दि. २२ जून २०१४ रोजी झालेल्या मि.पा. कट्ट्याचा वॄतांत
मी तसा मिपाचा दोन वर्षे जुना सदस्य आहे. परंतू मिपाकरांना भेटण्याची माझी ही पहिलीच वेळ. खुप दिवसांपासून मि. पा. करांना भेटायची इच्छा होती ती श्रीरंग जोशी, वल्ली, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा यांच्यामुळे पूर्ण झाली त्याबद्दल त्यांचे आभार.
शनिवारी वल्लींनी मेसेज करून सांगितले की रविवारी कट्टा आहे श्रीरंग जोशी व इतर सदस्य येणारेत. तेव्हाच ठरवले की हा चान्स सोडायचा नाही. रविवारी संध्याकाळी ४ ला शनिवार वाड्याला पोहोचलो. शनिवार वाड्यात पोहोचल्यानंतर मी व चौकटराजे दोघेच होतो कारण वल्ली आमच्याआधी शनिवार वाड्यात आले होते. तेव्हा कोणीच दिसले नाही. वाटले कदाचित ५-६ जण येतील. परंतू वल्ली आल्यानंतर मागे पाहिले तर सर्व मिपाकर उभे! मग प्रत्येकाने एकमेकाची ओळख करून घेतली.
आम्ही सर्व शनिवार वाड्याच्या बाहेरील चबूतर्यावर उभे होतो.
शनिवार वाड्याचा दर्शनी भागाचा फोटो खाली पहावा.
(Photo Credit : Shrirang Joshi)
शनिवार-वाड्याच्या कोरीवकामाचा फोटो.
(Photo Credit : Shrirang Joshi)
खाली उभे असताना देशपांडे काकांनी पानशेत धरणफुटीचा 'आखोदेखा' वृतांत आम्हाला सांगितला. वयाच्या १८ व्या वर्षी असा प्रसंग पाहणार्या काकांचे धरणफुटीचे वर्णन ऐकल्यावर हाच तो शनिवार वाडा ज्याच्या भिंतींपर्यंत पाणी आले होते हे ऐकल्यावर खरंच काकांनी किती धैर्य बाळगून प्रसंग निभावून नेला असेल याची कल्पना आली. आजूबाजूला फिरणारे लोक हे अधे-मधे येऊन काका सांगत असलेला प्रसंग ऐकत होते. देशपांडे काकांना दुरून पाहिल्यावर मला क्षणभर ते बाबासाहेब पुरंदरे वाटले होते. कदाचित इतर लोकांनाही तसाच भास झाला असावा. ( या गोष्टीला देशपांडे काकांनी पण दुजोरा दिला.).
पानशेत धरणफुटीचा वृतांत ऐकल्यावर तिथेच ग्रूप फोटो काढले ते खाली पहावेत.
(Photo Credit : Shrirang Joshi)
श्रीरंग जोशी यांनी आणलेली चॉकलेट्स, पैसाताईंनी गोव्यावरून आणलेले काजू, अपर्णाताईंनी आणलेला बेळगावचा कुंदा, ५० फक्त यांनी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आणलेली सोनपापडी अशा starters नी कट्ट्याला सुरूवात झाली. खादाडीचे पदार्थ खाली.
(Photo Credit : Shrirang Joshi)
आत गेल्यानंतर शनिवार वाडा दर्शन फक्त नावालाच झाले कारण खुप दिवसांनी कट्टा जमल्याने गप्पांनाच जास्त प्राधान्य होते. शनिवार वाड्यातून आतील भागाचा काढलेला लँडस्केप खाली पहावा.
थोड्या गप्पा झाल्यानंतर पुन्हा ग्रूप फोटो घेणे सुरू. फोटो खाली पहावेत.
(Photo Credit : Shrirang Joshi)
सर्व मिपाकरांचा एकत्रित फोटो
(Photo Credit : Shrirang Joshi)
तसा प्लॅन मंगळवार पेठेतील शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिर पहाण्याचा ही होता परंतू वेळेअभावी तो रद्द झाला. त्यामूळे तेथीलच एका बुरुजातून पलीकडे दिसणार्या मंदीराचा फोटो घेतला. तो खाली पहावा.
