✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाइक्स घेताना - भाग २

ट
टवाळ कार्टा यांनी
Mon, 12/22/2014 - 13:26  ·  लेख
लेख
बाइक्स घेताना - भाग २ भाग - १ … तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत १००-११० cc १. दमड्या - सगळ्यांत कमी २. मायलेज … "कितना देती है" - सगळ्यांत जास्त ३. दिसणे - काकूबाई / वरणभात ४. ताकद (power) - ७५+ पळवली की धापा टाकणार ५. आराम - अगदीच टुकार ६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च - सगळ्यांत कमी ७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) - फक्त महिंद्र कडून हिरो स्प्लेंडर hero splendor पॅशन प्रो hero passion pro स्प्लेंडर प्रो क्लासिक (नवीन) hero splendor pro classic होंडा ड्रीम निओ / युगा “honda ट्विस्टर “honda बजाज डिस्कव्हर “bajaj टिव्हिएस स्टार सिटी सुझुकी स्लिंग शॉट महिंद्र सेंच्युरो पंटेरो “mahindra हा सगळ्यांत जास्त खप होणार्या बाइक्सचा विभाग … सगळ्या कंपन्यांच्या नफ्यातला मोठा हिस्सा या दुचाकींच्या विक्रीतून येतो खपाच्या बाबतीत हिरो अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवते इथे … हिरोच्या स्प्लेंडर आणि पॅशन यांच्याबद्दल काही लिहायलाच नको … tried, tested and proven themselves मोडेल्स आहेत ती … हिरो अजून पर्यंत तरी होंडाचीच इंजिन्स वापरत आहे पण लवकरच ती EBR च्या इंजिनाने बदलण्यात येतील … पण हिरोला २ खूप मोठे फायदे आहेत …. खूप मोठे service network आणि स्वस्त सुट्टे भाग … बाइकची किंमतसुध्धा वाजवी आहे आणि ५ वर्षे हमी … मायलेज भरपूर …. दिसण्याच्या बाबतीत या ठिकठाक … या विभागातली अलका कुबल :) नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ती या विभागातली सगळ्यात हटके बाइक आहे \m/ … साधी पण स्टाईलिश … old wine in new bottle … रेशम टिपणीस सारखी :)
सध्ध्या होंडाने ड्रीम निओ / युगा आणुन हिरोला समर्थ पर्याय उभा केला आहे … होंडाच्या इंजिनची गुणवत्ता ही सर्वोत्तम आहे … आणि शहरे व आसपासच्या परिसरात service center असतातच … ही स्मिता पाटील आणि होण्डाचीच ट्विस्टर मात्र या विभागातली वर्षा उसगावकर ;)
बजाजची डिस्कव्हर सिरीज सगळ्या विभागांत आहे … बजाजचा सर्वांत मोठा प्लस पोइण्ट म्हणजे सगळ्यात कमी किंमत, सगळ्यात जास्त मायलेज … खूप स्वस्त सुट्टे भाग … नुस्ते बघून कळतच नाही की १०० वाली का १२५ वाली का १३५ वाली 8) … परंतु इंजिन refinement मध्ये हिरो आणि होंडाच्या मागे पडते… डिस्कव्हर सिरीज थोडक्यात jack of all trades master of none अशी आहे … या विभागातली निशिगंधा वाड :P
टिव्हिएस आणि सुझुकी सध्यातरी खपाच्या बाबतीत वरच्यापैकी कोणाच्याच जवळपास सुध्धा नाहीत… service network कमी आहे
महिंद्राने सेन्च्युरो / पटेरो असे २ पर्याय दिले आहेत … यांनासुध्धा ५ वर्षे हमी … त्यांच्यात मात्र काही first in class वैशिष्ठ्ये आहेत …जसे इंजिन immobilizer, find me parking lights, remote flip key … comes with freshness but not sure about potential इथली सुप्रिया पिळगावकर :D
अवांतर - जुन्या मराठी नायिका निवडण्याचे कारण … looks plain based on what we get to see :D उपमा हुकल्या असतील तर पर्याय सुचवावेत ;) क्रमश:
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47808 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

नाय नो नेवर...

