रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in तंत्रजगत
2 Oct 2014 - 6:26 pm

मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...

इथे अपेक्षित काय आहे ??

आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.

तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)

१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च

२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही

३. क्लासिक ३५० चे तोटे ??

१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर

मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.

मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

13 Sep 2016 - 9:54 am | टवाळ कार्टा

थोडक्यात लाल डबा घ्या ;)

तुला स्वतःचा "आबुआगा" करायची इतकी का हौस आहे..?

बाकी लाल डब्याचे तुमचे आणि तुमच्या खास मित्रांचे पॅरामीटर्स माहिती असल्याने मित्रांसह तुम्हाला इथुन पुढे फाट्यावर मारल्यास आश्चर्य वाटून घेवू नये.

टक्या 'बाबबाब' आहे हे सांगून मी बापूचा ५०० सीसी (कॉमेन्ट्स अँड कॉम्प्लिमेन्ट्स) धागा संपन्न करतो.
धन्यवाद.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Sep 2016 - 5:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाबबाब

अर्थ व्यनि कर बे! मै पीएसपीओ नही जानता भाई!

टवाळ कार्टा's picture

13 Sep 2016 - 5:19 pm | टवाळ कार्टा

मलापण करा...बघू तरी काय लिहिले आहे

अभ्या..'s picture

13 Sep 2016 - 5:20 pm | अभ्या..

हीहीहीहीही,
टकोजीराव, जौद्या सोडा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Sep 2016 - 5:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

अभ्या घे ह्याला बी घोळात!

*विचित्र दिसत (इथे बोलत) असले तरी आपलेच आहेत ते.

*प्रेरणास्थान - अशी ही बनवाबनवी

अभ्या..'s picture

13 Sep 2016 - 5:26 pm | अभ्या..

अरे टक्या 'बाबबाब' म्हणजे
बाबा बजरंग बाईकवर बसले. ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Sep 2016 - 5:20 pm | कैलासवासी सोन्याबापु

अनुल्लेखाने मारा असे सूचक दोन शब्द बोलून मी माझे म्हणणे संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र जय एन्फिल्ड!

अनिरुद्ध.वैद्य's picture

13 Sep 2016 - 10:35 am | अनिरुद्ध.वैद्य

मलादेखील सायलेंसर, हॅण्डल बार बदलवुन घ्यायचेय. हे पुण्यात कोठे मिळतील?
ते कलरींगच पण आहे मनात, पण आरटीओ मध्ये नेउन आरसीवर चेंजेस करावे लागतील काय?

महासंग्राम's picture

13 Sep 2016 - 10:45 am | महासंग्राम

नाना पेठेत बदलून मिळतात. आणि कस्टमाइज्ड करायची असेल तर http://gabrielmotorcycle.com/
वर्दे पेक्षा क्वालीटी काम.

सत्याचे प्रयोग's picture

13 Sep 2016 - 10:58 am | सत्याचे प्रयोग

नाना पेठेत जावा कालच जाऊन आलो बरच काय काय भेटते तिथे

अनिरुद्ध.वैद्य's picture

13 Sep 2016 - 11:06 am | अनिरुद्ध.वैद्य

बघतो तिथ! बाकी कस्टमाईझ नाही करायचीय. आहे ती मस्तय.

गॅब्रीअल अण्णांना प्लसारच नेकेड कस्टमाइझेशनच बजेट विचारलं होतं तेच लाखात नेलं त्यांनी! म्हणुन तसही ऑट्टा लिमीट आहेच ते.

महासंग्राम's picture

13 Sep 2016 - 11:15 am | महासंग्राम

हे हायच म्हणा पण तुमचाच वरचा डायलॉग चिटकवतो

अहो हौस करायची तर खिशाकडं बघायचं नाय मालकं!

;)

अनिरुद्ध.वैद्य's picture

13 Sep 2016 - 11:20 am | अनिरुद्ध.वैद्य

थंडरबर्ड्चीच हौस करतोय! :फिदी:

अमर विश्वास's picture

13 Sep 2016 - 4:01 pm | अमर विश्वास

ग्लासवूल हे मटेरियलचे नाव आहे

शॉर्ट-बॉटल व गोल्डस्टार या दोन्हीमध्ये ग्लासवूल वापरलेले असते.

