वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in तंत्रजगत
29 Sep 2014 - 3:49 pm

आजच्या धावपळीच्या युगामधे वेळेत अपेक्षित ठिकाणी पोचण्यासाठी आपण वाहनाच्या कुठल्याना कुठल्या प्रकारावर सतत अवलंबुन असतो. नोकरीला ३०-४० कि.मी. जायचं असु दे किंवा शेजारच्या चौकातुन कोंथिंबिरीची गड्डी आणायची असु दे. ऐन पावसाळ्यात महत्त्वाच्या पिलिअन रायडर (मि.पा. वरच्या नाही) बरोबरची सहल असु देत. गाडीवर (मोदकरावांसारखे उत्साही लोकं आजही सायकलवर :) ) टांग टाकली की निघालं असा प्रकार असतो. आपल्या पे.रु.चा.पा.पा. एवढ्याच महत्त्वाच्या असणार्‍या गाडीच्या काम करायच्या पद्धतीविषयी मात्र बहुतांश लोकं उदासिन असतात. स्पाच्या ह्या धाग्यावर बर्‍याच लोकांनी बर्‍याच शंका एकमेकांना विचारलेल्या आहेत. त्यापासुन प्रेरणा घेऊन एक वाहनविश्वाची सफर घडवुन आणणारी एक लेखमाला मी आजपासुन सुरु करत आहे.

ह्या मालिकेचा मुख्य उद्देश असा आहे की,

१. वाचकवर्गाला वाहनविश्वाचा इतिहास समजावा.
२. ईंधनावर चालणार्‍या वाहनांचे वेगवेगळे प्रकार काय असतात?
३. वाहन नक्की कसं काम करतं?
४.काळानुरुप वाहनांमधे आणि त्यामधे वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानामधे कसे बदल होत गेले?
५. आत्ताच्या काळात प्रोटोटाईप स्टेज ला असणार्‍या आणि भविष्यात वाहन क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवुन आणणार्‍या वाहनांची आणि त्यावर चालु असणार्‍या संशोधनाची माहीती देणं.
६. काही ब्रँड स्पेसिफिक टेक्नॉलोजिज.
७. काही प्रसिद्ध स्पोर्ट्सकार्स.
८. वाहनाची देखभाल.

ह्या सगळ्या गोष्टींची जमेल तेवढ्या साध्या सोप्या भाषेमधे माहीती द्यायचा प्रयत्न मी करणार आहे.

वाहनांशी संबंधित शेकडो तांत्रिकी नावं आहेत. मराठी प्रतिशब्द सुचवता आले तर सुचवाच. पण किचकट अणि जडबंबाळ शब्दप्रयोग टाळण्यासाठी मी शक्यतो प्रचलित ईंग्रजी नावचं वापरणार आहे. जसे की स्पार्क प्ल्ग (ईंधन प्रज्वलक), हायड्रॉलिक ब्रेक (तैल गतिनिंयंत्रक ईत्यादी), फ्युएल ईंजेक्श्न (ईंधन टोचक =)) )

ईथेच आपण आपल्या वाहनाविषयी काही शंका असतील तर त्याविषयीही चर्चा करु. कोणाला वाहन उद्योगाविषयी अजुन जास्तीची माहीती हवी असेल तर तिही तुम्ही इथे विचारु शकता. कोणाला माहीतीमधे भर घालायची असेल तर तीही मला सांगाच. तसं सांगायचं झालं तर ही लेखमाला ६० ते ७० भाग एवढी मोठी होऊ शकते. वाचकांचा कसा प्रतिसाद मिळतोय त्यावर किती खोलात माहीती द्यायची हे ठरवीन :) . चला तर मग उद्यापासुन सुरु करु वाहन विश्वाची एक मोठ्ठी सफर.

Ford T model

(फोर्ड टी- मॉडेल वर्ष १९१७)

(क्रमशः)

*सर्व चित्रे आं.जा. वरुन साभार.

पुढचा भाग

प्रतिक्रिया

अत्यंत इंटरेस्टिंग.. वाट पाहात आहे..

काउबॉय's picture

29 Sep 2014 - 3:56 pm | काउबॉय

.

शिद's picture

29 Sep 2014 - 3:53 pm | शिद

चांगला उपक्रम.

बरीच नवीन माहीती मिळेल असं वाटतंय त्यामूळे पुढील लेखांची वाट पाहत आहे.

आदूबाळ's picture

29 Sep 2014 - 3:54 pm | आदूबाळ

वाट पहातो आहे.

खेडूत हेही या क्षेत्रातले जाणकार आहेत. त्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा असेल.

मोदक's picture

29 Sep 2014 - 3:55 pm | मोदक

चांगला उपक्रम.

पुढील भागांच्या प्रतिक्षेत..!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Sep 2014 - 3:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

विषय फारच मोठा आणि जटील आहे
कितिही भाग होत असले तरी न कंटाळता लिहा.
वाचायला नक्की आवडेल.

स्पा's picture

29 Sep 2014 - 4:00 pm | स्पा

असेच बोलतो
वाचतोय :)

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2014 - 4:32 pm | टवाळ कार्टा

आण्दो :)

उगा काहितरीच's picture

29 Sep 2014 - 4:47 pm | उगा काहितरीच

वा मस्त.. एक गोष्ट सुचवु इच्छितो की सरसगट सगळ्या वाहनांबद्दल लिहिन्यापेक्षा अगोदर दुचाकी वा चारचाकी बद्दल लिहा.

उगा काहितरीच's picture

29 Sep 2014 - 4:49 pm | उगा काहितरीच

वा मस्त.. एक गोष्ट सुचवु इच्छितो की सरसगट सगळ्या वाहनांबद्दल लिहिन्यापेक्षा अगोदर दुचाकी वा चारचाकी बद्दल लिहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2014 - 6:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक विषय आणि सुंदर सुरुवात !

फोटोवरून चारचाकीने सुरुवात होईल असे वाटते. सर्वच वाहनांबद्दल लिहिल्यास वर अनेकजणांनी म्हटल्याप्रमाणे चारचाकी आणि दोनचाकी वेगळ्या विभागांत ठेवल्यास बरे... अर्थात हा विचार तुम्ही केला असणारच म्हणा.

सुबोध खरे's picture

29 Sep 2014 - 6:04 pm | सुबोध खरे

+१००

खेडूत's picture

29 Sep 2014 - 6:23 pm | खेडूत

चांगला उपक्रम. पु भा प्र.
वाहन विषयक कितीही माहिती मिळवली तरी कमीच!
तुमचा टंकनोत्साह पहाता रोचक मालिका वाचायला मिळेल याची खात्री आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2014 - 9:29 pm | अत्रुप्त आत्मा

वाचिंग!

खटपट्या's picture

29 Sep 2014 - 11:13 pm | खटपट्या

जबरी
वाट पहात आहे.

दशानन's picture

29 Sep 2014 - 11:19 pm | दशानन

उत्तम विषय!

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2014 - 11:21 pm | श्रीरंग_जोशी

एका मोठ्या विषयाला हात घातलाय, कॅप्टन.

लेट्स मार्च फॉरवर्ड.

काउबॉय's picture

30 Sep 2014 - 12:55 am | काउबॉय

रोचक विषय.

मुक्त विहारि's picture

30 Sep 2014 - 10:23 pm | मुक्त विहारि

केला आहे.