त्या मंदिराकडे पाहताना अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्या मंदीराकडे पाहताना Optical Illusion चा आविष्कार. खालील Crop केलेला फोटो पहावा म्हणजे आपल्या लक्ष्यात येईल. फोटो मधील मंदीर हे एक मजला खाली होते परंतू ते त्या बुरुजावरील कमानीमध्येच आहे असे वाटते.
तिथून पुढे गेल्यावर एका बुरूजावर काढलेला चौकटराजा व इस्पिकचा एक्का यांचा फोटो.
गप्पा झाल्यानंतर संध्याकाळी ६ ला शनिवार वाडा बंद होत असल्याची सूचना देणारी शिट्टी वाजली आणि आम्ही सर्व मिपाकर बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर अपर्णाताई, पैसा ताई, अजित सावंत, देशपांडे काका आणि मोदक यांचा निरोप.
(Photo Credit : Shrirang Joshi)
वरील मंडळींचा निरोप घेऊन हॉटेल भोज च्या दिशेने वाटचाल सुरू. हॉटेल भोजमधील जेवणानंतर सर्व मिपाकर बाहेरील कट्ट्यावर स्थानापन्न आणि खर्या अर्थाने कट्ट्याला सुरूवात. शनिवार वाड्यात फिरताना बसायला कट्टा असा कुठेच मिळाला नसल्याने या कट्ट्याचा आनंद वेगळाच होता.
(Photo Credit : Shrirang Joshi)
साधारण ९ च्या सुमारास हॉटेल भोजवरून घराकडे प्रयाण. श्रीरंग जोशी, वल्ली, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा यांचे कट्टा आयोजन केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
कट्ट्याला उपस्थित असलेल्या सभासदांची नावे व फोटो पुढीलप्रमाणे. .
. . .
१. वल्ली (डावीकडे) आणि अत्रुप्त आत्मा (उजवीकडे)
२. ५० फक्त
३. अजित सावंत
४. अपर्णा ताई
५. देशपांडे काका
६. हुकुमीएक्का(डावीकडे), चौकटराजा(मध्यभागी) आणि इस्पिकचा एक्का(उजवीकडे)
७. मोदक
८. समीर शेलार
९. पैसा ताई
१०. प्रशांत
११. श्री.श्री.श्री. धनाजीराव वाकडे
१२. श्री व सौ. श्रीरंग जोशी
१३. सूड
. . .
. . .
आता वाट पहायची पुढील कट्ट्याची. . .
---समाप्त---
प्रतिक्रिया
24 Jun 2014 - 5:06 am | चौकटराजा
कट्याचे वेळचे आतापर्यंतचे फोटो अंधारे असायचे. हा कट्टा अगदी उजेडात झालेला आहे.फोटोची गुणवत्ता व सादरीकरण लाजबाब ! शेवटी दिलेला पात्रपरिचय ही मस्त." माउली" श्रीरंग जोशी यांचे खास आभार.(चॉकलेट्स मस्ताड !) अरारा ते पात्र परिचय मधे तो दोन इरसाल कार्टी राहिली की राव ! बसा, ते आता दावा ठोकणार तुमच्यावर !
जाता जाता - "नाव विसरलो" वाल्याना अजून इथले " नाव" मिळायचे आहे .तरीही त्यांच्या कट्यातील उत्साह हे एक रेकार्डच ठरावे !
28 Jun 2014 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कट्याचे वेळचे आतापर्यंतचे फोटो अंधारे असायचे. हा कट्टा अगदी उजेडात झालेला आहे.फोटोची गुणवत्ता व सादरीकरण लाजबाब ! शेवटी दिलेला पात्रपरिचय ही मस्त
+१ कट्टा वर्णनाला आणि पात्रपरिचयाला पैकीच्या पैकी मार्क देण्यात येत आहेत.
-दिलीप बिरुटे
30 Jun 2014 - 9:59 pm | हुकुमीएक्का
धन्यवाद.