टवाळ कार्टा
Tue, 12/23/2014 - 09:33 नवीन
नाय नो नेवर... Royal Enfield आकाराला मोठी आहे पण "बेढब" नाहीये...तस्मात तिच्यासाठी कमनीय बांधाच सुचवला जाईल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

Royal Enfield= सई ताम्हणकर?

प्रसाद गोडबोले
Tue, 12/23/2014 - 12:20 नवीन
Royal Enfield= सई ताम्हणकर?;) बिकिनीतील फोटो डकवा रे कोणीतरी सई चा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नावे सुचवा...नक्कीच विचारात

टवाळ कार्टा
Tue, 12/23/2014 - 12:24 नवीन
नावे सुचवा...नक्कीच विचारात घेतली जातील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

घेऊन टाका...भन्नाट सायकल आहे

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 16:52 नवीन
घेऊन टाका...भन्नाट सायकल आहे नवीनच सुरु करत असाल तर \m/ मी आत्ताच घेतली आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बाकी पोरे नशीबवान यात शंकाच

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 16:55 नवीन
बाकी पोरे नशीबवान यात शंकाच नाही...आमी इथे घासून घासून मुम्बै व्हर्सीटीतून डिस्टिंक्शन काढूनपण बैक नव्हती दिली :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

फायरफॉक्स्ची सायकल घेवु का ?

काळा पहाड
Tue, 12/23/2014 - 22:27 नवीन
फायरफॉक्स्ची सायकल घेवु का ? १७ हजारत येईल
हितं दोन हजाराची सायकल घेवू म्हटलं तर डोस्कं खाल्लं माझं बायडीनं चार दिवसापुरतं आहे म्हणून. ती पडून राहीली त्यामुळं टोमणे खावे लागतात ते वेगळेचं. तुम्ही तर १७ हजाराबद्दल बोलताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

भौ...गल्लीतली आणि जाहिरातीतली

टवाळ कार्टा
Tue, 12/23/2014 - 22:35 नवीन
भौ...गल्लीतली आणि जाहिरातीतली इतका फरक आहे दोन्हीत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

हे जरा बायडीला कसं पटवायचं ते

काळा पहाड
Tue, 12/23/2014 - 22:44 नवीन
हे जरा बायडीला कसं पटवायचं ते सांगता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पोट कमी करायला वजनाला हलकी

टवाळ कार्टा
Tue, 12/23/2014 - 23:04 नवीन
पोट कमी करायला वजनाला हलकी असणारी सायकल घेतो म्हणून सांगायचे...हाकानाका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

पोट

कपिलमुनी
Tue, 12/23/2014 - 23:18 नवीन
माझी बायडी म्हणाली , वजनाला हलकी कशाला जड घ्या ! लौकर वजन कमी होइल :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझी बायडी म्हणाली सायकल

काळा पहाड
Wed, 12/24/2014 - 00:51 नवीन
माझी बायडी म्हणाली सायकल कशाला पाहिजे, सकाळी उठून पळायला जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मग सांगायचे...

मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 05:35 नवीन
पळायला हरकत नाही, पण तुझी "ती" मैत्रीण पण पळायला येते. चुकुन-माकून आम्ही दोघेही एकत्रच पळायला लागलो तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

प्लान उघड होईल ना मग.

काळा पहाड
Wed, 12/24/2014 - 10:15 नवीन
प्लान उघड होईल ना मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

म्हणजे हाच प्लान आहे का? तसे

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 10:23 नवीन
म्हणजे हाच प्लान आहे का? तसे वाटत नाही...कारण असे प्लान असणार्यांना थापा मारणे आपोआप जमते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

बाइकची आवड नाही परंतू

कंजूस
Tue, 12/23/2014 - 09:13 नवीन
बाइकची आवड नाही परंतू बाइक्सची जी काही चर्चा चालली आहे ती फार आवडली आहे. मीही माझे दोन शब्द लिहितो १)हे एंजिनचं CC प्रकरण काय आहे ? -यावरून एंजिनची एचपी (हॉर्स पॉवर कळते). -पेट्रोल एंजिनच्या CC संख्येला वीसने भागले की एचपी कळते १००cc चे ५एचपी एंजिन असते.मारुति ८००चे ४०एचपीचे एंजिन असेल. डीझेल एंजिनासाठी cc ला ४०ने भागावे ३लिटरD SUV वाहनाचे (३०००cc)चे ७५एचपी होतील.
  • Log in or register to post comments

