उगवत्या सरकार समोरचा पहीला; मावळत्या सरकारचा शेवटचा आंतरराष्ट्रीय राजनितीक गूंता इटालीयन ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
25 Apr 2014 - 12:45 pm
गाभा: 

भारतातल सध्याच सरकार मावळतीला असताना, एक पाश्चिमात्य राष्ट्र घायकुतीला येऊन भारत सरकारवर राजनितीक दबाव वाढवत असल्याच्या बातम्या आहेत.

१५ फेब्रुवारी २०१२ला इटालीयन तेलवाहू नौकेवरील दोघा सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात दोन केरळी मच्छिमारांचा मृत्यू झाला. भारतीय यंत्रणांनी त्या दोन इटालियन माणसांना अटक करून (भारतातच) केस टाकली. केस कोणी हँडल करायची केरळ सरकारने का भारत सरकारने, कोणते कायदे-कलम लागू करायचे यावर नेहमी प्रमाणे गोंधळ, काही साक्षीदार परदेशात जाऊन बसणे यात नेहमी प्रमाणे भारतीय चौकशी संस्था सरकारे ते न्यायालये यांची दिरंगाई.

गंमत म्हणजे त्या इटालीयन माणसांना शीक्षा झालि तरी ती त्यांना इटालीतील तुरूंगात स्थानांतरीत होऊन घेता येईल असा करार नव्हेंबर २०१२ मध्ये इटालीने भारतासोबत करून घेतला आहे.

एवढ्यावर इटालीचे समाधान झाले नाहीए. या दिरंगाईचा फायदा घेऊन इटालीयन शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करण्याची संधी साधत भारतावर नेमका आपल्या चालु निवडणूकीच्या काळात दबाव वाढवला आहे. कदाचित काँग्रेस सरकार नाही राहीलेतर अजूनच अवघड जाईल म्हणून मावळत्या मनमोहन सिंग सरकार कडून त्या दोन माणसांची सुटका पदरात पाडून घ्यावयाची असावी. त्या करता राजनितीक मांडवली करण्यास हरकत नाही पण हे इटालीयन अ‍ॅरोगन्स भलताच दाखवतना दिसतात. अर्थात त्यांचा आर्थीक आणि सामरीक सबलतेतून आलेला तो अहंकार आहे हे लक्षात घ्यावे लागते.

भारताने हा प्रश्न भारतीय पब्लीक इमेज मध्ये प्रतिष्ठेचाच म्हणून जपला आहे. मनमोहनसिंग सरकार मावळत्या काळात काय करते ते कळेलच कदाचित भारतातले मतदान संपले की त्यांना सोडतात का डोकेदुखी येत्या संभाव्य मोदी सरकारवर सोडतात. अर्थात भारतीय माध्यमांनी निवडणूकीच्या धांदलीत त्याकडे सध्या दुर्लक्ष केल्यामुळे सध्याच्या मावळत्या सरकारला किमान भारतीय माध्यमांना या विषयावर फारसे तोंड द्यावे लागेल असे दिसत नाही. इन एनी केस भारतातल्या निवडणूका संपल्यावर भारत - इटली राजनितीक संबध भारतीय वृत्तपत्रातील ठळक बातम्यांमध्ये येण्याची आणि येत्या (संभाव्य मोदी ?) सरकार पुढची पहीली आंतरराष्ट्रीय डोकेदुखी इटालीयन असू शकेल अशी शक्यता वाटते. तर असे हे योगायोग

* केरळच्या राजकारणाच्या बाबतीत, भाजप सरकारला प्रकरण निस्तरायला देण्यात राजकीय फायदा भाजपला अधिक असेल का काँग्रेसला ? तुम्हाला काय वाटते.

* तुम्ही हे प्रकरण आंतरराष्ट्रीय भूमीकेतून अभ्यासले असेल तर मनमोहन अथवा भावी (मोदी?) सरकारने याची सोडवणूक कशी करावी ?

संदर्भ:
१) इंग्रजी विकिपीडियावरील लेख या लेखात दोन्ही बाजूचे बायस नसतीलच हे सांगता येत नाही. मल्याळी विकिपीडियन आणि युरोपीयन विकिपीडियन दोन्ही अ‍ॅक्टीव्ह असतात. दुसरा हा लेख अगदी अलिकडच्या राजनितीक बाबींकरता अपडेट झाला नसेल तरीही ज्यांना अभ्यासावयाचा आहे त्या करता भरपूर माहिती दिसते.