24 Jun 2014 - 5:12 am | चौकटराजा
पात्र परिचय क्र १ मधे - शिकारी शिकारीच्या खांद्यावर हात ठेवून असे वाचावे.
( शिकारीकडे शिकार्याला मारण्यासाठी भरपूर शस्त्रास्त्रे व दारूगोळा आहे पण तो व्हरचुअल असल्याने " शिकारी" मस्तावलाय!
आता काही साथीदारही येऊन मिळालेत म्हणे त्याला- तरणे म्हातारे सर्व !!!
24 Jun 2014 - 7:58 am | श्रीरंग_जोशी
या सविस्तर वृत्तांतासाठी हुकुमीएक्का यांचे आभार.
क्र. ८ चा फोटो श्री समिर शेलार यांचा आहे.
माझ्या कॅमेर्याने सर्व फोटो काढले गेले असले तरी ते सर्व मी काढलेले नसल्याने त्यांचे श्रेय माझे नाही.
24 Jun 2014 - 10:46 pm | हुकुमीएक्का
ते बरोबर आहे परंतू वरील सर्व फोटो आपण दिलेल्या "लिंक" वरून घेतले असल्याने तसा उल्लेख केला आहे. *pardon*
24 Jun 2014 - 8:29 am | तिमा
वृत्तांत आवडला. पात्रपरिचय , एक चांगली कल्पना. पूर्ण बरा झाल्यावर कट्ट्याला नक्कीच हजेरी लावेन.
24 Jun 2014 - 9:06 am | सुधीर
वृत्तांत आवडला. आयडींच्या मागच्या व्यक्ती दिसतात कशा? ही एक उत्सुकता असते. त्यामुळे पात्रपरिचय आवडला.
24 Jun 2014 - 9:12 am | सस्नेह
अन फोटोसहित ओळख्-परेड. फोटो पाहून कट्ट्याला हजरी लावता आली नसल्याची खंत कमी झाली.
24 Jun 2014 - 9:19 am | प्रचेतस
छान वृत्तांत रे. :)
24 Jun 2014 - 9:27 am | मुक्त विहारि
मस्त झक्कास...
24 Jun 2014 - 9:54 am | नाखु
निरिकक्ष्ण..
१.५०फक्त यांनी तब्येत "शिस्तीत" राखली आहे.(कन्या प्राप्ती करिता पुन्हा अभिनंदन)
२.प्रशांतभाउ,मोदक राव "बाळसे" जपा
३.वल्ली दा टीशर्ट शिवाय (ते ही मिपा कट्ट्याला) अदभुत योग.
४.बुवा "डिरेस" लाई झ्याक हाये.
५.धन्याचा सेपरेट फटु वळख का न्हायी ( का त्यावेळेला कुठे गेला होता काय?)
24 Jun 2014 - 11:16 am | गवि
धन्याला अकरा नंबरला समीर शेलार करुन टाकलाय..
कट्टा आवडला.. मजा केलीत सगळ्यानी. झकास..
24 Jun 2014 - 12:56 pm | धन्या
होय.
कुणीतरी तेव्हढं अकराव्या क्रमांकाला "समीर शेलार" बदलून श्री श्री श्री धनाजीराव वाकडे करावे ही नम्र विनंती. :)
24 Jun 2014 - 3:07 pm | नाखु
आता फोटु आनि नाव दोन्ही दिसतय.
पुन्हा अभिनंदन
24 Jun 2014 - 9:57 pm | हुकुमीएक्का
खुप जण एकदम भेटल्याने थोडा घोळ झाला नावे आठवताना. परंतू आता धनाजीराव यांचे नाव त्यांच्या फोटो समोर दिसत आहे. तसेच समीर शेलार यांचीही ओळख मिळाली आहे.
24 Jun 2014 - 10:07 am | संजय क्षीरसागर
इथे मारलेल्या गेसमधे (एक अजित सावंत सोडता) सगळे बरोब्बर आहेत!
