चतुराई

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
16 Aug 2008 - 5:08 pm

चतुर. एक साधा किटक. पण थेट काही दशके मागे नेणारा. शाळेतले दिवस आठवायला लावणारा. फुलपाखरे, टाचण्या आणि चतुर हे विशेष कुतुहलाचे विषय. काही मुले फुलपाखरे पकडायची व बाटलीत ठेवायची. मग ती मेल्यावर पंख पुस्तकात घालायचे! हा प्रकार मला कधीच आवडला नाही. त्या काळी प्रकाशचित्रणाचा नाद नव्हता आणि अक्कलही नव्हती (अजुनही नाहिये म्हणा; पण हातात क्यामेरा तर आहे?)

मला चतुर आणि टाचण्या अधिक आवडायच्या. चतुर बरे. दबकत जाऊन पकडायचे आणि शेपटाला बारीक घागा बांधुन पतंगासारखे उडु द्यायचे. मग थोडा वेळ मस्ती झाली की धागा तोडुन टाकायचा आणि सोडुन द्यायचे. टाचण्या मात्र फार नाजुक. त्या पकडल्या तरी अगदी अल्गद सांभाळाव्या लागायच्या, उगाच आपल्या हातुन काही व्हायला नको. शेपटीला धागा बांधायला जायचो आणि शेपुट तुटायची.

चतुराच्या जवळ जवळ पारदर्शक असलेल्या पंखावरची जाळी खासच! संगमरवरावर वा दगडात मस्त जाळी कोरून काढावी तशी ही जाळी. मध्यंतरी एकदा बाहेरगावी गेलो होतो. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या एका पर्यटनगृहात मुक्कम होता. कधी नव्हे ते दुपारी न झोपता जरा भटकायला निघालो. कुटी च्या बाहेर आलो आणि एका वाळकटलेल्या रोपट्यावरच्या चतुराकडे लक्ष गेले. बरोबर कॅमेरा होताच. तात्काळ सरसावला आणि त्याची छबी टिपली.

डांग्या चतुर त्या मानाने जरा मोठा. आणि त्याच्या पंखांचा आवाजही अधिक फरफराटी. पकडायला भिती वाटायची. लालभडक शेपुट पाहुन या नांगीत विष असेल का? आणि नांगी मारली तर काय होईल ही धास्ती वाटायची. मग काही टगी मुले आपण पकडलेला डांग्या चतुर घेउन मोठ्या रुबाबात फिरायची. आत्ता फिरतानाही असाच एक डांग्या चतुर दिसला. गडद गुलाबी अंग, प्रत्येक जोडाला गुलाबी रंगाच्या कडेला लालभडक रंगाच्या रेषा. पंखांवर काळ्या भागावर मात करणारी लालगडद पण नाजुक जाळी. स्वारी पंख मुडपून एवढ्या एकाग्रतेने त्या वाळलेल्या शुष्क फुलात काय पाहत होती कोण जाणे.

मधेच विचलीत होत तो चतुर उडाला आणि काही वेळ भिरभिर करून व माझी थोडी दमछाक करून पुन्हा जवळच्याच एका फुलावर येऊन बसला. स्वारी जरा आरामत बसलेली दिसली तरी पंख आखडलेलेच होते. कदाचित बसायचे की नाही हे ठरत नसावे.

अलगद पाय न वाजवता त्याची तंद्री भंग न करता मी वळसा घेत दुसर्‍या अंगाने गेलो. आता या कोनातुन त्याचे डोके पंखातून आरपार दिसत होते. जणु डोक्यावर जाळिदार ओढणी घेतलेली एखादी रमणी.

त्या परिसरात चतुर बरेच असावेत. थोडे पुढे गेलो असता अचानक एका झुडुपावर एक काळे ठिपके असलेल्या सोनेरी पंखांचा चतुर दिसला आणि मी नकळत तिकडे सरकलो. बराच वेळ पाठ शिवणीचा खेळ खेळुन झाल्यावर हे महाशय एका दूरच्या खुरट्या झुडुपावर स्थिरावले. वाटेत एक डबके, आजुबाजुला काटेरी झाडे. अखेर होतो तिथुनच मधे येणार्‍या फांद्या व पाने चुकवुन त्याचे पंख टिपले. जमले तसे. पलिकडुन हाक आली. बाहेर जायचे होते. कॅमेरा म्यान केला नी निघालो.

कलाप्रवासमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

16 Aug 2008 - 5:21 pm | यशोधरा

मस्त फोटो! कोणता कॅमेरा?

चंबा मुतनाळ's picture

16 Aug 2008 - 5:48 pm | चंबा मुतनाळ

क्लास फोटू काढले आहेत.
मला पण लहानपणची आठवण झाली. चतुराच्या शेपटिला दोरा बांधणे वगैरे!!
कॅमेर्‍याची सेटिंग्स मात्र द्यावीत

भडकमकर मास्तर's picture

16 Aug 2008 - 5:49 pm | भडकमकर मास्तर

शीर्षकावरून कल्पना आली नाही, आत काय असेल...
वरचे सर्वच फोटो उत्तम आहेत...

