बाइक्स घेताना - भाग २

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in तंत्रजगत
22 Dec 2014 - 1:26 pm

बाइक्स घेताना - भाग २

भाग - १

… तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत

१००-११० cc

१. दमड्या - सगळ्यांत कमी
२. मायलेज … "कितना देती है" - सगळ्यांत जास्त

३. दिसणे - काकूबाई / वरणभात
४. ताकद (power) - ७५+ पळवली की धापा टाकणार
५. आराम - अगदीच टुकार
६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च - सगळ्यांत कमी
७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) - फक्त महिंद्र कडून

हिरो

स्प्लेंडर

hero splendor

पॅशन प्रो

hero passion pro

स्प्लेंडर प्रो क्लासिक (नवीन)

hero splendor pro classic

होंडा

ड्रीम निओ / युगा

“honda

ट्विस्टर

“honda

बजाज

डिस्कव्हर

“bajaj

टिव्हिएस

स्टार सिटी

सुझुकी

स्लिंग शॉट

महिंद्र

सेंच्युरो
पंटेरो

“mahindra

हा सगळ्यांत जास्त खप होणार्या बाइक्सचा विभाग … सगळ्या कंपन्यांच्या नफ्यातला मोठा हिस्सा या दुचाकींच्या विक्रीतून येतो

खपाच्या बाबतीत हिरो अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवते इथे … हिरोच्या स्प्लेंडर आणि पॅशन यांच्याबद्दल काही लिहायलाच नको … tried, tested and proven themselves मोडेल्स आहेत ती … हिरो अजून पर्यंत तरी होंडाचीच इंजिन्स वापरत आहे पण लवकरच ती EBR च्या इंजिनाने बदलण्यात येतील … पण हिरोला २ खूप मोठे फायदे आहेत …. खूप मोठे service network आणि स्वस्त सुट्टे भाग … बाइकची किंमतसुध्धा वाजवी आहे आणि ५ वर्षे हमी … मायलेज भरपूर …. दिसण्याच्या बाबतीत या ठिकठाक … या विभागातली अलका कुबल :)

नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ती या विभागातली सगळ्यात हटके बाइक आहे \m/ … साधी पण स्टाईलिश … old wine in new bottle … रेशम टिपणीस सारखी :)

सध्ध्या होंडाने ड्रीम निओ / युगा आणुन हिरोला समर्थ पर्याय उभा केला आहे … होंडाच्या इंजिनची गुणवत्ता ही सर्वोत्तम आहे … आणि शहरे व आसपासच्या परिसरात service center असतातच … ही स्मिता पाटील आणि होण्डाचीच ट्विस्टर मात्र या विभागातली वर्षा उसगावकर ;)

बजाजची डिस्कव्हर सिरीज सगळ्या विभागांत आहे … बजाजचा सर्वांत मोठा प्लस पोइण्ट म्हणजे सगळ्यात कमी किंमत, सगळ्यात जास्त मायलेज … खूप स्वस्त सुट्टे भाग … नुस्ते बघून कळतच नाही की १०० वाली का १२५ वाली का १३५ वाली 8) … परंतु इंजिन refinement मध्ये हिरो आणि होंडाच्या मागे पडते… डिस्कव्हर सिरीज थोडक्यात jack of all trades master of none अशी आहे … या विभागातली निशिगंधा वाड :P

टिव्हिएस आणि सुझुकी सध्यातरी खपाच्या बाबतीत वरच्यापैकी कोणाच्याच जवळपास सुध्धा नाहीत… service network कमी आहे

महिंद्राने सेन्च्युरो / पटेरो असे २ पर्याय दिले आहेत … यांनासुध्धा ५ वर्षे हमी … त्यांच्यात मात्र काही first in class वैशिष्ठ्ये आहेत …जसे इंजिन immobilizer, find me parking lights, remote flip key … comes with freshness but not sure about potential इथली सुप्रिया पिळगावकर :D

अवांतर -
जुन्या मराठी नायिका निवडण्याचे कारण … looks plain based on what we get to see :D
उपमा हुकल्या असतील तर पर्याय सुचवावेत ;)

क्रमश:

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 1:40 pm | मदनबाण

छान... ;) तुलना मजेशीर ! ;)
old wine in new bottle … रेशम टिपणीस सारखी
लगेच, मी सातार्‍याची गुलछडी आठवले ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

जेपी's picture

22 Dec 2014 - 2:00 pm | जेपी

मस्त..