24 Jun 2014 - 10:48 am | चित्रगुप्त
वृतांत आणि फोटो छानच आहेत, मुख्य म्हणजे फोटो कुणा-कुणाचे, हा नेहमी पडणारा प्रश्न व्यवस्थित पात्रपरिचय करून दिल्याने आता हे मिपाकर समोर येतील तेंव्हा लगेच ओळखता येतील.
24 Jun 2014 - 1:07 pm | श्रीगुरुजी
मस्त फोटो! लहानपणी घर शनिवार वाड्याजवळ असल्याने दर शनिवार-रविवारी, मे महिन्यात शनिवार वाड्यात फेरी असायची (तेव्हा प्रवेशासाठी तिकिट नव्हते). शनिवार वाड्याचा आतला कानाकोपरा मला माहित आहे. दुपारी अनेक जण झाडाखालच्या सावलीत झोपायला व विद्यार्थी शांततेत अभ्यास करायला यायचे. वरील एका फोटोत झाडाच्या सावलीत निवांत झोपलेला एक जण बघितला आणि शनिवार वाड्यात दुपारी झोपायला जाण्याची उच्च परंपरा २१ व्या शतकात देखील जिवंत आहे याचा परमानंद झाला.
24 Jun 2014 - 1:31 pm | सुहास झेले
सहीच... आवडला वृत्तांत :)
24 Jun 2014 - 2:15 pm | शिद
सचित्र वृतांत आवडला.
24 Jun 2014 - 2:21 pm | दिपक.कुवेत
पत्त्यातल्या तीन महत्वाच्या पानांचा एकत्र फोटो बघुन अतीव आनंद जाहला आहे. पैसातै ने पुण्यात खरेदि केलेली दिसतेय *ok* . ५० रावांचे 'बाबा' झाल्याबद्दल हार्दिक अभीनंदन.
24 Jun 2014 - 2:34 pm | अत्रुप्त आत्मा
हुकुमीएक्का(डावीकडे), चौकटराजा(मध्यभागी) आणि इस्पिकचा एक्का(उजवीकडे) >>> कांय सिक्वेन्स जमवून आणलनीत... मेल्यानी!!! =))
.
.
.
.
अशी तीन-पत्ती सगळ्यांना जमत नै... :D
कांय समजलांस बेमट्याssss!!! :p
24 Jun 2014 - 2:43 pm | दिपक.कुवेत
मग शो कुणी अ कसा केला हे पण सांगा बुवा.... *biggrin*
24 Jun 2014 - 3:19 pm | अत्रुप्त आत्मा
शो टाइमला मी नव्हतो ना तिथे..
मी सगळे वाड्या बाहेर आल्यावर आलो.. त्यामुळे म्हाइत नै.
24 Jun 2014 - 2:51 pm | सूड
हां!! ह्याला म्हणतात वृत्तांत !! बाकी शेपरेट फोटु टाकून पात्रपरिचय करुन दिल्याबद्दल आभार...
24 Jun 2014 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
लय भारी कट्टा वृत्तांत !
24 Jun 2014 - 3:09 pm | प्रभाकर पेठकर
छायाचित्रंसहित पात्रपरिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. कट्ट्याला बरीच मजा मारलेली प्रसन्न चेहर्यांवरून दिसते आहेच.
अतृप्त आत्मा ह्यांना पाहिल्याबरोबर का कोण जाणे पण 'बेडसे लेणी' आठवून मनात जरा धस्सच होतं.
24 Jun 2014 - 3:30 pm | सूड
बाकी वल्ली आणि अतृप्त...सॉरी अत्रुप्त आत्मा यांना मिपाचे टॉम अँड जेरी ही पदवी बहाल करणेत यावी असे नमूद करतो. ;)
24 Jun 2014 - 3:37 pm | बॅटमॅन
की लॉरेल & हार्डी ;)
24 Jun 2014 - 4:44 pm | सूड
बुवा सडपातळ असते तर हे शोभलं असतं ;)
24 Jun 2014 - 4:54 pm | संजय क्षीरसागर
हे (दोन्ही साईज, जरा वाढवून) कसं वाटतं?