२) इंडियन एक्सप्रेस मधील लेटेस्ट वृत्त

३) India, Italy put marine row behind, reset ties

४) India has jurisdiction to try Italian marines, tribunal told

५) आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Apr 2014 - 2:25 pm | llपुण्याचे पेशवेll

हम्म. महत्वाचा मुद्दा आहे. परंतु थोडा बाजूला पडल्यासारखा आहे. कदाचित यात नवे सरकार काय भूमिका घेते ते पाहणे महत्वाचे ठरेल.

मला वाटते कि त्यांना सोडून द्यावे, पण एका महत्वाच्या अटीवर, जाताना त्यांनी बरोबर, राखी सावंतला व उमा भारतीला पर्मनंटली इटलीला घेऊन जावे, (दोनावर दोन फ्री).

माहितगार's picture

25 Apr 2014 - 3:04 pm | माहितगार

का बरं त्या त्यांचा पिझ्झा शेअर करत नाहीत म्हणून ? :)

कवितानागेश's picture

25 Apr 2014 - 3:02 pm | कवितानागेश

कमाल आहे.
गंमत म्हणजे त्या इटालीयन माणसांना शीक्षा झालि तरी ती त्यांना इटालीतील तुरूंगात स्थानांतरीत होऊन घेता येईल असा करार नव्हेंबर २०१२ मध्ये इटालीने भारतासोबत करून घेतला आहे.
हा असा करार कुठल्या आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे होउ शकतो?
इतर कुठल्या देशांमध्ये असे " सलोख्याचे" संबंध आहेत का?

माहितगार's picture

25 Apr 2014 - 3:22 pm | माहितगार

आंतरराष्ट्रीय कायद्यांबाबत इंग्रजी विकिपीडियावरील लेखात बर्‍यापैकी माहिती दिसते. अजून कोणा मीत्र देशा सोबत एखादा करार असला म्हणजे लगोलग इटलीशी या विषयावर सलगी करण्याची गरज नसावी. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनावश्यक सलगी करण्याची घाई करण्याची चूक नेहमी भारतीयांनी दाखवीली आणि ज्यां राष्ट्रांना संधी दिली नेमके तेच नंतर डोक्यावर येऊन मीरे वाटतात.

आयुर्हित's picture

25 Apr 2014 - 3:08 pm | आयुर्हित

कॉंग्रेसने कोठे कुठे I घातली(शी केली म्हणा तर)आहे हे सगळेच उघड होईल हळूहळू!

पण आपला विकासावरचा फोकस(focus)विसरू नका म्हणजे झाले!

माहितगार's picture

25 Apr 2014 - 3:17 pm | माहितगार

पण आपला विकासावरचा फोकस(focus)विसरू नका म्हणजे झाले!

सहमत, गजोधरांनी म्हटल्या प्रमाणे केरळी जनता जराशी नाराज होईल पण सोडून देण्यासही हरकत नाही; त्यात गोची एवढीच की इतर महासत्ताही जो अ‍ॅरोगन्स भारतासोबत दाखवणार नाहीत ते हे इटालीयन भारतीय सार्वभैमत्वावर डोळे वटारत असल्यामुळे भारतकरता हकनाक राजनितीक अस्मीतेचा प्रश्न होतोय असे दिसते. आपण म्हटल्या प्रमाणे आर्थिक विकास साधल्या शिवाय या महासत्तांना शिंगावर घेण्यात फार पॉईंट नाही. फोकस विकासावरच ठेवावा या बद्दल सहमत

मड्डम च्या माहेरची मंडळी आहेत ना ती ! ;) आत्ता पर्यंत खुप पिझ्झे रिचवले असतील त्यांनी ! कसाबने बिर्याणी चरली होती ना ? अहो अतिथी देवो भव ! असं सांगणारी आपली संस्कॄती, चांगला पाहुणचार करायला नको ?
बघुया... येणार्‍या काळात काय होतयं ते.

शुचि's picture

25 Apr 2014 - 4:51 pm | शुचि

मला वाटतं सोमालियन चाच्यांच्या प्रकरणा मुळे एकंदर जाहाजावाले/तेलवाहू नौकावाले भयग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचीच शक्यता जास्त आहे. खोडी काढण्यासाठी नव्हे. भरगच्च दंड करून सोडून द्यावे. त्या निधीतून मच्छीमारांच्या कुटुंबियांची पुढच्या कमीत कमी ३ पीढ्यांची तरतूद करावी. हां मात्र पूर्ण चौकशी अंती "खोडी हा हेतू नसल्याचे" सिद्ध झाल्यासच, हे करावे.

