" एकद्दाच्यं कायथे होन ज्यावूद्दये " -इती, पिंग-पॉन्ग-चू

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
15 Aug 2008 - 11:06 pm
गाभा: 

"शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड" अशी एक म्हण आहे.मांसाहाऱ्यांसाठी प्राण्याना कुठ्ल्या दिव्यातून जावं लागतं ह्याचा जरा कानोसा घेतला.आणि मग ठरवलं,
" एकद्दाच्य कायथे होन ज्यावूद्दये " -इती, पिंग-पॉन्ग-चू
दिलीप प्रभावळकर. त्यांच्या चिनी माणसाच्या भुमिकेतलं त्यांच एक वाक्य- असो.

प्रत्येक मांसाहारी माणसाने अर्ध्यानें मांस कमी खाल्लं तर अब्जानें प्राण्यांवरचं दुष्ट अत्याचार कमी होऊन त्यांचे मरण्यापासून प्राण वाचतील.
जरी तुम्हाला मांस खायाला आवडलं,तरी प्राण्यांवर होणारा दुष्ट अत्याचार वाचवुं शकता.
पाश्चात देशातील खेड्यातल्या सुंदर शेतीवाडी वरच्या वर्णनांवरच्या आनंदायी कवितांचे रुपांतर आता दुर्गंधीयुक्त कारखान्यातल्या प्राण्यांच्या शेतीत झाले आहे.दहा,दहा हजार कोंबड्या एके ठिकाणी पिंजऱ्यात बघून मनस्वी धक्का बसतो.

अंडी देणाऱ्या कोंबडींना अतिशय गर्दी असलेल्या पिंजऱ्यात डांबले जाते,तसेच गरोदर डुक्करीना हलायला पण जागा नसलेल्या कोंडाण्यात जखडून ठेवतात.
पाश्चात्य देशात गेल्या अर्ध्या शतकानंतर प्राण्यांची शेती घरोघरी करण्या ऐवजी आता मोठमोठ्या कारखानावजा शेतात केली जाते.आणि प्राण्यांकडे दुःख आणि छळ सहनकरणारा जीव असे न पाहता एक वस्तु म्हणून पाहिलं जातं.
लोकाच्या नजरेपासून दुर ठेवून प्राण्यांच्या मोठमोठ्या शेतीच्या जागी त्यांचा होणारा छळ दुर्लक्षीत झाला जरी,तरी अलिकडे अधीक अधीक लोक अशा गोष्टीना विरोध करू लागले आहेत.
पृथ्वी वरचे वाढतं तपमान,समुद्राची वाढती पाण्याची पातळी, धृवावरची बर्फाच्छादनाची वाढती वितळण्याची
क्रिया , महासागराच्या प्रवाहामधे होणारे बदल, वातावरणात होणारे बदल,तपमानात होणारे बदल हे सर्व मनुष्यजातीला सामोरं जाणारं आव्हान आहे.
घरगुती प्राण्यांची मोठ्या प्रमाणातील शेतीचा, वरिल गोष्टीना कारणीभूत व्हायला १८% ग्रीनहाऊस गॅसCO2 च्या रुपात निर्माण करायला सहभाग आहे.आणि हा सहभाग दळणवळणापासून होणाऱ्या सहभागापेक्षा जास्त आहे.

माझ्या मते मांसाहारी लोक जर का ह्या घरगुती प्राण्यांच्या मोठया शेतीकारखान्याला एकदा भेट देतील आणि पाहातील की ह्या ठिकाणी ह्या प्राण्यांचे कशाप्रकारे उत्पादन होतं आणि त्यांच्यावर कशाप्रकारे प्रकिया होते तर ते पाहून आच्शर्यचकीत होतील,आणि कदाचित अशी प्रतिज्ञापण करतील की पुन्हा मांस खाणार नाही.
म्हणून,
आधूनिक घरगुती प्राण्याचा शेतीव्यवसाय करणाऱ्या लोकाना वाटतं की जितकं म्हणून होईल तितकं मांसाहारी व्यक्तिला त्याच्या आहाराच्या थाळीत प्रत्यक्ष मांस पडेपर्यंत काय घडत असेल त्याची वाच्यता न झालेली बरी.
आणि हे जर खरं असेल तर हे नितीमत्येच्या दृष्टीने योग्य होईल का? हे काय चाललं आहे हे कळण्यास नकारात्मक राहील्याने मांसाहारी, शाकाहारी होतील ही आपली काळजी दूर होईल असं त्यांना वाटतं.