थोडा अधिक खर्च करायची तयारी आसेल तर वाइल्ड बोअर चान्गला पर्याय आहे

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Sep 2016 - 5:35 pm | कैलासवासी सोन्याबापु

आभार अमर भाऊ, वाइल्ड बोर चा परफॉर्मन्स कसा असतो?? वर व्यक्त केलेल्या शंकांच्या बाबतीत तो कसा उतरतो कसोटी वर???

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Sep 2016 - 5:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

अभ्या लगा
बाबबाबचा अर्थ पोचला!! काय बोलू ह्यावर

ठ्ठो =))) =))))

(मोडक्या तोडक्या पंजाबी मध्ये )
हाय हाय वीरे लूट लिता महफिल त्वानु!!

(मायमराठीत)
बाजार बाराच्या भावात उटीवलांस र मर्दा!!

(वऱ्हाडी ठसक्यात)
अबे हा निरानाम झांगडबुत्ता हाय

अमर विश्वास's picture

13 Sep 2016 - 7:43 pm | अमर विश्वास

वाइल्ड बोर सायलेन्सरमध्ये ग्लासवूल नसते. हा फ्री-फ्लो प्रकरतला आहे

पिकअप थोडासा जास्त मिळतो... पण गाडी आवज भरपुर करते

मला स्वतःला हा आवज खूप जास्त (लाउड) वाटतो...

जर जुन्या बुलेटसारखा (कास्ट आयर्न इन्जिन) आवाज हवा असेल तर शॉर्ट बॉटलच वापरा...
इन्जिनसाठीही उत्तम ...

मी अनेक वर्षे हा वापरला आहे..

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Sep 2016 - 8:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

आभार!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Sep 2016 - 7:48 am | कैलासवासी सोन्याबापु

शॉर्ट बॉटल पाहिला, युट्युब वर विडिओ पाहिले अन मुख्य म्हणजे आवाज ऐकला, फिक्स आहे शॉर्ट बॉटलच घ्यायचा. पण त्यातही कन्फ्युजन आहे राव, विथ ग्लासवूल का वीथाऊट ग्लासवूल घ्यावा, कंपनी कुठली? इत्यादी, जमल्यास खात्रीशीर अन चांगल्या शॉर्ट बॉटल ची विक्री करणारी एखादी कंपनी सुचवा, किंवा एखादी लिंक अमेझॉन, ईबे ची.

धन्यवाद
बाप्या

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Sep 2016 - 2:16 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त वाटला. पण थंडरबर्डला बसेल का?

सोन्याबापु,

रॉयल एन्फिल्डचाच, अपस्वेप्टप्रकारात येतो सायलेंसर, तो बघितलाय का? क्लासिक्ला बसतो. मला हवा होता, पण थंडरबर्डला लागणार नाही अस सांगण्यात आलंय.

मला सायलेन्सरबद्दल फारसे माहिती नाही आणि मी बदलायचा विचारही करत नाहीये..

..पण अपस्वेप्टचा एक मोठा इश्श्यू म्हणजे टायर खोलायचे असेल तर पहिला सायलेन्सर काढायला लागतो आणि मगच टायरला पाने बसतात. बरोबरै का?

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Sep 2016 - 2:23 pm | अनिरुद्ध.वैद्य

येवढी डीटेल माहिती नाहि काढली. पण एकुणात डिझाईन बघता, तुमचा मुद्दा व्यवस्थित वाटतोय! पण थंप चांगला येतो त्याचा.

थंप चांगला येतो त्याचा.

येस्स..!!!!

अमर विश्वास's picture

14 Sep 2016 - 2:39 pm | अमर विश्वास

स्वतःची गाडी modify करणे यासारखा आनन्द नाही..
Process is as enjoyable as end result

या महान कार्यास माझा थोडा हातभार.. फोटो जरूर पाठ्वा...

