गेल्या महिन्यात कुटुंबीया समवेत केरळ राज्यी जाऊन आलो .
पुणे - मुंबई - एर्नाकुलम- मुन्नार- थेक्कडी - त्रिवेंद्रम - पुणे असा ६-७ दिवसाचा भेट ठरवला होता .

मुंबई - एर्नाकुलम दुरान्तो एक्स्प्रेस ने रात्री मुंबई सोडले.

रात्रीचा प्रवास असल्यामुळे कोकणातील निसर्ग व बोगदे पाहता आले नाही .
मडगाव सोडले आणि पहाट झाली.


सोबत मंगळूर लागले .

१८ - २० तासांच्या प्रवासानंतर एर्नाकुलम गाठले .
एर्नाकुलम म्हणजेच कोची किवा कोचीन .
ऑफ सिझन असल्याने हॉटेल बुकिंग वेळेवर केले .
कोचीन रेल्वे स्टेशन बाहेर कोचीन गेस्ट हाउस चांगले हॉटेल आहे .
जेवण पंजाबी मिळाले .
दुसर्या दिवशी सकाळीच उठून MARINE DRIVE ला भेट दिली .



MARINE DRIVE वरून दिसणारा समुद्र .


काही कारणास्तव फोर्ट कोची बघता आले नाही .
संध्याकाळी मुन्नार ला जाण्यासाठी आगेकूच केली .
मुन्नार म्हणजे हिल स्टेशन . कोचीन ला गर्मी तर मुन्नार ला थंडी .
मुन्नार गाव तसा छोटासा . इथले लोक CHRISTIAN असल्याने केरळ मध्ये चर्च जास्त पाहायला मिळतात .
रात्री मस्त मुक्काम करून दुसर्या दिवशी मुन्नार बघितले .


सगळे मळे हे संरक्षित आहेत .
आपल्याला आत मध्ये जाता येत नाही . (ट्राय केले तर येते पण ) . पण जाऊ नये . इथे हत्ती जास्त प्रमाणात आहेत . ते आत मध्ये येउन नासधूस करू नये म्हणून केलेलं हे कुम्पन. (करंट सोडलेले आहेत. )








मुन्नार ला चहाचे मळे बघायला मिळतात .
टाटा यांचे येथे संग्रहालय आहे. एन्ट्री फी रु. १०० /- .
मुन्नार Bus Stand च्या समोरच्या गल्लीत अस्सल केरळी जेवण मिळाले (नाव लक्षात नाही).
रस्सम भात व ५-६ चटण्या .

Bus Stand च्या बाजूलाच मार्केट आहे. वेगवेगळे मसाले मिळतात .
रात्री मुन्नार ला मुक्काम केला व दुसर्या दिवशी थेक्कडी साठी निघलो.
जाताना मसाल्याचे मळे पाहायला भेटले .
*** विलायची चे झाड . ***

*** विलायची ***
कच्ची विलायची.
खाताना चव नाही लागत पण वास येतो

*** बुरशी (दगडी फुल) ***
आपल्याकडे जे दगडी फुल म्हणून मसाल्यात वापरतात ते एक प्रकारची बुरशी आहे.
इथल्या वातावरणात हे आपोआप तयार होते .



कॉफ्फी बिन्स : केरळ मध्ये कॉफ्फी ची झाडे पण आहेत.

कथ्थकली ( मुन्नार)
हा इथला पारंपारिक नृत्य आहे .
अगदी तयारी पासून सगळे लाइव पाहायला मिळाले .
मेक अप हा पूर्ण नच्रल कलर ने करतात .

मुन्नार जवळ कुमिली गाव आहे . इथे पेरियार पार्क आहे .
सकाळी ६ ला बोटीने चक्कर मारली .






* ** अलेप्पी ** *
अल्लेपी ची खासियत म्हणजे हाउस बोटीतून Backwaters एन्जोय करणे .
मुक्काम करायचा असेल तर या किमान ५००० रु. /- पासून सुरु होतात .
३.-४ तासांसाठी रु. १२०० - १५०० /- लागतात .
बोटीतून अल्लेपिचा आजूबाजूचा परिसर बघता येतो .
इथले वायनाड लेक बघण्यासारखे आहे .
इथे लोकाल त्रांस्पोर्त म्हणून बोट वापरतात .
रु. ५ - २०/- तिकीट . कुठेही जा











प्रतिक्रिया
9 Apr 2014 - 2:41 pm | केदार-मिसळपाव
लिहीत रहा. थोडे अधिक वर्णन येवु द्या.
9 Apr 2014 - 2:46 pm | वैभव.पुणे
:)
9 Apr 2014 - 3:41 pm | वैभव.पुणे
प्रयत्न चालू आहे
9 Apr 2014 - 3:14 pm | कंजूस
फोटो भरपूर टाकलेत ते छान केलेत .चार दोन ओळीत प्रत्येक ठिकाणची माहिती लिहा ना .आणि मुख्य स्वत:च गेलात का टुअरमध्ये ?
9 Apr 2014 - 3:41 pm | वैभव.पुणे
प्रयत्न चालू आहे
9 Apr 2014 - 3:46 pm | अत्रुप्त आत्मा
+२
हां.....अता जमलय हो ... जरा! :D
9 Apr 2014 - 3:19 pm | vrushali n
अथ पासुन इती पर्यन्त लिहिलेत तुम्ही ....चांगल लिहिलेय (म्हणन्यापेक्शा मस्त फोटो आहेत)
9 Apr 2014 - 3:19 pm | vrushali n
अथ पासुन इती पर्यन्त लिहिलेत तुम्ही ....चांगल लिहिलेय (म्हणन्यापेक्शा मस्त फोटो आहेत)
9 Apr 2014 - 3:24 pm | त्रिवेणी
खरच तुम्हाला वेळ मिळेल तसे जरा सविस्तर लिहा ना, म्ह्णजे कुणाला जायचे असेल तर तुमच्या अनुभवांचा फायदा होईल.
9 Apr 2014 - 3:40 pm | वैभव.पुणे
प्रयत्न चालू आहे
9 Apr 2014 - 3:27 pm | दिपक.कुवेत
पण वर्णन थोड्क्यात का आटपलं? प्रत्येक जागेबद्दल अधीक विस्ताराने लिहिता आलं असतं कि!
9 Apr 2014 - 3:41 pm | वैभव.पुणे
प्रयत्न चालू आहे
9 Apr 2014 - 3:43 pm | प्यारे१
आमच्या गणेशानं 'वेळात वेळ' काढून टिपलेलं लिहीलेलं बघा केरळ वर.
http://www.misalpav.com/node/20240
9 Apr 2014 - 5:21 pm | प्रमोद देर्देकर
अरे वा एकाच दिवशी २ जिलेब्या पाडल्यत की राव! संपुर्ण वर्षाचा कोटा पुर्ण करताय की काय?
आता तसंच त्या महाबळेश्वाराच्या धाग्याला पण असाच वृत्तांत येवौद्या.
9 Apr 2014 - 5:37 pm | शिद
सौजन्यः वैभव.पुणे
9 Apr 2014 - 7:26 pm | शुचि
वेकम अॅबोर्ड! स्वागत आहे. फोटो आवडले.
9 Apr 2014 - 7:40 pm | जातवेद
अहो काय इंटरनेटचा कोटा संपत आलेला काय? नुसत्या मसाल्याच्या मळ्यावर एक लेख वडला असता की.
फोटो सुरेख खासकरून रस्त्याच्या वळणावरचा. आणि फोटोंना आकडे असतील तर नेमक्या प्रतिक्रीया देता येतात.
आता याला
म्हणून प्रतिक्रीया देउ नका :)
9 Apr 2014 - 10:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो. जरा अजून जास्त वर्णन टाका की !
9 Apr 2014 - 10:55 pm | आत्मशून्य
बॅ़क वॉटर सफारी, आणी कुठेही फिरा किमान ५०% मराठी पर्यटक दिसणार ... केरळ केरळ म्हणजे खरच केरळ आहे. देवाची भुमी हे विषेशण सार्थ करते.
11 Apr 2014 - 11:54 pm | तुमचा अभिषेक
छान फोटोज !
केरळला जायचे मागच्या वेळी हुकले ते अजून बायकोच्या शिव्या खातोय.
तुम्ही काय कसे गेलात आणि खर्चा साधारण किती आला याबद्दल निदान प्रतिसादात तरी लिहा ना.. फायदा होईल अनुभवाचा.
12 Apr 2014 - 1:51 pm | किसन शिंदे
या दिवाळीत केरळ फिक्स!!
14 Apr 2014 - 7:47 pm | शुचि
मज्जा आहे :) खरच अप्रतिम आहे केरळ. इतकं हिरवंगार आम्ही पावसाळ्यात (जुलै)पाहीले होते. इतके खंड्या पक्षी होते, भाताची खाचरं पाहीली.
अन खोबर्याच्या तेलातील, केळ्याच्या काचर्या (चिप्स) मस्तच.
14 Apr 2014 - 7:45 pm | अनन्न्या
पुढच्या मार्च एप्रिलमध्ये जायचेय. चांगली हॉटेल्स, किती दिवस लागतात, महत्त्वाच्या ठिकाणांचे सविस्तर वर्णन..... इ.
14 Apr 2014 - 10:37 pm | भाते
सर्वच फोटो छान आहेत. थोडक्यात आटोपते वर्णन खटकले. वेळ काढुन यावर एखादा सविस्तर माहिती देणारा लेख येऊ द्या.