ग्रहण

पार्टनर's picture
पार्टनर in काथ्याकूट
1 Aug 2008 - 6:53 pm
गाभा: 

ग्रहणात का खाऊ नये याची शास्त्रीय माहिती कुठे मिळेल ? मुळात त्याला तसा शास्त्रीय आधार आहे का ?

आज एकाने मला ग्रहण आणि आपल्या रूढींबद्द्ल विचारलं.. मी जमेल तसं पाळतोय , माझा विश्वास आहे पण माझ्याकडे ठोस असं उत्तरच नाहिये. काही वर्षांपूर्वी मी एका धार्मिक पुस्तकात वाचलेलं पण आत्ता माझ्याकडे ते पुस्तकही नाही आणि मला तशी माहिती जालावर मिळतही नाहिये. याबद्द्ल अधिक माहिती कोणी देऊ शकेल का ? ( link वगैरे असेल तर जरूर द्या.). आणि हो, तुम्हाला काय वाटतं ?

नावाउलट वागणारा
- पार्टनर

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

2 Aug 2008 - 1:35 pm | विसोबा खेचर

मी तर काल ग्रहणकाळात चापून मिसळ खाल्ली! काहीही झालं नाही! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2008 - 9:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पार्टनर साहेब,

तात्यांनी तुम्हाला योग्य माहिती दिली आहे. ग्रहण म्हणजे चंद्राच्या बिंबाच्या मागे सूर्य (आपल्या मिपावरचा नाही) लपतो. म्हणजे याला तुम्ही छोटी रात्रही म्हणू शकता. आता रात्र आहे (माझ्याकडे) म्हणजे पृथ्वीने सूर्याला ग्रहण लावले आहे. कारण सूर्य पृथ्वीच्या मागे लपला आहे. आपण झाडाखाली सावलीत जातो, टोपी घालतो ते सूर्याला झाकण्यासाठीच ना? ग्रहणात पण हेच होतं. त्यामुळे (या वेळेस चापलं नसेल काही तर) पुढच्या वेळेस जरूर काहीतरी खाऊन पहा, तुमचाही तात्या म्हणतात त्यावर विश्वास बसेल. पुढचं भारतातून दिसणारं सूर्यग्रहण (माझ्या माहितीत) पुढच्या वर्षी २२ जुलैला आहे. आपल्या नंदूरबार वगैरे त्या बाजूने खग्रास दिसणार आहे ... जमणार असेल तर जाऊन पहा. काय मजा येते खग्रास ग्रहण पहायला ते बघितल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय नाही समजणार!

(ग्रहणामुळेच खगोलशास्त्राकडे वळलेली) यमी

घाटावरचे भट's picture

3 Aug 2008 - 7:04 am | घाटावरचे भट

सगळं बिनधास्त खायचं प्यायचं हो...काय होत नाय...
हे सगळे लोकांना चू* बनवायचे धंदे आहेत..

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरन्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सुबक ठेन्गनी's picture

4 Aug 2008 - 3:20 pm | सुबक ठेन्गनी

भोजराज द्विवेदिन च्या ''Hindu Traditions and Beliefs'' या पुस्तकात
वेदातिल उत्तर दिले आहे...शास्त्रिय उत्तर नाहि हि नोन्द घ्यावि..
''तत्र चन्द्र ग्रहणे यस्मिन्याये ग्रह्ण्म तस्मात् पूर्व I
प्रहरत्रयम न भुन्ज्यित I सुर्य ग्रहे तु प्रहर चतुश्टयम न भुन्ज्यित II''

अर्थ : चन्द्र ग्रहणाच्या पहिल्या तीन स्टेजेस दरम्यान आणि सुर्य ग्रहणाच्या चारि स्टेजेस दरम्यान शिजवलेले अन्न खाउ नये.
अशी माहिति मिळते कि..अल्ट्रा वायलेट किरणान मुळे अन्न दुशित होते आणि आपण पोटाचे डोळ्याचे आणि दातचे त्रास होउ शकतात..म्हनुन अन्नावर तुलशि पत्र ठेवतात जे जन्तुनाशक असते..

पार्टनर's picture

4 Aug 2008 - 7:05 pm | पार्टनर

आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.घाईगडबडीत्त लिहिल्याने कदाचित मी माझं म्हणणं नीटसं मांडलेलं नसावं.

