आरक्षणा संबंधी नवीन विचार

येडाफुफाटा's picture
येडाफुफाटा in काथ्याकूट
19 Dec 2014 - 4:23 pm
गाभा: 

माझे हिंदु/पुरुष/उच्चवर्गीय/ऊच्चवर्गीय/पहिला मुलगा असणे हीसुद्धा matter of fact च आहे. आणी त्याचे 'परिणाम भोगणे' असली काही परिस्थिती आलेली नसून त्याचे वट्ट फायदे मी 'enjoy' करत आहे. तरी काळजी नसावी.
मला फक्त आरक्षणाला टार्गेट करायचे नव्हतेच. पण ते कोणाला व कसे दिले गेले आहे याचा 'फेरविचार' मला सुचवायचा आहे. तुम्ही तुम्हाला फायदा मिळत असताना त्याचा फेरविचार करणे अपेक्षित नाही पण थोडा वेळ निदान एकांतात तरी विरूद्ध बाजूने विचार करायला काय हरकत आहे. पण मी पुरुष/straight असूनदेखील feminist/LGBT वाल्यांना पाठिंबा देतो. फक्त माझ्या घरातील सदस्यासाठी नाही. मागच्या पिढीतल्या सुधारकाना सतीबंदी निरर्थक वाटत होती. त्याना काय गरज होती समाजविरोधात जायची? महानायकाने सशक्त होईपर्यंत आरक्षण सुचवल होतं. पण सशक्तची व्याख्या म्हणजे दूसर्याने निमूटपणे सगळ्या अटी मान्य कराव्यात असे नाही. परिस्थिती असताना क्रिमी लेयरमधून सुट घेणारा तितकाच दांभिक म्हटला पाहिजे जितक तुम्ही लाच/हुंडा/पत्नीकडून सेवा घेणार्याला म्हणता.
आरक्षणातल loophole हे आहे की महानायकाने त्या वेळेसच्या बंदिस्त जातीनुसार अख्ख्या जातीलाच आरक्षण लागू केल. त्यावेळेसदेखील महानगरातून/शहरातून जात वगैरे एवढ फेमस नव्हत, पण majority लोकसंख्या ग्रामीण भागातील असल्याने हे mass operation चालून गेलं. Induvidual पेशंटला तपासलं गेल नाही. काही मर्यादा घातल्या का? नाही. शिक्षणात आरक्षण ठेवलं असताना नोकरीत कशाला? त्यांच्या चरितार्थाची तजवीज ही अशी करायची? नोकरी देउन? मग नोकरी म्हणजे केवळ चरितार्थच होईल. जे काही लोक सरकारी नोकरीत राहून त्याला सेवा मानतात, त्याना खाज सुटलीये असच म्हणाव लागेल.
Reservation म्हणजे APMC कायद्यासारखं केलय. शेतकर्याच्या कल्याणासाठी म्हणायच अन् गब्बर शैतकरी फायदा घेतात.(थोड्याफार गरजू शेतकर्याना पण फायदा होतोच. अन त्यांच्या नावाखाली हे फायदे घेतात. वरून सान्गायच आपली union आहे त्या दुसर्या दलाल/मारवाड्याकड जाउ नको. 'ते' लई वाइट असतात.) गरजू बसलेत ग्रामीण भागात. अन् कोणत्याही बाबतीत practical असणारे , सगळ्या सुविधांचा यथेच्छ उपभोग घेणारे शहरी किंवा ग्रामीण सुस्थितीत असणारे तथाकथित मागासवर्गीयच याचा maximum लाभ घेतात. ------------
आरक्षणामुळे किती फायदा झाला? 1991 च उदारीकरण, सगळ्याकड आलेले laptop,computers,fridge,motorcycle,familarity with modern world,television,news,internet याचा किती फायदा झाला? उत्तर महानायकाच्या विरोधात जात असलं तरी ते आहे आरक्षणाच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त. बाजारपेठ संस्कृती अस्तित्वात आल्याने तो कोणत्या जातीचा आहे हे मला काय करायचे आहे? म्हणून व्यापारी जात/धर्म at least विकण्याच्या बाबतीत तरी पाळत नाहीत. रहिवासी किवा लग्नाच्या बाबतीत पाळले तरी आपल काही जात नाही. आता आपण