डोक्यावर जाळिदार ओढणी घेतलेली एखादी रमणी.

ही उपमा भन्नाट...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सूर्य's picture

16 Aug 2008 - 6:41 pm | सूर्य

चतुरचे चतुराईने काढलेले फोटो सुंदर आले आहेत. एवढे चतुर आपल्याला कुठुन मिळाले :). आपल्याकडे कॅमेरा कोणता आहे. असेच अजुन फोटो इथे डकवावेत ही विनंती.

- सूर्य.

सहज's picture

16 Aug 2008 - 6:44 pm | सहज

चतुर कॅमेरामॅन!

:-)

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Aug 2008 - 6:50 pm | ब्रिटिश टिंग्या

एकदम सुरेख छायाचित्रे!

कॅमेरा कोणता होता?

मदनबाण's picture

17 Aug 2008 - 5:01 am | मदनबाण

सर्वच फोटो फार सुरेख आहेत..
चतुर तसा एका जागी जास्त वेळ स्थिर बसत नाही,,तुम्ही त्याला कसे टिपले ??
कॅमेरा कोणता आहे?किती X zoom ?

(निकॉन प्रेमी)
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विसोबा खेचर's picture

17 Aug 2008 - 8:59 am | विसोबा खेचर

साक्षीदेवा,

आहेस खरा चतूर! :)

सर्वच फोटू सुरेख आले आहेत. साला लहनपणी चतूर पकडायचो त्याची आठवण झाली! :)

वरून तिसर्‍या चित्रातल्या चतुराचा रंग तर फारच मोहक आहे! :)

आपला,
(चतूर आणि फुलपाखरांचा प्रेमी) तात्या.

शितल's picture

17 Aug 2008 - 9:11 am | शितल

खुपच सुंदर फोटो आहेत.
सगळे कॅमेरा विचारत आहेत, पण तुमच्या फोटोग्राफीला आमचा सलाम. :)

देवदत्त's picture

17 Aug 2008 - 9:57 am | देवदत्त

छान आहेत फोटो :)
ह्याचे एवढे प्रकार आणि नावे माहित नव्हती. आम्ही फक्त चतुर म्हणून पकडायचो. ते पण त्यांच्या पंखांवर. पण नंतर त्यांचे पंख माझ्या हातून तुटू लागले तेव्हा मी सोडून दिला हा प्रकार.

ह्यालाच काहीजण 'हेलिकॉप्टर' ही म्हणतात :)

श्रीकृष्ण सामंत's picture

17 Aug 2008 - 10:12 am | श्रीकृष्ण सामंत

आपला चतूर -कोकणात आम्ही त्याला "भिरमुटा" म्हणतो, त्याचे फोटो आणि त्याची अभ्यासलेली माहिती खरोखरंच अवर्णनीय आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सर्वसाक्षी's picture

17 Aug 2008 - 1:00 pm | सर्वसाक्षी

मिपाकरांनो,

धन्यवाद. चित्रे आपल्याला आवडली, बरे वाटले.
कॅमेरा निकॉन डी ६०. भिंगसंच - नि़क्कॉर १८-७० आणि सिग्मा ८०-३००.

देवदत्ता, 'हेलीकॉप्टर' अगदी योग्य नाव आहे. विशेषत: जेव्हा चतुर हवेत एका जागी स्थिर होतो तेव्हा खात्री पटते की हेलिकॉप्टर ची कल्पना चतुरा वरूनच सुचली असावी.

प्रियाली's picture

17 Aug 2008 - 5:11 pm | प्रियाली

सर्व चित्रे उत्तम आहेत. चतुर रंगीबेरंगी असतात हे माहित आहे पण त्यांचे रंग किती खुलून दिसतात हे या फोटोंतून कळले.

रेशमी वस्त्रे परिधान केलेली रमणीच जणू.

प्राजु's picture

17 Aug 2008 - 9:16 pm | प्राजु

चतुराकडे इतके रंग असतात हे समजलच नव्हतं कधी. आपल्या फोटोग्राफीला सलाम. उत्तम आले आहेत सगळेच फोटो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

17 Aug 2008 - 9:29 pm | चतुरंग

अशी प्रकाशचित्रे काढायला प्रचंड पेशन्स हवा तो तुमच्याकडे आहे. हॅट्स ऑफ!
गुलाबी चतुर आणि ओढणीवाली रमणी फारच कल्पक आणि मोहून टाकणारी चित्रे.
सर्वच चतु(र)रंग आवडले! ;)

(खुदके साथ बातां : रंगा, हे खरे चतुरंग. तू जे उधळतोस ना ते नुसतेच रंग बरं! ~X( शीक शीक जरा निसर्गापासून! :? )

चतुरंग