✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

" एकद्दाच्यं कायथे होन ज्यावूद्दये " -इती, पिंग-पॉन्ग-चू

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 08/15/2008 - 23:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4078 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

खरंय सामंतकाका,

रेवती
Sat, 08/16/2008 - 01:44 नवीन
मीही याबद्द्ल ऐकले आहे. हे हाल ऐकवत नाहीत. याबद्द्ल कुणाला काही सांगायला जावे तर म्हणतात की आमचं खाणं काढू नका. रेवती
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Sat, 08/16/2008 - 03:55 नवीन
सहमत .. "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

स्त्री पिढी तयार करते

श्रीकृष्ण सामंत
Sat, 08/16/2008 - 10:26 नवीन
रेवतीजी, तुम्ही विश्वास ठेवणार नाही.अलिकडे अमेरिकेतल्या बर्‍याच अशा स्त्रीया हे सर्व वाचून,बघून आणि ऐकून मांस खाणं वर्ज करू लागल्या आहेत. पुरूषांपेक्षा स्त्रीयांच्या मनावर त्याचा जास्त परिणाम होऊ लागला आहे.आणि ही एक भविष्य काळाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे.कारण स्त्रीच मुलांच्या जोपासनेतून पिढी तयार करते.त्यामुळे कुणाला सांगायला जाण्याची गरजच भासणार नाही. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वा! यावेळी वेगळी आणि विचार करण्यासारखी भूमिका.

धनंजय
Sat, 08/16/2008 - 03:13 नवीन
यावेळी वेगळी आणि विचार करण्यासारखी भूमिका. (मागच्या वेळी विरोध नेमक्या मुद्द्यांना होता. "तुमचे अंतिम ध्येय विचार करण्यालायक नाही" असा विरोध नव्हता. पण तरी मुद्द्यांची सरमिसळ होत असल्यामुळे येथेही थोडी गडबड होऊ शकते. मुद्दे असे : (१) नैतिक मुद्दे - [१अ] क्रूरता, [१आ] शेवटचा मुद्दा पाळीव प्राण्यांबद्दलचे प्रेम खाद्य प्राण्यांसाठीही असावे; (२) घृणा - खाटिकखान्याला काचेच्या भिंती असत्या तर, वगैरे; (३) पर्यावरणविषयक - कार्बन डायॉक्साइड गॅस, वगैरे, (४)...इ.इ. यात काही मुद्दे अधिक ठोस आहेत आणि काही कमजोर आहेत. ज्यांना तुमचे लिखाण पटणार नाही ते कमजोर मुद्द्यांना कमजोर जाणून मग पूर्ण लेखालाच कमजोर मानतील. ज्यांना तुमचे म्हणणे पटते त्यांना ते नाहीतरी पटतेच आहे. ते हे कमजोर मुद्दे ठोस मानून कुठे दुसरीकडे सांगतील आणि त्यांचे हसे होईल. वेगवेगळे मुद्दे वेगवेगळ्या लेखांत विशद केले असते, तर हा सैरभैरपणा, कमजोर आणि ठोस मुद्द्यांची अशी सरमिसळ झाली नसती, असे मला वाटते. तरी तुमच्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेतच. "लहान लोक तोंडात मोठा घास घेणारच" असे जाणून या आगाऊ सल्ल्याचे फार वाटून घेऊ नका.)
  • Log in or register to post comments

आपल्या शुभेच्छा मोलाच्या आहेत.

श्रीकृष्ण सामंत
Sat, 08/16/2008 - 10:54 नवीन
धनंजयजी, आपल्या अभ्यासू वृत्तिचा मला आदर आहे.आणि त्यामुळेच विषयाचं चर्वीचरण होत असताना प्रत्येक मुद्दा महत्वाचा होतो.माझा मूळ मुद्दा एव्हडाच होता की, "मनुष्यजातीला निसर्गाने उपजतच वैचारीक शक्ति आणि कल्पना करण्याचं सामर्थ्य दिलं असताना, केवळ चवीष्ट मांस म्हणून जीव घेण्याचा अधिकार मनुष्य म्हणून आपल्याला आहे काय?" तेव्हा जे सुचलं ते मी उदाहरण देवून लिहिण्याचा प्रयत्न करताना माझ्या दृष्टीने सर्वच मुद्दे ठोस वाटल्याने तसा लेख लिहिला गेला. आपल्या सल्याचा मी जरूर विचार करतो आणि वाईट वाटून मुळीच घेणार नाही. आपल्या शुभेच्छा मला मोलाच्या आहेत. प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