ह्या जमान्यातलेव्यापारी बघू. गल्लीबोळातले मोबाइल,कापड,हॉटेल,किराणा दुकानवाले इतके झालेत, की competition मुळे जात नावाची चीजच at least वस्तू विकत घेण्यात तरी उरली नाहीये. ती उरलीये फक्त लग्नात आणी केवळ ग्रामीण भागातील वसाहतीमध्ये. शहरात flat विकताना जात पाळणे किती आतबट्ट्याचे आहे हे सांगणे नकोच. Public transport (local trains/ PMT/Buses) यात travel करताना त्याच्या नको नको त्या गोष्टी नाका तोंडात जाताना अस्पृश्यता कशी पाळली जाईल? कॉलेजात झक् मारत हॉस्टेल रहाव लागत. एकमेकांच्या तोंडातले घास काढून खाल्ले. सलग आंघौळी न करण्याचे रेकॉर्ड , BP बघणे, 'दुसर्या धर्म-प्रदेशातल्या' पोरींवर कमेंट मारणे , दुसर्याचे नको ते अवयव दिसणे याच्या पलीकडे जात संपुष्टात येणे म्हणजे काय?पण दुसर्या दिवशी collegeची fee त्याला संपुर्ण return मिळते तर माझ्या खिशाला 70-80 हजाराचा फटका. ढुंगणाला ढुंगण घासत अभ्यास केल्यावर सारखेच मार्क मिळणार मग नोकरी पात्रतेत 5-10% सवलत का? हे मुद्दे माझ्या लेखी तरी गौण आहेत. 70-80 हजारानी किवा टक्क्यानी कोणी खाली-वर जात नसते. आणी माझ पण उत्तमच चाललय. पण प्रश्न हा आहे की यामुळे 'जात' खाली जातेय का वर? ह्या घडीला जात उच्चवर्णीय नाईलाजाने पाळतायत. तर जातीचे फायदे मिळवणारा मागासवर्गीयातला उच्चवर्गीय समाज त्याच समाजातल्या इतर खर्याखुर्या मागासाला दाबत- आश्वासन देत 'जात' टिकवून आहे. निदान हे तरी ओळखण्याचा प्रयत्न व्हावा.
-------------
ह्याला parallel उदाहरण आहे गोरे-काळे हा भेदभाव. हा तेवढा वादग्रस्त नसेल त्याचे फायदे-तोटे पण limited असतील तरी मानसिकता सेम आहे. गोरे आणी खासकरुन स्त्रिया आपली आपल्या धवल कांतीमुळे अधिकचे स्त्री दाक्षिण्याचा लाभ घेतात. उदा.लग्नाच्या वेळेस जास्त मागणी व इतर general ठिकाणी. (पण 'गोरं'पण जपण किती त्रासदायक आहे , पुरुषाकडून सार्वजनिक ठिकाणी न्याहाळल जाण हे काही जणाना हवहवस वाटत असेलही बापडे. पण बहुतांशी महिला याच्या विरोधातच आहे.) मुळ काळ-सावळे असलेले काजोल-शाहरुख छाप cosmetics च्या जाहिराती करुन गोरेपणाला एक अधिष्ठान प्राप्त करुन देतात. पुरुषी वर्चस्वामूळे काळे पुरुष खपतातसुद्धा पण महिलाना लग्न बाजारात settlement करावी लागते. काळा आहे म्हणून ओबामाने पावडर लावावी असे तर शाहरुख सांगत नाही ना. बाकी शाहरूखच्या व काजोलच्या कांतीत तरी DDLJ पासून HNY पर्यंत बराच फरक पडलाय.
टोच्या 1- अगर किसी चीज को दिल और शिद्दतसे चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने मे जुट जाती है अस कोण्या संतान म्हणून ठेवलय. लोकांच्या चेहर्यातले तिमिर जावो याची इच्छा अगदी मनातसुद्धा काही काळबेरं न ठेवता केल्याचे फळ रसाळ नसली तरी गोरी-गोमटी आली आहेत.
टोच्या 2- उडदामागे काळे गोरे फरक न करण्याची संस्कृती आपली. अमेरिकेत/इंग्लंडमध्ये आशियनाना काळे-गोरे गटात न ढकलता केवळ काळे एशियन या क्याटेगरीत ढकलतात. असे कोणीतरी म्हटले होते म्हणे बहुधा. जाणकारांनी आपला 'उजेड' पाडावा.

