Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 10/14/2014 - 11:36
लेखनविषय (Tags)
उखाणे
लेखनप्रकार (Writing Type)
मदत
समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. (रस्त्याच्या खालून तर चालत नाहीये ना मी?) बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... (`कशाला मारली झक' असं आता वाटतंय... पण काय उपयोग?) मी जात आहे..की येत आहे ? (आयचा घो! रिवर्समधे चालतोयं की काय?) ..आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..! (माझे डोळे उघडे आहेत का बंद? पण आता हे सांगणार तरी कोण?) वाटचाल अवघड म्हणता म्हणता अशक्य होत चाललीय...मघापर्यंत पाउल तरी पुढे (की मागे ?) पडत होतं ! पण आता तर बोटही हलवणं अशक्य झालंय... (बहुतेक माझी एमाराय चाललीये ! अजिबातच हालता येत नाहीये) ओह. काय करू ? किंबहुना काही करण्याचा ऑप्शन मला आहे का ? (एमाराय कुणी करायला सांगितली होती बरं?) ..आतापर्यंत तरी जे केलं ते ‘मी’च केलं का ? मला काही पर्याय होता का ? ( `ऐकावे डॉक्टरचे आणि करावे मनाचे' हेच खरं!) माझी वाट चुकली आहे का ? (यालाच `वाट लागली' म्हणतात का? पण आता `वाट पाहाण्याशिवाय' हातात काये ?) किती काळ गेला समजत नाही. काळ ही संकल्पनाच या बोगद्यात अर्थशून्य ठरली आहे... (पुन्हा तोच प्रश्न डोळे उघडेत का बंद? आणि ते सुद्धा कोण ठरवणार, मी की बोगदा?) ....अं ? हा आवाज कसला ? खरंच आवाज येतो आहे की चाहुलीला आसावलेल्या माझ्या कानांना भास होतो आहे ? कोण ते हसतंय ? हे सुपरिचित असे मंद शांत सूर कुठून ऐकू येताहेत ? (हल्ली पेशंटला एमारायमधे बासरी ऐकवतात असं दिसतंय!) कुणाचं तरी निकट सान्निध्य जाणवतंय ... फार फार पूर्वी लहानपणी, स्मृती पोचते तिथपासून, अगदी श्वाससुद्धा घेता येत नव्हता तेव्हापासून माझा प्रेमानं सांभाळ करणारं कुणीतरी...तोच का तू ? (का मीच तो? आयला, काय लफडा आहे हा? `मी' तू आहेस की `तू' मी आहेस? कोण कुणाशी बोलतंय?) अन इथे कसा अवचित समोर आलास ? (तू समोरून आलास का मागून हा खरा प्रश्न आहे! ....पण तो नंतर सोडवू.) ...ओह आता मी तुला ओळखले आहे..तू तो अंती असणारा आहेस..सगळं काही अखेर ज्याच्याकडेच जातं तो.. ..नाही, नाही, पण तू तर सुरुवातीला पण होतास..! ..जेव्हा मी एक बिंदूसुद्धा नसेन, तेव्हापासून तूच तर सोबत होतास..! म्हणजे तू अंती नव्हे तर आदि...! (अरे, आता आलं लक्षात तू आदी उर्फ अ‍ॅडी (किराणावाला)! आणि मी आँटी!) हसू नको..मी ओळखलंय तुला. तूच तो ! तू..माझ्या अंतर्यामी राहून दिशा देणारा, माझे चलन वलन, वहन-भरण करणारा ...योगक्षेम चालवणारा आत्मन ! माझेच शुद्ध केवल स्वरूप..! (येस, अ‍ॅड्या वाणी! कडकीत सुद्धा वाणसामान देणारा आणि मला शुद्ध डालडा देणारा तो तूच!) ..जनधिक्काराच्या अंधारात चाचपडताना थेंबाथेंबाने मी गलितगात्र होताना, मति तर्क अन मार्ग सारे खुंटले होते तेव्हा, विजेसारख्या क्षुल्लक गोष्टीचे बील थकले होते तेव्हा, तूच ना नवा मार्ग सुचवलास ? (`आज उधार उद्या रोख' हाच तो वाणसामानाचा मार्ग आणि शेजार्‍याकडून टेंपरवारी कनेक्शन घेऊन घर उजळवून टाकलं होतस, आठवतंय?) ..होय. आता माझ्या थोडं थोडं लक्षात येऊ लागलंय...मागे वळून पाहताना काही काही उमज पडू लागला आहे. ...पुष्कळदा मला वाटत होतं मला निर्णय घ्यायचा आहे.. (आता तरी बीलं भरु का नको? चालललंय ते काय वाईट आहे?) पण आता उमगतंय, ..