काजू अक्रोड कतली
उद्या गुढीपाडवा! नवीन वर्ष नवी आशा नवी सुरुवात. मागच्या गुढीपाडव्याला मी टक्कू हा माझा पाककृती ब्लॉग सुरु केला आणि बघता बघता तो एक वर्षाचा झाला. येत्या वर्षी हा ब्लॉग अजून चविष्ट आणि स्वादिष्ट बनवण्याचा माझा मानस आहे.
हाच मानस समोर ठेवून नवीन वर्षाची सुरुवात आपणासोबत एक नवीन गोड पदार्थ ठेवून करतेय. ही एक हटके प्रकारची कतली आहे. दोन पदार्थांचा बेमालूम संगम मी एका बर्फी मध्ये केला आहे आणि खरंच ते अप्रतिम झालंय. आपल्या सर्वांची आवडती काजू कतली .... आणि त्याच्या जोडीला अक्रोड हलवा! काय कशी वाटली कल्पना?
काजू कतली आणि अक्रोड हलव्याची प्राथमिक कृती मी rakskitchen आणि archanaskitchen या blogs वरून घेतली आहे. पण या combination साठी त्यात थोडेफार बदल केले आहेत. साखरेचे प्रमाण दोन्ही कृत्यांमध्ये कमी केले आहे कारण आपण दोन गोड पदार्थ एकत्र करून खाणार आहोत. :P
थोडंसं वेळखाऊ काम आहे खरं, पण खव्व्येगीरीसाठी काय पण! :) नाही का !?
अक्रोड हलवा साहित्य:
१ वाटी अक्रोडांची भरड आणि २ टे.स्पू. अक्रोडांची बारीक पूड
३/४ कप दूध
३/४ वाटीला थोडी कमी साखर (नुसता हलवा करायचा असेल तर ३/४ कप साखर)
२ टे.स्पू. तूप
१ टी.स्पू. वेलची पूड
कृती :
१. प्रथम जाड पॅन मध्ये तूप घ्यावे आणि त्यावर अक्रोडाची भरड खमंग भाजून घ्यावी. त्यामुळे अक्रोडाचा कच्चट वास निघून जातो.
२. नंतर त्यात दूध घालावे व मिश्रण एकत्र करावे. लगेच त्याला तूप सुटायला लागेल. आता त्यात अक्रोडची बारीक पूड आणि साखर घालावी.
३. हे मिश्रण छान एकत्र झाले कि विस्तव बंद करून त्यात वेलची पूड घालावी आणि मिश्रण थंड होण्यास ठेवावे.
आता काजू कतलीचा नंबर :)
काजू कतली साहित्य:
२ वाट्या काजू
१ सपाट वाटी साखर
१/२ वाटी पाणी
१ टे.स्पू. दूध आणि तूप (मिश्रण मळण्यासाठी)
कृती:
१. काजू मिक्सर मध्ये वाटून घ्यावेत. चांगली मोकळी पूड होण्यासाठी काजू रूम टेम्परेचर ला असावेत.
२. पाणी आणि साखर एका जाड पॅन मध्ये घ्यावे आणि त्याचा एक तारी पाक करावा. पाकाच्या माहितीसाठी खालील दुव्या वर टिचकी मारा. http://takkuuu.blogspot.in/2013/09/shaahirawabarfi.html
३. पाक झाला की त्यात काजू पूड घालावी व मिश्रण सारखे करावे. आता गॅस ची आच कमी करावी आणि ४-५ मिनिटे मिश्रण सतत हलवत राहावे.
४. पॅन ला मिश्रण लागणार नाही याची काळजी घ्यावी. साधारण मिश्रण एकत्र गोळा झाले कि थोडेसे हातात घेऊन त्याचा छोटा गोल करून बघावा. बोटांना चिकटले नाही कि मिश्रण तयार झाले असे समजावे.
काजू अक्रोड कतली कृती:
आता हे काजू मिश्रण ओट्यावर किंवा मोठ्या ताटामध्ये घ्यावे. तूपाचा आणि दुधाचा हात लावून हे मिश्रण मळावे आणि त्याचे दोन समान गोळे करावेत.
ओट्यावर थोडंसं तूप लावून एका गोळ्याची पोळी लाटावी. त्यावर आता अक्रोड हलवा पसरवावा. एका प्लास्टिक वर किंवा बटर पेपर वर दुसरा गोल लाटून घ्यावा आणि प्लास्टिक उलटे करून दुसरी पोळी अक्रोड हलव्याच्या थरावर ठेवावी. वरून एकदा लाटणे फिरवावे.
आता सुरीने तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात. अशा रीतीने आपली काजू अक्रोड कतली खाण्यास सज्ज आहे !

वाचने
9688
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
प्रतिक्रिया
अप्रतिम
पाकृ मस्तं
कातिल कतली!
झकास..
क्लास!!!!!
सर्व फोटुंमधून हळूहळू गतप्राण
एकदम चोक्क्स्... लास्टवाला
मस्त मस्त ! रिच रेसेपी एकदम
In reply to मस्त मस्त ! रिच रेसेपी एकदम by पियुशा
असेच म्हणते.
फोटो लै भन्नाट
वेगळेच कॉम्बीनेशन!
अप्रतिम
तुम्ही सगळ्यांनी फक्त फोटो
भारीच....
मस्त!
आवडली पाकॄ. करुन बघायला हवी.
मी काय्येक पाह्यलं किंवा
पाककृती आवाडली आहे.
In reply to पाककृती आवाडली आहे. by गणपा
दुसर्या कुणी म्हटलं असतं तर
In reply to दुसर्या कुणी म्हटलं असतं तर by प्यारे१
+१
मस्त दिसताहेत काजू अक्रोड
भारि... मे अक्रोड केलि होति
चला अजून एका
In reply to चला अजून एका by मुक्त विहारि
कुणाला कशाचं नि कुणाला कशाचं!
भारी...
हे असं घरी नसतं बनवायचं......
माझी पाकृ
आवडली...
दुष्ट!