एकाच पिंजऱ्यात अनेक प्राणी ठेवल्याने आर्थिक दृष्ट्या सुलभ असतं.प्रत्येक प्राण्यामागे लाभ कमी झाला तरी प्रत्येक पिंजऱ्यामागे लाभ वाढतो.एका पिंजऱ्यात गर्दी करून प्राण्याना ठेवल्याने त्यांची हालचाल कमी होते त्यामुळे अन्न खाऊन त्याचे वजन वाढतं आणि त्यामुळे प्रत्येक प्राण्यामागे मांस जास्त मिळून मांसाचं ऊत्पादन वाढतं आणि प्रत्येक प्राण्यापेक्षा पिंजऱ्याची किंमत जास्त असल्याने शेवटी कमी पिंजरे वापरून प्राणी चोंदून ठवल्याने जास्त फायदा होतो.म्हणजेच
प्राणी स्वस्त असतो आणि त्यामानाने पिंजरा महाग असतो.

डुक्करांची कथा
शेतीवरच्या लोकांना उपदेश दिला जातो.
" डुक्कर हा, एक प्राणी आहे हे विसरा आणि त्याला एक कारखान्यातले यंत्र आहे असे समजा"
सतत पिंजऱ्यात असल्याने ह्या प्राण्याला त्यांच्या अपुऱ्या आयुष्यात कधीही सूर्यदर्शन होत नाही.
सुकल्या गवतावर लोळायला मिळत नाही.चिखलात कुदायला मिळत नाही.गर्भवती डुक्करीणीला कधी पिंजऱ्यात जरा हलायला मिळत नाही.खाली लोखंडाच्या नळ्या असल्याने त्यावर झोपावं लागत.आणि त्यांची विष्टा त्या मधल्या फटीमधून खाली असलेल्या डबक्यांत पडते,आणि चोहिकडे दुर्गंधी सुटलेली असते.

खाटिकखान्याला जर का कांचेच्या भिंती असत्या तर हे दृश्य दिसलं असतं.
प्राण्याना मारण्यापुर्वी त्यांना अर्धबेशुद्ध करण्याचा कायदा आहे,पण......
त्यांना अतिशय कृरतेने मारतात,त्याचे वर्णन करणं पण कठीण आहे.
म्हणून म्हणतो,
मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचं सामर्थ्य दिलं असताना, तिचा मुखोद्वारे किंवा लेखाद्वारे प्रचार करणं ही शक्य असताना, युगानयुगे जमलेल्या ज्ञानाचा, नितीमत्ता आणि बरे,वाईट यातला योग्य निर्णय घेण्याचेही सामर्थ्य असताना,त्यांचा स्वतःच्या खाजीसाठी विशेषेकरून भूक किंवा अन्नआहारच्या दृष्टीने आवश्यक्यता नसताना, ज्या जीवाना भावना आणि अंतरज्ञान असतं, त्यांचा केवळ चवीष्ट मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय?
प्रश्न ह्या प्राण्याना आपली बाजू मांडता येत नाही हा नाही,प्रश्न त्याना बोलता येत नाही हा पण नाही,तर प्रश्न हा आहे की त्यानी हालहाल होऊन मरावं काय?

अंदाजे २ लाख डुक्करं खाटिकखान्यात मृतावस्तेत आणली जातात.आणि त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण त्याना आणताना अपुरी हवा आणि अतिशय गरम वातावरणात आणलं जातं हे आहे. ते खाटिकखान्यात येण्यापुर्वीच मरतात.

सहजतेने हाताळलं जावे म्हणून हे मांसासाठी वाढवलेले प्राणी विजेचा धक्का देऊन अर्धमेले केले जातात. परंतु,ही पद्धत त्यांना खरोखरच अर्धमेले करतात का? कधी कधी त्या विजेच्या धक्क्याच्या गुंगीत ते अतिशय निघृण दुखापतीत जीवंत राहून, हे सर्व प्राणी अशा परिस्थितित जेव्हा उकळत्या पाण्याच्या टाकीत टाकले जातात तेव्हा ते पाण्यात उकळून तरी मरतात किंवा त्या पाण्यात बुडून मरतात.गुप्त व्हिडीयो टेपने सर्व रेकॉर्ड करून हे उजेडात आणले आहे.

