किंवा पेस्ट्री शीट्स नक्कि मिळत असणार. ओवन नसेल तर करणे जरा अवघड आहे. विचार करायला लागेल. :)

माझीही शॅम्पेन's picture

22 Jul 2015 - 8:12 pm | माझीही शॅम्पेन

धन्यवाद मृणालिनी ,
घरी ओवन नाही (बहुतेक भारतीय घरांप्रमाणे) त्यामुळे मिळाले तरी काही करता येणार नाही :)