कोकोच्या वड्या

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
1 Aug 2008 - 3:09 pm

साहित्य- १०० ग्राम मिल्क पावडर, १/२ वाटी कोको पावडर, १/२ वाटी लोणी, सव्वा वाटी साखर, बदाम तुकडे (ऐच्छिक)

कृती - मिल्क पावडर+कोकोपावडर एकत्र करून चाळून घेणे‌. साखरेचा पक्का गोळीबंद पाक करणे. लोणी पाकात घालणे. गॅस मंद करून हलवणे. आता गॅस बंद करून भांडे खाली घेऊन त्यात कोको पावडर+मिल्क पावडर घालणे व गुठळी होऊ न देता ढवळणे.हवे असल्यास बदामाचे तुकडे घालणे.एका ताटाला तूप लावून घेणे.मिश्रण घट्ट झाल्यावर वड्या थापणे.

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

1 Aug 2008 - 3:19 pm | भडकमकर मास्तर

शाळेत असताना रुचिरात पाहून मी कोकोच्या वड्या बनवत असे...
परत आठवण झाली...
आता करणार आज रात्री... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनस्वी's picture

1 Aug 2008 - 3:42 pm | मनस्वी

मस्त सोपी पाककृती.. तो पाक तेवढा नीट जमला पाहिजे! नाहीतर घे हातोडा आणि मार.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

II राजे II's picture

2 Aug 2008 - 6:39 pm | II राजे II (not verified)

नाहीतर घे हातोडा आणि मार.

=))

येथील हरयाणामधील शंकरपाळ्या अश्याच असतात हो.... दाताने तुटतच नाहित मग मी चुपचाप ... खुर्ची खाली सरकवतो ;)

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

शिप्रा's picture

1 Aug 2008 - 3:45 pm | शिप्रा

छान आहे पाककृती..नक्कि करुन बघणार..

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

श्रीमंत दामोदर पंत's picture

1 Aug 2008 - 3:51 pm | श्रीमंत दामोदर पंत

नक्कि करणार..................

प्रकाश घाटपांडे's picture

1 Aug 2008 - 8:22 pm | प्रकाश घाटपांडे

गोळीबंद म्हणजे काय?
प्रकाश घाटपांडे

प्राजु's picture

1 Aug 2008 - 8:42 pm | प्राजु

पाकाचा थेंब पाण्यात टाकला तर तो पाण्यात पसरला नाही पाहिजे..(बहुतेक) . किंवा पाकाचा थेंब थाळीत टाकल्यावर तो घट्ट झाला पाहिजे(हे ही बहुतेक) .. हो ना स्वातीताई ? सुगरणींनी माहिती पुरवावी..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

2 Aug 2008 - 9:49 am | स्वाती दिनेश

पाकाचा थेंब थाळीत किवा ओट्यावर टाकला की न पसरता त्याची गोळी झाली की गोळीबंद पाक/पक्का पाक तयार झाला.
स्वाती

टिउ's picture

2 Aug 2008 - 2:24 am | टिउ

शाळेत असताना रुचिरात पाहून मी कोकोच्या वड्या बनवत असे...

आम्ही सुद्धा हा उपद्व्याप लहानपणी करुन बघितला होता...घरी फक्त मी आणि माझी बहीण..आई बाबा कुठेतरी गेले होते. मी वय वर्ष ८, ताई वय वर्ष १२...

त्यानंतर आजपर्यन्त कोकोच्या वड्या/बिस्कीट बघितले की मला मळमळायला लागतं!

भडकमकर मास्तर's picture

2 Aug 2008 - 2:39 am | भडकमकर मास्तर

माझ्या वड्या नीट होत असत तेव्हा... :)

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

2 Aug 2008 - 1:43 pm | विसोबा खेचर

मस्त! :)

प्रकाश घाटपांडे's picture

2 Aug 2008 - 1:52 pm | प्रकाश घाटपांडे

१०० ग्राम कोको दुकानदाराला मागितला. त्याने स्वस्त पडेल म्हणुन २०० ग्राम दिला. ९० रुपयाला. मिल्क पावडर १/२ वाटी मागितली त्याने १० रु चा पाउच दिला. आल्यावर बघतो तर १०० ग्रॅम मिल्क पावडर लिहिले होते, आन कोको १/२ वाटी. तरी बर प्राजुने १/२ वाटीची भानगड सोडवुन दिली. आता पाक कसा करावा बरे? पाणी आन साखर घ्यायची हे झालं पुढे काय? पाणी किति? साखर किती? नंतर काय करायचं?
प्रकाश घाटपांडे