शॉर्ट बॉटल विथ ग्लासवूल ....
ग्लासवूल ज्याला फिटर 'जाळी'म्हणतात . नक्की वापरा

ग्लासवूलमुळे High Frequency Sound होतात.. Noise कमी होतो
विशेषतः आवाजातला Treble कमी होतो व Base sound मिळतो

लॉन्ग बॉटल हा अजुन एक प्रकार आहे.. वरील सर्व तसेच .. थोड्या जास्त प्रमाणात

फक्त एकच तोटा. लाम्बी जास्त असल्याने गाडीच्या बाहेर येतो

गेली दोन वर्षे बाहेर असल्यामुळे सध्या कुठल्या कंपन्या आहेत ते शोधावे लागेल

चौकशी करुन कळवतो

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Sep 2016 - 3:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

अत्यंत आभारी आहे अमर भाऊ

भटकंती अनलिमिटेड's picture

21 Sep 2016 - 2:30 pm | भटकंती अनलिमिटेड

"ग्लासवूल ज्याला फिटर 'जाळी'म्हणतात"

फिटर लोक ज्याला जाळी म्हणतात ते baffles . सायलेन्सरच्या लांबीच्या काटकोनात आतमध्ये धातूच्या चकत्या बसवलेल्या असतात त्या. मुख्य काम heat dissipation .

संदीप डांगे's picture

22 Sep 2016 - 10:38 am | संदीप डांगे

ग्लासवूलमुळे High Frequency Sound होतात.. Noise कमी होतो
विशेषतः आवाजातला Treble कमी होतो व Base sound मिळतो

>> सर्वांनीच हे लक्षात ठेवावं, 'ट्रेबल' ने इरिटेट होतं, 'बेस' ऐकायला 'गोड ते ठिक' ह्या रेंजमधे येतं.

सुबोध खरे's picture

24 Sep 2016 - 10:31 am | सुबोध खरे

बेस' ऐकायला 'गोड ते ठिक
हे बुलेट मालकांसाठी, सामान्य माणसांसाठी नव्हे
ढोल ताशे इ वाद्ये असाच "हाय बेस" (कि बास्स) मुळे डोकेदुखी आणि आवाज प्रदूषणा ला कारणीभूत होतात

संदीप डांगे's picture

24 Sep 2016 - 1:22 pm | संदीप डांगे

सरजी, ते सामान्य माणसास उद्देशून आहे, 'गोड ते ठीक' ही एक रेंज आहे, त्यापुढे इरिटेट होतं,

यामाहा rx100 चे फायरिंग किंवा माझ्या लांसर कारचे फायरिंग 'गोड व आकर्षक' ह्या कौतुकात बसतं,

काही बुलेट मालक मोठेपणासाठि, उगाच लक्ष वेधून घेण्यासाठी म्होट्टा आवाज काढून बुलेटची शान घालवतात ते इरिटेटिंग आहेच,

सुबोध खरे's picture

24 Sep 2016 - 1:45 pm | सुबोध खरे

डांगे अण्णा
मूळ बुलेटचा सायलेन्सर कढून त्याच्या जागी दुसरा लावण्याची काय गरज आहे? कारण कंपनीने कायद्यात बसेल इतकाच आवाज करणारा सायलेन्सर आणि विषारी वायू नष्ट करणारा कॅटॅलीटिक कन्व्हर्टर बसवलेला आहे. तो काढून दुसरा बसवण्याची गरज का भासते
स्पष्ट शब्दात "शो ऑफ" साठी. "जमाने को दिखाना है". मग त्यात "हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण" झाले तर बेहत्तर.
हा एक संप्रदाय(कल्ट) आहे आणि एकदा तुम्ही त्यात प्रवेश केलात कि सारासार विवेक बुद्धी बाजूला ठेवावी लागते. आणि हे "असंच असतं" किंवा "असं नसेल" तर चालणार नाही. हि स्थिती येते.
रात्रीच्या प्रशांत वेळेस ठणाणा करणाऱ्या बुलेटचा आवाज किती त्रासदायी असतो हे सर्वानी पाहिलेले आहे.