कोंबड्या ह्या प्राण्याबद्दल सर्वसाधारण समजूत आहे ते खरं नाही.त्या अगदीच बावळट नसतात.उलट त्यांची वागणूक बरीच गुंतागुंतीची असते.शिकण्यात बऱ्याच तत्पर असतात मिळून मिसळून रहाण्यात फार उत्सुक असतात.आणि निरनिराळ्या आवाजाला साद देण्यात फार तल्लख असतात. तसंच त्यांच्या समुहात प्रत्येकाची स्वतःची ओळख असते.

पाश्चात्य देशात घरातल्या पाळीव प्राण्याचा (कुत्रा,मांजर,ससा वगैर) छळ होऊ नये म्हणून जे कडक कायदे आहेत ते जर ह्या मांसोद्पानासाठी शेती होत असलेल्या प्राण्याना लागू केले तर बेकायदा वागणुकीसाठी जबर शिक्षा होईल.कुत्रा,मांजरे,ससा वगैरे प्राण्यांचा समुह आणि कोंबडी,डुक्कर,गाई,म्हशी ह्यांचा समुह ह्या दोन समुहात पहिल्या समुहाला कायद्दयाचे संरक्षण असावं हा पंक्तिप्रपंच का असावा?
ही दुर्लक्षीत वागणूक तशीच चालू राहाण्याचे कारण खूप कमी लोकाना त्या प्राण्यांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीची माहिती असते.आणि त्यापेक्षाही कमी लोकांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती असते.पण जर का याची जागृती झाली तर बऱ्याच लोकांना मानसिक धक्का बसेल,आणि त्याचे कारण प्राण्यांच्या सुलभतेने जगण्याच्या ह्क्कावरून नसून, त्यांचा विश्वास बसेल की प्राण्याना पण ईजा होते आणि दुखते सुद्धा.त्याशिवाय माणूस सुद्धा माणुसकीच्या दृष्टीने आणि नितीमत्तेच्या दृष्टीने कुणालाही असे दुःख देण्यापासून परावृत्त होईल.

गाईला बछडा-बछडी नव्हे- झाल्यावर भविष्यात त्याचा दुध उत्पन्नासाठी काहीच उपयोग नसल्याने त्याचा जन्म होताच एक दोन दिवसानंतर आई पासून दूर करून त्या बछड्यासाठी निराळ्या प्रकारचं दुधवजा अन्न दिले जातं.आणि गाईचे दुध उद्पातीत करतात.नंतर हा बछडा १८,२० आठवड्यानंतर कोवळे गुलाबी मांस (tender pale coloured meat) म्हणून खाण्यासाठी कत्तलखान्यात नेतात.

ऐतिहासीक दृष्टीने मनूष्य जेव्हा नितीमत्तेची गरज खूप विकसीत करीत जात होता तेव्हा अज्ञान आणि मुळगरजा कमी करीत गेला, प्रथम कुटुंब आणि जमातीच्या पलिकडे जाऊन, नंतर धर्म ,जात,आणि देशाच्या पलिकडे जाऊन. ही त्याच्या नितीमत्तेची विकसीत होण्याची मर्यादा वाढवून ईतर प्राण्यांनापण सामाऊन घेण्याच्या निर्णयासाठी, सध्यातरी तो अशी टोकाची भुमिका घेईल हे कल्पने पलिकडचं वाटतं.पण एक दिवस,म्हणजे दशके गेल्यानंतर किंवा शतके गेल्यानंतर कदाचित त्याला "सुसंकृतीच्या" नांवाखाली ह्या प्राण्यांना सामाऊन घेण्याचा विचार करावा लागेल.

माणसाचं आणि प्राण्यांचं एकमेकाचं नातेसंबध असे विचीत्र आहेत की एकाच वेळी माणसाचं प्राण्याविषयी भावनीक प्रेम आणि क्रुरपणा शेजारी शेजारी वास्तव्य करत असतात.एकदा मझ्या वाचनात आलं " अमेरिकेत नाताळच्या उत्सवात कुत्र्या मांजराना बक्शीशी दिली जाते,अन त्याच वेळेला डुक्कराच्या दुरदैवी आयुष्याची कुणालाही चुकून सुद्धा आठवण येत नाही,कुत्र्या मांजरा एव्हडं त्याला सुद्धा तेव्हडीच बुद्धिमत्ता असून संध्याकाळच्या जेवणात
"खिस्मस हॅम "-डुक्कराचे मांस- ही चवदार
"डिश"
मेजवानी म्हणून फस्त केली जाते.