तुम्ही जो फॉर्मुला लिहिला आहे

टवाळ कार्टा
Tue, 12/23/2014 - 09:27 नवीन
तुम्ही जो फॉर्मुला लिहिला आहे तो "ठोकळेबाज" (इन जनरल) फॉर्मुला आहे सारख्या CC असणार्या इंजिनपैकी ज्याची पॉवर जास्त त्याचे मायलेज कमी असते आणि ज्याची पॉवर कमी त्याचे इंजिन लाईफ जास्त असते त्यामुळे जर इंजिनमधून पावर आणि मायलेज यांचा सुवर्णमध्य हवा असेल तर ढोबळमानाने वरचा फॉर्मुला वापरतात याला सणसणीत अपवाद बघायचे असतील तर खालील बाइकबद्दल गुगलवा Any Royal Enfield...specially check out Taurus KTM Duke 200/400 Yamaha R-15 Honda CBR150R
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ठोकळेबाज फॉर्म्युलाच

कंजूस
Tue, 12/23/2014 - 11:00 नवीन
ठोकळेबाज फॉर्म्युलाच स्टार्टिँग पॉइंट असतो. १००किलो वजन २७ किमीच्या वेगाने नेले की झाले १ एचपी, (याप्रमाणे २एचपी=१००किलो ५४किमी वेग इत्यादी).आता हा गुणाकार कसाही करू शकता. २७ किलो वजन १००किमीच्या वेगाने नेले तरी तेच उत्तर येणार. मोटर कंपन्यांचे मार्केँटिंगवाले आपला खरेदीदार कोणता गट आहे आणि किती गाड्यांची मागणी येईल त्याप्रमाणे भारदस्त परंतू कमी माइलेज अथवा उलट हलक्या आणि जास्ती माइलेज शिवाय यातले एक मधले मॉडेल बाजारात आणतात. आपली गरज ओळखायची. कधी गाडीचा भपका तर कधी कमी रिपेअर या मुद्द्यांवर गाड्या खपतात.
  • Log in or register to post comments

या धाग्यावर समकालीन चालू

गवि
Tue, 12/23/2014 - 13:32 नवीन
या धाग्यावर समकालीन चालू बाईक्सचीच चर्चा होणार हे स्वाभाविक आहे. पण इथे उपस्थित प्रौढ (शब्द आवडीनुसार बदलावा) 1960-70s दरम्यान जन्मलेल्या बंधूंनी ( आणि ॲप्लिकेबल असल्यास भगिनींनी) आपल्या त्या वयातल्या बाईक्सचा नामोल्लेख तरी करायला हरकत नाही. त्या आता कै. झाल्या असल्या तरी त्या टू स्ट्रोक छाव्यानी आपली जवानी माजवली.. आपलं.. गाजवली.. माझी आदरांजली पहिली स्वत: घेतलेली सुझुकी सामुराई आणि तिची बहीण शोगन यांना. काही वर्षे सुझुकी फिएरो ही बाईकदेखील वापरली. हल्ली मिळते का ही? येझ्दी जावा राजदूत यांना तर पुष्पचक्र अर्पण केले पाहिजे. फार आठवणी जुळल्या आहेत.
  • Log in or register to post comments

गवि अवं... लुना राहिली की राव

मदनबाण
Tue, 12/23/2014 - 13:39 नवीन
गवि अवं... लुना राहिली की राव ! हो तीच तीच जी समस्त मराठी जाल विश्वावर ब्रह्मे यांना प्रसिद्ध करुन गेली ! ;) शिवाय यामाहा आरएक्स -१०० ला कसे काय विसरलात बॉ ? Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आरेक्स हंड्रेड.. होय रे होय

