बोगदा

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
14 Oct 2014 - 11:36 am

समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा..
(रस्त्याच्या खालून तर चालत नाहीये ना मी?)

बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय...
(`कशाला मारली झक' असं आता वाटतंय... पण काय उपयोग?)

मी जात आहे..की येत आहे ?
(आयचा घो! रिवर्समधे चालतोयं की काय?)

..आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..!
(माझे डोळे उघडे आहेत का बंद? पण आता हे सांगणार तरी कोण?)

वाटचाल अवघड म्हणता म्हणता अशक्य होत चाललीय...मघापर्यंत पाउल तरी पुढे (की मागे ?) पडत होतं ! पण आता तर बोटही हलवणं अशक्य झालंय...
(बहुतेक माझी एमाराय चाललीये ! अजिबातच हालता येत नाहीये)

ओह. काय करू ? किंबहुना काही करण्याचा ऑप्शन मला आहे का ?
(एमाराय कुणी करायला सांगितली होती बरं?)

..आतापर्यंत तरी जे केलं ते ‘मी’च केलं का ? मला काही पर्याय होता का ?
( `ऐकावे डॉक्टरचे आणि करावे मनाचे' हेच खरं!)

माझी वाट चुकली आहे का ?
(यालाच `वाट लागली' म्हणतात का? पण आता `वाट पाहाण्याशिवाय' हातात काये ?)

किती काळ गेला समजत नाही. काळ ही संकल्पनाच या बोगद्यात अर्थशून्य ठरली आहे...
(पुन्हा तोच प्रश्न डोळे उघडेत का बंद? आणि ते सुद्धा कोण ठरवणार, मी की बोगदा?)

....अं ? हा आवाज कसला ? खरंच आवाज येतो आहे की चाहुलीला आसावलेल्या माझ्या कानांना भास होतो आहे ?
कोण ते हसतंय ? हे सुपरिचित असे मंद शांत सूर कुठून ऐकू येताहेत ?
(हल्ली पेशंटला एमारायमधे बासरी ऐकवतात असं दिसतंय!)

कुणाचं तरी निकट सान्निध्य जाणवतंय ... फार फार पूर्वी लहानपणी, स्मृती पोचते तिथपासून, अगदी श्वाससुद्धा घेता येत नव्हता तेव्हापासून माझा प्रेमानं सांभाळ करणारं कुणीतरी...तोच का तू ?
(का मीच तो? आयला, काय लफडा आहे हा? `मी' तू आहेस की `तू' मी आहेस? कोण कुणाशी बोलतंय?)

अन इथे कसा अवचित समोर आलास ?
(तू समोरून आलास का मागून हा खरा प्रश्न आहे! ....पण तो नंतर सोडवू.)

...ओह आता मी तुला ओळखले आहे..तू तो अंती असणारा आहेस..सगळं काही अखेर ज्याच्याकडेच जातं तो..
..नाही, नाही, पण तू तर सुरुवातीला पण होतास..! ..जेव्हा मी एक बिंदूसुद्धा नसेन, तेव्हापासून तूच तर सोबत होतास..! म्हणजे तू अंती नव्हे तर आदि...!

(अरे, आता आलं लक्षात तू आदी उर्फ अ‍ॅडी (किराणावाला)! आणि मी आँटी!)

हसू नको..मी ओळखलंय तुला. तूच तो ! तू..माझ्या अंतर्यामी राहून दिशा देणारा, माझे चलन वलन, वहन-भरण करणारा ...योगक्षेम चालवणारा आत्मन ! माझेच शुद्ध केवल स्वरूप..!
(येस, अ‍ॅड्या वाणी! कडकीत सुद्धा वाणसामान देणारा आणि मला शुद्ध डालडा देणारा तो तूच!)

..जनधिक्काराच्या अंधारात चाचपडताना थेंबाथेंबाने मी गलितगात्र होताना, मति तर्क अन मार्ग सारे खुंटले होते तेव्हा, विजेसारख्या क्षुल्लक गोष्टीचे बील थकले होते तेव्हा, तूच ना नवा मार्ग सुचवलास ?
(`आज उधार उद्या रोख' हाच तो वाणसामानाचा मार्ग आणि शेजार्‍याकडून टेंपरवारी कनेक्शन घेऊन घर उजळवून टाकलं होतस, आठवतंय?)

..होय. आता माझ्या थोडं थोडं लक्षात येऊ लागलंय...मागे वळून पाहताना काही काही उमज पडू लागला आहे.
...पुष्कळदा मला वाटत होतं मला निर्णय घ्यायचा आहे..
(आता तरी बीलं भरु का नको? चालललंय ते काय वाईट आहे?)

