मागून येणार्‍याला मी दरवाजा उघडा धरून ठेवते.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
26 Jul 2008 - 9:54 am
गाभा: 

"मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं एका अनोळख्या कडून हे एका रेस्टॉरंट मधे शिकले."

त्यादिवशी आम्ही एका सेमिनारला गेलो होतो.ललिता प्रधान माझ्या बरोबरच काम करते.सेमिनार संपल्यानंतर मी दरवाजातून बाहेर पडत असताना दरवाजा रोखून धरून उभी असलेली तिला पाहून मी तिच्या बरोबर गप्पा मारतच उभा राहिलो.नंतर आम्ही दोघं कॅन्टिन मधे जावून एक एक कॉफीच्या कपावर गप्पा पुढे चालू ठेवित बोलत होतो.दरवाजा उघडा करून धरून ठवलेलं मी तिला यापूर्वीच एक दोनदा पाहिलं होतं म्हाणून ह्यावेळेला जरा कुतुहल म्हणून मी तिला विचारलं तेव्हा मला ललिता म्हणाली,

"हा विषय मी जरा माझ्या दृष्टीने मनाला लाऊन घेतल्यासारखा करते.काही लोक दरवाजा थोडासा तुमच्यासाठी उघडून धरतात असा की दरवाजा तुमच्यावर आपटणार नाही,पण कदाचीत तुमच्या मनगटाला इजा व्हायची संभव आहे.काही लोक तर दरवाजा सरळ सोडून देतात आणि तुमच्या तोंडावर जरी तो आपटला तरी ते मागे वळून पण पहात नाहीत आणि सॉरी पण म्हणत नाहीत.
आणि काही एकदम अनोळखे असून ते तुम्हाला एखादा छोटासा धडा शिकवून जातात.जणू सांगतात,
"तुम्ही लोकांसाठी दरवाजा उघडा करून धरून ठेवा."
हे मी एका अनोळख्या कडून शिकले.
एकदा मी अशीच शुक्रवारचा रात्रीचा एका रेस्टॉरंटमधे तट्ट जेवून वेटरला टेबलावर टीप ठेऊन एका मैत्रिणी बरोबर दरवाज्यातून बाहेर पडत होते.दुसर्‍या एका गृहस्थाने आपल्या येणार्‍या मित्रासाठी दरवाजा उघडा ठेऊन धरून ठेवला होता.तो दुसरा गृहस्थ अर्धा दरवाजातून बाहेर पडत असताना पहिल्याने त्याला कोपराने खूणावलं,त्या दुसर्‍याने त्याला रागाने खूणावून -तसच कोपर्‍याने खूणावून विचारलं" तुझा प्रॉबलेम काय आहे.?"
तो त्याला गंमतीत म्हणाला,
"तू स्त्रीयांसाठी नक्कीच दरवाजा उघडून धरून ठेवतोस बाकी"

मला अजून त्या प्रसंगाची आठवण येते ज्यावेळी त्याने माझ्यासाठी दरवाजा धरून ठेवला होता.आणि त्या प्रसंगाचा माझ्या मनावर निराळाच परिणाम झाला होता.जरी मी स्त्री असले आणि रीतरीवाजाने दरवाजा धरून जरी ठेवला नाही तरी मी तसा धरून ठेवते. कारण इतरानाही माझ्या सारखं वाटत असावं.
काही आठवड्या पूर्वी मी एका सेमिनारला गेली असताना माझी एक मैत्रिण आणि तिची आई दरवाजातून बाहेर येत असताना मी त्यांच्यासाठी दरवाजा धरून ठेवला होता एव्हडच नाही तर त्यांच्या मागून एक घोळका येत होता त्यांच्यासाठी पण मी दरवाजा धरून ठवला होता.मला मिळालेला त्या गृहस्थाकडचा धडा मला दुसर्‍याना पास-ऑन करायचा होता.
काय करतेस म्हणून माझ्या मैत्रिणिने मला विचारलं.आणि माझ्या बाजूला ती पण उभी राहिली.
"जे मी माझ्या मला वचन देऊन बसले होते ते मी करणार आहे."
ती माझ्याकडे जणू मी विचित्र आहे असंच बघत होती.
प्रत्येक जण त्या दरवाजातून जात होता त्या प्रत्येकाने माझ्याकडे बघून स्मित दिलं आणि आभार म्हणाले.आणि ते त्यांचे उद्गार मनापासूनचे होते असावे.
माझी मैत्रीण मला म्हणाली,
"आपल्या वयाचे लोक असं काही करीत नाहित."
तोपर्यंत शेवटचा माणूस दरवाजातून बाहेर पडला होता.आणि मग मी त्याच्या मागे दरवाजा सोडून दिला.
"तू पण असं कधीतरी करावंस"
असं मी तिला म्हणाले.सर्वच गोष्टी काही आपल्या आईवडिलांकडून आजी आजोबांकडून मित्रांकडून किंवा शाळेतून शिकायच्या नसतात काही.एखाद्दा एकदम अनोळखी माणसाकडून पण काही गोष्टी शिकायच्या असतात त्याचा मोठा परिणाम ही आपल्या जीवनावर होतो.

मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं एका अनोळख्या कडून हे एका रेस्टॉरंट मधे शिकले.
हे ऐकून मी मनात म्हणालो,
"लोकं बारिक बारिक गोष्टी पण किती मनाला लावून घेतात.कौतूक करण्यासारखं आहे"

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Jul 2008 - 6:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, (चालेल ना?)

काही वाक्य वाचताना माझा जाम गोंधळ झाला, पण विचार एकदम पटले. माझ्यासाठी कोणी दरवाजा उघडा ठेवावा अशी (स्त्री-सुलभ?) अपेक्षा मी ठेवत नाही पण मी दरवाजा उघडा ठेवते. आणि मी हे शिकले टाटा मूलभूत संशोधन संस्थेतल्या मोठमोठ्या वैज्ञानिकांकडून! आपल्या मोठेपणाचा बडेजाव न मिरवता माणसाला माणसाप्रमाणे वागवणारे शिक्षक मी तिथेच पहिल्यांदा पाहिले.

(छोटी) अदिती

श्रीकृष्ण सामंत's picture

27 Jul 2008 - 1:22 am | श्रीकृष्ण सामंत

हलो आदिती,
मला काका म्हटलं तर नक्की चालेल.तुला कदाचीत माहित ही असेल की पंजाबीत लहान बाळाला "काका" म्हणतात.
राजेश खन्नाला लहानपणापासून काका म्हणतात.गंमत म्हणून अजूनही त्याला काकाच म्हणतात.
मी काही पंजाबी नाही.तेव्हा "नावात काय आहे" असं जरी म्हटलं तरी तुझा उद्देश आदरार्थी म्हणण्याचा आहे हे मला कळतं.बद्दल आभार.
तुझा वाचताना गोंधळ कशामुळे झाला त्याचं मला कुतुहल आहे.तू पण दरवाजा उघडा धरून ठेवतेस हे वाचून बरं वाटलं.आणि त्याहुनही वाचून बरं वाटलं की ते तू tifr मधे शिकलीस.tifr बद्दल जे तू पुढे लिहितेस ते वाचून मला खूपच आनंद झाला.I am proud of you and I am proud of tifr.
टाटा इन्सटिट्युट्चा मी ऋणी आहे. त्या वयात मला दुरून का होईना जगविख्यात शास्त्रज्ञ पाहायला मिळाले.
Prof.H.C Urey केमिस्ट्री
Prof.Teller,Prof.Patrick Blackett,Prof.J. Robert Oppenheimer ऍटम बॉम्ब
Prof Kosambi गणीत
Dr.MGK Menon कॉस्मीक रे
Dr.Bhabha
हे तर आमचे डायरेक्टरच होते म्हणा.
तुझीही नेचर मधे लिहिण्याची इच्छा नक्कीच पुरी होईल.आणि त्याबद्दल तुला माझ्या शुभेच्छा.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

हि पद्धत मी जर्मनीत पाहीली.

