मँगो - स्ट्रॉबेरी पॅना कोता

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
23 Jun 2014 - 4:57 pm

नमस्कार मंडळि,

पॅना कोता (Panna cotta) हे एक ईटालीयन डेझर्ट आहे ज्याचा अर्थ आहे "cooked cream". फार कमी पदार्थ वापरुन एक झटपट आणि तितकचं क्लासी होणारं हे डेझर्ट आहे.

आंबा / स्ट्रॉबेरीचा सीझन अजुन असल्यामुळे हे पॅना कोता ह्या कॉम्बीनेशन मधे केलं आणि चव/रंगसंगतीच्या बाबतीत एकदम सरस ठरलं. पण एवढा खटाटोप टाळायचा असेल आणि धीर धरवत नसेल तर नुसत्या मँगो किंवा स्ट्रॉबेरीचहि छान लागतं.

चला तर मग ईटलीला न जाता ईटलीच्या डेझर्ट चा आस्वाद घेउया.

PC 1

साहित्यः
१. तयार हापुस आंबे - २ (नसतील तर कॅन्ड मँगो प्युरेहि वापरु शकता)
२. १ बाउल स्ट्रॉबेरीज
३. लिक्वीड क्रिम - २०० मिली
४. दुध - १ कप
५. साखर (आंबा/स्ट्रॉबेरी च्या चवीनुसार कमी/जास्त)
६. अनफ्लेवर्ड जेलीची २ पाकिटं किंवा अगार-अगार
७. सजावट आपापल्या आवडिनुसार

Sahitya

कृती:

१. एका नॉनस्टिक पॅन मधे लिक्वीड क्रिम, दुध आणि साखर घालुन हलकं गरम करा. अगदि एक हलकिशी उकळि आली तरी चालेल. गॅस बंद करुन मिश्रण गार करत ठेवा (टिप नं १ बघा)

cream n milk

२. क्रिम गार होतेय तोपर्यंत आंब्या रस मिक्सर मधुन काढुन गाळण्याने गाळुन घ्या. मिक्सरचं भांड परत स्वच्छ धुवुन स्ट्रॉबेरीचा पल्प करुन घ्या म्हणजे पल्पचे रंग एकमेकात मिसळणार नाहित

pulp

३. अर्ध्या कप हलक्या गरम पाण्यात अनफ्लेवर्ड जेली/अगार-अगारचं १ पाकिट घालुन ठेवा (टिप नं २ बघा)

४. आता गार झालेल्या दुधमिश्रित क्रिमचे दोन भाग करा. एका भागात मँगो पल्प आणि दुसर्‍या भागात स्ट्रॉबेरी पल्प घालुन मिक्स करा. जेलीमिश्रित पाण्याचेहि २ भाग करा

cream in 2 parts

५. जेलीमिश्रित पाणी ह्या वरील दोन भागात घालण्याआधी क्रिममिश्रित मँगो आणि स्ट्रॉबेरीचे आणखी १/१ भाग करा. आता मँगो आणि स्ट्रॉबेरीच्या एका भागात जेलीमिश्रित पाणी घालुन आवडत्या मोल्ड/कप्स/ग्लास मधे घालुन सेट होण्यास ठेवा. (टिप नं ३ बघा)

half set glass

६. १५/२० मि. उरलेल्या मँगो आणि स्ट्रॉबेरीच्या भागात परत जेलीमिश्रित पाणी घालुन सेट झालेल्या पॅना कोता वर विरुद्ध भागाची लेयर सेट करा. म्हणजे तळाशी मँगो असेल तर त्यावरती स्ट्रॉबेरी किंवा हेच उलट्या क्रमाने. त्या मधल्या ग्लास सारखं डिझाईन करायचं झाल्यास दोन्हि पल्पमिश्रित क्रिम हळुवारपणे संततधारेने एकाच वेळेस ग्लास मधे ओतत जा.

७. फायनल लेर्यड केलेले ग्लास/कप्स/ग्लास परत एक १५-२० मि. डिप फ्रिजर मधे ठेवा आणि मग खाली फ्रिज मधे शीफ्ट करा (टिप नं ४ बघा)

full set glass

८. एक ३-४ तासात सेट/चिल्ड झालं कि आवडेल तसं सजवुन क्लासीक पॅना कोता पेश करा.

टिपा:
१. भारतात आपल्याकडे काहि वेळेला खुप जाड साखर येते. अश्या वेळेस ती पटकन विरघळण्यासाठि एक तर तीची पीठिसाखर करुन घाला किंवा गॅस वर ठेवण्याआधी डावेने ढवळुन घ्या म्हणजे क्रिम जास्त उकळलं जाणार नाहि.