संदीप डांगे's picture

24 Sep 2016 - 2:10 pm | संदीप डांगे

आपल्या गाडीला स्वतंत्र कॅरेक्टर देणे हा उद्देश असतो, पण तो मालकाच्या विचाराच्या लेव्हल नुसार बदलतो, कायदा व पर्यावरण ह्याची काळजी घेऊन केलेले बदल माझ्या मते चुकीचे नसावेत, अन्यथा बुलेट चालवणे हेच अयोग्य आहे असं म्हणावं लागेल

एस's picture

24 Sep 2016 - 1:01 am | एस

'सायलेन्सर' चं काम नक्की असतं तरी काय, हा प्रश्न पडला आहे. एक तर ते (किंवा कुठलेही मॉडिफिकेशन) बेकायदेशीर आहे. दुसरे म्हणजे ते पर्यावरणाला घातकही आहे, कारण इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणारे विषारी वायू व इतर घटक तसेच हवेत सोडले जातात. मग लोक तरीही सायलेन्सर का बदलतात? कुठे जातो लोकांचा विवेक आणि का वाटत नाही कायद्याबद्दल आदर!

अनिरुद्ध.वैद्य's picture

24 Sep 2016 - 9:21 am | अनिरुद्ध.वैद्य

सायलेंसर 'विषारी वायुंना अटकाव करते' हे समजले नाही.

जेव्हा येवढ्या कंपन्या राजरोसपणे मॅन्युफॅक्चर करत आहेत तर तिथं बंदी घातली सरकारने तर ह्या विषयी जागरुकता होइल. किंवा नियम तरी स्पेसिफाय करावे.

प्रश्न फक्त प्रचंड आवाजाचा वाटतो. ८० डेसीबलची लिमीट असेल तर काय हरकत असावी?

सुबोध खरे's picture

24 Sep 2016 - 10:24 am | सुबोध खरे

https://en.wikipedia.org/wiki/Catalytic_converter
कॅटॅलीटिक कन्व्हर्टर मुळे विषारी वायूंचे कमी किंवा बिनविषारी पदार्थात रूपांतर होते. यासाठी कंपन्यांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रणे असतात. सध्या फॉक्सवॅगन वर जगभर चालू असलेले खटले याच कारणास्तव आहेत. पण "बिगर" कंपनीचे कॅटॅलीटिक कन्व्हर्टर (असले तर) अशा कोणत्याही नियंत्रणात नसल्याने त्यातून किती विषारी वायू बाहेर पडतात ते माहित नाही आणि त्यांचा "आवाज" चांगला( बुलेट मालकांसाठी, सामान्य माणसांसाठी नव्हे) यावा यासाठी त्यातील मफलर( आवाज कमी करणारे नळकांडे) पण असते किंवा नसते.

अमर विश्वास's picture

24 Sep 2016 - 3:54 pm | अमर विश्वास

माझ्य माहिती प्रमाणे बुलेट्मध्ये कॅटॅलीटिक कन्व्हर्टर नसतो. नविन बुलेटमधे EGR (Exhaust Gas Recirculation) ही सिस्टिम वापरली आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे कॅटॅलीटिक कन्व्हर्टर इन्जिन व सायलेंसर यांना जोडणार्‍या पाईपमध्ये बसवता येतो. त्यमुळे नुसता सायलेन्सर बदलल्यमुळे वायु प्रदुषण वाढते हे चुकिचे आहे.

आवाजाचे प्रदूषण : (माझी स्वतःची आवड) : सायलेंसर बदलुन आवजची पातळी (volume) कमी करता येतो व आवजाची प्रत बदलता येते

काही़जण अवाजाची पातळी खुप वाढवतात. ते शक्यतो टाळावे.

संदीप डांगे's picture

24 Sep 2016 - 4:07 pm | संदीप डांगे

सहमत!!

अनिरुद्ध.वैद्य's picture

30 Sep 2016 - 3:19 pm | अनिरुद्ध.वैद्य

आर डी हॅण्डल्बार लावण्याबाबत विचार करतोय. कोणी बसवला आहे का? कितीपर्यंत होइल ५०० पासुन २००० इतक्या रेंजमध्ये ओप्शन्स कळले!!