गवि
Tue, 12/23/2014 - 13:44 नवीन
आरेक्स हंड्रेड.. होय रे होय मबाशेठ.. काय पळायची ही.. स्लिम शेप अन हंड्रेड सीसी खूप होतील असे हलके वजन. टू स्ट्रोकचे दिवस संपल्यावरही केवळ हिच्यापासून अलग होणे शक्य नसल्याने ती जपून ठेवणारे भरपूर लोक होते. बाकी ल्युनाला अस्मादिकांनीही लिखाणात मानाचं पान दिलंय. आठवलं असेलच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ल्युनाला अस्मादिकांनीही

मदनबाण
Tue, 12/23/2014 - 13:49 नवीन
ल्युनाला अस्मादिकांनीही लिखाणात मानाचं पान दिलंय. आठवलं असेलच.. खरं सांगु... इसरलो हाय बघा. जरा दुवा ध्या की... बाकी टीव्हीएस सुझिकीची फोर स्ट्रोक स्पेक्ट्रा ही १५० सीसीची माझी पहिली दुचाकी होती. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एक शंका नेहमी मनात डोकवते. या

काळा पहाड
Tue, 12/23/2014 - 22:32 नवीन
एक शंका नेहमी मनात डोकवते. या आर एक्स १०० गाड्या नेहमी चकाचक नव्या कोर्‍या कशा काय दिसतात? एक पण जुनी कशी काय दिसत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कारण त्या डायवरचे पहिले प्रेम

टवाळ कार्टा
Tue, 12/23/2014 - 22:35 नवीन
कारण त्या डायवरचे पहिले प्रेम असतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

नै म्हणजे साफ्सूफ म्हणत नाही

काळा पहाड
Tue, 12/23/2014 - 22:39 नवीन
नै म्हणजे साफ्सूफ म्हणत नाही मी. एकदम नवीन फॅक्टरी मॉडेल टाईप दिसतात. चकचकीत कलर. वापरून वापरून जुन्या दिसायला हव्यात ना. आमची बाईक काही वर्षातच जुनाट दिसायला लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

रीस्टोरेशन

कपिलमुनी
Tue, 12/23/2014 - 23:22 नवीन
सर्व बाईक रिस्टोर करतात. बफिंग आणि क्रोम पॉलिश करून घेतला की बाईक चकचकीत दिसते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

कोणी काहीही म्हणो..."झालेत

टवाळ कार्टा
Tue, 12/23/2014 - 19:19 नवीन
कोणी काहीही म्हणो..."झालेत बहु...होतील बहु...परंतू यासम हिच" => RD-350 अजूनही सेकंड हँण्ड घ्यायला गेलात तर १ पेटी लागतात...आणि पर्फॉर्मन्स बोले तो...मधुबाला :) \m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

येझडी

कपिलमुनी
Tue, 12/23/2014 - 17:26 नवीन
Image removed. ह्येचा कोणाला अणुभव आहे का ? अत्रंगी बाईक !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मला भरपूर अनुभव आहे. या

गवि
Tue, 12/23/2014 - 17:38 नवीन
मला भरपूर अनुभव आहे. या येxxx मधे किक मारुन झाल्यावर तीच उलट दिशेत (समोर) खाली पाडून त्याचा गियर लिव्हर म्हणून वापर करावा लागतो. मागच्या बाजूला गियर उतरवण्यासाठी काही नसल्याने टाचेचा उपयोग करता येत नाही. त्याऐवजी लीव्हरच्या खाली पायाची बोटे नेऊन उलटी वरती ढकलून गियर खाली आणायचे. स्टार्ट करताना लांब पाऊल असलेल्यांचा अंगठा पुढच्या फुटरेस्टवर आपटून नख उचकटण्याचा धोका. मुळासकट नख उखडणे आणि अनेक महिने ठसठसणारी वेदना अनुभवास आली आहे. बादवे या फोटोतल्या येझदीला आडवी जादा स्टेपनी दिसत नाही. बाईकमधे सहसा नसणारं ते फीचर होतं तिच्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