अंधश्रद्धा :

शाळेत असताना ग्रहण पाहायच्या कार्यक्रमाला गेलोच होतो.असे कार्यक्रम आमच्या शाळेत (नू. म. वि., पुणे) होत असतात.
ग्रहणकालात मी सुद्धा खाल्लेलंच आहे.पण मग मला आपल्या संस्कृतीशी दूर गेल्याचीही भावना मागाहून येते. गिल्ट म्हणा हवं तर. आणि म्हणूनच तो प्रश्न.

मी याबाबत जो प्रश्न विचारला होता, तो परत लिहितो :
"ग्रहणात का खाऊ नये याची शास्त्रीय माहिती कुठे मिळेल ? मुळात त्याला तसा शास्त्रीय आधार आहे का ?"

यांत तरी काही अंधश्रद्धा मला दिसत नाही.
"ग्रहण म्हणजे चंद्राच्या बिंबाच्या मागे सूर्य लपतो." ई.
हे सगळं शाळेत असताना वाचलेलं होतंच.तुमच्यामुळे परत वाचायला मिळालं. आणि तुम्ही ते चांगल्या प्रकारे सांगितलंय. वादच नाही.
पण माझं म्हणणं ते नव्हतंच ! मला ग्रहणाची नव्हे, ग्रहणात का खाऊ नये याची शास्त्रीय माहिती (असली तर) हवी होती हे स्पष्ट लिहिलं होतं.

आपले पूर्वज आपल्यापेक्षा कितीतरी जास्त निसर्गाच्या जवळ होते.त्यांच्या सांगण्याच्या पद्धती वेगळ्या किंवा अशास्त्रीय असू शकतील(राहू - केतू आणि ग्रहणाची कथा).पण याचा अर्थ असा काढणे की सगळे मूर्खात काढायला बसले आहेत हे मात्र पटत नाही.Cynical वाटतं.मला असं वाटतं, की जसं काही विचार न करता सरळ कशावरही विश्वास ठेवणं ही अंधश्रद्धा , तसंच काही संशोधन न करता किमान माहिती तरी गोळा न करता अविश्वास दाखवणं हीसुद्धा अंधश्रद्धाच ! मग ती विज्ञानावर का असेना !

अशी उदाहरणे देता येतील की ज्याला शास्त्रीय भाषेतलं कारण तुम्हाला मिळेलच असं नाही. (विषयांतर होतंय ,पण इलाज नाही.. मला ठाऊक असलेलं उदाहरण सांगतो.)

१. संध्याकाळी दही खाऊ नये :
शास्त्रीय भाषेत फक्त तुम्हाला विटॅमिन्स , मिनरल्स ईत्यादी माहिती मिळेल. पण कुठल्या वेळी दही खाल्ल्याने त्याचे काय परिणाम होतात याचं उत्तर आयुर्वेदात मिळेल.कारण त्यांचा दृष्टिकोनच वेगळा आहे. आणि माझ्या मते याचं तुम्हाला शास्त्रीय भाषेत उत्तर मिळणं अवघडच आहे(चू.भू.द्या.घ्या. : मी बायोचा विद्यार्थी नाही.). तेच बॅक्टेरिया ,तोच पदार्थ पण वेळेनुसारही त्याचे गुणधर्म / शरीरावर होणारे परिणाम बदलतात असं आयुर्वेद म्हणतं.

हेच तुम्ही आजीच्या वयाच्या लोकांना विचाराल तर ते लोकं भलतीच कारणं देतात .. 'बाहेरची बाधा होते' वगैरे.मग म्हणून ते भंपक का ?
तेच ध्यान, अल्फा स्टेट , सिक्स्थ सेन्स याबाबतीतही म्हणता येईल.

२. पुण्यात एक डॉक्टर आहेत.डॉ. अरविंद देशपांडे.Atheist आहेत.त्यांनी असे प्रयोग करून पाहिलेत ज्यांना कदाचित शास्त्रीय म्हणता येणार नाही आणि त्यांचे रिजल्टस् पण एका छोट्या पुस्तकात लिहिलेत. मला आत्ता आठवतंय ते म्हणजे कुठल्याशा कारणाने छातीत कळ आलेल्या रूग्णाला त्यांनी काही वेळ 'विठ्ठल विठ्ठल' म्हणायला सांगितलं आणि मग तिच्या छातीतल्या कळा का थांबल्या तेही सांगितलंय. माझ्याकडे त ई मेल वर आलेलं होतं. पाहिजे असल्यास मी pdf पाठवू शकतो.