निर्णय घेतले ते ‘मी’ नाही, तर माझ्या पूर्वकर्मांनी, ... त्या कर्मांच्या वेळोवेळी समोर ठाकलेल्या परिणामस्वरूप परिस्थितीने... (ज्ञानीजनांनी पूर्वीच सांगितलंय `नाईलाज को क्या इलाज? आणि सिनियर सिटिझन्स म्हणतात ते, `कर्म माझं!' म्हणजे हेच असावं) निर्णयाचे योग्य पर्याय अर्थात होते..पण अज्ञानाच्या धुक्यामुळे मी ते जाणले नाहीत. ...केवळ घेतले म्हणून काही निर्णय अंमलात आणले...कधी स्वत;च्या कधी इतरांच्या मतानं कर्म पार पाडले. (आयला, संपतेयं का नाही ही एमाराय?) होय.. तुझ्यासाठीच केली सर्व कर्मे..कधी भली कधी बुरी..कृष्ण अन धवल..सुचेल तसं केलं. आल्या क्षणाला साजरं केलं त्या कर्माच्या आहुतीनं (अरे, गॅस कोण फुकटात देणार? तिथे पैशाची आहुती द्यावीच लागली) कधी तू समोर असायचास, कधी वळणापलीकडे ! तुझे इशारे कधी कधी समजलेच नाहीत. कधी समजूनसुद्धा दुर्लक्ष केलं मी ! पण परिणाम भोगायला अन उपभोगायला लागले मात्र आपणा दोघांना ! एकत्रित.. (म्हणजे बीलं थकवायची मी आणि परिणाम मात्र `एकत्रित'! दैवी चमत्कार म्हणतात तो हाच) या काळोख्या बोगद्यातला प्रवेश ही त्याचीच तर परिणीती नव्हे ? (तू बोगद्यात आहेस का बाहेर? आणि एकावेळी दोघांचा एमाराय कसा चालूये?) ..यावेळी तुझे हास्य मघासारखे मुक्त नाही...! (बील वाढलं की काय?) ...समजलं ! कधीतरी काहीतरी चुकलंय. नाही समजत, नक्की कधी अन कुठं...पण चुकलंय खरं ! पश्चात्ताप.. ? हं..चूक समजेल तर ना पश्चात्ताप ? (छे, छे, रामराया, सोडव रे या हिवतापातून) पण खोल तळाशी एक खात्री आहे रे..रस्ते चुकले असतील पण इरादे नक्कीच चुकीचे नव्हते. जन्म घेणं हातात नव्हतं पण जन्म घेतल्यावर जमेल तितके हातपाय हलवले, काही दिशा ठरवून मार्ग शोधण्याचा प्रयत्न तरी प्रामाणिकपणे केला रे ! (जन्म घेतला का दिला? हातपाय हालायचे थांबून आता, डोक्यात विचारांना सुद्धा हालायला जागा राहिली नाही. टोटल ज्याम!) आणि हे सर्व तुझ्यासाठीच रे आत्मन, तुझ्यासाठी ! ना त्या आईवडिलांसाठी, ना बायको-मुलांसाठी, ना सख्या-जिवलगांसाठी. सगळं काही स्वत:साठीच बरं. .( अ‍ॅडया, गैरसमज नको बरं, `आत्मन' म्हणजे संस्कृतमधे `ग्रोसर', ज्याच्याशिवाय `आत्मा चालत नाही' तो) आज या अंधाऱ्या बोगद्याच्या अंतर्गृहात जणू माझी प्रज्ञा शुद्ध व्हावी तसे सर्व काही स्वच्छ दिसते आहे मला ! आता या ज्ञानाच्या क्षणी मला निवळलेल्या मानससरोवराचा तळ अगदी स्पष्ट दिसतो आहे. (एमारायच्या पाईपात ही बिसलेरीची बाटली कुठून आली?) अन हेही समजतंय की ही अनुभूती या ज्ञानासाठीच ! तुझीच योजना ही ! तुझ्या-माझ्यातले अंतर शून्य करण्यासाठी ! जिवा-शिवाची भेट घडवण्यासाठी ! द्वैताला अद्वैत करण्यासाठी ! (आयचा घो, जीवाला शिवायचा अनुभव यावा म्हणून मला या पाईपात घातलं?) अन मग आता वेळ का लावतो आहेस जिवलगा ? (त्यापेक्षा साईडनं पाईप खोल!) पुरे झालं आता ! नको अंत पाहूस ! नको दुरून दुरून ते विलक्षण मोहक हास्य फेकूस ! भरून जाऊदे तुझ्या प्रकाशमय चैतन्याने माझा रिकामा गाभारा ! उजळून जाऊदे हे तमोमय कृष्णविवर तुझ्या दैदिप्यमान सान्निध्याने ! (लावा रे कुणी तरी लाईट लावा!) .....या अज्ञान-बोगद्याचा अंत करणारे हे पाउल, मी शिल्लक राहिलेले सर्व बळ एकवटून हे पहा उचलले ! (मायला, आणि पुन्हा नवा बोगदा लागला!) ______________________________ (मूळ बोगदा इथूनच साभार!)
  • Log in or register to post comments
  • 23115 views

