* अभिनव मोडी लिपी स्पर्धा *

समिर२०'s picture
समिर२० in जनातलं, मनातलं
17 Mar 2015 - 12:18 pm

माझे मित्र श्री परेश जोशी आणि मोडी लिपीचा प्रसार करणारे त्यांचे सहकारी यांनी येत्या महाराष्ट्र दिनी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

* अभिनव मोडी लिपी स्पर्धा *

... एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्राच्या चार शहरात ...

(१) " सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा "
(२) " शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा "

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०१५ या दिवशी एकाच वेळी मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या शहरांमध्ये मोडी लिपीची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

(१) " सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा "

वेळ : सकाळी १०.०० ते ११.०० वेळ मर्यादा : एक तास

यात एक पान देवनागरी लिपीतील उतारा दिला जाईल. त्याचे मोडी लिपीत लिप्यंतर करावयाचे आहे. अक्षर चूका ग्राह्य धरल्या जातील. एका अक्षरास अनेक पर्याय असल्यास कोणतेही पर्याय वापरण्यास मुभा आहे.

सूचना : कागद आयोजक पूरवतील. स्पर्धकांना स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेंसिल, कोड रब्बर, फूट पट्टी आणि राईटींग पॅड आणावयाचा आहे. �

(२) " शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा "

वेळ : सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वेळ मर्यादा : एक तास

यात १ शिवकालीन आणि १ पेशवेकालीन कागद दिला जाईल दोन्ही कागदांकरिता अर्धा-अर्धा तास दिला आहे. स्पर्धक तो एक तास स्वत:स हवा तसा वापरू शकतात.

सूचना : कागद आयोजक पूरवतील. स्पर्धकांना स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेंसिल, कोड रब्बर, फूट पट्टी आणि राईटींग पॅड आणावयाचा आहे.

प्रथम तीन विजेत्यास उत्तम परितोषीक असून इतर सर्वांस स्पर्धे अंती मोडी सरावा करिता साहित्य दिले जाईल. स्पर्धा व निकाल प्रक्रीयेचे सर्व हक्क आयोजकांकडे राहतील.

प्रवेश : एका स्पर्धेचा सहभाग शुल्क ₹ १०० आहे तर दोन्ही स्पर्धेचा सहभाग शुल्क ₹ १५० आहे.

स्पर्धा केंद्र :

(१) मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क,
दापर (प), मुंबई - ४०० ०२८
संपर्क क्रमांक : ०२२-२४४६५८७७

(२) अहमदनगर : अहमदनगर ऐतिहासीक वास्तु संग्रहालय
हातमपुरा, कलेक्टर कचेरी शेजारी,
अहमदनगर - ४१४ ००१
संपर्क अधिकारी : श्री.सतोष यादव
संपर्क क्रमांक : ९३७२१-५५४५५

(३) नाशिक : चिंतामणीज मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग
१६६५, ए/२, तिळभांडेश्वर पथ,
दिल्ली दरवाजा, नाशिक - ४२२ ००१
संपर्क अधिकारी : श्री.अरविंद साने
संपर्क क्रमांक : ९८५०७-४६१७२

(४) पुणे : स्थळ निश्चित व्हायचे आहे.
संपर्क अधिकारी : श्री.परेश जोशी
संपर्क क्रमांक : ९८८११-०४३७९

स्पर्धा निष्पक्ष व पारदर्शक ठेवण्याकरिता ठरलेल्या वेळीच प्रारंभ होईल आणि थांबिवली जाईल. तेच कागद चरंही केन्द्रावर दिले जातील आणि वेळेची कटीबद्धता पाळली जाईल.

प्रवेश अर्ज स्पर्धा ठिकाणी शुल्का सहीत सुपूर्द करायचा आहे. काही दिवसात येथे अप्लोड केला जाईल जो डाऊनलोड करून स्पर्धा ठिकाणी नोंदणी पक्की करावयाची आहे. प्रत्येक केंद्रावर स्पर्धक मर्यादा १०० ठेवण्यात आली आहे. प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य या तत्त्वावर.

स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या: https://www.facebook.com/events/403735983140079/

इतिहासवाङ्मयभाषाव्याकरणशुद्धलेखनप्रकटनशिफारस

प्रतिक्रिया

माहितगार's picture

17 Mar 2015 - 12:48 pm | माहितगार

स्पर्धेस शुभेच्छा !

*एक अनुषंगिक अवांतर, मोडी युनिकोडवर उपलब्ध झाली म्हणून ऐकले होते. तिची ऑनलाईन टायपींग सुविधा उपलब्ध होण्या बाबत काही प्रगती झाली आहे किंवा कसे ? किमान युनिकोड मोडी अक्षरे च्योप्य पेस्त तरी करता येऊ शकतील का ?

