प्रयत्न चांगला आहे. तुम्हाला यासंदर्भात काही सांगितले तर आवडेल का? :B
शेडिंगवरचा तुमचा हात खरोखर चांगला आहे, प्रत्येकाला तो साधत नाही.
पण मूळ प्रतिमा त्यामानाने ढोबळ वाटतात. असे का वाटावे? एखाद्या चित्रात काय रेखाटणे सर्वात महत्वाचे, ते ठरवायचे असते. ते आधी ठरवायचे अन् मग त्यानुसार रेखाटन करायचे. चेहेर्याचे रेखाटन करतांना चेहेर्याची ठेवण, त्यावरचे भाव, डोळ्यांची नेमकी दिशा या सर्व गोष्टी प्रकर्षाने चित्रीत व्हायला हव्यात. शेडींग हे कशासाठी करतात? मूळ विषय अकृत्रीम वाटावा यासाठी. त्याने पूरक काम करायचे असते. ते जर नाही साधले तर चित्राची परिणामकारकता कमी होते.
मला वाटते तसे वर मांडले आहे. चु.भू.द्या.घ्या. :)
शेवटचे चित्र खूप छान आले आहे. केस आणि डोळे. डोळे अतिशय बोलके आले आहेत. चेहर्यावरील खट्याळ हसूही एकदम मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
18 Aug 2008 - 10:21 am | मदनबाण
शेवटच चित्र फार आवडल्..विशेषतः चेहेर्यावर आलेले केस!! डोळे सुद्दा फार छान आलेत..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
18 Aug 2008 - 11:27 am | ध्रुव
हेच म्हणतो. या चित्रातील केस फारच भारी....
--
ध्रुव
18 Aug 2008 - 10:35 am | नरेंद्र गोळे
उदयजी, शेवटले चित्र आवडले. नितांत सुंदर आहे!
डोक्यावरचे चेहर्यावर विहरणारे केस एवढे सुंदर रेखाटलेत, अक्षरश: सजीवच केलेले आहेत,
मग पापण्यांच्या केसांवरच का हो अन्याय केलात?
18 Aug 2008 - 10:40 am | visshukaka
अरे उदय,
फारच छान बुवा, तेव्हडि रेखा जरा सोडुन
18 Aug 2008 - 11:30 am | विसोबा खेचर
सर्व चित्रे बरी आहेत...
शुभेच्छा...
तात्या.
18 Aug 2008 - 11:49 am | ईश्वरी
शेवटचे चित्र आवडले. छान आले आहे.
दुसर्या चित्रात आरशातील प्रतिमा त्या स्त्री पेक्षा वेगळी वाटत आहे.
ईश्वरी
18 Aug 2008 - 11:59 am | किर्ति
शेवट चे चित्र आवडले
18 Aug 2008 - 12:15 pm | राघव१
मला का कुणास ठाऊक चित्र दिसतच नाहीयात :(
कुणी सांगू शकेल का असं का होतंय ते?
(बेचैन) राघव
18 Aug 2008 - 3:24 pm | राघव१
प्रयत्न चांगला आहे. तुम्हाला यासंदर्भात काही सांगितले तर आवडेल का? :B
शेडिंगवरचा तुमचा हात खरोखर चांगला आहे, प्रत्येकाला तो साधत नाही.
पण मूळ प्रतिमा त्यामानाने ढोबळ वाटतात. असे का वाटावे? एखाद्या चित्रात काय रेखाटणे सर्वात महत्वाचे, ते ठरवायचे असते. ते आधी ठरवायचे अन् मग त्यानुसार रेखाटन करायचे. चेहेर्याचे रेखाटन करतांना चेहेर्याची ठेवण, त्यावरचे भाव, डोळ्यांची नेमकी दिशा या सर्व गोष्टी प्रकर्षाने चित्रीत व्हायला हव्यात. शेडींग हे कशासाठी करतात? मूळ विषय अकृत्रीम वाटावा यासाठी. त्याने पूरक काम करायचे असते. ते जर नाही साधले तर चित्राची परिणामकारकता कमी होते.
मला वाटते तसे वर मांडले आहे. चु.भू.द्या.घ्या. :)
राघव
18 Aug 2008 - 12:50 pm | पावसाची परी
शेवटचे चित्र भारी सुरेख आहे
तिचे केस्/डोळे हसण फारच मोहक अदा दिसुन येतेय
18 Aug 2008 - 1:55 pm | चंबा मुतनाळ
भारीच आहेत स्केचेस
18 Aug 2008 - 2:00 pm | अनिल हटेला
पहील चित्र जास्त आवडल!!!
आणी माधुरी चे आपण पंखे आहात असा ग्रह झालाये ..बरोबर ना?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
18 Aug 2008 - 5:06 pm | प्राजु
शेवटचे चित्र खूप छान आले आहे. केस आणि डोळे. डोळे अतिशय बोलके आले आहेत. चेहर्यावरील खट्याळ हसूही एकदम मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/