स्वाती दिनेश's picture

2 Aug 2008 - 6:12 pm | स्वाती दिनेश

प्रकाशराव, सव्वा वाटी साखर घ्या, साधारण तेवढेच पाणी घ्या. साखर पाण्यात घालून जाड बुडाच्या पातेल्यात उकळत ठेवा,लोणीही पाकात घाला,मध्ये मध्ये ढवळा,पाणी उकळले की एका चमच्यात पाक घेऊन तो वरून खाली सोडून पहा,आधी एक तार येईल मग दोन तीन तारा येतील.अजून थोडा आटला की पाकाचा थेंब ओट्यावर टाकलात तर त्याची गोळी होईल.लगेचच गॅस बंद करून कोको व मिल्कपावडर घाला आणि भरभर ढवळा.मिश्रण घट्ट झाले की ताटात ओता आणि थापून वड्या पाडा.
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2008 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घाटपांडे साहेबांची, वेगळीच पाककृती होइल अस्स वाटतंय :)

घाटपांडे साहेब काकोच्या वड्या नाहीच जमल्या तर, सव्वा वाटी साखर घ्या तेवढेच पाणी तापवा नंतर दुध टाकायचं झाली गुळवणी (गुळोणी) तयार. पुरण पोळी भिजवून चांगली चापायची :)

प्राजु's picture

2 Aug 2008 - 6:49 pm | प्राजु

लगेचच गॅस बंद करून कोको व मिल्कपावडर घाला आणि भरभर ढवळा.मिश्रण घट्ट झाले की ताटात ओता आणि थापून वड्या पाडा.

आणि त्याचा झक्क पैकी फोटू काढून लावा हितं... मिपा वर.. आजची खादाडी मंदी... कसं??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

3 Aug 2008 - 1:22 am | भडकमकर मास्तर

लगेचच गॅस बंद करून कोको व मिल्कपावडर घाला आणि भरभर ढवळा.मिश्रण घट्ट झाले की ताटात ओता
लगेचच ... आता हे समजण्यात थोडा अधिक वेळ गेला तर तो संपूर्ण लगदा / मिश्रण फारच घट्ट होते , आणि ताटात पडायच्या योग्यतेचे उरत नाही.... मग ते पातेल्यातूनच खावे...त्यात फारच मजा येते.
घट्ट झाले की.... आता जर थोडे आधीच मिश्रण खाली उतरवले तर वडी घट्ट होण्याची प्रार्थना करावी लागते... अशा वेळी पातळ मिश्रण ताटलीतून चमच्याने उचलून सुद्धा खाता येते... उत्तम लागते....
_____________-
थोडक्यात काय तर वडीचे मिश्रण ताटात ओतण्याचा योग्य क्षण गाठणे महत्त्वाचे .... ताटातून चमच्याने बर्‍याचदा कोकोची पातळ वडी खाल्ली की खूप अनुभव गोळा होतो, मग हळूहळू पुढच्या प्रयत्नांमध्ये तो योग्य क्षण गाठता येतो.... :)

(कोको नुभवी ) भडकमकर

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2008 - 4:06 pm | प्रकाश घाटपांडे