प्रतिक्रिया

उजेड पाडण्यासाठी आधि आंदोलन पेटवाव लागेल.
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.नवा विषय मिळाला ' मिपावर नविन आयडी साठी खास आरक्षण असाव का ?'
कार्यकर्ते या इकडे ....
*biggrin*

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 12:56 am | मुक्त विहारि

असा एक परीसंवाद आखायचा का?

काळा पहाड's picture

19 Dec 2014 - 6:18 pm | काळा पहाड

यामुळे 'जात' खाली जातेय का वर?

तेवढी अक्कल जर समाज धुरीणांना असती तर काय पाहिजे होतं? मोदींसारख्या सर्वमान्य नेत्याला सुद्धा जातीचा फायदा घ्यायचा मोह झाला यावरूनच आपल्या समाजाची नैतिक पातळी किती खालावलीय याची कल्पना यावी (तथाकथित नव-जाणत्या राजासारख्या अति-जातियवादी माणसाचं तर सोडाच). पण एका गोष्टीबद्दल तरी अभिमान बाळगायची संधी या समाजानं माझ्या पिढीला दिली हे काय कमी आहे? कोणतंही आरक्षण न घेता, कष्टानं, प्रवाहाच्या विरूद्ध पोहत वर जायला लावल्याबद्दल या राजकारण्यांचे आभारच मानायला हवेत. त्या अभिमानाची शिदोरी तर कितितरी कठीण वेळा उपयोगी पडणार आहे.

येडाफुफाटा's picture

19 Dec 2014 - 6:44 pm | येडाफुफाटा

तुम्हाला s.p. Pattern विषयी बोलायच आहे का?

काळा पहाड's picture

19 Dec 2014 - 8:46 pm | काळा पहाड

ही काय भानगड आहे?

येडाफुफाटा's picture

19 Dec 2014 - 11:51 pm | येडाफुफाटा

तुम्ही कोणत्या नव जाणत्या राजाबद्दल बोलता आहात? तोच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Dec 2014 - 7:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आरक्षण ही समाजोपयोगी गोष्ट राहिली नसुन राजकारण्यांचं चिलखत कम व्होटबँक झालेली आहे.

(इंजिनिअरिंगच्या फीसाठी काढलेल्या कर्जाचे हफ्ते फेडणारा आणि फी माफ झालेल्यांकडे आलेल्या फोर व्हीलर आणि घरांकडे पाहणारा) अनिरुद्ध

येडाफुफाटा's picture

19 Dec 2014 - 10:24 pm | येडाफुफाटा

अगदी डिट्टो.

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 12:55 am | मुक्त विहारि

शतकी धागे कसे असावेत? ह्यासाठी "वाखूसा.."

नव्या बाटलीत जूनी दारु....

खटपट्या's picture

20 Dec 2014 - 2:44 am | खटपट्या

हेच बोलणार होतो. चावून चोथा झालेला विषय !

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 2:54 am | मुक्त विहारि

अशी एक शंका मनांत आली.

आज-काल अशा धाग्यांवर मुळ विषय बाजूला ठेवून इतर चर्चाच जास्त करायचा विचार आहे.

म्हणजे धागा शतकी झाला ह्याचे आत्मीक समाधान धागाकर्त्याला आणि कुठल्याच प्रकारे मिसळपावकरांची एकजूट तोडण्याचे समाधान धागाकर्त्यांना न मिळाल्याने खर्‍या मिपाकरांना पण समाधान.

बादवे,

तुम्ही (खटपट्या) भारतात कधी येताय?

सामान्यनागरिक's picture

20 Dec 2014 - 1:47 pm | सामान्यनागरिक

आरक्षणाची शोकांतिका ही आहे की वर सगळ्यांनी मांडलेले मुद्दे आपल्याला पटतात तसे ते राजकारण्यांनाही पटतात. पण कोणीही काही करु शकत नाही सध्या मराठा आरक्षणावद्दल जे काही चालु आहे ते पाहुन हळहळ वाटाते. खासगीते वोरिध करायचा पण बाहेर आणि विधीमंडळात मात्र त्याला पाठिंबा द्यायचा हे चालुच आहे. खरंच कोणी काही करु शकत नाही काहो?

राही's picture

20 Dec 2014 - 4:57 pm | राही

सध्याच्या काळात आरक्षणाचा एक फायदा कुणाच्याच कसा लक्षात आला नाही? 'घर-वापसी'साठी आरक्षण अत्यावश्यक आहे!

येडाफुफाटा's picture

21 Dec 2014 - 5:20 am | येडाफुफाटा

म्हणजे ह्याचा व्यत्यास आरक्षण नसैल तर 'घरा'-बाहेर पडू असा करता येईल काय?

hitesh's picture

21 Dec 2014 - 1:51 pm | hitesh

घर वापसी अभियानात , उत्तर ध्रुवावरुन आलेले लोक पुन्हा उत्तर ध्रुवावर परत जाणार का ?