माझा विश्वास असा आहे, की ग्रहणकालात न खाण्यामागे काही कारण तरी असणार.आणि ते मला हवंय.. मी सुद्धा काहीही संशोधन केलेलं नाहिये, मला फक्त प्रश्न पडलेला आहे आणि मी उत्तर शोधतोय.

सुबक ठेंगणी :

शास्त्रीय नसली तरी उपयुक्त माहिती दिलीत ! धन्यवाद !!

विज्ञानप्रेमी , परंपराप्रेमी !
पार्टनर

सुबक ठेन्गनी's picture

4 Aug 2008 - 8:15 pm | सुबक ठेन्गनी

आपल्या कडे बर्‍याच रुढि आनि मान्यता आहेत..जसे,
१)रात्रि घरातला केर काढु नये आणि बाहेर टाकु नये..याचे खरे कारण असे आहे कि
पुर्वि घरात दिवे नसयचे...भावना हि होति कि केर काढुन अन्धारात जमिनिवर चुकुन पडलेल्या मौल्यवान वस्तु केरातुन जाउ नयेत.
२)सकाळि तुलशि भोवति फेरे घ्यायचे -याचे कारण असे आहे कि..तुलशि अन्टिबेक. आहे त्याचा वास घेतल्याने बरेच सर्दि,खोकल्या
सारखे आजार दुर होतात.
३)तुम्हि दह्याचे उदहरण दिले आहे त्याचे करण असे आहे कि..दह्याच शित हा गुणधर्म आहे..रात्रि दधि खाल्ल्याने..थन्ड गुणधर्मामुळे कफ चा त्रास होउ शकतो...
आता ह्या आनि अशा बर्याच गोश्टि आहेत्...त्याला शास्त्रिय कारण आहेत पण काळाच्या ओघात त्याचा अपभ्रन्श झाला आहे..
ह्या गोष्टि सर्व सामान्य लोकाना कळाव्या म्हनुन त्याला...देवान्चा आधार दिला गेला..आणि त्यान्च्या अन्ध श्रद्धा झाल्या...

विजुभाऊ's picture

4 Aug 2008 - 8:19 pm | विजुभाऊ

जी ए म्हणतात
सूर्य चन्द्रांची छायेतुन सुटका व्हावी म्हणुन नदीत स्नान करणारे आणि सूर्याला अर्घ्य देणारे खुळचट कल्पना बाळगणारे लोक ......
पुर्णपणे सहमत

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

भाग्यश्री's picture

4 Aug 2008 - 9:41 pm | भाग्यश्री

पार्टनर , मला तुमचा या प्रश्नामागचा हेतू पटला.. बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहीत नाहीत. पण त्यामुळे त्यांचा अर्थ न समजता अंधश्रद्धा म्हणणं चुकीचचं.. मी ही ग्रहणात काहीही गोष्टी पाळत नाही..त्या वेळात खाते, ग्रहण बघते इत्यादी ज्या गोष्टी माझी आई नाही करत. पण मला या मागचं कारण समजून घ्यायला आवडेल.. मिळालं तर जरूर सांगा...

पार्टनर's picture

6 Aug 2008 - 2:33 pm | पार्टनर

विजुभाऊ :

"सूर्याला अर्घ्य देणारे खुळचट कल्पना बाळगणारे लोक ......"
सवडीने उत्तर देईन यावर.. :)

भाग्यश्री :

"पण मला या मागचं कारण समजून घ्यायला आवडेल"

मिळालं तर नक्कीच देईन !

पार्टनर

I was born intelligent. But nobody ruined me :(

श्री's picture

7 Aug 2008 - 7:06 pm | श्री

पार्टनर ,
तुम्ही व्.पु.काळेंचे पार्टनर का?:)
मला ती pdf file 'shreehi@gmail.com' वर पाठवा. धन्यवाद.