पण आता उमगतंय, ..निर्णय घेतले ते ‘मी’ नाही, तर माझ्या पूर्वकर्मांनी, ... त्या कर्मांच्या वेळोवेळी समोर ठाकलेल्या परिणामस्वरूप परिस्थितीने...
(ज्ञानीजनांनी पूर्वीच सांगितलंय `नाईलाज को क्या इलाज? आणि सिनियर सिटिझन्स म्हणतात ते, `कर्म माझं!' म्हणजे हेच असावं)

निर्णयाचे योग्य पर्याय अर्थात होते..पण अज्ञानाच्या धुक्यामुळे मी ते जाणले नाहीत. ...केवळ घेतले म्हणून काही निर्णय अंमलात आणले...कधी स्वत;च्या कधी इतरांच्या मतानं कर्म पार पाडले.
(आयला, संपतेयं का नाही ही एमाराय?)

होय.. तुझ्यासाठीच केली सर्व कर्मे..कधी भली कधी बुरी..कृष्ण अन धवल..सुचेल तसं केलं. आल्या क्षणाला साजरं केलं त्या कर्माच्या आहुतीनं
(अरे, गॅस कोण फुकटात देणार? तिथे पैशाची आहुती द्यावीच लागली)

कधी तू समोर असायचास, कधी वळणापलीकडे ! तुझे इशारे कधी कधी समजलेच नाहीत. कधी समजूनसुद्धा दुर्लक्ष केलं मी ! पण परिणाम भोगायला अन उपभोगायला लागले मात्र आपणा दोघांना ! एकत्रित..
(म्हणजे बीलं थकवायची मी आणि परिणाम मात्र `एकत्रित'! दैवी चमत्कार म्हणतात तो हाच)

या काळोख्या बोगद्यातला प्रवेश ही त्याचीच तर परिणीती नव्हे ?
(तू बोगद्यात आहेस का बाहेर? आणि एकावेळी दोघांचा एमाराय कसा चालूये?)

..यावेळी तुझे हास्य मघासारखे मुक्त नाही...!
(बील वाढलं की काय?)

...समजलं ! कधीतरी काहीतरी चुकलंय. नाही समजत, नक्की कधी अन कुठं...पण चुकलंय खरं ! पश्चात्ताप.. ? हं..चूक समजेल तर ना पश्चात्ताप ?
(छे, छे, रामराया, सोडव रे या हिवतापातून)

पण खोल तळाशी एक खात्री आहे रे..रस्ते चुकले असतील पण इरादे नक्कीच चुकीचे नव्हते. जन्म घेणं हातात नव्हतं पण जन्म घेतल्यावर जमेल तितके हातपाय हलवले, काही दिशा ठरवून मार्ग शोधण्याचा प्रयत्न तरी प्रामाणिकपणे केला रे !
(जन्म घेतला का दिला? हातपाय हालायचे थांबून आता, डोक्यात विचारांना सुद्धा हालायला जागा राहिली नाही. टोटल ज्याम!)

आणि हे सर्व तुझ्यासाठीच रे आत्मन, तुझ्यासाठी ! ना त्या आईवडिलांसाठी, ना बायको-मुलांसाठी, ना सख्या-जिवलगांसाठी. सगळं काही स्वत:साठीच बरं.
.( अ‍ॅडया, गैरसमज नको बरं, `आत्मन' म्हणजे संस्कृतमधे `ग्रोसर', ज्याच्याशिवाय `आत्मा चालत नाही' तो)

आज या अंधाऱ्या बोगद्याच्या अंतर्गृहात जणू माझी प्रज्ञा शुद्ध व्हावी तसे सर्व काही स्वच्छ दिसते आहे मला ! आता या ज्ञानाच्या क्षणी मला निवळलेल्या मानससरोवराचा तळ अगदी स्पष्ट दिसतो आहे.
(एमारायच्या पाईपात ही बिसलेरीची बाटली कुठून आली?)

अन हेही समजतंय की ही अनुभूती या ज्ञानासाठीच ! तुझीच योजना ही ! तुझ्या-माझ्यातले अंतर शून्य करण्यासाठी ! जिवा-शिवाची भेट घडवण्यासाठी ! द्वैताला अद्वैत करण्यासाठी !
(आयचा घो, जीवाला शिवायचा अनुभव यावा म्हणून मला या पाईपात घातलं?)

अन मग आता वेळ का लावतो आहेस जिवलगा ?
(त्यापेक्षा साईडनं पाईप खोल!)

पुरे झालं आता ! नको अंत पाहूस ! नको दुरून दुरून ते विलक्षण मोहक हास्य फेकूस ! भरून जाऊदे तुझ्या प्रकाशमय चैतन्याने माझा रिकामा गाभारा ! उजळून जाऊदे हे तमोमय कृष्णविवर तुझ्या दैदिप्यमान सान्निध्याने !
(लावा रे कुणी तरी लाईट लावा!)

.....या अज्ञान-बोगद्याचा अंत करणारे हे पाउल, मी शिल्लक राहिलेले सर्व बळ एकवटून हे पहा उचलले !
(मायला, आणि पुन्हा नवा बोगदा लागला!)

______________________________

(मूळ बोगदा इथूनच साभार!)

उखाणेमदत

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

14 Oct 2014 - 11:43 am | कवितानागेश

उत्तम रसग्रहण.:):)

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Oct 2014 - 11:51 am | डॉ सुहास म्हात्रे

कठीण आहे !

