काजू अक्रोड कतली

टक्कू's picture
टक्कू in पाककृती
30 Mar 2014 - 1:27 pm

उद्या गुढीपाडवा! नवीन वर्ष नवी आशा नवी सुरुवात. मागच्या गुढीपाडव्याला मी टक्कू हा माझा पाककृती ब्लॉग सुरु केला आणि बघता बघता तो एक वर्षाचा झाला. येत्या वर्षी हा ब्लॉग अजून चविष्ट आणि स्वादिष्ट बनवण्याचा माझा मानस आहे.

हाच मानस समोर ठेवून नवीन वर्षाची सुरुवात आपणासोबत एक नवीन गोड पदार्थ ठेवून करतेय. ही एक हटके प्रकारची कतली आहे. दोन पदार्थांचा बेमालूम संगम मी एका बर्फी मध्ये केला आहे आणि खरंच ते अप्रतिम झालंय. आपल्या सर्वांची आवडती काजू कतली .... आणि त्याच्या जोडीला अक्रोड हलवा! काय कशी वाटली कल्पना?

काजू कतली आणि अक्रोड हलव्याची प्राथमिक कृती मी rakskitchen आणि archanaskitchen या blogs वरून घेतली आहे. पण या combination साठी त्यात थोडेफार बदल केले आहेत. साखरेचे प्रमाण दोन्ही कृत्यांमध्ये कमी केले आहे कारण आपण दोन गोड पदार्थ एकत्र करून खाणार आहोत. :P

थोडंसं वेळखाऊ काम आहे खरं, पण खव्व्येगीरीसाठी काय पण! :) नाही का !?

अक्रोड हलवा साहित्य:

१ वाटी अक्रोडांची भरड आणि २ टे.स्पू. अक्रोडांची बारीक पूड
३/४ कप दूध
३/४ वाटीला थोडी कमी साखर (नुसता हलवा करायचा असेल तर ३/४ कप साखर)
२ टे.स्पू. तूप
१ टी.स्पू. वेलची पूड

कृती :

१. प्रथम जाड पॅन मध्ये तूप घ्यावे आणि त्यावर अक्रोडाची भरड खमंग भाजून घ्यावी. त्यामुळे अक्रोडाचा कच्चट वास निघून जातो.
२. नंतर त्यात दूध घालावे व मिश्रण एकत्र करावे. लगेच त्याला तूप सुटायला लागेल. आता त्यात अक्रोडची बारीक पूड आणि साखर घालावी.
३. हे मिश्रण छान एकत्र झाले कि विस्तव बंद करून त्यात वेलची पूड घालावी आणि मिश्रण थंड होण्यास ठेवावे.

1
2
3
4
5
6

आता काजू कतलीचा नंबर :)

काजू कतली साहित्य:

२ वाट्या काजू
१ सपाट वाटी साखर
१/२ वाटी पाणी
१ टे.स्पू. दूध आणि तूप (मिश्रण मळण्यासाठी)

कृती:

१. काजू मिक्सर मध्ये वाटून घ्यावेत. चांगली मोकळी पूड होण्यासाठी काजू रूम टेम्परेचर ला असावेत.
२. पाणी आणि साखर एका जाड पॅन मध्ये घ्यावे आणि त्याचा एक तारी पाक करावा. पाकाच्या माहितीसाठी खालील दुव्या वर टिचकी मारा. http://takkuuu.blogspot.in/2013/09/shaahirawabarfi.html
३. पाक झाला की त्यात काजू पूड घालावी व मिश्रण सारखे करावे. आता गॅस ची आच कमी करावी आणि ४-५ मिनिटे मिश्रण सतत हलवत राहावे.
४. पॅन ला मिश्रण लागणार नाही याची काळजी घ्यावी. साधारण मिश्रण एकत्र गोळा झाले कि थोडेसे हातात घेऊन त्याचा छोटा गोल करून बघावा. बोटांना चिकटले नाही कि मिश्रण तयार झाले असे समजावे.

1
2
3
4
5

काजू अक्रोड कतली कृती:

आता हे काजू मिश्रण ओट्यावर किंवा मोठ्या ताटामध्ये घ्यावे. तूपाचा आणि दुधाचा हात लावून हे मिश्रण मळावे आणि त्याचे दोन समान गोळे करावेत.

ओट्यावर थोडंसं तूप लावून एका गोळ्याची पोळी लाटावी. त्यावर आता अक्रोड हलवा पसरवावा. एका प्लास्टिक वर किंवा बटर पेपर वर दुसरा गोल लाटून घ्यावा आणि प्लास्टिक उलटे करून दुसरी पोळी अक्रोड हलव्याच्या थरावर ठेवावी. वरून एकदा लाटणे फिरवावे.