प्रथम सर्व रेसीपीचे चिंतन केले. मनन केले. मनातल्या मनात कल्पनाचित्रफीत तयार केली. तरी देखील कागदावर सर्व उतरवुन कायम नजरेसमोर राहिल असा ठेवला. बायकोची मदत अजिबात घ्यायची नाही हे ठरवले.हा गोळीबंद पाक व्हायला किती काळ लागेल हा अंदाज नसल्याने सगळे युद्धपातळीवर तयार ठेवले. हा गोळीबंद शत्रु तयार झाला कि लगेचच त्या मिश्रण पावडर अटॅक करायला तयार ठेवले.
गॅस ची फ्लेम बारीक ठेवायची कि मोठी अशा संभ्रमामुळे बटन कमी जास्त करत राहिलो. मिश्रण कढईत हलवत राहिलो. भाजणार नाही याची दक्षता घेत राहिलो. पाच मिनिटे झाली तरी काही नाही दहा झाली मग मिश्रण चॉकलेटी काळे होउ लागले. मनात म्हणल हा कोकोचा चमचा वापरुन झाल्यावर पुसुन घ्यायला ह वा होता. घट्ट तार आल्यावर , पुढे दोन तारा त्यानंतर ओट्यावर हा पाक टाकून पाहिला. तो पटकन घट्ट झाला पण ओट्याला चिकटला नाही. तो क्षण साधुन मी गॅस बंद केला.कोको मिश्रण टाकून युध्दपातळीवर हलवत राहिलो. भयंकर वेगाने ते मिश्रण चिकट व घट्ट झाले. पातेले ऐवजी मी कढई घेतली होती. उलथन्याने हलवत त्याचा घट्टचिवट चिखल झाला. गणपती बनवताना चिखल तयार करतो तसला.
मी ताटात तो ओतेपर्यंतच कठीण होउ लागला. गरम असल्याने हाताने न थापता लाटण्याने पोळी सारखे वाटायचा प्रयत्न केला. ताटाला तुप लावले होते बरका! पण ते मिश्रण पसरेनाचं. शेवटी ते तसेच ठेवले. हे बघा. पाककृती म्हणजे अवघड असते बाबा! आता हातोडी मारुन परत पावडर तयार करायचा विचार आहे.
kokowadi

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2008 - 4:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली पाककृती आवडली. :)

प्राजु's picture

3 Aug 2008 - 8:23 pm | प्राजु

=)) =)) =)) =)) =))

बापरे .. घाटपांडे सर.. ही तुमची रेसिपी मात्र एकदम कडक (शब्दशः) आहे हा..... मानलं तुम्हाला..

-(सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
स्वगत : स्वाती ताईला कुठुन ही रेसिपी सांगितली असे झाले असेल....-

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2008 - 12:04 pm | स्वाती दिनेश

प्रकाशराव... पाषाण वडी पाहिली,:) (तुम्ही सौ. घाटपांडेंची मदत सूचना स्वरुपात तरी घ्यायला हवी होती, :) )
मास्तर म्हणतात ते अगदी खरं आहे.. 'तो क्षण' साधणे फार महत्त्वाचे असते.
बहुतेक तुमचा पाक जळायला लागला असावा म्हणून चॉकलेटी काळे होऊ लागले.
गरम मिश्रण ताटात ओतले की भाजू नये म्हणून आधीच एका प्लास्टीक पेपरला(दुधाची पिशवी चालेल) तुपाचा हात लावून घ्यायचा आणि तो पेपर त्या मिश्रणावर घालून थापायचे. मग सुरीने वड्या पाडायच्या.
स्वाती

सन्दिप नारायन's picture

14 Aug 2008 - 3:19 pm | सन्दिप नारायन

स्वति तुझ्या कोकोच्या वदि खाउन दिनेशच्या पोताचे काय झाले देवालाच माहित

कुंदन's picture

14 Aug 2008 - 3:24 pm | कुंदन

आज कोको , कालच्या शिळ्या ग्लासातुन प्यायलात काय ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Aug 2008 - 3:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आज कोको , कालच्या शिळ्या ग्लासातुन प्यायलात काय ?
=))
लय भारी, कुंदनभौ!

स्वाती ताई, मला जाम आनंद झाला रेसिपी पाहून! आमच्या घरी प्यायचं कोको होतं, पण त्याला गिह्राईक नव्हतं, म्हटलं चला हा प्रयोग करू. पण घाटपांडे काकांचा अनुभव वाचून्/पाहून थोडी भीती वाटली ... मग थोडं आधीच गॅस बंद झाला आणि आता आम्ही ताटलीतून स्कूप करून चॉकलेट खातोय. चव छान आहे आणि पावावर चॉकलेट स्प्रेड म्हणूनही छान लागतंय ....
त्यामुळे स्वातीताई आणि घाटपांडे काकांचेही आभार!

(कधी कधीच स्वयंपाक आवडणारी, पण गोरी) यमी