विटेकर's picture

14 Oct 2014 - 12:16 pm | विटेकर

शष्प देखील कळले नाही.
कुणी समजेलश्या भाषेत सांगेल का ?

संजय क्षीरसागर's picture

14 Oct 2014 - 12:29 pm | संजय क्षीरसागर

थोडी शोधाशोध केली तर सापडेल. आणि एकदा सापडल्यावर सॉलिड मजा येईल.

स्वप्नज's picture

14 Oct 2014 - 9:08 pm | स्वप्नज

असेच म्हणतो....

अशा दोन्ही साशंकता आहेत. ज्यांना माझ्या लेखनात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सांगतो की, आता खुद्द मान्यवरांनी सुरुवात केलीये, तेव्हा न्याय होईल की नाही याची खात्री (मला तरी) नाही.

एनी वे, बहुमतानं अल्पमताला दाबणं हे लोकशाहीत सुद्धा शक्य आहेच आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना तर ते सहज आहे. प्रस्थापिताविरुद्ध प्रतिवाद अवघड नाही कारण प्रस्थापिताकडे किती प्रज्ञा आहे ते मूळ लेख दर्शवतो. पण नवा विचार उचलून धरणं जनमनावर अवलंबून आहे.

तस्मात, माझा आयडी ब्लॉक झाला तर त्याला फेअर जस्टीस म्हणता येणार नाही पण दाद सुद्धा मागता येणार नाही.

अर्थात, जे लिहिलंय ती केवळ मूळ लेखाची खिल्ली नाही तर एकूण जनमानचा वैचारिक गोंधळ दर्शवण्याचा प्रयत्न आहे.
मला ब्लॉक होण्याची फिकिर नाही कारण अभिव्यक्ती हा सत्याचा अंगभूत धर्म आहे. इथे नाही तर आणखी कुण्याप्रकारे मी व्यक्त होत राहीनच. लेट अस सी.

कवितानागेश's picture

14 Oct 2014 - 12:39 pm | कवितानागेश

उत्तम प्रतिसाद.
- रीप्रेझेन्टेटिव्ह (टीम वाहव्वा! )

पैसा's picture

14 Oct 2014 - 1:02 pm | पैसा

प्रतिसाद आवडला. प्रस्थापितांचा णिशेध असो. __/\__

स्पंदना's picture

15 Oct 2014 - 4:34 am | स्पंदना

हाणा!! मारा!! तोडा!!
अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!!
देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!!
अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!!
देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!!
अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!!
देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!!
अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!!
देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!

अर्धवटराव's picture

15 Oct 2014 - 5:45 am | अर्धवटराव

=))

तुला गं काय झालं अपर्णे एव्हढा सगळा धावा करायचा...साक्षात भवानी तु...अगं हे सगळे स्वर्ग/जन्नतपती तुझ्याकडे आशेने बघतात...आणि तुच अशी  हाय खावी ना...

मला देखील कायच आकलन झालेले नाही

संजय क्षीरसागर's picture

14 Oct 2014 - 12:48 pm | संजय क्षीरसागर

कारण ती निव्वळ इकडचं तिकडचं उचलून केलेली फेकंफेक आहे. तो अनुभव असला तर मात्र `औषधोपचाराची' गरज आहे. अर्थात, लिहिण्याची स्टाईल अशीये की सामान्यांनी भारावून जावं पण एकूण गौडबंगाल काये ते विडंबनातून मांडलंय.

http://www.misalpav.com/user/*****/authored गाळलेल्या जागी योग्य आकडा टाकला की झालं!

पिलीयन रायडर's picture

14 Oct 2014 - 12:51 pm | पिलीयन रायडर

हे ही कळलं नाही...

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Oct 2014 - 1:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

ओके,
हा क्लु मिळाल्यावर मला साक्षात्कार झाला

विडंबन म्हणुन चांगलच जमलय

पैजारबुवा,

संजय क्षीरसागर's picture

14 Oct 2014 - 1:12 pm | संजय क्षीरसागर

मला साक्षात्कार झाला !

वॉट अ क्लू !!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2014 - 1:04 pm | अत्रुप्त आत्मा

असच्च माझं ही वरील सदर प्रतिसादाबद्दल झालय

पिलीयन रायडर's picture

14 Oct 2014 - 12:34 pm | पिलीयन रायडर

संक्षी... कोडि घालु नकात,.. लेख वाचायला प्रय्त्न केलाय.. अगदी प्रामानिकपणे... अर्ध्यातच अवसान गळालं... आता नक्की कशावर लिहीलय ते सांगाल तर कदाचित अर्थ लागेल.. (आज काही काम नाही फारसं..) शोधाशोध करायला सांगु नकात, ते मला जमत नाही..

बाळ सप्रे's picture

14 Oct 2014 - 12:36 pm | बाळ सप्रे

कोडं सुटत नाही बुवा!! अगदी अंधार्‍या बोगद्यात गेल्यासारखच वाटतय..

