बागकाम - एक छंद
कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा
(फलांच्या प्रदर्शनांतले फोटो साभार)
बागकामाची आवड असणारे आपली हौस घराभोवती फळाफुलांची झाडे लावून पुरवतात. शहरातले, इमारतीच्या गच्चीवर अथवा बाल्कनीत फुलझाडे आणि पुदिना,आले,तुळस,गवतीचहा वगैरे उपयुक्त झाडे कुंड्यांतून वाढवतात. अगदी काहीच नाहीतरी खिडकीत एखादा मनिप्लांट असतो. आपल्या बागेतले फोटो इथे दाखवता येतील. काही प्रश्नही विचारता येतील.या छंदाविषयीची माहिती आणि फोटो एकाच ठिकाणी राहतील. आज गुढी पाडव्याच्या दिवशी सुरुवात करुया.
बाहेरगावी दहा दिवस गेल्यास बाल्कनीतली झाडे कशी जगवायची? मातीच्या कुंडीतले पाणी लगेच सुकते.- जी झाडे वाळली तरी चालतील -तुळस,सदाफुली,सोनटक्का,हळद,पुदिना अशी बाथरूममध्ये ठेवायची . महत्त्वाची झाडे गुलाब वगैरे,काही चमेली सायली वेली यांचे मातीपासूनचा एक फुट भाग ठेवून बाकी कापून टाकायचा .एक तासभर ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवायची. जी झाडे कुंडीतून काढून प्लास्टिक पिशव्यांत हलवता येतील ती आठ दिवस अगोदरच हलवावीत. पिशव्या पाणी अधिक दिवस धरून ठेवतात. एका ट्रेमध्ये या पिशव्या ठेवून दोन इंच पाणी ठेवावे. बाल्कनीच्या कट्ट्याच्या बाहेर लोखंडी ग्रिलमधल्या कुंड्या काढून आतमध्ये ऊन लागेल अशा जागी ठेवाव्यात.
प्रतिसादातले माझ्या बाल्कनीतल्या बागेतले तीन फोटो-
१
२
३ भातावरच्या मुनिया
कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बाहेरगावी जातांना झाडे
या धाग्याला "कृषी" मध्ये
ते कृषी आता
यशोधरा — 1 Dec 2018 - 18:09
बरीच झाडे दिसताहेत.
जाळीच्या टोपलीची कल्पना मस्त
कंकाका, मागील वेळी मी
चिनी गुलाब थंडीत मलूल होतो.
पुदिन्यावर रोग पडला आहे.
पुदिन्याची पाने तोडून लगेच
धन्यवाद
थर्माकोलच्या खोक्यात नको.
ठिक आहे. तसेच करतो.
नर्सरीत वांग्याचे बियाणं
जमीन नाही आहे,
भाजीसाठी आणलेल्या चवळाईच्या(
भारी. पिशवीत लावलंय का?
चवळीची भाजीच. त्याचे शेंडे
कुठे होता
@ vcdatrange ,बागकाम - एक छंद