जेपी's picture

17 Mar 2015 - 12:48 pm | जेपी

उपक्रमाला शुभेच्छा..
भाग घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2015 - 12:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मोडी लिपी कुठे शिकायला मिळेल?

अन्या दातार's picture

17 Mar 2015 - 1:41 pm | अन्या दातार

मी मागे पुण्यात प्रशिक्षण शिबिरासाठी चौकशी केली होती, पण निगडी-आकुर्डीपासून खुप लांब पडत असल्याने जमले नाही.

मलाही शिकायची आहे मोडी लिपी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2015 - 1:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठी सापडलं तर कॉलव मला. आपण बघु जमतय का अंतरात आणि वेळेत.

सांरा's picture

17 Mar 2015 - 1:24 pm | सांरा

उपक्रमासाठी शुभेच्छा...
एक प्शन- मला मोडी येते पण मी या चारही शहरांत राहात नाही. विदर्भात कोणत्यातरी शहरात याचे आयोजन नाही होऊ शकत काय ?

हे स्पर्धेचे पहिलेच वर्ष आहे आणि विदर्भात स्पर्धा घेण्याकरिता प्रतिनिधी आणि मनुष्यबळ नसल्यामुळे यंदा शक्य नाही. पुढील वर्षी नक्कीच प्रयत्न करू

प्रसाद१९७१'s picture

17 Mar 2015 - 3:39 pm | प्रसाद१९७१

विदर्भावर कायमच अन्याय होतो ह्या महाराष्ट्रात. म्हणुनच 'बबन्'ची वेगळ्या विदर्भाची मागणी अगदी योग्य आहे.
मोडीच्या स्पर्धेचाही अनुशेष. :-( पुढच्या वर्षी विदर्भात २ स्पर्धा घ्या.

उपक्रमाला शुभेच्छा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2015 - 1:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

उपक्रमाला अनेक शुभेच्छा !

मलाही मोडी लिपि शिकायची आहे.

परेश१४'s picture

17 Mar 2015 - 3:25 pm | परेश१४

सर्वांचे आभार!

मला मोडी शिकायची आहे, पुण्यात क्लासेस असतील तर कळवा.

झकास's picture

17 Mar 2015 - 4:11 pm | झकास

मिपा वरच्या ह्या संदर्भातील जुन्या धाग्याची link
http://www.misalpav.com/node/17048

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2015 - 6:22 pm | अत्रुप्त आत्मा

उपक्रमास शुभेच्छा! :)

प्रचेतस's picture

17 Mar 2015 - 6:30 pm | प्रचेतस

उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Mar 2015 - 6:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चांगला उपक्रम रे समिरा.वयाने साथ दिली असती तर नक्कीच भाग घेतला असता.

पुण्यात सदाशिव पेठेत "भारत ईतिहास संशोधक मंडळ" मोडीचे वर्ग, कोणतेही मुल्य न घेता चालवतात.
इथे Google+ आणि ईथे Wiki माहिती मिळेलं.

एकदा का मोडी साधारण जमायला लागली की, तुम्ही मंडळाकडे भाषांतरासाठी काम करू शकता. मंडळाकडे बरेच जुने ऐतिहासीक दस्तावेज आहेत. त्यांचे मारठीत भाषांतर करण्यासाठी त्याना मोडी जाणकारांची गरज आसते.

मी पुण्यात वडगांवशेरी येथे रहायला होतो. माझ्याकडे वाहन नसल्याने, संध्याकाळच्यावेळी सदाशिव पेठेत जाणे जमत नसे. लेले? सरांनी (नावं आठवत नाही), मोडी बाराखडीची प्रत दिली, आणि एक पुस्तक विकत घेण्यास सांगीतल. कोणाला स्वतः शिकण्याची ईच्छा असेल सांगा बाराखडी इकडे डकवतो.

ता.क: ठाण्यामध्ये ही कुठेतरी मोडीवर्ग भरतात. नक्की कुठे ते नाही माहीत.

मोडी लिपी स्वंअध्ययन द्वारे शिकायची ज्यांची इच्छा असेल ते मला व्यनी करु शकतात.
माझ्याकडे काही ई-नोट्स आहेत.

श्रेय-मिपाकर सुहास झेले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2015 - 9:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मोड(डी)र्हित जेपी.

तेवढ जिवनाच कल्याण आमी करत नाय... *beee*

फायरहिट-जेपी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2015 - 9:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

बॅटमॅन's picture

1 Apr 2015 - 2:38 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

समिर२०'s picture

1 Apr 2015 - 2:19 pm | समिर२०

स्पर्धा केंद्र : पुणे
डी. आर. नगरकर प्रशाला
४४/१३४, नवसह्याद्री सोसायटी, कर्वे नगर
नवसह्याद्री टेनिसकोर्ट शेजारी,
म्हात्रे पूल डी पी रस्ता पुणे ४११०५२