नमस्कार मंडळि,
पॅना कोता (Panna cotta) हे एक ईटालीयन डेझर्ट आहे ज्याचा अर्थ आहे "cooked cream". फार कमी पदार्थ वापरुन एक झटपट आणि तितकचं क्लासी होणारं हे डेझर्ट आहे.
आंबा / स्ट्रॉबेरीचा सीझन अजुन असल्यामुळे हे पॅना कोता ह्या कॉम्बीनेशन मधे केलं आणि चव/रंगसंगतीच्या बाबतीत एकदम सरस ठरलं. पण एवढा खटाटोप टाळायचा असेल आणि धीर धरवत नसेल तर नुसत्या मँगो किंवा स्ट्रॉबेरीचहि छान लागतं.
चला तर मग ईटलीला न जाता ईटलीच्या डेझर्ट चा आस्वाद घेउया.
साहित्यः
१. तयार हापुस आंबे - २ (नसतील तर कॅन्ड मँगो प्युरेहि वापरु शकता)
२. १ बाउल स्ट्रॉबेरीज
३. लिक्वीड क्रिम - २०० मिली
४. दुध - १ कप
५. साखर (आंबा/स्ट्रॉबेरी च्या चवीनुसार कमी/जास्त)
६. अनफ्लेवर्ड जेलीची २ पाकिटं किंवा अगार-अगार
७. सजावट आपापल्या आवडिनुसार
कृती:
१. एका नॉनस्टिक पॅन मधे लिक्वीड क्रिम, दुध आणि साखर घालुन हलकं गरम करा. अगदि एक हलकिशी उकळि आली तरी चालेल. गॅस बंद करुन मिश्रण गार करत ठेवा (टिप नं १ बघा)
२. क्रिम गार होतेय तोपर्यंत आंब्या रस मिक्सर मधुन काढुन गाळण्याने गाळुन घ्या. मिक्सरचं भांड परत स्वच्छ धुवुन स्ट्रॉबेरीचा पल्प करुन घ्या म्हणजे पल्पचे रंग एकमेकात मिसळणार नाहित
३. अर्ध्या कप हलक्या गरम पाण्यात अनफ्लेवर्ड जेली/अगार-अगारचं १ पाकिट घालुन ठेवा (टिप नं २ बघा)
४. आता गार झालेल्या दुधमिश्रित क्रिमचे दोन भाग करा. एका भागात मँगो पल्प आणि दुसर्या भागात स्ट्रॉबेरी पल्प घालुन मिक्स करा. जेलीमिश्रित पाण्याचेहि २ भाग करा
५. जेलीमिश्रित पाणी ह्या वरील दोन भागात घालण्याआधी क्रिममिश्रित मँगो आणि स्ट्रॉबेरीचे आणखी १/१ भाग करा. आता मँगो आणि स्ट्रॉबेरीच्या एका भागात जेलीमिश्रित पाणी घालुन आवडत्या मोल्ड/कप्स/ग्लास मधे घालुन सेट होण्यास ठेवा. (टिप नं ३ बघा)
६. १५/२० मि. उरलेल्या मँगो आणि स्ट्रॉबेरीच्या भागात परत जेलीमिश्रित पाणी घालुन सेट झालेल्या पॅना कोता वर विरुद्ध भागाची लेयर सेट करा. म्हणजे तळाशी मँगो असेल तर त्यावरती स्ट्रॉबेरी किंवा हेच उलट्या क्रमाने. त्या मधल्या ग्लास सारखं डिझाईन करायचं झाल्यास दोन्हि पल्पमिश्रित क्रिम हळुवारपणे संततधारेने एकाच वेळेस ग्लास मधे ओतत जा.
७. फायनल लेर्यड केलेले ग्लास/कप्स/ग्लास परत एक १५-२० मि. डिप फ्रिजर मधे ठेवा आणि मग खाली फ्रिज मधे शीफ्ट करा (टिप नं ४ बघा)
८. एक ३-४ तासात सेट/चिल्ड झालं कि आवडेल तसं सजवुन क्लासीक पॅना कोता पेश करा.
टिपा:
१. भारतात आपल्याकडे काहि वेळेला खुप जाड साखर येते. अश्या वेळेस ती पटकन विरघळण्यासाठि एक तर तीची पीठिसाखर करुन घाला किंवा गॅस वर ठेवण्याआधी डावेने ढवळुन घ्या म्हणजे क्रिम जास्त उकळलं जाणार नाहि.
२. बहुतेक वेळेला जेली भीजत घातल्यावर त्यात गुठळ्या होतात ज्या सहजगत्या मोडल्या / विरघळत (Dissolve) नाहित. त्या टाळण्याकरिता जेव्हा जेलीची पुड घालाल तेव्हा चमचा किंवा फोर्क ने सतत ढवळत रहा.
३. असं लेयरचं पॅना कोता करायचं झाल्यास, ग्लास मधे पहिली लेयर घातली कि ग्लास एक १५-२० मि. डिप फ्रिजर मधे ठेवा. झटकन सेट होतं. १५-२० मि. दुसरी जेलीमिश्रित लेयर घालुन सेट करा.
४. पहिली लेयर सेट झाल्यावर दुसरी लेयर घालताना मिश्रण ग्लास मधे एकदम ओतु नका. हळुवारपणे डावेने घालत जा. जरी डिप फ्रिजर मधे ठेवलं असलं तरी मिश्रण कधी कधी आतुन सेट होत नाहि (जरी वरुन दिसत असलं तरी). अश्या वेळेस एकदम ओतलं तर दोन्हि मिश्रण एकत्र होउन एक वेगळिच लेयर तयार होईल.
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे का छळतोस इतका
अरे का छळतोस इतका :(
ला ज वा ब...!!!
तुमच्या मँगो मुस धाग्यावर दिलेला प्रतिसाद पुन्हा इथे देत आहे.
नेह्मी तेच तेच काय लिहायचे?
धन्यवाद शिद साहेब
In reply to ला ज वा ब...!!! by शिद
अहो कुठला आंबा महोत्सव?? ईथे हापुस आंबे मिळतात हेच आमचं भाग्य आणि जोवर सीजन आहे तोवर लुफ्त घेतो आहे एवढच. सुट्टिला या ईकडे....मस्त मँगो मुस आणि हे पॅना कोता खात निवांत गप्पा हाणु/कट्टा करु.
नक्कीच
In reply to धन्यवाद शिद साहेब by दिपक.कुवेत
नक्कीच :)
वाह सुंदर !!
आंबा / स्ट्रॉबेरी दोन्ही चे कॉम्बीनेशन मस्तच.. :)
निशेध निशेध.. कधी येणार आहेस
निशेध निशेध.. कधी येणार आहेस परत? तेव्हा वचपा काढला जाईल..
@ पिंगू
In reply to निशेध निशेध.. कधी येणार आहेस by पिंगू
भारतवारी आता येत्या मे एंड्-जुन मधे होणार आहे तेव्हा भेटु नक्कि....
मस्तच !!
मस्तच !!
सहीच दिसतयं
पाकृ, फोटो सही दिसतयं, टीपा पण मह्त्वाच्या.
मस्तं
पॅन्ना कोटा अतिशय आवडतं डेझर्ट आहे.
आंबा- स्ट्रॉबेरी एकत्र छान लागेल असे दिसतेय :)
सुरेख फोटो! खरंच छळवाद आहे!
सुरेख फोटो! खरंच छळवाद आहे!
हम्म्
आम्हांला मानसिक मधुमेह झाला आहे अशी स्वतःची समजूत करून घेतल्याने आपला लेख वाचून अजिबात जळजळ झाली नाही. मात्र डोळ्यांना मधुर गोष्टींचे वावडे नसल्यामुळे प्रतिमांतून चव चाखल्याचे समाधान लाभले असे कळवीत आहे.
आणखीन एक…
दिपक, सोमवारी पाकृ टाकणे बंद कर ना रे बाबा. आता मी तुझ्या 'सोमवार स्पेशल' पाकृ मोजणार आहे.
इकडे आल्यावर त्या 'सगळ्या' पाकृ करून खायला घातल्याशिवाय तुला परत जाऊ देणार नाही.
सध्या फक्त फोटो पाहुनच पोट भरल्यामुळे पाकृ नंतर वाचुन सविस्तर प्रतिसाद देईन.
धन्यवाद स्वॅप्स
In reply to आणखीन एक… by भाते
@ भात्या: एनी टाईम वेल्कम. तुझ्या सगळ्या फर्माईशी पुर्या करण्यात आनंदच वाटेल.
(No subject)
*scratch_one-s_head*
सुंदर.
सुंदर.
मिश्र पॅना कोता जास्त आकर्षक दिसतं आहे.
जेली मिश्रीत क्रिम ओतताना मध्ये भागी (ग्लासच्या आतील आकाराचा) पुठ्ठा उभा धरून दोन्ही बाजूंनी क्रिम ओतून नंतर पुठ्ठा काढून घेतल्यास उभे दोन भाग वेगळे वेगळे छान दिसतील.
धन्यवाद काका
In reply to सुंदर. by प्रभाकर पेठकर
तेच तर! जेव्हा लेयरचं काहि करतो तेव्हा क्रिएटीव्हीटिला भरपुर वाव असतो.
फार त्रास झाला फोटू बघून.
फार त्रास झाला फोटू बघून. पेना कोटा खाऊन शतक लोटलेय. तुमचं कौतुक वाटतय.
तोंपासू !
तोंपासू !
खल्लास !!!
खल्लास !!!
मीपण !
In reply to खल्लास !!! by सुहास झेले
डोळ्याला गुद्गुल्या होताहेत फोटो पाहून !
डेझर्ट सम्राट दिपक महाराज की
डेझर्ट सम्राट दिपक महाराज की जय..!!!
अ वांतर :- क्रमांक ३ चा फोटू चोरणेत आलेला आहे..
याची णोंद घ्यावी! 
@अ वांतर :- क्रमांक ३ चा फोटू
In reply to डेझर्ट सम्राट दिपक महाराज की by अत्रुप्त आत्मा
@अ वांतर :- क्रमांक ३ चा फोटू चोरणेत आलेला आहे.>>> श्श्या... :-/ चुकलं... कुणितरी त्या तिनाचे ४ करा पाहू *biggrin* >>> क्रमांक ४ चा फोटू चोरणेत आलेला आहे. ... हे असे!
आत्मुस
In reply to @अ वांतर :- क्रमांक ३ चा फोटू by अत्रुप्त आत्मा
अरे फोटो चोरण्याची तुला फुल्ल टु मुभा आहे पण एका अटिवर....पुढल्या भारतभेटित जर पुणेवारी झाली तर उत्तम खादाडिची सगळि ठिकाणं तुझ्या सोबतीने पालथी घालायची...बोल आहे कबुल???
कबूल....कबूल....कबूल....!
In reply to आत्मुस by दिपक.कुवेत
कबूल....कबूल....कबूल....! :D
पाकॄ आवडली आणि फोटो पण.
पाकॄ आवडली आणि फोटो पण.
सध्या सर्व साहित्य घरात असल्यामुळे आधी मँगोंमूस का ही पाकॄ हा मोठ्ठा प्रश्न पडलाय.
दोन्ही करा आणि एक चवीसाठी
In reply to पाकॄ आवडली आणि फोटो पण. by इन्दुसुता
दोन्ही करा आणि एक चवीसाठी इकडे पाठवून द्या, माझी काही तक्रार नाही.
नक्की नक्की!!!
In reply to दोन्ही करा आणि एक चवीसाठी by रेवती
नक्की नक्की!!! :)
मीपण
In reply to पाकॄ आवडली आणि फोटो पण. by इन्दुसुता
इन्दुसुता मीपण आधी मॅंगोमूस करावे म्हणुन थांबले होते आणि इथे लगेच दुसरी इतकी शानदार पाकृ आलीपण, काय म्हणावे ह्या छळवादाला?
ते जाऊ दे दिपकजी- लिक्विड क्रिम काय असतं? कधी ऐकलं नाही, दुकानात कोणत्या भागात मिळेल हेही कळत नाही.
@ सखी
In reply to मीपण by सखी
मँगो मुस काय किंवा पॅना कोता काय....कधीहि कर आणि खाउन घरच्यांबरोबर आनंद द्विगुणीत कर. लिक्विड क्रिम हे नावाप्रमाणे पातळ असतं जे सॉफ्ट पीक्स फॉर्म होईस्त बीट करायचं असतं (मँगो मुस मधे आंब्याच्या पल्पवर क्रिम आहे बघ ती घनता येईस्त). पण कोणत्याहि सुपर मार्केट मधे रेडिमेड व्हिप्ड क्रिम सुद्धा मीळेल. ते हि वापरु शकतेस. भारतात अमुलचं मिळतं.
सुंदर
नयनरम्य पाककृती.
जीवघेणी!! स्ट्रॉबेरी सध्या
जीवघेणी!! स्ट्रॉबेरी सध्या मिळने अवघड आहे...पण अमेझिंग दिसतेय हे!
मस्त
झक्कास...
नेत्रसुख
जिव्हालौल्य आणि नेत्रसुख एकदमच!!!
मस्त!!!
मस्त!!!
काय भारी आहेत फोटोज. सध्या
काय भारी आहेत फोटोज. सध्या स्ट्रॉबेरी मिळत आहेत तेव्हा करून बघेन.
दादा, पाकृ काही वाचली नाही.
दादा, पाकृ काही वाचली नाही. माझी गाडी घरी चहा बनवण्याच्या पुढे जात नसल्यामुळे वाचून फायदाही नाही.
मात्र फोटो पाहणे हा एक नेत्रसुखद अनुभव होता !!!
धन्या भौ
In reply to दादा, पाकृ काही वाचली नाही. by धन्या
आपण ह्या धाग्यावर हजेरी लावलीत हिच आमच्यासाठि पर्वणी!
शॉलिट्ट...
शेवटचे ३ ग्लास मी गट्टम केले आहेत असे समजावे. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Apollo 440 - Charlie's Angels
अप्रतिम रंगित ग्लासच बघत
अप्रतिम रंगित ग्लासच बघत रहावेसे वाटताहेत.भारीच...
याला किडनॅप करायला हवं...
याला किडनॅप करायला हवं... :)
कारणे दाखवा नोटिस.
श्री. दीपक
मु.पो. कुवेत,
विषयः मिपाकरांचा छळ केल्याबद्दल कारणे दाखवा.
महोदय,
आपण मिपा वर वारंवार विविध पाकृ करुन त्या पाकृ आणि त्याबरोबर 'नुसतेच छान छान फोटो' दाखवीत असता.
असे केल्याने आपण मिपाकरांचा अक्षम्य असा छळ करीत आहात ह्याची जाणीव आपल्याला नाही का? आपल्यावर त्या पाकृ प्रत्यक्ष सादर करुन मिपाकरांना खाऊ घालण्याऐवजी 'नु छा छा फो' टाकून जो छळ आरंभिला आहे त्याबद्दल आपल्यावर कडक कारवाई का केली जाऊ नये ह्याबद्दल ४ दिवसाच्या आत कारणे देण्यात यावीत.
अशी कारणे दिल्यानंतर देखील प्रत्यक्ष भेटीअंती आपल्या हातच्या बनवलेल्या किमान ४-५ रेसिपी खाऊ घातल्यासच आपल्यावर कारवाई होणार नाही ह्याची खात्री बाळगावी.
मा. प्रशांत आवले साहेब
In reply to कारणे दाखवा नोटिस. by प्यारे१
आपल्या आरोपाची आम्हि तातडिने दखल घेतली आहे. 'नु छा छा फो' बघुन पोटात कालवाकालव होते हि जाणीव आम्हास नक्किच आहे (जशी आमचीहि ईतरांचे फोटो बघुन अशीच हालत होते) पण हाय पाकृ करनेसे/फोटो निकालसे हे जालीम हात रुकतेहि नहि| अब ईसका क्या उपाय है? तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे. आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो.
सर्वांचाच कृपाभीलाषी
दिपक मु. पो. कुवेत
>>> तरीसुध्दा आपणास काय काय
In reply to मा. प्रशांत आवले साहेब by दिपक.कुवेत
>>> तरीसुध्दा आपणास काय काय खावयावयाचे आहे ते आम्हास कळवावे.
ह्यातील 'खावयावयाचे' शब्दाच्या वापराबद्दल एक तुमचीच पाकृ गिफ्ट.
>>> आम्हि शक्य तितके प्रयत्न करुन आपली फर्माईश पुरी करु ह्याची खात्री बाळगावी. सबब आता आमच्या वरील राग/रुसवा कमी झाला असेल अशी खात्री बाळगतो.
२०१४ विधानसभा निवड्णुक जवळ आल्याचे 'प्रकर्षाने' जाणवले. ;)
आवल्या
In reply to >>> तरीसुध्दा आपणास काय काय by प्यारे१
हि "कोरडिच" आश्वासनं नाहित बरं....
मँगो मूस फसल्यावर पॅना कोता
मँगो मूस फसल्यावर पॅना कोता करू की नको करू की नको असं मन भेलकांडतंय... पण डेअरींग करावं म्हणते. फोटो भयंकर टेम्प्टिंग आहे.
फोटोत दाखवलेलं जिलेटिनचं एक पाकिट किती ग्रॅमचं आहे?
@ हसरी
मँगो मुस का फसलं? (हसलं म्हणुन का *biggrin*
जिलेटिनचं पाकिट किती ग्रॅम होतं माहित नाहि पण उघडल्यावर एक चमचाभर भरलं.
दुष्ट!
याला बॅन करा रे!
वॉव..
मस्त दिसते आहे पॅना कोता..
स्वाती
मिपा आंबा महोत्सवाच्या निमित्ताने....
पाकृ वर आणतोय हो....
तुमचं मूस फसतं म्हणे? करावं
In reply to मिपा आंबा महोत्सवाच्या निमित्ताने.... by दिपक.कुवेत
तुमचं मूस फसतं म्हणे? करावं म्हणत होतो आता प्लान रद्द!! =))
आँ कसं काय?
In reply to तुमचं मूस फसतं म्हणे? करावं by सूड
माझं तर अजून फसलं नाहिये....नक्कि ह्याच स्टेप्स फॉलो करतोस ना??