आता सुरीने तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात. अशा रीतीने आपली काजू अक्रोड कतली खाण्यास सज्ज आहे !

6
1
2
3
4

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

30 Mar 2014 - 2:35 pm | वामन देशमुख

अप्रतिम पाकृ, टक्कू!

सानिकास्वप्निल's picture

30 Mar 2014 - 3:03 pm | सानिकास्वप्निल

काजू-अक्रोड काँबी भन्नाट लागेल असे दिसतेय :)
पाकृ आवडली...तोंपासू

मनिष's picture

30 Mar 2014 - 3:11 pm | मनिष

कातिल कतली! :-)

पण एवढे कष्ट नाही होणार आमच्याने...तेंव्हा फोटोवरच समाधान! :-)

बाबा पाटील's picture

30 Mar 2014 - 3:56 pm | बाबा पाटील

आपली दोनच आवड.एक काजु कतली आणी ....पतली.

किसन शिंदे's picture

30 Mar 2014 - 3:57 pm | किसन शिंदे

खायला येऊ का?? :D

अत्रुप्त आत्मा's picture

30 Mar 2014 - 4:10 pm | अत्रुप्त आत्मा

सर्व फोटुंमधून हळूहळू गतप्राण होत होत शेवटच्या फोटूमधून वारल्या गेलो आहे...

एकदम चोक्क्स्... लास्टवाला फोटो जोए ने हुं तो मरी गयो... ;)

जय श्री कॄष्ण... :)

{मदन मोदी} ;)

मस्त मस्त ! रिच रेसेपी एकदम :)

रेवती's picture

30 Mar 2014 - 5:08 pm | रेवती

असेच म्हणते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2014 - 5:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडेश.

-दिलीप बिरुटे

अनन्न्या's picture

30 Mar 2014 - 5:45 pm | अनन्न्या

फोटो पाहून तोंपासू!!!!!!!!!!!!!!

निवेदित's picture

30 Mar 2014 - 6:36 pm | निवेदित

अप्रतिम

वेल्लाभट's picture

30 Mar 2014 - 7:28 pm | वेल्लाभट

तुम्ही सगळ्यांनी फक्त फोटो बघितलेत...
मी हा पदार्थ प्रत्यक्ष चाखलाय.
केवळ जबरदस्त!

सुहास झेले's picture

30 Mar 2014 - 7:39 pm | सुहास झेले

भारीच.... :)

अजया's picture

30 Mar 2014 - 10:11 pm | अजया

मस्त!

इन्दुसुता's picture

31 Mar 2014 - 12:07 am | इन्दुसुता

आवडली पाकॄ.
करुन बघायला हवी.

मी काय्येक पाह्यलं किंवा वाचलं नाहीय इथे येऊन. ;)

गणपा's picture

31 Mar 2014 - 3:02 pm | गणपा

अजुन एक त्रास देण्यार्‍या आयडीची भर. ;)

दुसर्‍या कुणी म्हटलं असतं तर लगेच्च +१ केलं असतं पण हे म्हणजे बिन लादेन नं प्रभाकरनला 'उग्र आतंकवादी' म्हणण्यासारखं आहे. (त्यातल्या त्यात हीच बरी तुलना सापडली)

प्रभाकरनची काजु कतली आवडली हे वे सां न लगे

मनिष's picture

1 Apr 2014 - 5:08 pm | मनिष

+१ :-)

मस्त दिसताहेत काजू अक्रोड कतली...

भारि... मे अक्रोड केलि होति पन हे सन्द्विच खुप अवडल

मुक्त विहारि's picture

2 Apr 2014 - 12:23 am | मुक्त विहारि

आरोग्यवर्धक वड्यांची भर पडली..

कुणाला कशाचं नि कुणाला कशाचं!

असो. ;)
(ह घ्या हो मु वि. आम्ही मुळात विचारच नै करत :P )

सविता००१'s picture

2 Apr 2014 - 11:04 am | सविता००१

बघणारच करून

शुभा मोरे's picture

2 Apr 2014 - 1:27 pm | शुभा मोरे

*stop* *STOP* :stop: हे असं घरी नसतं बनवायचं...........

टक्कू's picture

2 Apr 2014 - 2:37 pm | टक्कू

माझी पाकृ आवडल्याबद्द धन्यवाद! :)

इशा१२३'s picture

3 Apr 2014 - 11:15 am | इशा१२३

मस्त काजू-अक्रोड आवडतातच...कतली छानच असणार..

पैसा's picture

3 Apr 2014 - 1:41 pm | पैसा

बॅन करायच्या आयडीत अजून एकाची भर!