राम राम मंडळी,
गेल्याच शनिवारी सिकोया नैशनल पार्क ला जाऊन आलो. सिकोया नैशनल पार्क हे नेवाडा राज्याच्या दक्षिणेला लागून आहे. या नैशनल पार्कची स्थापना २५ सप्टेंबर १८९० साली झाली. हे पार्क ४०४ ०६३ एकरावर पसरलेले आहे. समुद्रसपाटीपासून ची उंची १४,५०५ फुट. किंग कैनियोन नैशनल पार्कला लागून असलेले हे पार्क मोठमोठाल्या प्राचीन वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे.
शनिवारी सकाळी लवकर निघून संध्याकाळी लवकर परत येण्याचा बेत होता पण शुक्रवारी मजबूत पार्टी झाल्यामुळे सकाळी लवकर उठणे झाले नाही आणि निघू निघू म्हणता १० वाजले. हे जंगल अस्वलांसाठी प्रसिध्द आहे पण आम्हाला एकही दिसले नाही. हिवाळा असल्यामुळे जंगलाचा उंच भाग बर्फाच्छादित झाला आहे.
पहाण्यासारखी जी ठिकाणे होती त्यापैकी बरीचशी हिवाळ्यामुळे बंद होती त्यामुळे हिरमोड झाला. परत एकदा फेरी मारून ती ठिकाणे कव्हर करण्याचा विचार आहे.
माझ्याकडे एसएलआर कैमेरा नाहीये त्यामुळे साम्सुंग नोट २ ने काढलेले फ़ोटो.
नुकताच पाउस पडून गेल्यामुळे रस्त्याच्या आजुबाजुला हीरवळ होती. वातावरणही अल्हाददायक होते.



५० मैल गाडी चालवल्यावर बर्फाच्छादीत शिखरे दिसू लागली.

पहील्याच स्पॉट्ला फोटो काढायला थांबल्याबरोबर तिथल्या मुली आमच्या बरोबर असलेल्या सरदारजींना फोटो काढण्याची विनंती करु लागल्या. काय त्या लोकांना एवढं सरदारजींचं आकर्षण काय माहीत..

बर्फाच्छादीत डोंगर जवळ आले.

पुढे असणारा सर्व रस्ता स्वप्नवत होता.



हा शरमन ट्री स्पॉट. चित्रात दिसतेय ते एक शौचालय आहे. एवढे सुंदर शौचालय मी कधी पाहीले नव्हते.


आणि हेच ती प्रसीद्ध मोठमोठाले व्रुक्ष !!


प्रवासात मधे मधे दिसणारी ही हिमशीखरे !!




खालील फोटो थोडा लांबून घेतल्यामुळे अंदाज येत नाहीये पण झाडांचा बुंधा १० फुटांपेक्षा जास्त रूंद होता.