बाळ सप्रे's picture

14 Oct 2014 - 1:55 pm | बाळ सप्रे

साक्षात्कार झाला!!

बेशर्त स्वीकृती करूनही आकलन बाकी काही झालेले नाही.

पिलीयन रायडर's picture

14 Oct 2014 - 1:48 pm | पिलीयन रायडर

समजलं....

पिलीयन रायडर's picture

14 Oct 2014 - 1:57 pm | पिलीयन रायडर

आणि नाही आवडलं....

"तुम्हाला" विरोध करायचा म्हणुन नाही... दोन्ही लेख वाचले... तुम्ही ज्याला विडंबन म्हणत आहात ते वाचलं तर स्पष्ट सांगते, जमलेलं नाही.. तुमच्या लेखामुळे जे गोंधळुन गेले आहेत तो तुमच्या लिखाणाचा परिणाम आहे, मुळ लेखाचा नाही... कारण तुम्ही मुळ लेख जशाचा तसा उचलुन मध्ये स्वतःच्या ओळी कंसात घुसडल्या आहेत.. आणि त्यानी गोंधळ उडतो आहे.. मुळ लेखावर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
मला नाही वाटत की तुमचा लेख उडेल.. कारण केवळ हातात अधिकार आहे म्हणुन त्याचा गैरवापर करतील असे सध्याचे कुणीच संपादक नाहीत.. कोणीही तेवढ्या कोत्या मनाचे नाही..

अवांतरः- तुमची दुर्बोधतेची व्याख्या नेमकी काय? ग्रेसच्या कविता लोकांना कळत नाही तेव्हा तुम्ही त्यांना म्हणता की "आपल्याला नसेल कळत तर सोडुन द्यावं... दुसर्‍याला कशाला खाली खेचता?"... आणि ह्या विडंबनाची प्रेरणा असणारा लेख तुम्हाला "गौडबंगाल" वाटतो.. आता तुम्ही का नाही सोडुन देत?

संजय क्षीरसागर's picture

14 Oct 2014 - 2:27 pm | संजय क्षीरसागर

मी माझ्या ओळी `घुसवल्या' नाहीयेत तर असल्या मजेशीर मानसिक गोंधळाला (जो प्रस्थापित आध्यात्मात `प्रगतीचा टप्पा' किंवा `शेवटची पायरी' मानली गेलायं) आणि (त्यामुळेच मूळ लेखावर `वॉव! वॉट अ‍ॅन एक्स्पीरिमंट असे प्रतिसाद आहेत), त्याला विनोदाचा रंग दिलायं.

कुणी कधी MRI Scan चा अनुभव घेतला असेल (किंवा तुम्ही त्याबद्दल ऐकलं जरी असेल) तर त्याला हा `बोगदा' अनुभव किती भयानक असतो याची कल्पना येईल. तो बोगदा तरी वैद्यकीय कारणासाठी असतो. हा `आध्यात्मिक बोगदा' मात्र साधकानं स्वतःच ओढवून घेतलेला असतो.

कवितानागेश's picture

14 Oct 2014 - 2:55 pm | कवितानागेश

तुम्हाला एमाराय ची भिती वाटते? ???
किन्वा इन जेनरल भिती वाटते?
सहज विचारले, हितचिन्तक म्हणून . नाही सान्गितले तरी चालेल.

संजय क्षीरसागर's picture

14 Oct 2014 - 3:09 pm | संजय क्षीरसागर

आध्यात्मातल्या `बोगदा एक्सपिरियंसबद्दल' चाललंय. अर्थात, तुम्हाला कल्पना असेलच त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. इतरांसाठी आय हॅव गिवन जस्ट अ पॅरलल.

कवितानागेश's picture

14 Oct 2014 - 3:23 pm | कवितानागेश

पण मी भितीबद्दल विचारले होते. पण राहूदे फारच भिती असेल तर. आय नो!

संजय क्षीरसागर's picture

14 Oct 2014 - 3:53 pm | संजय क्षीरसागर

ज्या पद्धतीनं दिलासा देतायं त्यावरनं. असू दे तो तुमच्याजवळच.

मला काहीएक गरज नाही. मेडिकल एमारायचीही नाही आणि आध्यात्मिक एमारायचीह तर नाहीच नाही.

कवितानागेश's picture

14 Oct 2014 - 5:25 pm | कवितानागेश

मी नेणार नाही हो तुम्हाला एमारायसाठी. कशाला काळजी करताय?
पण मला तुमच्या भितीबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. शिवाय प्रत्यक्ष अनुभवाशिवायच तुम्ही हा अनुभव भयानक असतो, हे कसं काय बरं सांगत आहात, याबद्दल अतीव उत्सुकताही वाटली.
तुमचे या प्रश्नापासून पळून जाणं मी नक्कीच समजू शकते, पण तरीही तुम्हाला भितीबद्दल असे कळवळून लिहिताना पाहून माझ्यासारख्या अनेक सह्र्दय सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही.
म्हणून मला रहावलं नाही आणि विचारलं,
तुम्ही खरोखरच घाबरता????