कपिलमुनी's picture

30 Sep 2016 - 3:39 pm | कपिलमुनी

या काँमेंट्मधे हॅण्डल्बार विषयी आहे .

अनिरुद्ध.वैद्य's picture

30 Sep 2016 - 5:02 pm | अनिरुद्ध.वैद्य

भटकंती साहेबांना व्यनी करतो!

भटकंती अनलिमिटेड's picture

3 Oct 2016 - 9:48 am | भटकंती अनलिमिटेड

थंडरबर्डचे हॅंडल आधीचे वर जाऊन पुन्हा रायडरच्या दिशेने थोडे खालच्या दिशेने झुकलेले असल्याने हॅंडलिंगला थोडा त्रास (विशेष असा नाही, पण थोडा) होतो. त्यात तो थोडा अरुंदही आहे. त्यामुळे लॉंग राईड्सना (गेल्या वर्षी डिसेंबरात केलेली १५००किमी आणि ४००-५०० किमीच्या दोनचार) थोडा खांद्यांवर मला थोडा त्रास जाणवला. तसेच त्या हॅंडलचे खालच्या दिशेने झुकलेले बार एंड्स असल्याने सस्पेंडेड वेट वाढले आहे जे की काही ठराविक आरपीएमला व्हायब्रेट होते. म्हणून मी आरडी हॅंडलबार बसवण्याचा निर्णय घेतला.
अधिक रुंद असल्याने कदाचित सुरुवातीला थोडे वेगळे वाटेल पण लवकरच सवय होते. व्हायब्रेशन्सचा त्रास गेलाय. शिवाय याला मध्ये आडवा लहानसा बार असल्याने मोबाईल-जीपीएस माऊंटची आणि कॅराबिनर कीचेन अडकवण्याची सोय झालीच.

किंमत: क्रोम प्लेटेडवाला अंदाजे ४००-५००/-. फिटिंग-१५०/- (घासाघीस किती करता त्यावर, मला सुरुवातीला ३००/- सांगितले होते)

उपलब्धता: नाना पेठ (पेट्रोल पंपाच्या चौकाजवळ बॉंबे मोटर हाऊससमोर एक मोठे दुकान आहे, बहुतेक नाव गुरुनानक असावे).

टिप: बुलेट घेऊन मेकॅनिकसमोर जाऊ नये. जंगली कुत्र्यासारखे तुटून पडतात गिर्‍हाईक आल्यावर. गाडी त्यांच्या नजरेपासून लांब पार्क करावी, दुकानातून हॅंडलबार घ्यावा, मग समोर मेकॅनिक बसलेले असतात त्यांच्याशी फिटिंगसाठी बार्गेन करावे. डील ठरले की गाडी त्यांच्यासमोर आणावी. रस्त्यावरच फिटिंगकामे केली जातात. जाताना लहान दोरी आणि एक मोठे कापड घेऊन जाणे, ओरिजिनल हॅंडलबार गुंडाळून, बांधून घरी आणायला.

भटकंती अनलिमिटेड's picture

3 Oct 2016 - 9:50 am | भटकंती अनलिमिटेड

हॅंडलबार घेताना त्याला एंड्सना वेट्स लावायला बोल्टची सोय आहे हे पाहून घेणे.
ओरिजिनल केबल्सची लांबी पुरेशी होते. मेक शुअर की केबल्स नीट राऊट केल्यात आणि शेवटी बारएंड वेट्स लावलेत.

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Oct 2016 - 10:50 am | अनिरुद्ध.वैद्य

माहितिसाठी धन्यवाद देवा!

अमर विश्वास's picture

30 Sep 2016 - 5:48 pm | अमर विश्वास

हॅंडलबार विषयीच्या आधीच्या कॉमेंट्स जरूर वाचा..
त्याशिवाय मला जाणवलेल्या / खटकलेल्या काही गोष्टी व काही टिप्स (इतरांची मते / अनुभव जाणून घ्यायला आवडेल)

- आर डी प्रकारचा हॅंडल बार लावल्यावर जास्त वाइब्रेशन्स जाणवतात. विशेषत: ५०० सीसीच्या गाड्यांसाठी. त्यामुळे हॅंडलच्या शेवटी (ग्रीपच्या बाहेरच्या बाजूस) वजन जरूर बसवावे.