०/गवि\०

कंजूस
Tue, 12/23/2014 - 13:45 नवीन
०/गवि\० अजून या गाड्या चालवत असाल तर गाडीसह मालकाच्या फोटोचे स्वागत फोटूशिवाय मजा नाही ९०च्या अगोदरचे फोटो टाकाच मिपा विंटेज का काय ते .
  • Log in or register to post comments

अजिबात संबंध उरला नाहीये

गवि
Tue, 12/23/2014 - 13:54 नवीन
अजिबात संबंध उरला नाहीये दुचाकीशी. :-( पूर्वी बाईक हेच पाय होते इतके सदैव त्यावरुनच भ्रमण असायचे अन आता आठेक वर्षं दुचाकीला हातच लावला नाही. आता नीट चालवता येईल का अशी एक शंका मनात खोलवर आहे. चारचाकीच्या अतिरेकामुळे हे असं वाटतंय. मोठी गॅप झाली तर परत बाईक चालवताना प्रोब्लेम येऊ शकतो का ? कोणाचा काही अनुभव ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

माझा थोडाफार अनुभव..

योगी९००
Tue, 12/23/2014 - 14:06 नवीन
मोठी गॅप झाली तर परत बाईक चालवताना प्रोब्लेम येऊ शकतो का ? कोणाचा काही अनुभव ? तितका प्रॉब्लेम येत नाही पण चार-चाकी चालवताना जो स्वतःवर विश्वास असतो तो रहात नाही आणि थोडीफार भिती वाटते की पाठीमागून कोणी चारचाकीवाला उडवेल म्हणून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

_/\_

असंका
Wed, 12/24/2014 - 10:36 नवीन
_/\_ काय सुरेख निरीक्षण!! चारचाकीची सवय नसली तरीही; चारचाकीतून उतरल्या उतरल्या दुचाकीवर बसलो तरी हे असंच होतं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

हाय तुमने तो चलायीच नही

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 10:53 नवीन
हाय तुमने तो चलायीच नही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

एकदा लोणावळा अॅम्बिवैली

कंजूस
Wed, 12/24/2014 - 06:55 नवीन
एकदा लोणावळा अॅम्बिवैली रस्त्यावर पक्षी बघायला फिरत होतो. इतक्यात प्रचंड मोठा आवाज झाला म्हणून कडेला उभे राहिलो तर आठ दहा बाईकस्वार खूप वेगात गेले. अशा तीनचार फेऱ्या झाल्या. १०००cc च्या असाव्यात का त्या बाइक्स?
  • Log in or register to post comments

हो. अशी वीसतीस बाईक्सची ती

गवि
Wed, 12/24/2014 - 07:24 नवीन
हो. अशी वीसतीस बाईक्सची ती ग्यांग नाशिक, इगतपुरी,लवासा,लोणावळा अश्या भागांत अनेकदा भडभडून जाताना दिसते. फास्ट असतात पण वेडेवाकडे झिगझॅग पॅटर्न , कसरती किंवा तत्सम धोकादायक आचरटपणा नसतो. कंट्रोल चांगला असावा त्यांचा. बाकी युनिफार्मसारखे संपूर्ण लेदर कव्हर्ड कपडे आणि हेल्मेट वगैरे बरोबर नियमित घालतात असे दिसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हेच ते "मानसिक वय > ४० -

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 08:10 नवीन
हेच ते "मानसिक वय > ४० - उपप्रकार २"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

असावे तसेच असे दिसते. कारण

गवि
Wed, 12/24/2014 - 08:27 नवीन
असावे तसेच असे दिसते. कारण एका बाईकवर एकच स्वार असतो मोस्ट केसेसमधे. म्हणजे पोरी भापण्याचाही उद्देश नसावा. शुद्ध बाईकिंगच असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अशी बाईक असेल तर "पोरी

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 08:44 नवीन
अशी बाईक असेल तर "पोरी भापण्याची" गरज नसते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+ १

मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 15:11 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे भुंगे पोरी कशाला भापवतील