विटेकर's picture

14 Oct 2014 - 5:51 pm | विटेकर

किती काळजी करावी माणसाने माऊतै !
" विश्वबंधुत्व" म्हणतात ते हीच की काय ? आता मी सुखाने डोळे मिटेन म्हणतो !
( उठवू नका रे कोणी प्लीज )

बॅटमॅन's picture

14 Oct 2014 - 5:54 pm | बॅटमॅन

विटेकर...ओ विटेकर....उठा!!!!

काळा पहाड's picture

14 Oct 2014 - 1:56 pm | काळा पहाड

अवघड आहे.

बाळ सप्रे's picture

14 Oct 2014 - 2:09 pm | बाळ सप्रे

'एका मळ्यात होती' चे पडसाद आहेत तर हे..
तिथे तुमची प्रतिक्रीया न दिसल्याने मला बरं वाटल होतं.. पण तितक्यात हे वाचलं आणि साक्षात्कारही झाला.. म्हणजे परत जैसे थे !!
रच्याकने 'एका मळ्यात होती' हे कशाचे पडसाद होते ??

संजय क्षीरसागर's picture

14 Oct 2014 - 2:35 pm | संजय क्षीरसागर

मी काय कुणाचं घोडं मारलेलं नाही. आणि तो स्वभावही नाही.

आता कुणाला काय आणि केव्हा उसळी मारावीशी वाटेल काही सांगता येत नाही. पण एक निरिक्षण आहे, आध्यात्मात गंडलेले किंवा देवभोळे, माझा उद्देश किंवा (त्यांच्याकडे) रोख नसतांनाही, माझ्यावर (उगीच) खवळून असतात.

अर्थात, अशा `बोगदा एक्स्पिरियन्सवाल्यांना', `आध्यात्म इतकं सोपं असेल तर आम्ही इतके दिवस काय झक मारली का?' असं वाटणं सहाजिक आहे.

कवितानागेश's picture

14 Oct 2014 - 2:48 pm | कवितानागेश

मुद्देसूद आणि चपखल.
रीप्रेझेन्टेटिव्ह (टीम वाहव्वा! )

पैसा's picture

14 Oct 2014 - 2:49 pm | पैसा

सहमत.
__/\__

विटेकर's picture

14 Oct 2014 - 3:12 pm | विटेकर

धीस इज पार्शिलिटी. नेह्मी नेह्मी तूच का रीप्रेझेन्टेटिव्ह (टीम वाहव्वा! )?????
संपादक मंडळ इकडे लक्ष देईल का ?

पैसा's picture

14 Oct 2014 - 3:53 pm | पैसा

सहमत
__/\__

चौकटराजा's picture

14 Oct 2014 - 4:42 pm | चौकटराजा

हे मला काही कळलं नाही पण माझे असे मत आहे की ज्याना कबीर समजला त्याना अध्यात्म समजले. मला वाटते कबीर काही शिकलेला बिकलेला नसावा. आपल्या जवळ जाणे इतका सोपा अर्थ असताना उगीचच बोगद्यात शिरून मागे कशाला जायचे ? If your are not worthy enough to change others change yourself as it is easier going towards you than attracting others to you ! .

संजय क्षीरसागर's picture

14 Oct 2014 - 4:51 pm | संजय क्षीरसागर

पण आता बोगद्यात शिरलेल्यांना परत फिरायची मुश्कील झालीये!

पाकृचा फोटो नसल्याने बाद ठरली आहे, पण फोडणीत आलं गरजेच आहे का?

पैसा's picture

14 Oct 2014 - 5:40 pm | पैसा

हीच पाकृ अंडी घालून कशी करता येईल? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2014 - 5:59 pm | अत्रुप्त आत्मा

@अंडी-घालून कशी करता येईल?>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

पैसा's picture

14 Oct 2014 - 6:00 pm | पैसा

लोळू नका. तुम्हाला कोणता अर्थ वाटला ते माहित आहे. पण तुम्ही अंड्यांची चर्चा करता? अब्रह्मण्यम!

बॅटमॅन's picture

14 Oct 2014 - 6:07 pm | बॅटमॅन

'ब्रह्मांड' आठवले.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2014 - 6:16 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/hysterical-laughter-smiley-emoticon.gif

स्वप्नांची राणी's picture

15 Oct 2014 - 10:39 am | स्वप्नांची राणी

अंडीच तर घातलीयेत की गं...

जरा बोगद्यातुन बाहेर आलात की बोलु की आवडलायला लागलाय बोगदा ?

स्वतःच्या ही चौकटीत न जगणारा
वाश्या

स्पंदना's picture

15 Oct 2014 - 4:41 am | स्पंदना

तू तुझ्या चौकटीत जगत नसलास तरी मी तुला माझ्या चौकटीत बसवणारच!!!
उगा गाळण उडते तुम्हा लोकांची चौकटीच नाव ऐकुन. समज नसल्याने गैरसमजाचे धनी होता तुम्ही. चौकटीत बसलच पाहिजे, अन ते ही मी देते आहे तीच. माझी सोडुन दुसर्‍या कोणाचीही चौकट चालणार नाही सांगुन ठेवते. मी सांगतेय ना, पुन्हा पुन्हा विचारु नको, तुझा गोंधळ फक्त माझ्या चौकटीत बसलास तरच सुटेल, नाहीतर आणखी गोंधळ!! मुर्ख! अडाणी!!