प्रतिक्रिया

Submitted by कवितानागेश on Tue, 10/14/2014 - 11:43

Permalink

उत्तम रसग्रहण.:):)

उत्तम रसग्रहण.:):)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 10/14/2014 - 11:51

Permalink

कठीण आहे !

कठीण आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Tue, 10/14/2014 - 12:16

Permalink

ह्म्म...

शष्प देखील कळले नाही. कुणी समजेलश्या भाषेत सांगेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 10/14/2014 - 12:29

In reply to ह्म्म... by विटेकर

Permalink

विटेकरबुवा!

थोडी शोधाशोध केली तर सापडेल. आणि एकदा सापडल्यावर सॉलिड मजा येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नज on Tue, 10/14/2014 - 21:08

In reply to ह्म्म... by विटेकर

Permalink

.

असेच म्हणतो....
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 10/14/2014 - 12:24

Permalink

हा लेख प्रकाशित होईल की नाही आणि झाला तरी इथे राहिल का?

अशा दोन्ही साशंकता आहेत. ज्यांना माझ्या लेखनात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सांगतो की, आता खुद्द मान्यवरांनी सुरुवात केलीये, तेव्हा न्याय होईल की नाही याची खात्री (मला तरी) नाही. एनी वे, बहुमतानं अल्पमताला दाबणं हे लोकशाहीत सुद्धा शक्य आहेच आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना तर ते सहज आहे. प्रस्थापिताविरुद्ध प्रतिवाद अवघड नाही कारण प्रस्थापिताकडे किती प्रज्ञा आहे ते मूळ लेख दर्शवतो. पण नवा विचार उचलून धरणं जनमनावर अवलंबून आहे. तस्मात, माझा आयडी ब्लॉक झाला तर त्याला फेअर जस्टीस म्हणता येणार नाही पण दाद सुद्धा मागता येणार नाही. अर्थात, जे लिहिलंय ती केवळ मूळ लेखाची खिल्ली नाही तर एकूण जनमानचा वैचारिक गोंधळ दर्शवण्याचा प्रयत्न आहे. मला ब्लॉक होण्याची फिकिर नाही कारण अभिव्यक्ती हा सत्याचा अंगभूत धर्म आहे. इथे नाही तर आणखी कुण्याप्रकारे मी व्यक्त होत राहीनच. लेट अस सी.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 10/14/2014 - 12:39

In reply to हा लेख प्रकाशित होईल की नाही आणि झाला तरी इथे राहिल का? by संजय क्षीरसागर

Permalink

उत्तम प्रतिसाद.