प्रतिक्रिया
23 Dec 2014 - 5:42 am | मुक्त विहारि
फोटो सुंदर...
23 Dec 2014 - 6:08 am | श्रीरंग_जोशी
हा धागा वाचला अन अमेरिकेत आल्यावरच्या माझ्या पहिल्या सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या.
कुठे राहिला होता तिथे? आम्ही लोक पार्क सुरू होण्यापूर्वी थ्री रिव्हर्स नावाचे लहानसे गाव लागते तिथल्या एका लहानशा मॉटेलमध्ये राहिलो होतो.
23 Dec 2014 - 6:16 am | खटपट्या
राहीलो नव्हतो, १८० हायवे ने बाहेर पडलो, फ्रेस्नोला जेवलो आणि बेकर्सफील्ड्ला येउन पिके बघितला. एकदम धावपळीत गेला दीवस. रात्री उशीर घरी पोहोचलो.
थंडी नसताना जायचा विचार आहे परत तेव्हा राहणार.
23 Dec 2014 - 6:18 am | खटपट्या
बाकी बाईक मस्त आहे. बहूगुणी यांनी दीलेल्या धाग्यावरून भाड्याने गाडी घ्यायचा विचार आहे. पण लायसनचे महादीव्य पार करावे लागणार आधी !!
23 Dec 2014 - 6:19 am | मुक्त विहारि
सहलीला गालबोट की तीट?
23 Dec 2014 - 6:31 am | खटपट्या
हो ना राव ! मस्त दिवस मजेत गेला होता. चित्रपट बघून मुड गेला !
23 Dec 2014 - 6:37 am | मुक्त विहारि
खाली उतारा देत आहे...
मस्त कुटुंबाबरोबर एंजॉय कर...
http://www.youtube.com/watch?v=twqF4T7epf0
23 Dec 2014 - 6:48 am | खटपट्या
मस्त !!
23 Dec 2014 - 7:12 am | मुक्त विहारि
हेरॉल्ड लॉइड विषयी नक्कीच लिहीन...
23 Dec 2014 - 6:24 am | श्रीरंग_जोशी
एकदम निवांतपणे वेळ घालवण्यासाठीचे उत्कृष्ट ठिकाण आहे हे. पुढल्या सहलीसाठी शुभेच्छा!!
येथील मोरो रॉकच्या शिखरावरून पाहिलेला सुर्यास्त मी पाहिलेल्या स्वर्गीय सुर्यास्तांपैकी एक आहे.
23 Dec 2014 - 6:20 am | मुक्त विहारि
बाइक मस्त आहे..
23 Dec 2014 - 6:27 am | श्रीरंग_जोशी
तेथे भेटलेल्या जपानी पर्यटकांची बाइक होती ती. फोटो काढण्यापुरती संधी साधली मी.
23 Dec 2014 - 6:38 am | मुक्त विहारि
हा हा हा...
23 Dec 2014 - 9:36 am | गिरीश मांधळे
मस्त.nps.gov संकेतस्थळावर अमेरिकेतील सर्व राष्ट्रीय उद्द्यानांची छान माहिती दिलेली आहे.
23 Dec 2014 - 9:50 am | प्रचेतस
मस्त फोटो.
जोशीबुवा तर एकदम हीरो दिसायलेत.
23 Dec 2014 - 10:42 am | मदनबाण
मस्त...
खटपट्याराव अवं तुमचा फोटु बी येउदे की... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015
23 Dec 2014 - 11:51 am | टवाळ कार्टा
जळजळ म्हणतात ती हिच असावी ;)
23 Dec 2014 - 11:53 am | खटपट्या
तर तर जळजळ तर होणारंच !!
पुढच्या वेळेला मीपण पगडी घालून जाणार आहे :)
23 Dec 2014 - 6:51 pm | किल्लेदार
किल्लेदार सिंग :)
23 Dec 2014 - 2:38 pm | सस्नेह
छानच . मस्त फोटो.
23 Dec 2014 - 5:25 pm | दिपक.कुवेत
आलेत. पण एका फोटोत तो सरदारजी असा का उभा आहे?
23 Dec 2014 - 10:56 pm | खटपट्या
अहो तो असाच स्टाईल मधे उभा असतो नेहमी !! एकदम अधुनिक सरदार आहे तो :)
24 Dec 2014 - 8:57 am | टवाळ कार्टा
कदाचित आधीच्या फोटोमुळे बसता येत नसेल
24 Dec 2014 - 8:58 am | टवाळ कार्टा
म्हणजे कठड्यावर बर्फ वगैरे लागले असेल की त्याला
24 Dec 2014 - 9:14 am | खटपट्या
हम्म्म :)
24 Dec 2014 - 5:24 pm | दिपक.कुवेत
मला वेगळिच शंका आली....
23 Dec 2014 - 6:54 pm | सखी
छान फोटो आणि वर्णन.
श्रीजोंनी काढलेला सुर्यास्ताचा फोटोपण छान आहेत.
24 Dec 2014 - 12:01 am | हुकुमीएक्का
सर्व फोटो मस्त आहेत.
24 Dec 2014 - 1:24 am | अत्रुप्त आत्मा
मस्स्स्स्स्स्त फ़ोटुज!
24 Dec 2014 - 2:05 am | अर्धवटराव
"प्रवासात मधे मधे दिसणारी ही हिमशीखरे !!"
या वाक्याखालचा फोटो तर एकदम चित्रवत.
24 Dec 2014 - 3:55 am | टिल्लू
सिकोया अगदी मस्त आहे, आम्ही आर-व्ही करुन लॉजपोल कॅम्पवर एक दिवस मुक्कम केला होता. हा कॅम्प छान होता, गर्द झाडी, छोटी नदी, समोर बर्फाच्छादीत शिखरे, दिवसभर स्नो फॉल होत होता, आम्हाला अस्वलही दिसले होते.
तुमचे फोटोज पाहून आठवणी ताज्या झाल्या.
24 Dec 2014 - 6:20 am | खटपट्या
सर्व प्रतीसादकांचे धन्यवाद !!
25 Dec 2014 - 2:53 pm | श्रीगुरुजी
सुंदर प्रकाशचित्रे!
सिकोया नॅशनल पार्क आणि योसेमिटी नॅशनल पार्क एकच आहेत का? मी १९९१ मध्ये योसेमिटी नॅशनल पार्कला भेट दिली होती. तिथे तो जगप्रसिद्ध २५०० वर्षे वय असलेला महाकाय वृक्ष होता. त्याच्या जवळच एक दुसरा महाकाय वृक्ष होता ज्याचे खोड करून त्यातून मोटारींसाठी रस्ता काढला होता. योसेमिटी नॅशनल पार्क अत्यंत सुंदर आहे.
25 Dec 2014 - 11:01 pm | खटपट्या
योसेमिटि आणि सिकोया हे वेगवेगळे नॅशनल पार्क आहेत. योसेमिटि उत्तरेला आहे आणि सिकोया योसेमिटिच्या दक्षिणेला आहे. दोन्ही पार्क सीरा नॅशनल फॉरेस्ट्ने जोडली गेली आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे ही दोन्ही पार्कस अत्यंत स्वछ ठेवली आहेत.
25 Dec 2014 - 3:43 pm | पैसा
छान लिहिलंय आणि फोटो जास्त आवडले!
27 Jan 2015 - 12:03 pm | अगम्य
सिकोया नॅशनल पार्क येथे जगातील सर्वात मोठा वृक्ष (actually the largest living thing by volume on earth ) आहे. त्या झाडाला यादवी युद्धात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या जनरल शेर्मन यांचे नाव दिले आहे.