*ROLF*

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 2:22 pm | टवाळ कार्टा

नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ... … रेशम टिपणीस सारखी

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 2:57 pm | टवाळ कार्टा

नाही हो....old wine in new bottle हे वाचले नाही का?
रेशम टिपणीस कशी आधी अंगभर साडी नेसून सोज्वळ भूमीका करायची...मग आता दुसर्या इनिंगमधे आयटम साँग्जवर नाचते...तस्सा प्रकार आहे तो... दिसायला कॅफे रेसर पण आतले इंजिन हळूबाई स्प्लेंडरचे

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 3:05 pm | मदनबाण

दिसायला कॅफे रेसर पण आतले इंजिन हळूबाई स्प्लेंडरचे
परत गाणे बघ हो टवाळा ! बाई म्हणतात... ज्याला त्याला कळलं ही बया नाही सोशिक, नादाला लागु नका ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 3:20 pm | टवाळ कार्टा

बाइक आणि बै यांची तुलनाच कशी करता तुम्ही...पहिली भौतिकशास्त्राचे सगळे नियम पाळते...दुसरी...जौदे ;)

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 3:24 pm | मदनबाण

रेशम टिपणीस कशी आधी अंगभर साडी नेसून सोज्वळ भूमीका करायची...मग आता दुसर्या इनिंगमधे आयटम साँग्जवर नाचते...तस्सा प्रकार आहे तो... दिसायला कॅफे रेसर पण आतले इंजिन हळूबाई स्प्लेंडरचे
हॅहॅहॅ... ही तुलना आपणच केली आहे नै ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 3:33 pm | टवाळ कार्टा

अरे हो...पण ते उदाहरण समजवण्यासाठी
म्हणजे वर्जीनल स्प्लेंडर आणि स्प्लेंडर प्रो क्लासिक याच्यात जे साम्य/फरक आहेत तेच जुनी रेशम आणि नवीन रेशम याच्यात आहेत... बै आणि बाईक यांची तुलनाच होउ शकत नाही...बाईक डायवर जे सांगेल ते ऐकते ;)

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 3:35 pm | मदनबाण

अच्छा असं व्हय... इनिंग कुठलीही बी असु दे... पर्फोमन्स महत्वाचा ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 3:42 pm | टवाळ कार्टा

गेटप बदलला तरी अलका कुबलची गेलाबाजार आयटम साँगमधली एक्ष्ट्रा पण नाही होउ शकत :)

गेटप बदलला तरी अलका कुबलची गेलाबाजार आयटम साँगमधली एक्ष्ट्रा पण नाही होउ शकत
रेशम टिपणीस च्या केलेल्या तुलने बद्धलच माझे वक्तव्य आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 4:27 pm | टवाळ कार्टा

कल्लाव ओ :)

काळा पहाड's picture

23 Dec 2014 - 10:23 pm | काळा पहाड

खिक.. अलका कुबलचं आयटम साँग. काय कल्पना आहे.

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 2:23 pm | टवाळ कार्टा

बिकिनी वाल्या बाइक्स पुढच्या भागांत आहेत... ;)

प्रसाद गोडबोले's picture

22 Dec 2014 - 2:54 pm | प्रसाद गोडबोले

त्याच प्रतिक्षेत ... आमच्या केटीयेम ३९० ला तुम्ही काय उपमा देता ह्याचे कुतुहल आहे ;)

लवकर लिवा पुढील लेख !!

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 2:59 pm | टवाळ कार्टा

KTM-390 = bike with best bang for bucks india has ever got \m/

"वाट बघताय" हे वाचून बरे वाटले...तशी RD-350 सुध्धा मालिकेत घ्यायचा विचार आहे :)

योगी९००'s picture

23 Dec 2014 - 2:01 pm | योगी९००

हा भाग मस्तच..!!
बिकिनी वाल्या बाइक्स पुढच्या भागांत आहेत...
मग आम्ही पुढच्याच्या पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

टवाळ कार्टा's picture

23 Dec 2014 - 7:15 pm | टवाळ कार्टा

किती हा उतावीळपणा =))