स्पा's picture

14 Oct 2014 - 6:31 pm | स्पा

सुरेखच जागा आहे.... नक्की जाऊन यायला हव
११,१४,२८, ५३ क्रमांकाचे फोटो ज्याम आवडले.
जाण्या येण्याचा किती खर्च आला तेही सांगा

शेवटून दुसर्‍या फोटोचा एक्सिफ डेटा पण मिळाला तर बर होईल.

पैसा's picture

14 Oct 2014 - 6:48 pm | पैसा

स्पा आता नवीन भयकथा लिहिणार का?

बॅटमॅन's picture

14 Oct 2014 - 6:49 pm | बॅटमॅन

शिवाय १७ व्या फोटोतला वॉटरमार्क हटवता आल्यास अजून बरे. रसास्वादात अंमळ बाधा आणत असल्याने अर्थनिर्णयनात मूग गिळून बसावे लागत आहे. प्रख्यात फ्रेंच कलासमीक्षक आज-दु-पार यांच्या सिद्धांताप्रमाणे फोटोरूपी कलावस्तूच्या एकूण व्यामिश्र अनुबंधाचा हाही एक रोचक आयाम म्हणावयास हरकत नसावी.

पैसा's picture

14 Oct 2014 - 6:53 pm | पैसा

येऊ द्या अजून संपूर्ण रसग्रहण.

सूड's picture

14 Oct 2014 - 6:58 pm | सूड

रसग्रहण, पाणिग्रहण, आसनग्रहण या सगळ्यात ग्रहणाचा अर्थ स्वीकार करणे असा असताना मूळात ग्रहण लागलं की लोक दान का करत असावेत?? किती विरोधाभास!!

आपण संग्रहण केल्यामुळे आपल्या गळ्यात पडलेली कटकट दुसर्‍याच्या माथी मारण्याचा नामी उपाय असावा तो.

पाणिग्रहणाविषयीही असेच म्हणता येईल का हो ;)

(पळा आता.)

पैसा's picture

14 Oct 2014 - 7:11 pm | पैसा

परंतु त्यास णिगोशिएबल इण्स्ट्रुमेंट आक्ट लागू होतो असे वाट्टे.

हाडक्या's picture

14 Oct 2014 - 7:15 pm | हाडक्या

पैसातै, साक्षात महिषासूरमर्दिनी कालीमाता यासारखा (सोळा हहातांसहित्) आभास होतोय ..!

चालु द्या..

पैसा's picture

14 Oct 2014 - 7:23 pm | पैसा

तसां काय नाय वो! मीयां आपलां आमच्या सरांच्या धाग्यावर शंभर प्रतिसाद करायला हातभार लावतंय. माजो आपलो चानीचो वाटो.

हाडक्या's picture

14 Oct 2014 - 7:33 pm | हाडक्या

चानीचो वाटो

हां काय.. मंग चालूंदेत. आमी निस्तेच बगतेत.. तु लढ बाय गो. ;)

बॅटमॅन's picture

14 Oct 2014 - 7:18 pm | बॅटमॅन

काय झेपलं नाही.

पैसा's picture

14 Oct 2014 - 7:25 pm | पैसा

णॉट निगोशिएबल म्हणजे अहस्तांतरणीय.

बॅटमॅन's picture

14 Oct 2014 - 7:30 pm | बॅटमॅन

हा हा हा, ओक्के. धन्स!

प्रभाकर पेठकर's picture

14 Oct 2014 - 7:37 pm | प्रभाकर पेठकर

नॉट निगोशिएबल म्हणजे 'चर्चा करण्यास अयोग्य' किंवा 'रोकड रकमेत रुपांतरीत करता येणारा'

अहस्तांतरणीय म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल.

प्रभाकर पेठकर's picture

14 Oct 2014 - 7:38 pm | प्रभाकर पेठकर

'रोकड रकमेत रुपांतरीत करता येणारा'

बॅटमॅन's picture

14 Oct 2014 - 7:39 pm | बॅटमॅन

हां, रैट्ट.

पैसा's picture

14 Oct 2014 - 8:16 pm | पैसा

जण्रल विंग्लिशप्रमाणे तुम्हे म्हणताय ते बरोबर पण मी निगिशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टाबद्दल बोलत होते. नॉट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे अहस्तांतरणीय लिखत (म्हंजे तुमचे चेक ड्राफ्ट्स इ. जे काय असेल ते)

हाडक्या's picture

14 Oct 2014 - 7:32 pm | हाडक्या

काय झेपलं नाही.