उत्तम प्रतिसाद. - रीप्रेझेन्टेटिव्ह (टीम वाहव्वा! )
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/14/2014 - 13:02

In reply to हा लेख प्रकाशित होईल की नाही आणि झाला तरी इथे राहिल का? by संजय क्षीरसागर

Permalink

वाहव्वा!

प्रतिसाद आवडला. प्रस्थापितांचा णिशेध असो. __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 10/15/2014 - 04:34

In reply to हा लेख प्रकाशित होईल की नाही आणि झाला तरी इथे राहिल का? by संजय क्षीरसागर

Permalink

हाणा!! मारा!! तोडा!!

हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 10/15/2014 - 05:45

In reply to हाणा!! मारा!! तोडा!! by स्पंदना

Permalink

मेलो...

=)) तुला गं काय झालं अपर्णे एव्हढा सगळा धावा करायचा...साक्षात भवानी तु...अगं हे सगळे स्वर्ग/जन्नतपती तुझ्याकडे आशेने बघतात...आणि तुच अशी  हाय खावी ना...
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 10/14/2014 - 12:33

Permalink

मला देखील कायच आकलन झालेले

मला देखील कायच आकलन झालेले नाही
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 10/14/2014 - 12:48

In reply to मला देखील कायच आकलन झालेले by स्पा

Permalink

मूळ लेखच केमिकल लोच्या आहे,

कारण ती निव्वळ इकडचं तिकडचं उचलून केलेली फेकंफेक आहे. तो अनुभव असला तर मात्र `औषधोपचाराची' गरज आहे. अर्थात, लिहिण्याची स्टाईल अशीये की सामान्यांनी भारावून जावं पण एकूण गौडबंगाल काये ते विडंबनातून मांडलंय. http://www.misalpav.com/user/*****/authored गाळलेल्या जागी योग्य आकडा टाकला की झालं!
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 10/14/2014 - 12:51

In reply to मूळ लेखच केमिकल लोच्या आहे, by संजय क्षीरसागर

Permalink

हे ही कळलं नाही...

हे ही कळलं नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 10/14/2014 - 13:10

In reply to मूळ लेखच केमिकल लोच्या आहे, by संजय क्षीरसागर

Permalink

ओके,

ओके, हा क्लु मिळाल्यावर मला साक्षात्कार झाला विडंबन म्हणुन चांगलच जमलय पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 10/14/2014 - 13:12

In reply to ओके, by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

क्या बात है!

मला साक्षात्कार झाला !
वॉट अ क्लू !!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 10/14/2014 - 13:04

In reply to मला देखील कायच आकलन झालेले by स्पा

Permalink

असच्च माझं ही वरील सदर

असच्च माझं ही वरील सदर प्रतिसादाबद्दल झालय
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 10/14/2014 - 12:34

Permalink

संक्षी... कोडि घालु नकात,..

संक्षी... कोडि घालु नकात,.. लेख वाचायला प्रय्त्न केलाय.. अगदी प्रामानिकपणे... अर्ध्यातच अवसान गळालं... आता नक्की कशावर लिहीलय ते सांगाल तर कदाचित अर्थ लागेल.. (आज काही काम नाही फारसं..) शोधाशोध करायला सांगु नकात, ते मला जमत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Tue, 10/14/2014 - 12:36

Permalink

कोडं सुटत नाही बुवा!! अगदी

कोडं सुटत नाही बुवा!! अगदी अंधार्‍या बोगद्यात गेल्यासारखच वाटतय..
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 10/14/2014 - 12:57

In reply to कोडं सुटत नाही बुवा!! अगदी by बाळ सप्रे

Permalink

म्हणजे `मूळ बोगदा' काय असेल त्याची कल्पना करा!

*smile*
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Tue, 10/14/2014 - 13:55

In reply to म्हणजे `मूळ बोगदा' काय असेल त्याची कल्पना करा! by संजय क्षीरसागर

Permalink

साक्षात्कार झाला!!

साक्षात्कार झाला!!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 10/14/2014 - 12:47

Permalink

बेशर्त स्वीकृती करूनही आकलन

बेशर्त स्वीकृती करूनही आकलन बाकी काही झालेले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 10/14/2014 - 13:48

Permalink

समजलं....

समजलं....
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 10/14/2014 - 13:57

In reply to समजलं.... by पिलीयन रायडर

Permalink

आणि नाही आवडलं....

आणि नाही आवडलं.... "तुम्हाला" विरोध करायचा म्हणुन नाही... दोन्ही लेख वाचले... तुम्ही ज्याला विडंबन म्हणत आहात ते वाचलं तर स्पष्ट सांगते, जमलेलं नाही.. तुमच्या लेखामुळे जे गोंधळुन गेले आहेत तो तुमच्या लिखाणाचा परिणाम आहे, मुळ लेखाचा नाही... कारण तुम्ही मुळ लेख जशाचा तसा उचलुन मध्ये स्वतःच्या ओळी कंसात घुसडल्या आहेत.. आणि त्यानी गोंधळ उडतो आहे.. मुळ लेखावर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मला नाही वाटत की तुमचा लेख उडेल.. कारण केवळ हातात अधिकार आहे म्हणुन त्याचा गैरवापर करतील असे सध्याचे कुणीच संपादक नाहीत.. कोणीही तेवढ्या कोत्या मनाचे नाही.. अवांतरः- तुमची दुर्बोधतेची व्याख्या नेमकी काय? ग्रेसच्या कविता लोकांना कळत नाही तेव्हा तुम्ही त्यांना म्हणता की "आपल्याला नसेल कळत तर सोडुन द्यावं... दुसर्‍याला कशाला खाली खेचता?"... आणि ह्या विडंबनाची प्रेरणा असणारा लेख तुम्हाला "गौडबंगाल" वाटतो.. आता तुम्ही का नाही सोडुन देत?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 10/14/2014 - 14:27

In reply to आणि नाही आवडलं.... by पिलीयन रायडर

Permalink

मूळात `बोगदा' हा मानसिक लोच्या आहे

मी माझ्या ओळी `घुसवल्या' नाहीयेत तर असल्या मजेशीर मानसिक गोंधळाला (जो प्रस्थापित आध्यात्मात `प्रगतीचा टप्पा' किंवा `शेवटची पायरी' मानली गेलायं) आणि (त्यामुळेच मूळ लेखावर `वॉव! वॉट अ‍ॅन एक्स्पीरिमंट असे प्रतिसाद आहेत), त्याला विनोदाचा रंग दिलायं. कुणी कधी MRI Scan चा अनुभव घेतला असेल (किंवा तुम्ही त्याबद्दल ऐकलं जरी असेल) तर त्याला हा `बोगदा' अनुभव किती भयानक असतो याची कल्पना येईल. तो बोगदा तरी वैद्यकीय कारणासाठी असतो. हा `आध्यात्मिक बोगदा' मात्र साधकानं स्वतःच ओढवून घेतलेला असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 10/14/2014 - 14:55

In reply to मूळात `बोगदा' हा मानसिक लोच्या आहे by संजय क्षीरसागर

Permalink

तुम्हाला एमाराय ची भिती वाटते

तुम्हाला एमाराय ची भिती वाटते? ??? किन्वा इन जेनरल भिती वाटते? सहज विचारले, हितचिन्तक म्हणून . नाही सान्गितले तरी चालेल.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 10/14/2014 - 15:09

In reply to तुम्हाला एमाराय ची भिती वाटते by कवितानागेश

Permalink

एमारायच्या भीतीचा प्रश्न नाहीये ओ!

आध्यात्मातल्या `बोगदा एक्सपिरियंसबद्दल' चाललंय. अर्थात, तुम्हाला कल्पना असेलच त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. इतरांसाठी आय हॅव गिवन जस्ट अ पॅरलल.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 10/14/2014 - 15:23

In reply to एमारायच्या भीतीचा प्रश्न नाहीये ओ! by संजय क्षीरसागर

Permalink

पण मी भितीबद्दल विचारले होते.

पण मी भितीबद्दल विचारले होते. पण राहूदे फारच भिती असेल तर. आय नो!
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 10/14/2014 - 15:53

In reply to पण मी भितीबद्दल विचारले होते. by कवितानागेश

Permalink

तुम्हाला दिसतोयं अनुभव

ज्या पद्धतीनं दिलासा देतायं त्यावरनं. असू दे तो तुमच्याजवळच. मला काहीएक गरज नाही. मेडिकल एमारायचीही नाही आणि आध्यात्मिक एमारायचीह तर नाहीच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 10/14/2014 - 17:25

In reply to तुम्हाला दिसतोयं अनुभव by संजय क्षीरसागर

Permalink

मी नेणार नाही हो तुम्हाला

मी नेणार नाही हो तुम्हाला एमारायसाठी. कशाला काळजी करताय? पण मला तुमच्या भितीबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. शिवाय प्रत्यक्ष अनुभवाशिवायच तुम्ही हा अनुभव भयानक असतो, हे कसं काय बरं सांगत आहात, याबद्दल अतीव उत्सुकताही वाटली. तुमचे या प्रश्नापासून पळून जाणं मी नक्कीच समजू शकते, पण तरीही तुम्हाला भितीबद्दल असे कळवळून लिहिताना पाहून माझ्यासारख्या अनेक सह्र्दय सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून मला रहावलं नाही आणि विचारलं, तुम्ही खरोखरच घाबरता????
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Tue, 10/14/2014 - 17:51

In reply to मी नेणार नाही हो तुम्हाला by कवितानागेश

Permalink

वा!

किती काळजी करावी माणसाने माऊतै ! " विश्वबंधुत्व" म्हणतात ते हीच की काय ? आता मी सुखाने डोळे मिटेन म्हणतो ! ( उठवू नका रे कोणी प्लीज )
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 10/14/2014 - 17:54

In reply to वा! by विटेकर

Permalink

विटेकर...ओ विटेकर....उठा!!!!

विटेकर...ओ विटेकर....उठा!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Tue, 10/14/2014 - 13:56

Permalink

अवघड आहे.

अवघड आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Tue, 10/14/2014 - 14:09

Permalink

'एका मळ्यात होती' चे पडसाद

'एका मळ्यात होती' चे पडसाद आहेत तर हे.. तिथे तुमची प्रतिक्रीया न दिसल्याने मला बरं वाटल होतं.. पण तितक्यात हे वाचलं आणि साक्षात्कारही झाला.. म्हणजे परत जैसे थे !! रच्याकने 'एका मळ्यात होती' हे कशाचे पडसाद होते ??
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 10/14/2014 - 14:35

In reply to 'एका मळ्यात होती' चे पडसाद by बाळ सप्रे

Permalink

सप्रे, धीस इज वेरी इंटरेस्टींग

मी काय कुणाचं घोडं मारलेलं नाही. आणि तो स्वभावही नाही. आता कुणाला काय आणि केव्हा उसळी मारावीशी वाटेल काही सांगता येत नाही. पण एक निरिक्षण आहे, आध्यात्मात गंडलेले किंवा देवभोळे, माझा उद्देश किंवा (त्यांच्याकडे) रोख नसतांनाही, माझ्यावर (उगीच) खवळून असतात. अर्थात, अशा `बोगदा एक्स्पिरियन्सवाल्यांना', `आध्यात्म इतकं सोपं असेल तर आम्ही इतके दिवस काय झक मारली का?' असं वाटणं सहाजिक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 10/14/2014 - 14:48

In reply to सप्रे, धीस इज वेरी इंटरेस्टींग by संजय क्षीरसागर

Permalink

मुद्देसूद आणि चपखल.

मुद्देसूद आणि चपखल. रीप्रेझेन्टेटिव्ह (टीम वाहव्वा! )
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/14/2014 - 14:49

In reply to मुद्देसूद आणि चपखल. by कवितानागेश

Permalink

सहमत

सहमत. __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Tue, 10/14/2014 - 15:12

Permalink

लिमाऊजेट ...

धीस इज पार्शिलिटी. नेह्मी नेह्मी तूच का रीप्रेझेन्टेटिव्ह (टीम वाहव्वा! )????? संपादक मंडळ इकडे लक्ष देईल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/14/2014 - 15:53

In reply to लिमाऊजेट ... by विटेकर

Permalink

सहमत

सहमत __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 10/14/2014 - 16:42

Permalink

हे मला काही कळलं नाही पण ..

हे मला काही कळलं नाही पण माझे असे मत आहे की ज्याना कबीर समजला त्याना अध्यात्म समजले. मला वाटते कबीर काही शिकलेला बिकलेला नसावा. आपल्या जवळ जाणे इतका सोपा अर्थ असताना उगीचच बोगद्यात शिरून मागे कशाला जायचे ? If your are not worthy enough to change others change yourself as it is easier going towards you than attracting others to you ! .
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 10/14/2014 - 16:51

In reply to हे मला काही कळलं नाही पण .. by चौकटराजा

Permalink

हे बाकी करेक्टायं!

पण आता बोगद्यात शिरलेल्यांना परत फिरायची मुश्कील झालीये!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 10/14/2014 - 17:37

Permalink

पाकृचा फोटो नसल्याने बाद ठरली

पाकृचा फोटो नसल्याने बाद ठरली आहे, पण फोडणीत आलं गरजेच आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/14/2014 - 17:40

In reply to पाकृचा फोटो नसल्याने बाद ठरली by सूड

Permalink

हीच पाकृ

हीच पाकृ अंडी घालून कशी करता येईल? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 10/14/2014 - 17:59

In reply to हीच पाकृ by पैसा

Permalink

@अंडी-घालून कशी करता येईल?>>

@अंडी-घालून कशी करता येईल?>> Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/14/2014 - 18:00

In reply to @अंडी-घालून कशी करता येईल?>> by अत्रुप्त आत्मा

Permalink

ओ बुवा

लोळू नका. तुम्हाला कोणता अर्थ वाटला ते माहित आहे. पण तुम्ही अंड्यांची चर्चा करता? अब्रह्मण्यम!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 10/14/2014 - 18:07

In reply to ओ बुवा by पैसा

Permalink

'ब्रह्मांड' आठवले.

'ब्रह्मांड' आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 10/14/2014 - 18:16

In reply to ओ बुवा by पैसा

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on Wed, 10/15/2014 - 10:39

In reply to हीच पाकृ by पैसा

Permalink

अंडीच तर घातलीयेत की गं...

अंडीच तर घातलीयेत की गं...
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Tue, 10/14/2014 - 18:23

Permalink

जरा बोगद्यातुन बाहेर आलात की

जरा बोगद्यातुन बाहेर आलात की बोलु की आवडलायला लागलाय बोगदा ? स्वतःच्या ही चौकटीत न जगणारा वाश्या
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 10/15/2014 - 04:41

In reply to जरा बोगद्यातुन बाहेर आलात की by सुहास..

Permalink

तू तुझ्या चौकटीत जगत नसलास

तू तुझ्या चौकटीत जगत नसलास तरी मी तुला माझ्या चौकटीत बसवणारच!!! उगा गाळण उडते तुम्हा लोकांची चौकटीच नाव ऐकुन. समज नसल्याने गैरसमजाचे धनी होता तुम्ही. चौकटीत बसलच पाहिजे, अन ते ही मी देते आहे तीच. माझी सोडुन दुसर्‍या कोणाचीही चौकट चालणार नाही सांगुन ठेवते. मी सांगतेय ना, पुन्हा पुन्हा विचारु नको, तुझा गोंधळ फक्त माझ्या चौकटीत बसलास तरच सुटेल, नाहीतर आणखी गोंधळ!! मुर्ख! अडाणी!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 10/14/2014 - 18:31

Permalink

अप्रतिम ठिकाण

सुरेखच जागा आहे.... नक्की जाऊन यायला हव ११,१४,२८, ५३ क्रमांकाचे फोटो ज्याम आवडले. जाण्या येण्याचा किती खर्च आला तेही सांगा
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com