मदनबाण's picture

24 Dec 2014 - 1:15 pm | मदनबाण

खीखीखी... ख्या ! ;)
बाकी बिकीनी मॉडेल वरुन आठवले की मिस अर्थ { ही पण कॉन्टेस्ट आहे, हे मला हल्लीच कळले हो ! } मधे असा एक पीस पाहिला होता ! तो सुद्धा "पाकिस्तानी" ! मिस अर्थ २०१२ झालेल्या या सुंदरीचा { Zanib Naveed } बिकीनी फोटो मध्यंतरी कोणी तरी मला व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवला होता ! अगदी "हराभरा कबाब" आहे ! ;) :P :D *LOL*
बाकी मिस वर्ल्ड स्पर्धेत यापुढे बिकीनी राउंड नसणार अश्या स्वरुपाच्या बातम्या हल्लीच वाचल्या होत्या...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ}
Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report
As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets
All About Arihant

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 1:19 pm | टवाळ कार्टा

या बाबतीत पाकिस्तानी फार नशिबवान :(

मुक्त विहारि's picture

24 Dec 2014 - 2:50 pm | मुक्त विहारि

बाणा...धन्यवाद...

मुक्त विहारि's picture

24 Dec 2014 - 2:52 pm | मुक्त विहारि

फोटो जपून ठेव...

किंवा तुझा मोबाइल नंबर व्यनि कर..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Dec 2014 - 2:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपल्या ग्रुपवर आला होता बहुतेक रे!!! आहे माझ्याकडे अजुन =))

मुक्त विहारि's picture

24 Dec 2014 - 3:02 pm | मुक्त विहारि

उडवण्यासाठी नसतातच.

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 3:14 pm | टवाळ कार्टा

हेच्च म्हणतो

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 3:13 pm | टवाळ कार्टा

व्यनी केलेला आहे

मदनबाण's picture

24 Dec 2014 - 3:17 pm | मदनबाण

आपल्या ग्रुपवर आला होता बहुतेक रे!!! आहे माझ्याकडे अजुन
अच्छा... अ‍ॅडमिनला सांगुन आपल्या ग्रूप मधे मुवि महोदयांना अ‍ॅड करायला सांगायला हवे ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ}
Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report
As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets
All About Arihant

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Dec 2014 - 3:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

घे अ‍ॅड करुन...रात्री अपरात्री पण दंगा करता येईल मग =))

खटपट्या's picture

25 Dec 2014 - 2:28 am | खटपट्या

आमी काय पाप केलंय हो !! आमाला बी घ्या की अ‍ॅड करून !!

मदनबाण's picture

25 Dec 2014 - 9:34 am | मदनबाण

आपला नंबर मला व्यनि करा...
@ गवि
तुम्ही दिलेला नंबर ग्रुप मधे अ‍ॅड करण्यासाठी अ‍ॅडमिनला कळवले आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyz

च्यामारी गवि आणि मुवि मधे लयं म्हणजे लयं गोंधळ उडायला लागला आहे ! :(
वरचा प्रतिसाद मुविंसाठी आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyz

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Dec 2014 - 9:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नंबर मला किंवा मदनबाणाला व्यनि करा.

मुक्त विहारि's picture

24 Dec 2014 - 3:07 pm | मुक्त विहारि

...कधी येतोय?

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 3:27 pm | टवाळ कार्टा

बाइकवेडे मिपाकर किती असतील याची शंका होती त्यामुळे पुढच्या भागावर जास्त काम झाले नाहिये...but it's on the way

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Dec 2014 - 3:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ईंजिनांविषयी माहिती हवी असेल तर लेट मे नो....मी माझ्या ऑटोमोबाईलच्या लेखमालेवर काम करतोय त्यामुळे बराच डेटा आहे माझ्याकडे.

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 3:29 pm | टवाळ कार्टा

बाइकवेडे असाल तर तुमचा मोबल्या व्यनी करा :)

सस्नेह's picture

22 Dec 2014 - 3:03 pm | सस्नेह

किंमती दिल्या असत्या तर बरं झालं असतं !
बाइक्स खिशात बसतात का तेही कळलं असतं ना !

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 3:18 pm | टवाळ कार्टा

तुमची रिक्वायरमेंट सांगा...बेस्ट मॅच सांगतो...खिशाला परवडणारी

अवांतर - तै असून बाइक मधे इंट्रेस्ट दाखवताय...कौतिक वाटते तुमचे :)

सस्नेह's picture

22 Dec 2014 - 3:38 pm | सस्नेह

लेकासाठी घ्यायचीय हो !