ब्यॅट्या लेका, विझायला लागलाईस आताशा (विंग्रजीत you are losing your spark, now-a-days) ;)

अहो, अधनंमधनं होतं असं. सारखं गारगोटीप्रमाणे (प्रथमार्धसंधिविग्रहू ;) ) राहण्यात तरी काय प्वाइंटे, नैका?

हाडक्या's picture

14 Oct 2014 - 7:43 pm | हाडक्या

भा. पो. *lol*

जेपी's picture

14 Oct 2014 - 7:45 pm | जेपी

कधी संपणार हा बोगदा ?

संजय क्षीरसागर's picture

14 Oct 2014 - 10:57 pm | संजय क्षीरसागर

विडंबनाचं सध्या बाजूला राहू दे, वास्तविकता अशीये.

एकतर बोगदा एक्स्पिरियन्ससाठी व्यक्ती कोण वणवण करते. त्यात असा अनुभव `जाहीर' केल्यावर, इतरेजन बावचळून जातात. `आपल्याला केव्हा दिसणार बोगदा?'

म्हणजे एकतर बोगदावाली व्यक्ती मानसिक टनेलमधे सापडलेली असते. तो अनुभव म्हणजे भ्रम असतो, कारण सत्य समोर आहे, ती क्लॅरिटीये, व्यापकता आहे, बोगदा नाही.

मग दुनिया, बोगदा एक्स्पिरियन्सवाल्या व्यक्तीकडे `पोहोचलेली' म्हणून बघायला लागते. `तुला बासरी ऐकू येतेयं? सिंप्ली ग्रेट! आता टनेलच्या त्या एंडला उभा असलेला `तो' भेटणार! खरं तर कसली बासरी आणि कसलं काय, मायला सगळे कल्पनेचे खेळ. इकडून तिकडून काहीबाही वाचलेलं, निरुद्योगी डोक्यात फिरत असतं, त्यातनं नाही नाही ते भास व्हायला लागतात. पण आता बोगदावाली मागे हटू म्हणता हटू शकत नाही कारण बाकीचे तिला पुढे ढकलत राहातात. असा हा भंपक सोहळा उत्तरोत्तर रंगत जातो.

मग कुणी म्हणतं `कसा दिसतोयं तो कृष्णसखा?' की ही सुरु! कल्पनेला अंत नाही.

मग `सुगंध' वगैरे यायला लागतात, `प्रकाश' दिसायला लागतो. ही खरं तर बाकीच्या सेंसरीज बाद होत चालल्याची लक्षणं असतात पण या `विद्वानांच्या' भाऊगर्दीत कोण कुणाला समजावणार?

तस्मात `कधी संपणार हा बोगदा ?' हा प्रश्न उपमर्दकारक ठरतो. तर अशी ही विद्वजनांची मांदियाळी आणि त्यांचे खुळे बोगदे!

सुहास..'s picture

14 Oct 2014 - 11:09 pm | सुहास..

स्वत: च्या ललित लेखाबद्दल स्वतःलाच येक्षप्लेशन द्यावे लागावे यासारखे खेदकारक काही नाही, विषय चांगला पण , लांबण जास्त झाली....त्यामुळे एक तर विमान डोक्यावरून च नव्हे तर आकांशगंगेच्या बाहेरून गेलयं , त्यात मग कंस ही भरुन पावलेत. लेखन सरल असते तर वेगळे नक्की वाटले असते .

( बाकी तेच, निंदा, परखड परीक्षण, गांभीर्य ई.ई. )

हे उदाहरणादाखल, कल्लोळ तर दाखवायचा पण सरल आणि संयत भाषेत :)
http://misalpav.com/node/12078

आता लेखच इतका दीर्घ आहे म्हटल्यावर (जवळजवळ) सगळे मुद्दे कव्हर करणं आलं.

जेपींना स्पष्टीकरण दिलेलं नाही, फॅक्ट सांगितलीये.

स्पंदना's picture

15 Oct 2014 - 4:45 am | स्पंदना

आला आला ! सुगंध आला एकदाचा. तरी म्हंटल अजुन खुळा हा शब्द कसा आला नाही. आता त्यांचे खुळे बोगदे म्हणजे माझा शाना बोगदा नाय का?

निराकार गाढव's picture

14 Oct 2014 - 10:47 pm | निराकार गाढव

व्वा! काय छानर सग्रहण आहे! मी पण सगळा रस एका दमात ग्रहण करून अगदी विरस करून टाकतो.

.

संजय जी तुम्हाला एक विचारु का ? जर तुम्ही रागावणार नसाल तर अगदी प्रामाणिक पणे एक कुतुहल आहे म्हणुन.

संजय क्षीरसागर's picture

14 Oct 2014 - 11:59 pm | संजय क्षीरसागर

.

मारवा's picture

15 Oct 2014 - 12:54 am | मारवा

तुम्ही दुखावलेले आहात का ?
आर यु डीपली हर्ट ?

अर्धवटराव's picture

15 Oct 2014 - 1:55 am | अर्धवटराव

आजवर आंजावर बघितलेलं अत्यंत सार्थ असं सदस्यनाम.