शाकाहारी व्यक्तिची प्रकृती ठिकठाक असते.रक्तदाब कमी असतो,वजन कमी असतं,कोलेस्टेरोल कमी असते,टाईप-टू डायाबीटीस,हृदय रोग,प्रोस्टेट कॅन्सर आणि कोलन कॅन्सर हे रोग कमी असतात. असं असण्याच्या अनेक कारणापैकी मांसाहार न घेणे हे पण एक कारण असावे असे ज्ञानी लोकाना वाटू लागले आहे.

एक निरपराधी मुल एका पाणकोंबडीवर ह्ळुवारपणे हात फिरवीत म्हणतं कसं,
" If I knew you, I wouldn't eat you"
काही दृष्टीने हे खरंच तितकं सोपं आहे.

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

रेवती's picture

16 Aug 2008 - 1:44 am | रेवती

मीही याबद्द्ल ऐकले आहे. हे हाल ऐकवत नाहीत. याबद्द्ल कुणाला काही सांगायला जावे तर म्हणतात की आमचं खाणं काढू नका.

रेवती

मदनबाण's picture

16 Aug 2008 - 3:55 am | मदनबाण

सहमत ..

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Aug 2008 - 10:26 am | श्रीकृष्ण सामंत

रेवतीजी,
तुम्ही विश्वास ठेवणार नाही.अलिकडे अमेरिकेतल्या बर्‍याच अशा स्त्रीया हे सर्व वाचून,बघून आणि ऐकून मांस खाणं वर्ज करू लागल्या आहेत.
पुरूषांपेक्षा स्त्रीयांच्या मनावर त्याचा जास्त परिणाम होऊ लागला आहे.आणि ही एक भविष्य काळाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे.कारण स्त्रीच
मुलांच्या जोपासनेतून पिढी तयार करते.त्यामुळे कुणाला सांगायला जाण्याची गरजच भासणार नाही.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

यावेळी वेगळी आणि विचार करण्यासारखी भूमिका.

(मागच्या वेळी विरोध नेमक्या मुद्द्यांना होता. "तुमचे अंतिम ध्येय विचार करण्यालायक नाही" असा विरोध नव्हता. पण तरी मुद्द्यांची सरमिसळ होत असल्यामुळे येथेही थोडी गडबड होऊ शकते. मुद्दे असे : (१) नैतिक मुद्दे - [१अ] क्रूरता, [१आ] शेवटचा मुद्दा पाळीव प्राण्यांबद्दलचे प्रेम खाद्य प्राण्यांसाठीही असावे; (२) घृणा - खाटिकखान्याला काचेच्या भिंती असत्या तर, वगैरे; (३) पर्यावरणविषयक - कार्बन डायॉक्साइड गॅस, वगैरे, (४)...इ.इ. यात काही मुद्दे अधिक ठोस आहेत आणि काही कमजोर आहेत. ज्यांना तुमचे लिखाण पटणार नाही ते कमजोर मुद्द्यांना कमजोर जाणून मग पूर्ण लेखालाच कमजोर मानतील. ज्यांना तुमचे म्हणणे पटते त्यांना ते नाहीतरी पटतेच आहे. ते हे कमजोर मुद्दे ठोस मानून कुठे दुसरीकडे सांगतील आणि त्यांचे हसे होईल. वेगवेगळे मुद्दे वेगवेगळ्या लेखांत विशद केले असते, तर हा सैरभैरपणा, कमजोर आणि ठोस मुद्द्यांची अशी सरमिसळ झाली नसती, असे मला वाटते. तरी तुमच्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेतच. "लहान लोक तोंडात मोठा घास घेणारच" असे जाणून या आगाऊ सल्ल्याचे फार वाटून घेऊ नका.)