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 4:27 pm | टवाळ कार्टा

सगळ्या रिक्वायरमेंट पाठवा तुमच्या, तुमच्या मुलाच्या आणि बाकी कोणाच्या...सल्ला फुकटात दिला जाइल

कपिलमुनी's picture

22 Dec 2014 - 4:43 pm | कपिलमुनी

सल्ला फुकटात दिला जाइल !

हाडक्या's picture

23 Dec 2014 - 7:51 pm | हाडक्या

बाईकर्हित

*lol*

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Dec 2014 - 9:44 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बाईकर्हित =))

कुठल्याही गोष्टीचा सल्ला फुकट नसतोय. "बाईकर्हित" पाहण्यासाठी बराचं अभ्यास लागतो. आम्ही कमिशण खाल्ल्याशिवाय सल्ले देतं नाही. आमचं कमिशण बाईकसंदर्भात सखोल सल्ला देण्यासाठी झ्याक कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि भाकरी आहे. वरवरचा सल्ला देण्यासाठी मिसळपावाची प्लेट समोर ठेवल्याशिवाय आम्ही माहिती देत नसतो.
इथे आम्ही लिटरली कमिशण खातो.
(मु.विं. कडुन बरेचं कमिशण येणे आहे. हिशोबपुस्तकात णोंद केली पाहिजे) =))

टवाळ कार्टा's picture

25 Dec 2014 - 12:49 pm | टवाळ कार्टा

मी पहिला सल्ला फुकटात देतो...मार्केटींग म्हणून ;)
नाहीतर माझे कमिशन चिकनची कुठलीही स्टार्टर डिश असते :)

प्रसाद गोडबोले's picture

22 Dec 2014 - 4:43 pm | प्रसाद गोडबोले

पोरं नशीबवान आहेत .

तुम्ही लेकाला गाडी घेवुन देताय , तिकडे मुवीही पोराला कोणती गाडी घेवु हीच चौकशी करत आहेत ... खरंच नशीबवान आहेत पोरं :)

इथं आम्ही स्वतःच्या खिष्यातल्या दीडक्या घालुन "फायरफॉक्स्ची सायकल घेवु का ? १७ हजारत येईल ." असे विचारले तर "तुम्ही काय डोक्यावर पडला आहात काय ? आहे ही कार चालवा आधी. ती चालवायला तरी वेळ मिळतोय का? " असा प्रतिप्रश्न येतो .... आई बायको आणि मावशीकडुनही *fool*

सस्नेह's picture

22 Dec 2014 - 4:51 pm | सस्नेह

असं बघा, शहरे मोठी होत चाललीयेत, आणि मुलांच्या कॉलेज, ट्युशन इ. च्या वेळा एकदम टाईट. कुठवर सायकल दामटायची त्यांनी ? एक ब्याटरीवरची गाडी घेऊन दिलेली, तिचे पार्टच मिळेनात. स्कूटी लेडीज वाटते म्हणतो. मग काय पर्याय ? एक तर वडाप नायतर बाईक. सध्या वडापवर भागवतोय बिचारा.

प्रसाद गोडबोले's picture

22 Dec 2014 - 5:01 pm | प्रसाद गोडबोले

एक ब्याटरीवरची गाडी घेऊन दिलेली

ब्याटरीवरची गाडी ... हे तर रॅगिंग झालं =))

मग आता एन्फिल्डच घेवुन द्या पोरगा खुष होईल अन आयुष्यभर लक्षात ठेवेल .

( माझ्या बेष्ट फ्रेंडला त्याच्या आईने एन्फिल्ड थंडरबर्ड घेवुन दिली होती तो इंजिनीयर झाल्यावर मग पुढे जॉब लागल्यावर त्याने आईला नॅनो भेट दिली :) म्हणजे तसे तो होण्डा जाझ म्हणत होता पण आईला नॅनोच हवी होती म्हणुन )

वरीलप्रमाणे पाहिल्यास थंडरबर्ड म्हंजे अशोक सराफ का ? की कवट्या महाकाळ राहुल सोलापुरकर ?

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 6:59 pm | टवाळ कार्टा

नाय ब्बॉ... माझ्यासाठी सगळ्या बाईक्स स्त्रीलींगीच असतात आणि असणार ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Dec 2014 - 8:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाय ओ...रॉयल एण्फिल्ड म्हणजे निर्मिती सावंत... :)...!!