सेमीकंडक्टर

पुरणपोळी's picture
पुरणपोळी in काथ्याकूट
14 Nov 2007 - 12:44 am
गाभा: 

माझा नवरा नुकताच एम एस झाला आहे. आम्ही त्याच्या साठि सेमीकंडक्टर कंपनी मध्ये नोकरि शोधत आहोत. फिजिक्स व मटेरियल्स सायन्स अशी बॅकग्राउन्ड आहे.
माहितगार लो़कांकडून सल्ला, माहिती आणि मदत मिळाली तर फार छान होइल.
-पुरणपोळी

प्रतिक्रिया

सर्किट's picture

14 Nov 2007 - 12:49 am | सर्किट (not verified)

बे एरियातील बहुतांशी सर्व सेमिकण्डक्टर कंपन्यांचे चौथे क्वार्टर वाईट असते. त्यामुळे डिसेंबरपर्यंत फारसे हायरिंग नसते. जानेवारीपासून पुन्हा हायरिंग सुरू होईल.

फिजिक्स आणि मटेरियल सायन्सेस मधून सेमिकण्डक्टर इण्डस्ट्रीत शिरायचे असल्यास, बे एरियात सध्या "सोलर सेल्स" च्या ज्या कंपन्या मश्रूम होताहेत, तेथे प्रयत्न करा. तो एरिया सध्या हॉट आहे (नो पन इण्टेण्डेड).

मदत हवी असल्यास विनासंकोच मागा. माझे ५०% मित्र सेमिकण्डक्टर्स कंपन्यांमध्येच आहेत.

- सर्किट

पुरणपोळी's picture

14 Nov 2007 - 6:36 pm | पुरणपोळी

सर्किट,
तुमच्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. तुमची मदत हवी आहे. तुमच्याशी कशाप्रकारे संपर्क साधू?

सर्किट's picture

14 Nov 2007 - 11:45 pm | सर्किट (not verified)

माझा इमेल पत्ता व्यनिने पाठवला आहे. कृपया रिझ्युमे पाठवावा.

- सर्किट

किमयागार's picture

14 Nov 2007 - 6:59 am | किमयागार (not verified)

सेमी कंडक्टर सोडा हो! नुसत्या कंडक्टरची नोकरी चालेका का आपल्या पतिराजांना?त्या विषयी आम्ही तज्ञ मार्गदर्शन करू शकतो.
कुठल्यातरी विचित्र टोपण नावाने दोन ओळीत सल्ला मागायचा आणि उत्तर मात्र एक्सपर्ट ओपीनिअन पाहिजे म्हणे.

जुना अभिजित's picture

14 Nov 2007 - 8:39 am | जुना अभिजित

माझ्या किमयागार मित्रा, तुझ्याकडे असलेली माहीती तू नाव काय आहे ह्या निकषावर देणार आहेस काय?
आणि टोपणनावाऐवजी नाव लिहिले असते तरी तू कंडक्टरबद्दल सांगितले असतेस काय?

प्रश्न कळाला ना? आपल्याला उत्तर नसेल माहीत तर नाही माहीत म्हणावे..उगाच उचकाट्या कशाला काढायला पाहिजेत..??

अभिजित हे टोपणनाव असलेला अभिजित

किमयागार's picture

14 Nov 2007 - 9:04 am | किमयागार (not verified)

तुम्हाला स्पष्ट बोलणार्‍यांची थोडी ऍलर्जी दिसते.. असो!
माझ्या किमयागार मित्रा, तुझ्याकडे असलेली माहीती तू नाव काय आहे ह्या निकषावर देणार आहेस काय?

नाव काय आहे ह्यावर नाही तर नाव आहे की नाही ह्या निकषावर माहिती देणार. फरक स्पष्ट झाला का?

आणि टोपणनावाऐवजी नाव लिहिले असते तरी तू कंडक्टरबद्दल सांगितले असतेस काय?

नाही

जुना अभिजित's picture

14 Nov 2007 - 9:31 am | जुना अभिजित

आपल्याला उत्तर नसेल माहीत तर नाही माहीत म्हणावे..

असंच मी म्हटलंय. स्वत:चा पहिला प्रतिसाद वाचा. म्हणजे कळेल कोण स्पष्ट बोलतंय.
पुरणपोळीला प्रतिसाद देताना विषय सोडून टोपणनावावर घसरण्याऐवजी आणि कंडक्टरचा उल्लेख करण्याऐवजी 'मला माहीत नाही' इतकं स्पष्ट लिहिलं असतंत तरी चाललं असतं.

अभिजित

विसोबा खेचर's picture

14 Nov 2007 - 9:34 am | विसोबा खेचर

पुरणपोळीला प्रतिसाद देताना विषय सोडून टोपणनावावर घसरण्याऐवजी आणि कंडक्टरचा उल्लेख करण्याऐवजी 'मला माहीत नाही' इतकं स्पष्ट लिहिलं असतंत तरी चाललं असतं.

सहमत आहे...

तात्या.