चाचा प्रकरणावरुन आठवले - कप्तान फिलिप्स छानच पिक्चर आहे.

नरेंद्र मोदी उवाच:
भारतीय जनतेची सुरक्षा सर्वतोपरी आहे.
असे कोणीही येवून आपल्या येथे येवून आपल्या लोकांना कश्या गोळ्या घालू शकते.
इटलीचे असले म्हणून स्पेशल व्यवहार का?
सुप्रिमकोर्टाने सांगितले म्हणून त्या लोकांना येथे परत बोलावले आहे.
कॉंग्रेस ने भारतीय जनतेला सांगावे की ते दोन्ही इटालीयन कोणत्या जेल मध्ये आहेत?
(म्हणजे आहेत की नाहीत याबद्दल शंकाच आहे, हे स्पष्ट होते)

माहितगार's picture

25 Apr 2014 - 7:51 pm | माहितगार

कॉंग्रेस ने भारतीय जनतेला सांगावे की ते दोन्ही इटालीयन कोणत्या जेल मध्ये आहेत?
(म्हणजे आहेत की नाहीत याबद्दल शंकाच आहे, हे स्पष्ट होते)

माझ्या वृत्तपत्रीय वाचनानुसार दिल्लीला इटालीयन दुतावासात असावेत. बाकी ओत्तावीओ वगैरे जसे भूर्र म्हणून उडून गेले तसे झाल्यास आश्चर्य नाही पण असे काही झाल्यास भारतीय सुरक्षा व्यवस्थेची आणखीच नाचक्की होईल. पण किमान २६/११ नंतर भारतीय कोस्टगार्डस सजग दिसतात. शस्त्रास्त्र असलेल्या एका आमेरीकन नौकेलाही ताब्यात घेऊन क्रू वर कारवाही केली गेली अर्थात हि घटना बातम्यात फारशी येताना दिसत नाही.

अर्थात याही केस मध्ये त्यांच्या नौकेवरील बाकी साक्षीदारांना ३कोटीचा जामीन घेऊन भारतीय कोर्टांनी साक्षी नोंदवून न घेताच सोडून दिले बहुधा अशाच साक्षीदाराच्या भारतात येण्याच्या गरजे पोटी केस लटकली आहे. हेही एक न्यायलयातील वेळ जाण्याचे कारण असावे. साक्षीदार भारतात पाठवणार नाहीत केसला उशीर झाला म्हणून पुन्हा हे इटालीयनच ओरडणार हा दुटप्पीपणा आधीच प्लानही असू शकतो. ३ कोटी रुपये जामीनाचे बाळगून आता काय चाटायचे ? सुरक्षा यंत्रणांनी कुठे नीट काम केले तरी असे आपण कोर्टात गचकतो. न्यायलयीन व्यवस्थे बद्दल आदर असूनही दिरंगाई आणि बेपर्वाईचे दुख्ख होते.

असे कोणीही येवून आपल्या येथे येवून आपल्या लोकांना कश्या गोळ्या घालू शकते.

हे बरोबर आहे काहीच वचक दाखवला नाहीतर अशा घटना पुढेही घडत राहतील. इटालीची मुख्य चूक म्हणजे प्रायव्हेट व्यापारी नौकेला प्रायव्हेट सुरक्षारक्षकही हायर करता आले असते. किमान डिप्लोमॅटीक रो एवढा गंभीर झाला नसता. काँट्रॅक्टवर इटालीयन नौसैनिक त्या नौकेला पुरवले गेले आणि गोळ्या त्यांनी चालवल्या. त्यांचा मूळ उद्देश सोमालीयन पायरेट्सनी पायरसी केल्यास इटालीयन नौसैन्याला अधिकृतपणे कारवाई करणे सोपे जावे असा असावा. पण असे जहाज लष्करी संबंध नसलेल्या देशाच्या हद्दीच्या जवळ पोहोचेल आणि आपले नौसैनिक असा गोळीबार होऊन दोन अणवस्त्रधारी देसातल्या नौसैन्या मध्ये किरकोळ प्रसंगावरून सरळ युद्धजन्य परिस्थिती होऊ शकते याचा त्यांनी विचार तेव्हा विचार केला नसावा.