24 Jun 2014 - 4:08 pm | देशपांडे विनायक
पुणे कट्टा वृतांत वाचून आणि फोटो पाहून ''इकडून '' सर्वांचे आभार मानण्यात आलेले आहेत
सर्वास विदित व्हावे हि विनंती
24 Jun 2014 - 4:35 pm | किसन शिंदे
झक्कास कट्टा वृत्तांत आणि फोटोही.
24 Jun 2014 - 6:25 pm | S.प्रशांत
तुम्ही सगळे एकमेकांना आधीपासूनच ओळखता ?
की मि.पा. वर सगळ्यांची ओळख झाली ??
24 Jun 2014 - 6:55 pm | धन्या
जवळपास ९९% जणांच्या ओळखी मिपावरच झाल्या आहेत. :)
24 Jun 2014 - 7:01 pm | सूड
काय तरी चवकश्या!! मिपावरच ओळख झाली हो.
24 Jun 2014 - 7:05 pm | मुक्त विहारि
आम्हा मिपाकरांना, मिपाकर आहेत ना? इतकीच ओळख पुरेशी असते.
तुम्ही पण पुण्यात रहात असाल तर, जमवा एखादा कट्टा....
24 Jun 2014 - 7:12 pm | सूड
>>आम्हा मिपाकरांना, मिपाकर आहेत ना? इतकीच ओळख पुरेशी असते.
अगदी !!
>>तुम्ही पण पुण्यात रहात असाल तर, जमवा एखादा कट्टा....
जेमतेम तीन दिवस जुना आयडी आहे हो मुवि. पाचवी तरी पुजून होऊ द्यात, मग बोला कट्ट्याचं. ;)
आणि काय सांगावं जुनीच मदिरा नव्या चषकात आलेलीही असू शकते. ;)
24 Jun 2014 - 9:40 pm | S.प्रशांत
मी मुंबईत राहतो .
24 Jun 2014 - 7:52 pm | भाते
मिपाकरांची सचित्र ओळख करून देण्याची पध्दत आवडली.
24 Jun 2014 - 10:08 pm | कंजूस
तीन पत्त्यांचा कट्टा हुकला आणि शेवटी सूड
24 Jun 2014 - 11:56 pm | प्यारे१
मस्त वृत्तांत.
आमचे ज्येष्ठ मित्र मा. श्री. ५० फक्त राव (तळवलकर जिमवाले) ह्यांचे विशेष अभिनंदन. :)
कन्यारत्नास उत्तम आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
25 Jun 2014 - 7:08 am | मदनबाण
वॄतांत आवडला. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Apollo 440 - Charlie's Angels
25 Jun 2014 - 11:23 am | समीरसूर
फोटो आणि कट्टा दोन्ही उत्कृष्ट...माझी ही संधी हुकली याबद्दल खूप वाईट वाटतेय. मिपाकरांना भेटण्याची ही नामी संधी होती. पुढच्या कट्ट्याची वाट बघतो.
तुम्ही सगळ्यांना कट्ट्याचा आनंद लुटला हे बघून छान वाटले. असाच नेहमी 'कट्टे पे कट्टा' होत राहो ही सदिच्छा!
25 Jun 2014 - 11:50 am | पैसा
आम्ही सकाळी पुण्यात उतरल्यापासून मिपा कट्टा मोडमधेच होतो. आधी अनाहितांचा मोठ्ठा कट्टा १२ ते ४ सुरू होता. शेवट वल्लीचा फोन आल्यामुळे मोबाईलकडे लक्ष गेले की ४ वाजून गेले आहेत!
तिकडे पोचल्यावर आणखी धमाल आली! मी सगळ्यांना प्रथमच भेटत होते, पण फोनवर आणि फेसबुक/चॅटवर बर्याच जणांशी आधी बोलले असल्याने तसे जाणवत नव्हते. काही ज्येष्ठ मिपाकर तिथे पाहून बरे वाटले तसेच चि.१००, धन्याचा भाचा यांच्यासोबतच प्रशांतचा अर्णव आल्याने हा कट्टा अगदी सर्वसमावेशक झाला होता.
स्वॅप्स कुठे धरणे धरून बसला आहे ते शेवटपर्यंत कळले नाही. तिथे दगडातल्या सुंदर्या नसल्याने वल्ली हरवल्यासारखा वाटत होता. बुवा २ खेळांच्या मधल्या वेळात बराचवेळ आमच्याबरोबर होते. मोदकानेही दर्शन दिल्याबद्दल उपकृत आहे. कार्यबाहुल्यामुळे (कसले ते विचारू नये) मी आणि अपर्णा शन्वारवाड्यातून लवकर हललो. मात्र बाकीचे लोक त्रिशुंडी मंदिरात जाऊ शकले नाहीत हे वाचून जळजळ कमी झाली.
हुकमाचा एक्का हा लाजराबुजरा मुलगा निघाल्याने अपेक्षाभंग झाला. इस्पिकचा एक्का, 'इरसाल म्हातारा' चौरा, धन्या, सुड, जुइ, श्रीजो, ५० फक्त, वगैरेंशी नेहमी बोलत असल्यासारखेच वाटत होते.
श्रीजोंच्या फोटोतील सौ. जोशी यांना मिपावर जुइ ही ओळख आहे, आणि त्या अनाहिताच्या अॅक्टिव्ह सदस्या आहेत. पुढच्या वेळी जोशीबुवांना घरी ठेवून अनाहिता कट्ट्यात दंगा करायला ये म्हणून तिला बजावले आहे.
सर्वात शेवट समीर शेलारची ओळख झाल्याबद्दल खास बरे वाटले. सदस्य होण्यापूर्वीच एवढ्या उत्साहाने आणि सर्वात मिसळून वागण्यासाठी प्रचंड कौतुक आहे. अ.आ. बरोबर त्यानेही आम्हाला योग्य ठिकाणी जाण्यासाठी छान मदत केली. त्यावर कडी म्हणजे राहुल देशपांडेची श्रामोंनी ग्रुपमधे सादर केलेली निर्गुणी भजनांची सीडी मला आणि इतर काही जणांना दिली. त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणावे तितके थोडेच!
हा कट्टा मी जाम एन्जॉय केला. मात्र अगदी थोडका वेळ मिळाल्याने चिंतामणी आणि इतर काही जणांना कबूल करूनही भेटता आले नाही, त्याबद्दल मनापासून सॉरी. इथे भेटूनही ज्यांची नावे लिहायला विसरले असेन त्यांनीही क्षमा करा. पुन्हा पुन्हा असे भेटत राहूच! वल्लीवर चहा मुद्दामच उधार ठेवला आहे. म्हणजे लवकरच परत भेट होईल!
25 Jun 2014 - 11:07 pm | हुकुमीएक्का
अरे बापरे तसे काही नाही हो. पहिलाच मिपा कट्टा असल्याने जरा 'Silent' मोडवर होतो. चौकटराजे यांच्याशी वरचेवर भेट होते. परंतू मिपाकरांना प्रत्यक्ष भेटायची ही पहिलीच वेळ होती. *pardon*
27 Jun 2014 - 2:55 pm | स्पंदना
बाकी कार्यबाहुल्य!!!!!! :))
25 Jun 2014 - 1:15 pm | कवितानागेश
फोटो छान आलेत.
५० फक्त काकांचे अभिनंदन. :)
बाकी मोदक थोडासा गोरा झालाय का?
आणि सूडही थोडा उंच झालाय मागे भेटला होता तेंव्हापेक्षा. :P
25 Jun 2014 - 2:34 pm | सूड
>>सूडही थोडा उंच झालाय मागे भेटला होता तेंव्हापेक्षा.
काहीही!!
26 Jun 2014 - 8:15 am | चौकटराजा
मोदक हा जरा बारीक झाला असून सूड्राव जरा गोरा झाला आहे.