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Aug 2008 - 10:54 am | श्रीकृष्ण सामंत

धनंजयजी,
आपल्या अभ्यासू वृत्तिचा मला आदर आहे.आणि त्यामुळेच विषयाचं चर्वीचरण होत असताना प्रत्येक मुद्दा महत्वाचा होतो.माझा मूळ मुद्दा एव्हडाच होता की,
"मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचं सामर्थ्य दिलं असताना, केवळ चवीष्ट मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय?"
तेव्हा जे सुचलं ते मी उदाहरण देवून लिहिण्याचा प्रयत्न करताना माझ्या दृष्टीने सर्वच मुद्दे ठोस वाटल्याने तसा लेख लिहिला गेला.
आपल्या सल्याचा मी जरूर विचार करतो आणि वाईट वाटून मुळीच घेणार नाही.
आपल्या शुभेच्छा मला मोलाच्या आहेत.
प्रतिक्रिये बद्दल आभार

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सुचेल तसं's picture

16 Aug 2008 - 10:37 am | सुचेल तसं

सामंत काका,

किती अफाट वाचन आहे हो तुमचं? हिंदी कवितांचा/गीतांचा अभ्यास आहे आणि त्याचा मराठीत समर्थ भावानुवाद देखील करता. जीवनाचं तत्वज्ञान देखील छोट्या छोट्या गोष्टींमधुन सांगता. हा मांसाहारावरचा लेख तर एकदम वेगळा आहे, अभ्यासपूर्ण असा.

तुम्ही पंचाहत्तरी पार केली ह्यावर विश्वासच बसत नाही. तुमच्या चिरतारुण्याला माझा सलाम!!!!

http://sucheltas.blogspot.com

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Aug 2008 - 11:24 am | श्रीकृष्ण सामंत

आपल्या ह्या अशा प्रतिक्रियेनेच मला आपण प्रेरणा देता.आपण म्हणता तसंच निरनीराळ्या विषयात मी दिलचस्पी घेण्याचा प्रयत्न करतो. एकाच प्रकारच्या विषयाची "मोनोटोनोसी" ठेऊन तुमच्या सारख्या माझ्या मायबाप वाचकाना "बोअर" करण्याचं पाप मी करू इच्छीत नाही.
आणि माझ्या वयाचं म्हणाल तर कदाचीत माझ्या लेखन/वाचनांमुळेच रिकामपणाला थाराच दिला जात नाही. आणि हा रिकामपणा जवळ नसल्याने वयाची आठवण येऊन प्रकृतीचे चोचलेच होत नसावे.
आपला सलाम "सर आखों पर"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

वैशाली हसमनीस's picture

17 Aug 2008 - 4:14 pm | वैशाली हसमनीस

सामंतजी,आपले म्हणणे पूर्णपणे पटले.पण आपल्याकडे कोण लक्ष देणार?उलट लोक आपल्यालाच नावे ठेवतील.शाकाहारी म्हणून आपलीच टर उडवित राहतील.

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Aug 2008 - 3:56 am | श्रीकृष्ण सामंत

वैशालीजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
टर उडवत असतील तर उडवोत बापुडे,अहो सालोमालो समाजात असतातच.
जो तो आपल्या अक्कलेने वागतो.तुकारामाने अभंग लिहायचं सोडलं नाही.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

हर्षद आनंदी's picture

18 Aug 2008 - 8:14 am | हर्षद आनंदी

"बळी तो कान पिळी" हा निसर्गाचा नियम आहे.
वाघाची सर्रास शिकार करून, खाणारा आजतागायत कोणी झाला नाही.

आयुर्वेद सुद्धा मांस्-मच्छी खाण्याचे फायदे विस्ताराने सांगतो. [ससा, कोंबडी, घोरपड, हरीण इ.]
ऊंदीर, बेडुक यांच्यावर निरनिराळ्या औषधांचे प्राथमिक प्रयोग अनंत काळापाऊन होत आहेत.

तरी प्रत्येक धर्म, पंथ, समाज मुलत: शाकाहारी असण्याची / राहण्याची दिक्षा देतो.

यातही निसर्गाची कमाल बघायला मिळते. निसर्गाने एक जीवन साखळी तयार केली असून, काळानुसार त्यात बदल होत गेले व होत जातील.
अर्थात म्हणून माणसाला जीव घेण्याचे लायसन्स मिळाले आहे, असे न समजता भुतदयेची जोपासना करणे आवश्यक आहे.

खाताना काही खाता येते, खाण्यातुन होणारे संस्कार सुध्दा लक्षात घेतले पाहीजेत.

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Aug 2008 - 9:39 am | श्रीकृष्ण सामंत

हर्षद आनंदीजी,
"खाताना काही खाता येते, खाण्यातुन होणारे संस्कार सुध्दा लक्षात घेतले पाहीजेत"
ह्या आपल्या एकाच वाक्यातून सर्व गीता समजते.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com