पैसा's picture

25 Apr 2014 - 8:33 pm | पैसा

फेब्रुवारी २०१२ मधे खून झाल्यानंतर नोव्हेंबर २०१२ मधे हा चक्रम करार करायची काय गरज होती? सरकार कोणतीही असो, दोन्ही देशांमधे खुनाला काय शिक्षा आहेत ते पाहून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. नि:शस्त्र कोळ्यांवर गोळीबार म्हणजे हे सरळ खूनच आहेत. तुरूंगवास ठीक पण समजा सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली तर ती इटलीमधे अंमलात येणार का?

माहितगार's picture

25 Apr 2014 - 9:19 pm | माहितगार

फाशीची शिक्षा दिली तर ती इटलीमधे अंमलात येणार का?

नाही करारात केवळ फाशीचा अपवाद आहे. फाशी झाली असती तर भारतात झाली असती. पण एनी वे इटालीयन लोकांनी फाशीवाले चार्जेस ड्रॉप व्हावेत म्हणून बरीच खळखळ केली आणि फाशी वाले चार्जेस ड्रॉप केले आहेत. आता बरीच कमी वर्षांची जेल बील होऊ शकते झाली तरी करारा नुसार शीक्षा इटलीत जाऊन भोगता येईल. गंमत म्हणजे कोणते चार्जेस लावायचे आणि चौकशी कोणत्या भारतीय एजन्सीनी करायची याचा निर्णय करण्यात दोन वर्षे गेली. अशा गोष्टी करून देण्यात आपले वकील प्रशासन आणि न्यायव्यवस्था सगळेच जण अग्रेसर आहेत. पटकन शीक्षा द्यायची एक्झीक्यूट करून मोकळे व्हायचे. देशाच्या आत काही करा बाकी जगापूढे नांगी टाकून तमाशा हे भारताचे रूप आतरराष्ट्रीय ठिकाणी स्पृहणीय दिसत नाही.

भारतीय (परराष्ट्र) प्रशासनीक सेवेतून आलेले बिचारे अधिकारी देशप्रेमाने बर्‍यापैकी झटतात देशाने त्यांची साथ अधिक चांगली द्यावयास हवी. चीनी माणसाला कम्यूनीस्ट सरकारवर किती प्रेम असेल ? पण देशप्रेमाची गोष्ट आली की सगळ्या जगाला हैराण करून सोडतात. शत्रुराष्ट्र असल तरी त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या देशा वर असलेल्या प्रेमाच कौतुक वाटत शत्रु असावा तर चीन सारखा. आपण चाणक्य नितीच्या पुस्तकाची पुजा करतो दिल्लीतल्या वस्त्यांना चाणक्याची नाव देतो डिप्लोमसीत चाणक्य निती प्रत्यक्षात आणताना मात्र चिनी अग्रेसर दिसतात.

पैसा's picture

25 Apr 2014 - 11:49 pm | पैसा

देवयानी खोब्रागडे प्रकरण अमेरिकेवर शेकले आणि त्यांच्या बाजूने एकही निर्विवाद असा मुद्दा नाही, तरी ते परत चार्जेस लावतच आहेत. आणि इकडे भारतात मात्र चांगले हातात सापडलेले परदेशी गुन्हेगार जवळपास सोडून दिल्यात जमा आहेत. त्यातही सुप्रीम कोर्टाने दखल घेतली म्हणून हे प्रकरण इतपत ताणले गेले. नाहीतर सगळं गुंडाळण्याची तयारी झालीच होती. अमेरिकन अधिकार्‍याने पाकिस्तानात दोन नागरिकांना गोळ्या घालून ठार मारले आणि इटलीच्या सैनिकांनी भारतीय कोळ्यांना मारले. शेवट परिणाम एकच. गुन्हेगार असे अलगद सुटून जाणार असतील तर भारत आणि पाकिस्तानच्या दर्जात काय फरक राहिला?

म्हणजे पंचनाम्यात लिहितांना लिहिले "बंदुकीच्या गोळ्यांची माळ करून गळ्यात घातली" त्यामुळे भारतीय कोळी चक्क हार्ट अॅटॅक ने आपणहून मेले!

आपल्याकडे एकच कर्ता पुरुष होता व माय!
आज विलासरावांची लई लई आठवण येते व माय!
रामू ला घेवून लगेच पिक्चर चे लोकेशन बघायला आले असते ते व माय!

खटपट्या's picture

25 Apr 2014 - 10:17 pm | खटपट्या

फोटोमधील दोघांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास (माज) हेच दाखवतोय कि "आपले कोण वाकडे करू शकत नाही, आपली ताई आहे आपल्याला वाचवायला"

ते दोघे

आत्मशून्य's picture

26 Apr 2014 - 6:49 am | आत्मशून्य

मर्डरर्स...