- हॅंडल बार बसवताना त्याची स्थिती (रिलेटिव पोज़िशन विथ ते सीट) महत्वाची आहे. ज्यामुळे गाडी चालवताना चालकाला योग्य स्थितीत (पोस्चर) बसता येईल. योग्य स्थिती म्हणजे :
- हॅंडल पकडल्यावर पाठीचा कणा ताठ राहील .. पुढे वाकावे लागणार नाही
- ग्रीप खांद्याच्या रेषेच्या खाली असेल व खांद्यावर अतिरिक्त भार येणार नाही. (लांबच्या प्रवासासाठी अत्यंत महत्वाचे..
- हॅंडल पकडल्यावर हात पुर्ण सरळ रहाणार नाहेत. कोपरात थोडे वाकलेले असतील. त्यामुळे मनगटे व हाताच्या स्नायुंवर कमी भार पडेल.

- केबल्सच्या लाम्बीबद्दल याआधीही चर्चा झाली आहे. तरी.. केबल्स स्ट्रेच होणार नाहीत, पुरेशी ढील (स्लॅक) असावा

- हॅंडल बारचे क्रोम प्लेटिंग नीट तपासून घ्यावे.. अन्यथा गंजण्याचा धोका असतो. आथवा काळ्या रंगाचा हॅंडल बार घ्यावा... अर्थात गाडीच्या रंगाला योग्य असेल तरच

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Oct 2016 - 10:59 am | अनिरुद्ध.वैद्य

योग्य माहितीसाठी आभार. ह्या अँगलने विचार केला नव्हता. सध्याच्या नॉर्मलमध्ये काही प्रॉब्लेम नाहिये, पण व्हाय्ब्रेशन्स जरा जास्त जाणवतात, म्हणुन आरडीचा घ्यायचा विचार करत होतो. स्टॉक हँण्डलबारमध्येच जरा पाठ वाकल्या जाते कधी कधी. त्यामुळे दोन्ही बसवुन ट्रायल घ्यावी लागेल.

ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 12:41 pm | ज्याक ऑफ ऑल

गेले ते दिवस .... राहिल्या त्या आठवणी....

बुलेट वापरून सुद्धा ... प्रो-बुलेट न झालेला ...

गोळाबेरीज मत : बुलेट ची स्प्लेंडर झालीये ... फक्त १५०००० ला मिळते इतकाच काय तो फरक !!

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Oct 2016 - 1:36 pm | अनिरुद्ध.वैद्य

बुलेटची एक्स्क्लुझिव्हिटी संपलीय ह्यात दुमत नाही. सगळेच बुलेट घेत सुटलेत!

ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 1:04 pm | ज्याक ऑफ ऑल

लोंग राईड्स साठी उपयुक्त .

विंडशिल्ड , फोटोत नीट दिसत नाहीये ... पण फुल लेंग्थ - साधारण ९०० ला rezone इथून ऑनलाईन मागवलं ...

अमर विश्वास's picture

3 Oct 2016 - 2:08 pm | अमर विश्वास

JOA आणि अनिरुद्धभाउ.. बुलेटही स्वत: साठी वापरावी.. दुसर्‍यनी बघावे म्हणून नाही.. म्हणजे एक्स्क्लुझिव्हिटी हा मुद्दाच राहणार नाही

शिवाय तुम्ही बुलेट कधी व कुठे वापरता हे महत्वाचे.. रोज ऑफीसला 5-10 किमी चालवत अससला तर जाउदे पण कधी लॉंग ड्राइव - हाइ वे - हिमालयात घेऊन जा ...
बुलेट.. बुलेट होती है..
स्प्लेन्डर .. स्प्लेन्डर होती है..

एक प्रश्न.. आपण विन्डशिल्ड लावल्यानंतर बुलेट घेऊन हे वे गेला आहात का? मला विन्डशिल्ड कॅमफर्टबल वाटले नाही.. हॅंड्लिंगच्या दृष्टीने..
आपला काय अनुभव ?