✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

* अभिनव मोडी लिपी स्पर्धा *

स
समिर२० यांनी
Tue, 03/17/2015 - 12:18  ·  लेख
लेख
माझे मित्र श्री परेश जोशी आणि मोडी लिपीचा प्रसार करणारे त्यांचे सहकारी यांनी येत्या महाराष्ट्र दिनी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे: * अभिनव मोडी लिपी स्पर्धा * ... एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्राच्या चार शहरात ... (१) " सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा " (२) " शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा " महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०१५ या दिवशी एकाच वेळी मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या शहरांमध्ये मोडी लिपीची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. (१) " सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा " वेळ : सकाळी १०.०० ते ११.०० वेळ मर्यादा : एक तास यात एक पान देवनागरी लिपीतील उतारा दिला जाईल. त्याचे मोडी लिपीत लिप्यंतर करावयाचे आहे. अक्षर चूका ग्राह्य धरल्या जातील. एका अक्षरास अनेक पर्याय असल्यास कोणतेही पर्याय वापरण्यास मुभा आहे. सूचना : कागद आयोजक पूरवतील. स्पर्धकांना स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेंसिल, कोड रब्बर, फूट पट्टी आणि राईटींग पॅड आणावयाचा आहे. � (२) " शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा " वेळ : सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वेळ मर्यादा : एक तास यात १ शिवकालीन आणि १ पेशवेकालीन कागद दिला जाईल दोन्ही कागदांकरिता अर्धा-अर्धा तास दिला आहे. स्पर्धक तो एक तास स्वत:स हवा तसा वापरू शकतात. सूचना : कागद आयोजक पूरवतील. स्पर्धकांना स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेंसिल, कोड रब्बर, फूट पट्टी आणि राईटींग पॅड आणावयाचा आहे. प्रथम तीन विजेत्यास उत्तम परितोषीक असून इतर सर्वांस स्पर्धे अंती मोडी सरावा करिता साहित्य दिले जाईल. स्पर्धा व निकाल प्रक्रीयेचे सर्व हक्क आयोजकांकडे राहतील. प्रवेश : एका स्पर्धेचा सहभाग शुल्क ₹ १०० आहे तर दोन्ही स्पर्धेचा सहभाग शुल्क ₹ १५० आहे. स्पर्धा केंद्र : (१) मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दापर (प), मुंबई - ४०० ०२८ संपर्क क्रमांक : ०२२-२४४६५८७७ (२) अहमदनगर : अहमदनगर ऐतिहासीक वास्तु संग्रहालय हातमपुरा, कलेक्टर कचेरी शेजारी, अहमदनगर - ४१४ ००१ संपर्क अधिकारी : श्री.सतोष यादव संपर्क क्रमांक : ९३७२१-५५४५५ (३) नाशिक : चिंतामणीज मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग १६६५, ए/२, तिळभांडेश्वर पथ, दिल्ली दरवाजा, नाशिक - ४२२ ००१ संपर्क अधिकारी : श्री.अरविंद साने संपर्क क्रमांक : ९८५०७-४६१७२ (४) पुणे : स्थळ निश्चित व्हायचे आहे. संपर्क अधिकारी : श्री.परेश जोशी संपर्क क्रमांक : ९८८११-०४३७९ स्पर्धा निष्पक्ष व पारदर्शक ठेवण्याकरिता ठरलेल्या वेळीच प्रारंभ होईल आणि थांबिवली जाईल. तेच कागद चरंही केन्द्रावर दिले जातील आणि वेळेची कटीबद्धता पाळली जाईल. प्रवेश अर्ज स्पर्धा ठिकाणी शुल्का सहीत सुपूर्द करायचा आहे. काही दिवसात येथे अप्लोड केला जाईल जो डाऊनलोड करून स्पर्धा ठिकाणी नोंदणी पक्की करावयाची आहे. प्रत्येक केंद्रावर स्पर्धक मर्यादा १०० ठेवण्यात आली आहे. प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य या तत्त्वावर. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या: https://www.facebook.com/events/403735983140079/
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
वाङ्मय
भाषा
व्याकरण
शुद्धलेखन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शिफारस

प्रतिक्रिया द्या
6345 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

स्पर्धेस शुभेच्छा !

माहितगार
Tue, 03/17/2015 - 12:48 नवीन
स्पर्धेस शुभेच्छा ! *एक अनुषंगिक अवांतर, मोडी युनिकोडवर उपलब्ध झाली म्हणून ऐकले होते. तिची ऑनलाईन टायपींग सुविधा उपलब्ध होण्या बाबत काही प्रगती झाली आहे किंवा कसे ? किमान युनिकोड मोडी अक्षरे च्योप्य पेस्त तरी करता येऊ शकतील का ?
  • Log in or register to post comments

उपक्रमाला शुभेच्छा..

जेपी
Tue, 03/17/2015 - 12:48 नवीन
उपक्रमाला शुभेच्छा.. भाग घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • Log in or register to post comments

मोडी लिपी कुठे शिकायला मिळेल?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/17/2015 - 12:51 नवीन
मोडी लिपी कुठे शिकायला मिळेल?
  • Log in or register to post comments

मी मागे पुण्यात प्रशिक्षण

अन्या दातार
Tue, 03/17/2015 - 13:41 नवीन
मी मागे पुण्यात प्रशिक्षण शिबिरासाठी चौकशी केली होती, पण निगडी-आकुर्डीपासून खुप लांब पडत असल्याने जमले नाही. मलाही शिकायची आहे मोडी लिपी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठी सापडलं तर कॉलव मला. आपण

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/17/2015 - 13:59 नवीन
कुठी सापडलं तर कॉलव मला. आपण बघु जमतय का अंतरात आणि वेळेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

उपक्रमासाठी शुभेच्छा...