27 Jun 2014 - 4:45 pm | स्पा
यंदा कर्तव्य असल्याने त्यांचा जोरदार workout सुरुये अशी बातमी खात्रीदायक सूत्रांकडून समजली आहे, मे बी पूल अप्स मारून उंची वाढली असावी , आणि पुण्यात राहून रंग उजळला असावा
28 Jun 2014 - 1:12 pm | प्रभाकर पेठकर
>>>>पुण्यात राहून रंग उजळला असावा
मी चुकून 'उधळला असावा' असे वाचले. सॉरी.
25 Jun 2014 - 4:44 pm | त्रिवेणी
मस्त कट्टा.
अनाहिताचा कट्टा बराच वेळ चालल्यामुळे शनिवारवाड्याचा कट्टा रद्द करावा लागला.
25 Jun 2014 - 4:49 pm | त्रिवेणी
50 फक्त यांचे अभिनंदन करायचेच राहिले.
खुप खुप अभिनंदन आणि छोट्या अनाहिताला भरपुर आशिर्वाद.
27 Jun 2014 - 12:59 pm | पियुशा
मस्त कट्टा :)
27 Jun 2014 - 2:59 pm | स्पंदना
माझा पण हा पहिलाच कट्टा! पण अजिबात जाणवल नाही की आपण पहिल्यांदाच भेटतोय.
पैसाताईबरोबर रहाताना सुद्धा नव्या अश्या माणसाच अजीबात दडपण वाटल नाही. अतिशय संस्मरणीय कट्टा (कट्टे) !
27 Jun 2014 - 3:17 pm | पैसा
अगदी अगदी! सेम सेम!!
27 Jun 2014 - 3:40 pm | प्रभाकर पेठकर
>>>>अश्या माणसाच अजीबात दडपण वाटल नाही.
'अश्या' म्हणजे?
27 Jun 2014 - 4:40 pm | पैसा
'नव्या अश्या' आहे ते!
28 Jun 2014 - 8:55 am | वपाडाव
आय मिस्ड इट... ग्रँड झालाय हा कट्टा...
28 Jun 2014 - 9:15 am | प्रचेतस
तू अत्तर नेल्यानंतर तर कितीतरी कट्टे मिसलेत. =))
28 Jun 2014 - 9:37 am | अत्रुप्त आत्मा
+++१११ =))
वपाडाव ,,, आपण आता-"एक धागा अत्तराचा" काढाच! :D
28 Jun 2014 - 1:57 pm | बॅटमॅन
अत्तर-वपाडाव-कनेक्षण कृपया एक्स्प्लेनवावे, ही इणंती.
(अज्ञ+उत्सुक) बॅटमॅन.
30 Jun 2014 - 10:53 pm | प्यारे१
वो एक लंबी कहानी है....
बीस साल पेहले, उस विरां हवेली के बाजूवाली कोठी में.... ब्रेक ब्रेक ब्रेक!
28 Jun 2014 - 3:49 pm | स्पा
अत्तर का लपविता?
28 Jun 2014 - 6:12 pm | अत्रुप्त आत्मा
=)) पांडू....... =))
हल कटा... मारीन हं फटाफटा!!!! :p
3 Jan 2017 - 12:04 pm | जव्हेरगंज
एक नंबर कट्टा!!!
28 Jan 2017 - 11:29 pm | ज्योति अळवणी
वेगळ्या नावांचे आयडी कसे दिसत असतील ही उत्सुकता कायम होती. काहींची ओळख या कट्ट्यातून झाली. मस्त!
21 Feb 2017 - 4:02 pm | dhananjay.khadilkar
छान वृत्तांत
22 Feb 2017 - 3:01 pm | इरसाल कार्टं
पुन्हा कधी कट्टा जमावताय?
13 May 2018 - 10:01 pm | संकेतजी कळके
मी आज खूपच दिवसानंतर ईथे आलोय. पण अजूनही कट्टा भरतो कुठे तरी ह्यानी भरून आले....
पूर्वी ठाण्याला रेग्युलरली व्हायचा. लै मज्जा यायची राव. वैचारिक देवाणघेवाणीचे व्यासपीठ होते ते......
लवकरच भेटूया