सामंत

सुचेल तसं
Sat, 08/16/2008 - 10:37 नवीन
सामंत काका, किती अफाट वाचन आहे हो तुमचं? हिंदी कवितांचा/गीतांचा अभ्यास आहे आणि त्याचा मराठीत समर्थ भावानुवाद देखील करता. जीवनाचं तत्वज्ञान देखील छोट्या छोट्या गोष्टींमधुन सांगता. हा मांसाहारावरचा लेख तर एकदम वेगळा आहे, अभ्यासपूर्ण असा. तुम्ही पंचाहत्तरी पार केली ह्यावर विश्वासच बसत नाही. तुमच्या चिरतारुण्याला माझा सलाम!!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

आपला सलाम "सर आखों पर"

श्रीकृष्ण सामंत
Sat, 08/16/2008 - 11:24 नवीन
आपल्या ह्या अशा प्रतिक्रियेनेच मला आपण प्रेरणा देता.आपण म्हणता तसंच निरनीराळ्या विषयात मी दिलचस्पी घेण्याचा प्रयत्न करतो. एकाच प्रकारच्या विषयाची "मोनोटोनोसी" ठेऊन तुमच्या सारख्या माझ्या मायबाप वाचकाना "बोअर" करण्याचं पाप मी करू इच्छीत नाही. आणि माझ्या वयाचं म्हणाल तर कदाचीत माझ्या लेखन/वाचनांमुळेच रिकामपणाला थाराच दिला जात नाही. आणि हा रिकामपणा जवळ नसल्याने वयाची आठवण येऊन प्रकृतीचे चोचलेच होत नसावे. आपला सलाम "सर आखों पर" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

पटले

वैशाली हसमनीस
Sun, 08/17/2008 - 16:14 नवीन
सामंतजी,आपले म्हणणे पूर्णपणे पटले.पण आपल्याकडे कोण लक्ष देणार?उलट लोक आपल्यालाच नावे ठेवतील.शाकाहारी म्हणून आपलीच टर उडवित राहतील.
  • Log in or register to post comments

उडवोत बापुडे

श्रीकृष्ण सामंत
Mon, 08/18/2008 - 03:56 नवीन
वैशालीजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. टर उडवत असतील तर उडवोत बापुडे,अहो सालोमालो समाजात असतातच. जो तो आपल्या अक्कलेने वागतो.तुकारामाने अभंग लिहायचं सोडलं नाही. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस

"बळी तो कान पिळी"

हर्षद आनंदी
Mon, 08/18/2008 - 08:14 नवीन
"बळी तो कान पिळी" हा निसर्गाचा नियम आहे. वाघाची सर्रास शिकार करून, खाणारा आजतागायत कोणी झाला नाही. आयुर्वेद सुद्धा मांस्-मच्छी खाण्याचे फायदे विस्ताराने सांगतो. [ससा, कोंबडी, घोरपड, हरीण इ.] ऊंदीर, बेडुक यांच्यावर निरनिराळ्या औषधांचे प्राथमिक प्रयोग अनंत काळापाऊन होत आहेत. तरी प्रत्येक धर्म, पंथ, समाज मुलत: शाकाहारी असण्याची / राहण्याची दिक्षा देतो. यातही निसर्गाची कमाल बघायला मिळते. निसर्गाने एक जीवन साखळी तयार केली असून, काळानुसार त्यात बदल होत गेले व होत जातील. अर्थात म्हणून माणसाला जीव घेण्याचे लायसन्स मिळाले आहे, असे न समजता भुतदयेची जोपासना करणे आवश्यक आहे. खाताना काही खाता येते, खाण्यातुन होणारे संस्कार सुध्दा लक्षात घेतले पाहीजेत.
  • Log in or register to post comments

एकच वाक्य किती सुंदर

श्रीकृष्ण सामंत
Mon, 08/18/2008 - 09:39 नवीन
हर्षद आनंदीजी, "खाताना काही खाता येते, खाण्यातुन होणारे संस्कार सुध्दा लक्षात घेतले पाहीजेत" ह्या आपल्या एकाच वाक्यातून सर्व गीता समजते. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा