गेल्या अर्ध्या तासात तीन सुंदर कविता इथे पाठवल्या गेल्या - "माझी पाखरे", "दूरदेशी..." आणि आत्ताच आलेली , "चैन". खरं सांगायचं तर आम्हा वाचकांची 'चैन' आहे इथे! या आणि अशा सुरेख रचना करून आम्हाला आनंद देणा-या तुम्हा मंडळींचे मनापासून आभार. आणि या सर्व भूताना अगदी योग्यसा पिंपळ उपलब्ध करून देणा-या वेताळाचे, तात्याबांचे सुध्दा!!
(कृतज्ञता शब्दात व्यक्त करू न शकणारा) मिसळपाव.
प्रतिक्रिया
30 Jul 2008 - 5:33 pm | अनिल हटेला
(कृतज्ञता शब्दात व्यक्त करू न शकणारा) मिसळपाव.
पोचली तुमची कृतज्ञता !!!
आनी आम्ही ही हेच म्हणतो.....
(अन्धेरा कायम रहे )
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
30 Jul 2008 - 5:37 pm | स्वाती दिनेश
आधी मला वाटलं चैन च विडंबन आलं काय लगेचच..म्हणून पाहिलं तर एकदम आभार प्रदर्शनच दिसलं..:)
पण हे खरच की फार चांगल्या दर्जाचे लेख आणि कविता येत आहेत मिपावर.
स्वाती
30 Jul 2008 - 11:18 pm | विसोबा खेचर
आणि या सर्व भूताना अगदी योग्यसा पिंपळ उपलब्ध करून देणा-या वेताळाचे, तात्याबांचे सुध्दा!!
यात आमचे थोडेफर श्रेय आम्ही नाकारत नाही, परंतु यात प्रामुख्याने मायबाप मिपाकरभुतांचेच श्रेय सर्वाधिक आहे याची आम्हाला विनम्र जाणीव आहे! त्यांच्या उत्तमोत्तम लिहिण्यामुळेच आपल्या सर्वांना चांगल्याचुंगल्या वाचनाचा आनंद मिळतो!
मिपाकर आहेत म्हणून मिसळपाव आहे! शाळेची इमारत कितीही सुंदर, सुरेख, आखीव-रेखीव, असली तरी संध्याकाळी ६ वाजता शाळा सुटून मुलं आपापल्या घरी गेल्यावर ती शाळेची इमारत कितीही सुंदर असली तरी केवळ भयाण दिसू लागते!
मिपाचंही तसंच आहे. तात्यावेताळ केवळ नाममात्र आहे. मिपाला शोभा आहे ती केवळ अन् केवळ येथे नांदत्या-गाजत्या मिपाकरांमुळेच!
असो,
आपला,
(कृतज्ञ) तात्यावेताळ!