सांरा
Tue, 03/17/2015 - 13:24 नवीन
उपक्रमासाठी शुभेच्छा... एक प्शन- मला मोडी येते पण मी या चारही शहरांत राहात नाही. विदर्भात कोणत्यातरी शहरात याचे आयोजन नाही होऊ शकत काय ?
  • Log in or register to post comments

हे स्पर्धेचे पहिलेच वर्ष आहे

परेश१४
Tue, 03/17/2015 - 15:20 नवीन
हे स्पर्धेचे पहिलेच वर्ष आहे आणि विदर्भात स्पर्धा घेण्याकरिता प्रतिनिधी आणि मनुष्यबळ नसल्यामुळे यंदा शक्य नाही. पुढील वर्षी नक्कीच प्रयत्न करू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांरा

विदर्भावर कायमच अन्याय होतो

प्रसाद१९७१
Tue, 03/17/2015 - 15:39 नवीन
विदर्भावर कायमच अन्याय होतो ह्या महाराष्ट्रात. म्हणुनच 'बबन्'ची वेगळ्या विदर्भाची मागणी अगदी योग्य आहे. मोडीच्या स्पर्धेचाही अनुशेष. :-( पुढच्या वर्षी विदर्भात २ स्पर्धा घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांरा

उपक्रमाला शुभेच्छा!

एस
Tue, 03/17/2015 - 13:28 नवीन
उपक्रमाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

उपक्रमाला अनेक शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 03/17/2015 - 13:48 नवीन
उपक्रमाला अनेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मलाही मोडी लिपि शिकायची आहे.

आनंदराव
Tue, 03/17/2015 - 14:26 नवीन
मलाही मोडी लिपि शिकायची आहे.
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार!

परेश१४
Tue, 03/17/2015 - 15:25 नवीन
सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments

मला मोडी शिकायची आहे, पुण्यात

सूड
Tue, 03/17/2015 - 15:48 नवीन
मला मोडी शिकायची आहे, पुण्यात क्लासेस असतील तर कळवा.
  • Log in or register to post comments

जुन्या धाग्याची link

झकास
Tue, 03/17/2015 - 16:11 नवीन
मिपा वरच्या ह्या संदर्भातील जुन्या धाग्याची link http://www.misalpav.com/node/17048
  • Log in or register to post comments

उपक्रमास शुभेच्छा!

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/17/2015 - 18:22 नवीन
उपक्रमास शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

प्रचेतस
Tue, 03/17/2015 - 18:30 नवीन
उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मस्त

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/17/2015 - 18:35 नवीन
चांगला उपक्रम रे समिरा.वयाने साथ दिली असती तर नक्कीच भाग घेतला असता.
  • Log in or register to post comments

पुण्यात सदाशिव पेठेत "भारत

Keanu
Tue, 03/17/2015 - 20:41 नवीन
पुण्यात सदाशिव पेठेत "भारत ईतिहास संशोधक मंडळ" मोडीचे वर्ग, कोणतेही मुल्य न घेता चालवतात. इथे Google+ आणि ईथे Wiki माहिती मिळेलं. एकदा का मोडी साधारण जमायला लागली की, तुम्ही मंडळाकडे भाषांतरासाठी काम करू शकता. मंडळाकडे बरेच जुने ऐतिहासीक दस्तावेज आहेत. त्यांचे मारठीत भाषांतर करण्यासाठी त्याना मोडी जाणकारांची गरज आसते. मी पुण्यात वडगांवशेरी येथे रहायला होतो. माझ्याकडे वाहन नसल्याने, संध्याकाळच्यावेळी सदाशिव पेठेत जाणे जमत नसे. लेले? सरांनी (नावं आठवत नाही), मोडी बाराखडीची प्रत दिली, आणि एक पुस्तक विकत घेण्यास सांगीतल. कोणाला स्वतः शिकण्याची ईच्छा असेल सांगा बाराखडी इकडे डकवतो. ता.क: ठाण्यामध्ये ही कुठेतरी मोडीवर्ग भरतात. नक्की कुठे ते नाही माहीत.
  • Log in or register to post comments

मोडी लिपी स्वंअध्ययन द्वारे

जेपी
Tue, 03/17/2015 - 20:54 नवीन
मोडी लिपी स्वंअध्ययन द्वारे शिकायची ज्यांची इच्छा असेल ते मला व्यनी करु शकतात. माझ्याकडे काही ई-नोट्स आहेत. श्रेय-मिपाकर सुहास झेले.
  • Log in or register to post comments

मोड(डी)र्हित जेपी.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/17/2015 - 21:03 नवीन
मोड(डी)र्हित जेपी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

तेवढ जिवनाच कल्याण आमी करत

जेपी
Tue, 03/17/2015 - 21:10 नवीन
तेवढ जिवनाच कल्याण आमी करत नाय... *beee* फायरहिट-जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

(No subject)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/17/2015 - 21:13 नवीन
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ठ्ठो =))

बॅटमॅन
Wed, 04/01/2015 - 14:38 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

स्पर्धा केंद्र : पुणे

समिर२०
Wed, 04/01/2015 - 14:19 नवीन
स्पर्धा केंद्र : पुणे डी. आर. नगरकर प्रशाला ४४/१३४, नवसह्याद्री सोसायटी, कर्वे नगर नवसह्याद्री टेनिसकोर्ट शेजारी, म्हात्रे पूल डी पी रस्ता पुणे ४११०५२
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा