रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in तंत्रजगत
2 Oct 2014 - 6:26 pm

मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...

इथे अपेक्षित काय आहे ??

आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.

तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)

१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च

२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही

३. क्लासिक ३५० चे तोटे ??

१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर

मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.

मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

प्रतिक्रिया

फ्लेक्स चे काहून टेन्शन, ते माझे मी बनवतो.
तू फक्त डिएस विकत(तुझ्या पैशाने)घेऊन मला दे.
.
वाटल्यास फ्लेक्सवर लिहितो पण.
बघतो काय रागाने, बुलेट दिलीय वाघाने,
स्पाराव झाले उदार, बुलेट दिली जोरदार,

मायला तुम्ही बिजनेस मन
घेऊन टाका विचार करू नका जास्त

गाडी बदलणे आयडी बद्दलण्याऐतके सोपे आहे स्टीव्हल्या.

बदलताय कशाला? नवीन घ्या

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Jul 2016 - 3:32 pm | अनिरुद्ध.वैद्य

अभिनंदन!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 12:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

अभ्या ह्या मोसमात काढायचीच रं!! लगा इतक्यात काही झेडपी पंचायत समिती विलेक्शन नाय का? तेवढीच बरी चलती धंद्याला

स्पा's picture

5 Jul 2016 - 12:44 pm | स्पा

बापू मला बी एक पायजेल

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 3:51 pm | कैलासवासी सोन्याबापु

स्पा भाऊ तथास्तु अन शुभेच्छा :P

इलेक्शन गणपतीनंतर आहे बापू, लागल काही जुगाड तर करूच धुराळा.

फक्त 3 महिन्यापूर्वी लौंच झालेली आर.इ. हिमालयन कंपनी ने रिकॉल करायला सुरुवात केली आहे.हा सगळं मामला कंपनी ने सध्या तरी गपचूप ठेवलेला आहे.ज्या इनिशिअल बॅचेस चे प्रोडक्शन झाले...त्या कस्टमर्सनी इंजिन चा मोठा आकार आणि इंजिन मधून येणारा tapping किंवा clicking noise ची तक्रार केली आहे.कंपनी च्या म्हणण्यानुसार Rocker Unit ( (the part that is responsible for opening and closing valves) म्हणून जो इंजिन चा हिस्सा असतो, त्या मध्ये fault असल्यामुळे हा आवाज होतो.बातमीचा दुवा ------> http://www.cartoq.com/things-you-dont-know-about-the-royal-enfield-himal...

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2016 - 12:45 am | टवाळ कार्टा

कालच हिमालयनची टेस्ट राईड घेतली...I am impressed :)
RE नसती तर कालच बुक करून आलो असतो

तुझे भांडण हलवायाशी आहे की मिठाईशी?

आता "बाईक शोधण्यातले फ्रस्ट्रेशन" असाही एक धागा टाक.

"दोन्हीही गोष्टीत कुठे ना कुठे अ‍ॅडजेस्टमेंट करावीच्च लागते" हे तुला कळेल तो सुदिन. ;)

(कृ.ह.घे.)

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2016 - 1:58 pm | टवाळ कार्टा

बाई आणि बाईक यातील जास्तीत जास्त एकीचेच नखरे सहन करावेत...आणि बाईक बदलता येते अथवा एकाच वेळी दोन किंवा अधीक एकत्र ठेउ शकतो...
बाई आणि बाईक या दोन्ही वेगवेगळ्या आहेत हे तुला कळेल तो सुदिन =))

बाई आणि बाईक यातील जास्तीत जास्त एकीचेच नखरे सहन करावेत

हे वाक्य नीट विचार करून पुन्हा लिहायचे आहे का?

असो शुभेच्छा...!!

स्वत:च्या हाताने बाइक धुवून पुसुन चकाचक केल्यावर तीच्याकडे बघण्याचा जो आनंद असतो तो (स्वतःच्या)नटलेल्या बायकोकडे बघण्यापेक्षा जास्त असतो.

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2016 - 11:27 pm | टवाळ कार्टा

खिक्क

सुबोध खरे's picture

7 Jul 2016 - 11:38 pm | सुबोध खरे

ये बात बिलकुल हजम नहीं हुई!

खटपट्या's picture

8 Jul 2016 - 12:48 am | खटपट्या

डॉक हाताने धुवून बघा बाइक.

रच्याकने ते चेपूवरून आलेले आहे

सुबोध खरे's picture

8 Jul 2016 - 10:23 am | सुबोध खरे

"बायको" बरोबर "शॉवर" मध्ये जाऊन पहा अशी आपल्याला विनंती/ सूचना आहे. "बाईक" ला विसरला अशी खात्री आहे
लोकलाजेस्तव याहून अधिक लिहिता येत नाही.

खटपट्या's picture

8 Jul 2016 - 10:33 am | खटपट्या

ओके ओके

टवाळ कार्टा's picture

8 Jul 2016 - 11:17 am | टवाळ कार्टा

कोपरापासून नमस्कार =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Jul 2016 - 1:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

उगाच द्वेषाची झैरात? :P

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Jul 2016 - 9:56 pm | अनिरुद्ध.वैद्य

तुने हिमालयन की रैड ली? ख्या ख्या!!

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2016 - 10:02 pm | टवाळ कार्टा

होंडा/बजाज गेलाबजार यामाहा/सुझुकीने आणली असती तर बुक करुन आलो असतो...RE आहे त्यामुळे इथे जे दिलेय ते बघा

जिन्क्स's picture

7 Jul 2016 - 11:50 pm | जिन्क्स

तुम्ही या धाग्यावर कन्हैय्या कुमार का बनत आहात?

टवाळ कार्टा's picture

8 Jul 2016 - 12:05 am | टवाळ कार्टा

खरे फॅक्ट्स लिहिले तर असे?

गणामास्तर's picture

8 Jul 2016 - 11:16 am | गणामास्तर

होंडा, यामाहा ठीक आहे.. पण बजाज म्हणजे. ह्यॅ ह्यॅ ह्यॅ

बेंचमार्किंग इश्यू आहे असे समजा आणि फाट्यावर मारा मास्तर.. किती महत्व देणार? ;)

गणामास्तर's picture

8 Jul 2016 - 3:01 pm | गणामास्तर

एकदा हत्ती वर फिरायचं म्हणालं की तो कुठे ठेवायचा? त्याला खुराक किती लागेल? आपल्याला रोज फिरायला गाढव, उंट (उदाहरण म्हणून वापरलंय, हवा तो प्राणी टाकून घ्या) पण चालतोय तर हत्तीचं कशाला पाहिजे ? असा विचार करून चालत नसतंय. नफ्या तोट्याची गणितं मांडणाऱ्या पब्लिक नी हत्तीच्या वाट्याला जाऊ नये.

पी. के.'s picture

8 Jul 2016 - 3:11 pm | पी. के.

लई भारी

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Jul 2016 - 5:57 pm | अनिरुद्ध.वैद्य

बनवण्याचा प्रयत्न आहे. आपटणारच गाडी सुरुवातीला. बाकी, किती बाईक्स विकल्या गेल्या अन किती रीपोर्ट केले गेले, असला काही विदा असल्यास बरे.

थंडरबर्डमध्येही असेच प्रॉब्लेम निघाले होते. आता सेल्सचे आकडे बघा. तेव्हा आताच रुल्ड ओफ्फ करायला नको :)

पण हे एन्फील्डवाले ओईल लीक कधी सुधारतील देव जाणे. :प

हा आता आस्तिक नास्तिक वादाचा धागा वाटायला लागलेला आहे =))

RE के खिलाफ एक लब्ज .. कसे खवळतायेत भक्त

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jul 2016 - 1:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

असंच काही नाही, आम्ही तर अजून आपण (इथेही) नव्या येत्या हॉलिवूड कॉमिक्सपटाची जाहिरात केली नाहीये ह्यातच लै खुश आहोत बघा, बाकी भक्त वगैरे असणे मिपावर ठेविले अनंते तैसेची राहावे वगैरे वगैरे आहेच अध्याहृत का कसं म्हणतात ते

स्पा's picture

8 Jul 2016 - 2:29 pm | स्पा

ऑ अच्च जाल्ल

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jul 2016 - 2:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

नॉही हॉ स्पॉ अच्चंच हॉतं कॉयॉम

स्पा's picture

8 Jul 2016 - 2:46 pm | स्पा

ओह के

संदीप डांगे's picture

24 Jul 2016 - 12:14 am | संदीप डांगे

आज हिला पाहिले आणि जब्रा वाटले. अंदाजे तीस+ वर्षे जुनी असावी. अजुनही हाफकिक स्टार्ट होते. टाकीखाली-इन्जिनजवळ बंद कंदिलासारखे दिसते ते एअरफिल्टर. त्यानेच लक्ष वेधून घेतले माझे.

जाणकारांनी ह्या मॉडेलबद्दल अधिक माहिती द्यावी.

re

मोदक's picture

24 Jul 2016 - 12:24 am | मोदक

झक्क्कास्स्स्स्स...!!!!!!!

खफवर फटू बघून सुचवणार होतोच. लै लै आभार्स..!

हि डिझेल एन्फिल्ड आहे. आधी लोक स्वतः माउंट करायचे इंजिन. नंतर सुरज नावाने आली. नंतर एन्फिल्डनेच टौरस नावाने उतरवली. 65 मायलेज होते महाराजा. मेंटेनन्स लैच म्हणून चालली नाही.

गेले 2 महिने इचार करून पार भुगा झालाय मेंदूचा, पण कुठली बाईक घ्यावी काय कळंना झालाय. आत्तापर्यंत यामाहा fz चालवत होतो. आता जरा 150cc चा कंटाळा यायलाय. थंडरबर्ड की CBR 250 की अपाचे 200 ABS

वामन देशमुख's picture

28 Jul 2016 - 11:25 am | वामन देशमुख

एकटे किंवा दुकटे असाल तर रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० घ्या.
तिकटे (मुलबाळ धरून) असाल तर रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रा ३५० घ्या.

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Jul 2016 - 11:42 am | भटकंती अनलिमिटेड

गाडीकडून फार जास्त दीर्घ पल्ल्याचे टूरिंग अपेक्षित नसेल आणि थोडा वेळ असेल तर थंडरबर्ड.
रिफाइन्ड आणि एकदम स्मूथ इंजिन हवे असेल आणि दीर्घ पल्ल्याचे टूरिंग असेल तर होंडा सीबीआर२५०. थोडा रायडिंग पोस्चर ऑड आहे. रेसिंग टाईप.
मॉडरेट पॉवरसाठी अपाचे २००.
म्याड पॉवर, राईडफन, स्ट्रीटफायटर टाईप बाईक आवडत असेल तर केटीएम ड्युक (२००/३९०). २०० मध्ये एबीएस नाही.

-(थंडरबर्डचा केटीएम ३९० वर डोळा ठेवून असलेला मालक)

कपिलमुनी's picture

28 Jul 2016 - 12:14 pm | कपिलमुनी

१.पहिल्यांदा स्वतःचा कंफर्ट झोन बघावा.
२. क्रुझर (टीबी , हार्ले ) हवी की रेसिंग टाईप (सीबीआर) हवी की नेकेड केटीएम , पल्सर २०० एन एस
३. पिलियन सोबत प्रवास करणार आहात का ?( केटीएम बाद )
४.बजेट नुसार ऑप्शन निवडावा .
५ . दुर्दैवाने अपाची २०० , पल्सर २००, केटीएम २०० ,सीबीआर २५०, क्लासिक बुलेट , थंडरबर्ड , मोजो , टीएन्टी १२५ एवढेच ऑप्शन १-२ लाखात उपलब्ध आहेत.
६. टकाला विचारू नका ,

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2016 - 12:35 pm | टवाळ कार्टा

३. पिलियन सोबत प्रवास करणार आहात का ?( केटीएम बाद )

याच क्रायटेरीयाने मोजोसुध्धा बाद...मागच्या शन्वारीच ३०-४० किमी चालवली आहे

कपिलमुनी's picture

28 Jul 2016 - 1:24 pm | कपिलमुनी

६. टकाला विचारू नका ,

अशे लिवले आहे . कोनती बाईक नको यापेक्षा कोणती चांगली ते सांग !

हा सगळ्यात चांगला सल्ला आहे कम्मू.

येत्या १३-१४ ऑगस्टला हैदराबाद ते श्रीशैल्यम असा बुलेटवर फिरण्याचा बेत केला आहे.
उत्साही बुलेटधारी इच्छुकांनी मला व्यनि करावा.

गाडीकडून फार जास्त दीर्घ पल्ल्याचे टूरिंग अपेक्षित नसेल आणि थोडा वेळ असेल तर थंडरबर्ड. >>>>> इतर लोकांच्या मते दीर्घ पल्ल्याच्या टूरिंग साठी थंडरबर्ड बेश्ट आहे, तुमचं मत वेगळं दिसतंय.

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Jul 2016 - 12:13 pm | भटकंती अनलिमिटेड

मत वेगळं असण्याचे कारण म्हणजे मी दीर्घ पल्ल्यासाठी साधारण हायवेने अंदाजे ८०-९० आणि अधिक वेगाने प्रवास करतो. ८०च्या वर गेल्यावर थंडरबर्डच्या "अंगअंग भडके" प्रमाणे फूटरेस्ट, हॅंडलबार्स, सीट आणि असंख्य ठिकाणाहून अशा काही व्हायब्रेशन्स येतात की बास रे बास. मग अर्थात वेग कमी करणे आले. या व्हायब्रेशन्सचा परिणाम एकूण राईड क्वालिटीवर होतो आणि दिवसाच्या शेवटाला त्याचे पर्यावसान राईड फटीगमध्ये होते. हे मी दोनतीन दीर्घ पल्ल्याच्या राईड्समध्ये अनुभवले आहे. पण सावकाश ढुब-ढुब-ढुब जगाच्या अंतापर्यंत करत जायचं असेल तर थंडरबर्डला दुसरा पर्याय नाही हेही तितकंच खरं.

स्वतः तीन वर्षे वापरत असल्याने रॉयल एन्फिल्डचा रेग्युलर मेंटेनन्स हा एक वेगळा आयाम आहेच. त्याबद्दल नकोच लिहायला.

कपिलमुनी's picture

28 Jul 2016 - 12:28 pm | कपिलमुनी

तुम्ही थंडरबर्ड घेण्यामागे कोणते क्रायटेरीया होते ?