ऑफिस, रेस्त्राँ अशा बहुसंख्य सार्वजनीक ठिकाणी लोक, अनोळखी लोकांसाठिहि दार उघडून धरतात. शेवटचा माणुस दारातुन बाहेर पडेपर्यंत हे केले जाते. लोक जास्त असतील तर हि पद्धत साखळी प्रक्रीयेने केली जाते.

जर्मन लोकांकडुन अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या जसे:

सकाळी रस्त्यावरुन जाताना अनोळखी माणसालासुद्धा गुड मॉर्नींग म्हणणे.
दुकानात शिरताना व बाहेर पडताना दुकानदार व ग्राहक एकमेकांनां अभिवादनपर वाक्ये म्हणतात.
रेस्त्राँ मधुन बाहेर पडताना सर्वांचा निरोप घेतात (बसलेले लोक माहीतीचे असोत अथवा नसोत).
परस्परांशी बोलताना मृदु शब्दात बोलतात. भारतीय माणसाला सुरवातीला ते कुजबुजत बोलतायत असे वाटते.

ह्यातल्या अनेक गोष्टि मी अंगीकारल्या व भारतात आल्यावरही आजतागायत सुरु ठेवल्या.
व्यवहारात लोकांची आपल्याशी वागण्याची पद्धत बदलल्याचा, ती अधिक चांगली झाल्याचा अनुभव आला.

थोडेसे विषयांतर:
भारतीय कंपन्यांच्या तुलनेत आणखी बघायला मिळालेला प्रकार म्हणजे, कोणतेही काम जर्मनीत अर्जंट नसते.
तर ते नीटनेटके व लयीत (एका विशिष्ट वेगाने) करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे त्यांचे काम आमच्यापेक्षा चांगले व वेळेते उरकते. अर्जंट कामात चुका होऊन त्या निस्तरणे व पुनरावृत्ती करावी लागणे टळते. आजच्या दिवसात किती काम उरकायचे हे सकाळी, किंबहुना आदल्या दिवशी संध्याकाळीच ठरते. बहुसंख जर्मन कंपन्या शुक्रवारी अर्धादिवस व शनीवार-रवीवार सुट्टी घेऊनही उत्तम दर्जाची उत्पादने बनवतात.

जर्मन समाजाचे हे यश, त्यांच्या संस्काराचे व शिस्तीचे यश आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

27 Jul 2008 - 1:33 am | श्रीकृष्ण सामंत

संजयजी,
खूपच अभ्यासून आणि इंटरेस्टिंग करून लिहिलेली माहिती वाचून बरं
वाटलं.जर्मन लोकाची वागण्याची पद्धत फार इंप्रेसिव्ह आहे.
आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

स्वाती दिनेश's picture

27 Jul 2008 - 11:15 am | स्वाती दिनेश

ऑफिस, रेस्त्राँ अशा बहुसंख्य सार्वजनीक ठिकाणी लोक, अनोळखी लोकांसाठिहि दार उघडून धरतात. शेवटचा माणुस दारातुन बाहेर पडेपर्यंत हे केले जाते. लोक जास्त असतील तर हि पद्धत साखळी प्रक्रीयेने केली जाते.
अगदी.. आणि तीच पध्दत नकळत आपल्यातही मुरत जाते.
रेस्तराँ किवा बाग,रेल्वेस्टेशन किवा अगदी रेल्वेमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणी जेवणाच्या वेळी आपल्या आजू बाजूचे लोकं जर जेवायला सुरूवात करणार असतील तर त्यांना 'गुटन आपिटिट' म्हणजे आपल्या 'सावकाश होऊ द्या..' सारखे अभिवादन आवर्जून करतात.अगदी टीसी सकट सगळे जण!

स्वाती

धोंडोपंत's picture

26 Jul 2008 - 10:31 pm | धोंडोपंत

वा वा,

सामंतसाहेबांकडून अजून एक उत्तम लेख.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

श्रीकृष्ण सामंत's picture

27 Jul 2008 - 1:35 am | श्रीकृष्ण सामंत

धोंडोपंतजी,
आपल्याला वाचून बरं वाटलं हे वाचून आनंद झाला
आभार

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com