२. बहुतेक वेळेला जेली भीजत घातल्यावर त्यात गुठळ्या होतात ज्या सहजगत्या मोडल्या / विरघळत (Dissolve) नाहित. त्या टाळण्याकरिता जेव्हा जेलीची पुड घालाल तेव्हा चमचा किंवा फोर्क ने सतत ढवळत रहा.

३. असं लेयरचं पॅना कोता करायचं झाल्यास, ग्लास मधे पहिली लेयर घातली कि ग्लास एक १५-२० मि. डिप फ्रिजर मधे ठेवा. झटकन सेट होतं. १५-२० मि. दुसरी जेलीमिश्रित लेयर घालुन सेट करा.

४. पहिली लेयर सेट झाल्यावर दुसरी लेयर घालताना मिश्रण ग्लास मधे एकदम ओतु नका. हळुवारपणे डावेने घालत जा. जरी डिप फ्रिजर मधे ठेवलं असलं तरी मिश्रण कधी कधी आतुन सेट होत नाहि (जरी वरुन दिसत असलं तरी). अश्या वेळेस एकदम ओतलं तर दोन्हि मिश्रण एकत्र होउन एक वेगळिच लेयर तयार होईल.

final 2

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

23 Jun 2014 - 5:02 pm | प्रचेतस

अरे का छळतोस इतका :(

शिद's picture

23 Jun 2014 - 5:15 pm | शिद

तुमच्या मँगो मुस धाग्यावर दिलेला प्रतिसाद पुन्हा इथे देत आहे.

नेह्मी तेच तेच काय लिहायचे?

दिपक.कुवेत's picture

24 Jun 2014 - 1:16 pm | दिपक.कुवेत

अहो कुठला आंबा महोत्सव?? ईथे हापुस आंबे मिळतात हेच आमचं भाग्य आणि जोवर सीजन आहे तोवर लुफ्त घेतो आहे एवढच. सुट्टिला या ईकडे....मस्त मँगो मुस आणि हे पॅना कोता खात निवांत गप्पा हाणु/कट्टा करु.

शिद's picture

24 Jun 2014 - 2:51 pm | शिद

नक्कीच :)

अक्षया's picture

23 Jun 2014 - 5:17 pm | अक्षया

आंबा / स्ट्रॉबेरी दोन्ही चे कॉम्बीनेशन मस्तच.. :)

निशेध निशेध.. कधी येणार आहेस परत? तेव्हा वचपा काढला जाईल..

दिपक.कुवेत's picture

24 Jun 2014 - 1:09 pm | दिपक.कुवेत

भारतवारी आता येत्या मे एंड्-जुन मधे होणार आहे तेव्हा भेटु नक्कि....

सूड's picture

23 Jun 2014 - 5:26 pm | सूड

मस्तच !!

सखी's picture

23 Jun 2014 - 5:35 pm | सखी

पाकृ, फोटो सही दिसतयं, टीपा पण मह्त्वाच्या.

सानिकास्वप्निल's picture

23 Jun 2014 - 6:26 pm | सानिकास्वप्निल

पॅन्ना कोटा अतिशय आवडतं डेझर्ट आहे.
आंबा- स्ट्रॉबेरी एकत्र छान लागेल असे दिसतेय :)

सुरेख फोटो! खरंच छळवाद आहे!

एस's picture

23 Jun 2014 - 7:30 pm | एस

आम्हांला मानसिक मधुमेह झाला आहे अशी स्वतःची समजूत करून घेतल्याने आपला लेख वाचून अजिबात जळजळ झाली नाही. मात्र डोळ्यांना मधुर गोष्टींचे वावडे नसल्यामुळे प्रतिमांतून चव चाखल्याचे समाधान लाभले असे कळवीत आहे.

भाते's picture

23 Jun 2014 - 7:44 pm | भाते

दिपक, सोमवारी पाकृ टाकणे बंद कर ना रे बाबा. आता मी तुझ्या 'सोमवार स्पेशल' पाकृ मोजणार आहे.
इकडे आल्यावर त्या 'सगळ्या' पाकृ करून खायला घातल्याशिवाय तुला परत जाऊ देणार नाही.
सध्या फक्त फोटो पाहुनच पोट भरल्यामुळे पाकृ नंतर वाचुन सविस्तर प्रतिसाद देईन.

दिपक.कुवेत's picture

24 Jun 2014 - 1:12 pm | दिपक.कुवेत

@ भात्या: एनी टाईम वेल्कम. तुझ्या सगळ्या फर्माईशी पुर्‍या करण्यात आनंदच वाटेल.

त्रिवेणी's picture

23 Jun 2014 - 8:30 pm | त्रिवेणी

*scratch_one-s_head*

प्रभाकर पेठकर's picture

23 Jun 2014 - 8:58 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर.
मिश्र पॅना कोता जास्त आकर्षक दिसतं आहे.
जेली मिश्रीत क्रिम ओतताना मध्ये भागी (ग्लासच्या आतील आकाराचा) पुठ्ठा उभा धरून दोन्ही बाजूंनी क्रिम ओतून नंतर पुठ्ठा काढून घेतल्यास उभे दोन भाग वेगळे वेगळे छान दिसतील.

दिपक.कुवेत's picture

24 Jun 2014 - 1:13 pm | दिपक.कुवेत

तेच तर! जेव्हा लेयरचं काहि करतो तेव्हा क्रिएटीव्हीटिला भरपुर वाव असतो.

फार त्रास झाला फोटू बघून. पेना कोटा खाऊन शतक लोटलेय. तुमचं कौतुक वाटतय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jun 2014 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

तोंपासू !

सुहास झेले's picture

23 Jun 2014 - 10:55 pm | सुहास झेले

खल्लास !!!

सस्नेह's picture

23 Jun 2014 - 10:57 pm | सस्नेह

डोळ्याला गुद्गुल्या होताहेत फोटो पाहून !

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2014 - 12:42 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif
डेझर्ट सम्राट दिपक महाराज की जय..!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif

अ वांतर :- क्रमांक ३ चा फोटू चोरणेत आलेला आहे.. http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-9.gif याची णोंद घ्यावी! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-269.gif

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2014 - 12:46 am | अत्रुप्त आत्मा

@अ वांतर :- क्रमांक ३ चा फोटू चोरणेत आलेला आहे.>>> श्श्या... :-/ चुकलं... कुणितरी त्या तिनाचे ४ करा पाहू *biggrin* >>> क्रमांक ४ चा फोटू चोरणेत आलेला आहे. ... हे असे!

दिपक.कुवेत's picture

24 Jun 2014 - 1:19 pm | दिपक.कुवेत

अरे फोटो चोरण्याची तुला फुल्ल टु मुभा आहे पण एका अटिवर....पुढल्या भारतभेटित जर पुणेवारी झाली तर उत्तम खादाडिची सगळि ठिकाणं तुझ्या सोबतीने पालथी घालायची...बोल आहे कबुल???

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2014 - 2:36 pm | अत्रुप्त आत्मा

कबूल....कबूल....कबूल....! :D

इन्दुसुता's picture

24 Jun 2014 - 3:31 am | इन्दुसुता

पाकॄ आवडली आणि फोटो पण.
सध्या सर्व साहित्य घरात असल्यामुळे आधी मँगोंमूस का ही पाकॄ हा मोठ्ठा प्रश्न पडलाय.

दोन्ही करा आणि एक चवीसाठी इकडे पाठवून द्या, माझी काही तक्रार नाही.

इन्दुसुता's picture

25 Jun 2014 - 8:45 am | इन्दुसुता

नक्की नक्की!!! :)

सखी's picture

24 Jun 2014 - 5:59 pm | सखी

इन्दुसुता मीपण आधी मॅंगोमूस करावे म्हणुन थांबले होते आणि इथे लगेच दुसरी इतकी शानदार पाकृ आलीपण, काय म्हणावे ह्या छळवादाला?
ते जाऊ दे दिपकजी- लिक्विड क्रिम काय असतं? कधी ऐकलं नाही, दुकानात कोणत्या भागात मिळेल हेही कळत नाही.

दिपक.कुवेत's picture

24 Jun 2014 - 7:15 pm | दिपक.कुवेत

मँगो मुस काय किंवा पॅना कोता काय....कधीहि कर आणि खाउन घरच्यांबरोबर आनंद द्विगुणीत कर. लिक्विड क्रिम हे नावाप्रमाणे पातळ असतं जे सॉफ्ट पीक्स फॉर्म होईस्त बीट करायचं असतं (मँगो मुस मधे आंब्याच्या पल्पवर क्रिम आहे बघ ती घनता येईस्त). पण कोणत्याहि सुपर मार्केट मधे रेडिमेड व्हिप्ड क्रिम सुद्धा मीळेल. ते हि वापरु शकतेस. भारतात अमुलचं मिळतं.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Jun 2014 - 10:37 am | llपुण्याचे पेशवेll

नयनरम्य पाककृती.

जीवघेणी!! स्ट्रॉबेरी सध्या मिळने अवघड आहे...पण अमेझिंग दिसतेय हे!

मुक्त विहारि's picture

24 Jun 2014 - 1:27 pm | मुक्त विहारि

झक्कास...

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Jun 2014 - 1:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

जिव्हालौल्य आणि नेत्रसुख एकदमच!!!

लव उ's picture

24 Jun 2014 - 2:31 pm | लव उ

मस्त!!!

मधुरा देशपांडे's picture

24 Jun 2014 - 2:42 pm | मधुरा देशपांडे

काय भारी आहेत फोटोज. सध्या स्ट्रॉबेरी मिळत आहेत तेव्हा करून बघेन.

दादा, पाकृ काही वाचली नाही. माझी गाडी घरी चहा बनवण्याच्या पुढे जात नसल्यामुळे वाचून फायदाही नाही.

मात्र फोटो पाहणे हा एक नेत्रसुखद अनुभव होता !!!

दिपक.कुवेत's picture

24 Jun 2014 - 7:17 pm | दिपक.कुवेत

आपण ह्या धाग्यावर हजेरी लावलीत हिच आमच्यासाठि पर्वणी!

मदनबाण's picture

25 Jun 2014 - 7:10 am | मदनबाण

शेवटचे ३ ग्लास मी गट्टम केले आहेत असे समजावे. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Apollo 440 - Charlie's Angels

इशा१२३'s picture

25 Jun 2014 - 3:06 pm | इशा१२३

अप्रतिम रंगित ग्लासच बघत रहावेसे वाटताहेत.भारीच...

कवितानागेश's picture

25 Jun 2014 - 3:22 pm | कवितानागेश

याला किडनॅप करायला हवं... :)

प्यारे१'s picture

25 Jun 2014 - 3:31 pm | प्यारे१

श्री. दीपक
मु.पो. कुवेत,

विषयः मिपाकरांचा छळ केल्याबद्दल कारणे दाखवा.

महोदय,

आपण मिपा वर वारंवार विविध पाकृ करुन त्या पाकृ आणि त्याबरोबर 'नुसतेच छान छान फोटो' दाखवीत असता.
असे केल्याने आपण मिपाकरांचा अक्षम्य असा छळ करीत आहात ह्याची जाणीव आपल्याला नाही का? आपल्यावर त्या पाकृ प्रत्यक्ष सादर करुन मिपाकरांना खाऊ घालण्याऐवजी 'नु छा छा फो' टाकून जो छळ आरंभिला आहे त्याबद्दल आपल्यावर कडक कारवाई का केली जाऊ नये ह्याबद्दल ४ दिवसाच्या आत कारणे देण्यात यावीत.

अशी कारणे दिल्यानंतर देखील प्रत्यक्ष भेटीअंती आपल्या हातच्या बनवलेल्या किमान ४-५ रेसिपी खाऊ घातल्यासच आपल्यावर कारवाई होणार नाही ह्याची खात्री बाळगावी.

दिपक.कुवेत's picture

26 Jun 2014 - 12:41 pm | दिपक.कुवेत

आपल्या आरोपाची आम्हि तातडिने दखल घेतली आहे. 'नु छा छा फो' बघुन पोटात कालवाकालव होते हि जाणीव आम्हास नक्किच आहे (जशी आमचीहि ईतरांचे फोटो बघुन अशीच हालत होते) पण हाय पाकृ करनेसे/फोटो निकालसे हे जालीम हात रुकतेहि नहि| अब ईसका क्या उपाय है? तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे. आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो.

सर्वांचाच कृपाभीलाषी
दिपक मु. पो. कुवेत

प्यारे१'s picture

26 Jun 2014 - 12:50 pm | प्यारे१

>>> तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे.

ह्यातील 'खावयावयाचे' शब्दाच्या वापराबद्दल एक तुमचीच पाकृ गिफ्ट.

>>> आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो.
२०१४ विधानसभा निवड्णुक जवळ आल्याचे 'प्रकर्षाने' जाणवले. ;)

दिपक.कुवेत's picture

26 Jun 2014 - 1:04 pm | दिपक.कुवेत

हि "कोरडिच" आश्वासनं नाहित बरं....

मँगो मूस फसल्यावर पॅना कोता करू की नको करू की नको असं मन भेलकांडतंय... पण डेअरींग करावं म्हणते. फोटो भयंकर टेम्प्टिंग आहे.

फोटोत दाखवलेलं जिलेटिनचं एक पाकिट किती ग्रॅमचं आहे?

दिपक.कुवेत's picture

26 Jun 2014 - 12:44 pm | दिपक.कुवेत

मँगो मुस का फसलं? (हसलं म्हणुन का *biggrin*

जिलेटिनचं पाकिट किती ग्रॅम होतं माहित नाहि पण उघडल्यावर एक चमचाभर भरलं.

पैसा's picture

27 Jun 2014 - 10:42 pm | पैसा

याला बॅन करा रे!

स्वाती दिनेश's picture

30 Jun 2014 - 12:29 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसते आहे पॅना कोता..
स्वाती

पाकृ वर आणतोय हो....

तुमचं मूस फसतं म्हणे? करावं म्हणत होतो आता प्लान रद्द!! =))

दिपक.कुवेत's picture

8 Jun 2016 - 3:41 pm | दिपक.कुवेत

माझं तर अजून फसलं नाहिये....नक्कि ह्याच स्टेप्स फॉलो करतोस ना??