किमयागार's picture

14 Nov 2007 - 9:37 am | किमयागार (not verified)

अभिजीत आणि अध्यक्ष,
तुम्हा दोघांच्याही मतांचा आम्हाला आदर आहे. पण व्यक्ति तितक्या प्रकृती तेव्हा मत भिन्नता चालायचीच! काय बरोबर ना?
-किमयागार

पुरणपोळी's picture

14 Nov 2007 - 9:30 am | पुरणपोळी

किमयागार,
माझ्या पोस्ट वरती येवढी चिडचिड कशाला? स्पष्ट बोलणे आणि लागेल असे बोलणे ह्यात फरक आहे. तुमचे उत्तर वाचून वाईट वाटले.
अजुन काय माहिती द्यायचि होति ति प्रतिसाद वाचुन दिलीच असती. आणि जर खरच तुम्ही तज्ञ ( सेमिकंड्क्टर चे किंवा कंडक्टरचे) असाल तर तस नीट सांगा म्हंजे पुढे बोलता येइल. बाय द वे तुमच टोपणनाव काहि कमी विचित्र नाहिये.

किमयागार's picture

14 Nov 2007 - 9:41 am | किमयागार (not verified)

तुम्हाला वाईट वाटले असेल तर दिलगीरी व्यक्त करतो. पण जेन्युइन माहिती हवी असेल तर 'पुरणपोळी ' आणि 'कांदाभजी' असल्या नावाने प्रश्न विचारुन कसे चालेल? त्यावर अशीच टवाळकीची उत्तरे येणार हे 'स्पष्ट' करायचे होते इतकेच.
-किमयागार

गुंडोपंत's picture

14 Nov 2007 - 10:32 am | गुंडोपंत

पण प्रश्न सरळ असेल तर खवचट उत्तर देण्याचे कारण काय?
नाव असे आहे म्हणून? पुरणपोळी नावात काय वाईट आहे?
असा एक बेसनलाडूही आहे येथे. उत्तम लेख करतो. त्याचा मधुबालावरचा लेख वाचून सुखावलो होतो आम्ही... आता त्याचे नाव तसे म्हणून लेख का खराब होणार आहे?

(गुंडोपंत या नावात काय चांगले आहे?
माझ्या बापाने गुंड्या असे नाव माझे ठेवले, मी काय करणार? पंत मी माझेच जोडून घेतले आहे.)
माझ्या एका मित्राचे नाव छगन आहे.

मग काही लोकांचे आडनाव चमत्कारीक असते त्यांना काय निट वागवणारच नाही?
माझ्या माहितीत एक लेकुरवाळे आडनाव असणारे गृहस्थ आहेत. शिवाय एक ढगे आहेत.
मी यांना सिरियसली घ्यायचेच नाही असे?

मला वाटते जर प्रशन प्रामाणिक असेल तर उत्तरही प्रामाणिकपणे द्यावे.
असो,
ही आपापली मर्जी आहे. हा गुंड्या काय म्हणणार कुणी कसे प्रतिसाद द्यावेत यावर... इथे भली भली मंडळी आहेतच

आपला
गुंडोपंत

पुरणपोळी's picture

14 Nov 2007 - 6:58 pm | पुरणपोळी

किमयागार,
माझा ईमेल आयडी मी तुम्हाला व्यक्तिगत सन्देशात पाठवू का? तुमचा जेन्युइन ईमेल आयडी मिळेल का? म्हणजे जेन्युइन माहिती देता येईल व प्रश्न विचारता येतील.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Nov 2007 - 9:35 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्या मते किमयागार म्हणजे अच्युत गोडबोले.
प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू's picture

15 Nov 2007 - 8:57 am | बेसनलाडू

काहीतरीच काय? अच्युत गोडबोले म्हणजे काय रंडीबाजारातल्या बार मध्ये आठशेच्या पगारावर काम केलेले गवई वाटले की काय प्रकाशकाका? की हिजड्याआडून भीष्म पाडणारी बृहन्नडा?
- बे. ला. गोडबोले

प्रकाश घाटपांडे's picture

15 Nov 2007 - 10:59 am | प्रकाश घाटपांडे

अहो अच्यत गोडबोले सारखा भारी माणुस कशाला येईल मिसळपाव वर येईल तर्रि चापायला. त्यांच "किमयगार" प्रसिद्ध आहे ना! पन लई भारी मानूस हं खर्‍या अर्थाने बहु आयामी.
प्रकाश घाटपांडे

किमयागार's picture

16 Nov 2007 - 8:41 am | किमयागार (not verified)

बेसन लाडू,
भलताच आगाऊ दिसतोस की रे तू! अवघ्या पंचविशीत आत्मचरीत्र काय लिहायचो म्हणतोस, कशा कशातला तज्ञ आहेस म्हणून स्वतःच काय मिरवतोस, शिव्या का देऊ नयेत ह्यावर लेक्चर देता देता स्वतःचा पट्टा अम्मळ सैलच काय सोडतोस.
कोणी वडिलधारे जवळापास असेल तर ड्रुष्ट काढून ठेवायला सांग हो . तुझ्या सारख्या रत्नाला कोणाची नजर नको रे बाबा लागायला.
-किमयागार

बेसनलाडू's picture

16 Nov 2007 - 9:51 am | बेसनलाडू

तुझ्या सारख्या रत्नाला कोणाची नजर नको रे बाबा लागायला.
--- डोळे बंद करा पाहू किका (किमयागार काका/कू :)) )
(नेत्रतज्ज्ञ)बेसनलाडू