सूड's picture

15 Oct 2014 - 6:47 pm | सूड

__/\__

स्पंदना's picture

15 Oct 2014 - 4:46 am | स्पंदना

काय झाल? आता आणि एक स्वपिडन ष्टुरी का?

संजय क्षीरसागर's picture

15 Oct 2014 - 10:31 am | संजय क्षीरसागर

जे लिहितो तो अनुभव असतो. दुसर्‍याचा अनुभव आणखी सघन असेल तर तो आपलासा करण्यात आनंद वाटतो (पाहा: `ती गेली तेंव्हा रिमझिम' वरचे तुमचे आणि माझे एक्सचेंजेस).

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिंदगी अनेकानेक बाजूंनी रंगीन केलीये. संगीत, वैवाहिक आयुष्य, आपत्य संगोपन, आप्तांशी नाते-संबंध, सचोटीची व्यावसायिक कारकिर्द, निर्धास्त सांपत्तिक स्थिती, आणि त्याच्या जोडीला आध्यात्म, कविता, ललित साहित्य, योगा, प्राणायम, खेळ, दोस्त लोक...आणखी काय हवं?

मारवा's picture

15 Oct 2014 - 11:15 am | मारवा

संजय जी
मग माझा गैरसमज झाला कदाचित.
मला वाटल तस की तुम्ही कुठेतरी दुखावलाय
म्हणुन विचारल इतकचं.

मुक्तपीठवर अमेरिकेचा लेख आणि मिपावर "मी" चा लेख हे जगात भारी. त्याला तोडच नाही

निराकार गाढव's picture

12 Nov 2014 - 8:05 am | निराकार गाढव

या रसग्रहणाचा एक महत्वाचा पैलू कोणाही प्रतिसादकाच्या लक्षात आलेला दिसत नाही. ते म्हणजे "प्रगाढ" आणि "दीर्घकालीन" अभ्यास!!"

मूळ लेख १३/३/२०१३ ला प्रसिद्ध झाला आणि हे रसग्रहण झाले १४/१०/२०१४ ला, म्हणजे तब्बल एकोणीस महिन्यांच्या अभ्यास आणि चिंतनानंतर.

मलासुद्धा माझ्या व्यासंगपूर्ण अभ्यासांतीच हे लक्षात आले.

.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Nov 2014 - 10:11 am | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif .. smileys/smiley-laughing021.gif" /> ..

सस्नेह's picture

12 Nov 2014 - 11:35 am | सस्नेह

आजवर मिपावर कधीच न केलेली गोष्ट आज करावी लागतेय, स्वत:च्या लेखाचा अर्थ सांगणे. इथे सर्व लोक्स समजदार आहेत. पण काही विद्वान लोकांना अर्थ समजला नाही असे वाटते म्हणून हा प्रपंच.
सदर लेख हा माझ्या ‘साक्षात्कार’ या लेखाचे विडंबन असावे असे वाटते.
‘साक्षात्कार’ हे एक रूपक असून चिवट मानवी आशेचे अन जिजीगीषेचे प्रातिनिधिक चित्रण आहे.
जीवनात अपयश अपमान दु:ख अनंत वेळा अनुभवास येते. प्रियजनांचा मृत्यू, वियोग प्रतारणेचा धक्का, .. कित्येक क्षणी तर जीवन संपवावेसे वाटण्याइतके नैराश्य येते. सर्व काही संपले, फिरून या जीवनात जगण्यासारखे काहीच राहिले नाही असे वाटते.
तरीही जीवन शिल्लक असतेच असते. आणि ते रेटताना विस्मय वाटावा अशी एक जीवनेच्छा, वठलेल्या खोडला अंकुर फुटावा तशी पुन्हा बहरून येत राहते. ती जीवनेच्छा कुठल्यातरी निमित्तमात्र प्रकाशाच्या कवडशाच्या आधाराने सरसरून येते. जीवन संपले तरी जीवनेच्छा अंकुरणे संपत नाही.
आपणा सर्वांना आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आला असेलच. हीच थीम आहे या लेखाची. यात कुणाला काही अध्यात्मिक दिसावे याचे नवल वाटले.
धन्यवाद.

संदीप डांगे's picture

12 Nov 2014 - 1:38 pm | संदीप डांगे

जाऊ द्या हो ताई, फार मनाला लावून घेऊ नका.

तुमच्या लेखाला ओढून ताणून कुणी अध्यात्माचा शिक्का मारत असेल तर जैसी जिसकी सोच. मला सिंह आणि कोकरू यांची गोष्ट आठवली. ज्यात "तू नाही तर तुझ्या बापाने माझेकडे येणारे पाणी उष्टे केले असेल" असे म्हणून कोकराचा जीव घेणारा सिंह आठवला.

कुणाला स्पष्टीकरण द्यावे लागावे यासारखा मनस्ताप दुसरा नाही.
पण एक बरे झाले तुम्ही त्या लेखामागची भावना स्पष्ट केली ते. मी त्यामागच्या भावनेशी जुळवून घेऊ शकलो आणि त्याचा मला आनंद झाला.