कंजूस
Wed, 12/24/2014 - 10:13 नवीन
हे भुंगे पोरी कशाला भापवतील म्हणा. त्यांची कमळे वेगळी असतात. एकदा केरळला जातांना शेजारचा पोरगा एक चकाचक मलयाळम (असले मराठीत येईल का ?)कार आणि बाईकचे मैगझिन चाळत होता. त्याला खुणेनेच कोणती बाईक आवडते विचारल्यावर त्याची कळी खुलली आणि त्याने एक तसल्या बाईकचा फोटो दाखवला (मुवि वाचताय ना ?)मग आमची गट्टी जमली हे सांगायला नको.
  • Log in or register to post comments

अग्गागा...मराठीत बाइकचे मासीक

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 10:30 नवीन
अग्गागा...मराठीत बाइकचे मासीक निघाले तर ते मासीक काढणारा डूबेल की ओ मराठी माणसाला भांडणे पहाण्यात्/करण्यात जास्त रस असतो...त्यात दोन्ही पार्टी मराठीच असतील तर जास्तच चेव येतो...आणि तो जास्तीचा चेव मिंधीत(मराठी + हिंदी) मधे बाहेर पडतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ये मराठी माणूस का अपमान है.

काळा पहाड
Wed, 12/24/2014 - 11:09 नवीन
ये मराठी माणूस का अपमान है. हम तुमको माफी मागो करके बोल देता है. नही तो जर मराठी माणूस भडका ना तो इतना आदळ आपट करेगा ना की तुम्हारी पाचके उपर धारण बैठेगा. मराठी माणूस को कमी लेखके देशका राजकारण नही करनेका ये लक्षात लो बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

_/|\_

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 11:14 नवीन
_/|\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

अगर तुम करेगा मराठी माणुस का

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 12/24/2014 - 15:01 नवीन
अगर तुम करेगा मराठी माणुस का अपमान... अगर तुम करेगा मराठी माणुस का अपमान... हाम आके पिळेगा तुम्हारा कान थोर कवीवर्ज (होय वर्जचं) नावं काही "आठवतं" नाहीये. आठवले की सांगेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

अगोदरच १०००cc (फटफटी)चा आवाज

कंजूस
Wed, 12/24/2014 - 11:42 नवीन
अगोदरच १०००cc (फटफटी)चा आवाज मोठा आणि त्यात साइलेन्सर कशाकरता काढून टाकता हो भाऊ ?हेल्मेट घालून लेख वाचावा लागेल.
  • Log in or register to post comments

फर्स्ट जनरेशन सीबीझी

गुंड्या
Wed, 12/24/2014 - 12:00 नवीन
माझी पहिली बाईक, फर्स्ट जनरेशन सीबीझी. अप्रतिम डिझाईन, सुंदर हँडलिंग या कारणांमुळं खूपच आवडायची. पण हीरो आणि होंडाच्या स्प्लिटनंतर पार वाट लावली डिझाईनची ... :(
  • Log in or register to post comments

Hero Honda CBZ

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 12:05 नवीन
Hero Honda CBZ हिच ती...जीने भारतातल्या बाइक इंडस्ट्रीमधे बदलाचा ट्रिगर दाबला \m/ रच्याकने तीच्या डिझाईनची वाट हिरो आणि होंडाच्या स्प्लिटच्या आधीच लावलेली...डिझाईन चांगले ठेवले असते तर पल्सरचे यश थोडेफार तरी नक्कीच कमी झाले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंड्या

सीबीझी स्टार जेव्हा बाजारात

गुंड्या
Wed, 12/24/2014 - 12:13 नवीन
सीबीझी स्टार जेव्हा बाजारात आली तेव्हापासूनच सेल कमी झाला होता... पल्सर तेव्हाही आवडली नाही आणि आताही नाहीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पल्सर तेव्हाही आवडली नाही आणि

टवाळ कार्टा
Wed, 12/24/2014 - 12:15 नवीन
पल्सर तेव्हाही आवडली नाही आणि आताही नाहीच!
तुमची आवड काय?? Royal Enfield च्या पंथातले असाल तर हार्ले सोडून बाकी काहीच आवडणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंड्या

हे अवश्य बघा..

गवि
Wed, 12/24/2014 - 12:47 नवीन
हे अवश्य बघा.. http://youtu.be/uPjkmPLjpkE छोटासाच व्हिडो आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा