जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का
ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत
माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते
प्रतिक्रिया
16 Mar 2014 - 11:07 pm | आयुर्हित
राखी सावंत चा घोर अपमान केला आहे आपण.
राखी सावंत स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी जगते,असे "गुढग्याला बाशिन्ग"(मला याचे नाव घ्यायला हि लाज वाटते) ला मिळालेल्या जनतेच्या पैशावर नाही.
17 Mar 2014 - 4:50 am | विकास
राखी सावंत स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी जगते,असे "गुढग्याला बाशिन्ग"(मला याचे नाव घ्यायला हि लाज वाटते) ला मिळालेल्या जनतेच्या पैशावर नाही.
अगदी मी हेच म्हणणार होतो. त्या निमित्ताने राखी सावंतचे केजरीवाल संदर्भातील मत बघण्यासारखे आहे...(मला वाटते हे एके मुख्यमंत्री असतानाचे अथवा त्याही आधीचे आहे...)
17 Mar 2014 - 5:00 am | आत्मशून्य
तर कोणाला कशाचे. असो, राखी सावंतचे अंबानी बाबतचे मतही जाणुन घ्यायला आवडेल.
17 Mar 2014 - 12:00 pm | मंदार दिलीप जोशी
राखी सावंत स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी जगते,असे "गुढग्याला बाशिन्ग"(मला याचे नाव घ्यायला हि लाज वाटते) ला मिळालेल्या जनतेच्या पैशावर नाही.
हान तिचायला!!! येकदम बराबर
17 Mar 2014 - 2:03 pm | तुमचा अभिषेक
सर्वप्रथम राखी सावंत - पहिला विचार हाच मनात आलेला, कि राखी सावंतला कशाला उगाच बदनाम केले गेले.
तसेच एक धोक्याची सूचना म्हणजे तिला या धाग्याची खबर लागली तर ती बदनामीचा दावाही ठोकू शकते, हे असे तिने आधीही केलेय.
असो, बाकी केजरीवाल यांनी मोदींच्या विरोधात उभे राहण्याचा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राजकारणात चांगली वाईट माणसे ओळखणे फार कठीण. जो तो आपल्या सोयीने आपल्या पक्षाच्या लोकांना चांगला बोलतो. पण केजरीवाल बाबत एक गोष्ट मान्य करावीच लागेल की अत्यंत बुद्धीमान माणूस आहे तो.
आता वाराणसीला काहीही होवो, ऐनवेळी खुद्द केजरीवालच तिथून माघार घेतील आणि पुन्हा एकदा चर्चा तर होणारच. एकंदरीत त्या मतदारसंघात काहीही होऊ दे पण हि चर्चा या निवडणूकीत केंद्रस्थानी राहून त्याचा फायदा आता `आप'ला देशभरात होणार.
इतर पक्ष देशभरात प्रचारयात्रा अन हेलिकॉप्टरची उड्डाणे भरत पायपीट करून मतदारांपर्यंत पोहोचतात त्या ऐवजी केजरीवाल हे असे मास्टरस्ट्रोक खेळत आपले नाव घराघरात पोहोचवत आहेत. हा पक्ष खरेच काही महिन्यांपूर्वीचाच आहे यावर विश्वास बसने कठीण व्हावे इतक्या वेगाने हा देशव्यापी बनत चालला आहे आणि याचे सारे श्रेय या अश्याच क्लृप्त्यांना जाते.
17 Mar 2014 - 2:04 pm | तुमचा अभिषेक
केजरीवाल यांचे विरोधक तेच करत आहेत जे केजरीवाल यांना हवे आहे.
या धाग्याने शंभरी वा द्विशतक गाठणे यात केजरीवाल यांचाच विजय आहे.
21 Mar 2014 - 2:50 am | निनाद मुक्काम प...
केजू मोदींवर खाजगी विमानाने फिरण्याचा आरोप करतो. स्वतः मात्र वेळ आली की आयोजकांच्या खर्चाने इमानातून फिरतो
पण केजू नीच नाही रे
तो जनतेला फक्त .......
21 Mar 2014 - 3:00 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
जबर्याच =))
21 Mar 2014 - 3:10 pm | श्रीगुरुजी
अहो केजू विमानात नाही बसत. आम आदमी बसतो. केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा ते म्हणाले होते की आज अरविंदने शपथ नही ली है, आम आदमी ने मुख्यमंत्रीपद की शपथ ली है! केजरीवाल जेव्हा १० खोल्यांच्या निवासात रहायला गेले (सरकारी निवासस्थान कधीही घेणार नाही ही प्रतिज्ञा मोडून), तेव्हा अरविंद नये घर में नही गया है, बल्की आम आदमी गया है!
ते जे काही करतात ते, ते स्वतः करत नसून आम आदमी करत असतो.
18 Mar 2014 - 11:01 am | मिसळलेला काव्यप्रेमी
अगदी अगदी, फक्त एक छोटीसी सुधारणा:
हे असे हवे:
;)
16 Mar 2014 - 11:26 pm | क्लिंटन
केजरीवाल या गृहस्थाविषयी माझे मत मी अनेकदा मिपावरच लिहिले आहे त्यामुळे त्याची पुनरावृत्ती नको.तरीही तुमच्या लेखातील केजरीवालविषयक मतांना अगदी +१०० असे लिहितो.
तरीही वाराणसी लोकसभा मतदारसंघ तितका सुरक्षित आहे का याविषयीची पुढील आकडेवारी प्रसिध्द करत आहे.यावरून लक्षात येईल की २००९ च्या निवडणुकीत मुरली मनोहर जोशींचा २.६% ने विजय झाला होता.२००४ मध्ये पक्षाचा पराभवच झाला होता.त्यामानाने १९९० च्या दशकात बऱ्यापैकी आरामात विजय पक्षाला मिळत होता.
table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}
निवडणुकभाजपबसपकॉंग्रेससप/मित्रपक्षइतरएकूण
१९९१४१.१%७.२%१२.७%२.२%३६.७%१००.०%
१९९६४४.६%१२.५%४.०%२६.७%१२.२%१००.०%
१९९८४३.०%१५.७%९.९%१९.४%१२.०%१००.०%
१९९९३३.९%१२.०%२५.५%१२.६%१६.०%१००.०%
२००४२३.६%९.४%३२.७%९.३%२५.०%१००.०%
२००९३०.५%२७.९%१०.०%१८.६%१३.०%१००.०%
जर केजरीवाल इतर सगळ्या विरोधी पक्षांच्या पाठिंब्यानिशी उभा राहिला (किंवा सप-बसप-कॉंग्रेस यांनी आपले उमेदवार उभे केले नाहीत) तर मात्र मोदींना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुक तितकी सोपी जाणार नाही असे वाटते. १९९९ मध्ये बेल्लारी (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या सोनिया गांधींविरूध्द भाजपच्या सुषमा स्वराज उमेदवार होत्या आणि ती लढत बऱ्यापैकी हाय प्रोफाईल झाली होती.त्यावेळी केवळ जनता दल (धर्मनिरपेक्षने) आपला उमेदवार उभा केला होता.इतर कोणी अपक्ष उमेदवारही तिथे उभा राहिला नाही. तसे वाराणसीत झाल्यास लढत अगदीच एकतर्फी होईल असे वाटत नाही.अर्थातच मोदींचा पराभव होईल असे मी नक्कीच म्हणत नाही.तरीही वाराणसी वाटते तितकी सेफ सीट आहे का याचा विचार जरूर व्हावा.
16 Mar 2014 - 11:57 pm | निनाद मुक्काम प...
सहमत आहे.ह्या तक्त्यातील माहिती वाचली की धर्मनिरपेक्ष पक्ष
मोदी विरुद्ध प्रतीस्पर्ध्धी उभे करणार नाहीत असे प्रथम दर्शनी वाटते.
पण राजकारणात मुरलेल्या मोदी व अमित शहा शहाला काटशह देण्यास प्रसिद्ध व तरबेज आहेत.
सध्याच्या वाराणसी मतदार संघात मोदी ह्यांचे धुमकेतू प्रमाणे आगमन झाले आहे. ते उत्तर प्रदेशातून निवडणूक लढतील हे त्यांच्या समर्थकांना काय पण विरोधकांना सुद्धा वाटले नव्हते.
तेथील स्थानिक भाजपचे कार्यकर्ते त्यांना दिल से मदत करतील. का
तेथील भाजपचे विद्यमान खासदार जोशी साहेब चांगली जागा सोडायची म्हणून नाराज होते. त्यांच्या समर्थक गडबड करू शकतात.
उत्तर प्रदेश हा दिल्लीच्या तख्ताची चावी असल्याने व बाजूला बिहार असल्याने तेथून लढून मोदी ह्या राज्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
केजरीवाल ह्यांना भारतात अनेक मतदारसंघात चांगले पर्याय आहेत ,एक खासदार म्हणून लोकपाल कायद्यासाठी ते प्रयत्न करू शकत होते. .
पण त्यांच्या अश्या वागण्याने खुद त्यांचे समर्थक बुचकळ्यात पडले आहेत.सध्या मोदींना त्यांच्या मतदार संघात अडकून ठेवायचे अशी त्यांची नीती आहे
आता प्रसार माध्यमांनी सगळे लक्ष वाराणसी वर ठेवले तर
शोलेचा डायलॉग म्हणायची वेळ येईल.
अब तेरा क्या होगा पप्पू
.
17 Mar 2014 - 3:00 am | आत्मशून्य
विदा हवा होता.
17 Mar 2014 - 11:34 pm | संपत
+१
18 Mar 2014 - 12:13 am | विकास
कुठेतरी वाचल्याप्रमाणे जोशींना वाराणसी मधे पुन्हा निवडून येणे अवघड होते. त्यामुळे जरी त्यांनी वरकरणी नाराजी दाखवली असली तरी मनात कुठेतरी सेफ मतदारसंघ मिळाल्यामुळे बरेच वाटले असावे.
आत्ताच्या घडीस भाजपामधील कोणी मोदींच्या विरोधात जाईल असे वाटत नाही. ही निवडणूक म्हणजे भाजपामधील मुरलेल्या राजकारण्यांसाठी त्यांच्या राजकीय आयुष्यातील "now or never" अशी आहे. त्यामुळे जो पर्यंत कुणी काँग्रेसचा छुपा समर्थक नाही तो पर्यंत या वेळेस कोणी फार गडबड करून सिट्स कमी करेल असे वाटत नाही...
17 Mar 2014 - 2:50 am | अर्धवटराव
केजरीवालांचे आणि त्यांच्या पक्षाचे आर्थीक, परराष्ट्रीय संबंध वगैरे बाबतीत काय धोरण आहे याची फारशी पर्वा करायचे कारण नाहि. केजरीवाल म्हणतात कि चांगल्या लोकांना राजकारणात आणा, बाकि सर्व आपोआप ठीक होईल...आणि हा मुद्दा नक्कीच सेलेबल आहे. शिवाय त्यांच्या हाती केंदीय सत्ता यायचे चान्सेस कमिच आहेत, त्यामुळे त्यांना सत्ताप्राप्तीनंतर ते काय करतील याचा जाब कोणि विचारणार नाहि.
मुख्य मुद्दा असा कि केजरीवालांना जे परिवर्तन अपेक्षीत आहे त्याकरता त्यांनी राज्य पातळीवर सरकार स्थापुन प्रयत्न करायला हवे कि केंद्र पातळीवर. केंद्राचा अगदी बेभरवशाचा घास गिळायला त्यांनी राज्याचं वाढुन ठेवलेलं ताट ठोकरलं. भाजपला शक्य तेव्हढं नुकसान पोचवुन केजरीवाल राज्यात परतले तरी अस्थीर केंद्र त्यांना परत परत खेचणार व त्यात त्यांचं राजकीय नुकसान होणार. अर्थात, त्यांना याच कामासाठी काँग्रेसने उभं केलं असेल तर हि इज डुइंग हिज जॉब वेल. अन्यथा, केजरीवाल अनावश्यक जुगार खेळताहेत असं वाटतं.
वाराणसी सीट मोदींकरता सोपी नाहि. केजरीवालांकरता देखील नाहि. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन राजकारणात उतरलेल्या केजरीसाहेबांनी जर एखाद्या अत्यंत कलंकीत काँग्रेसीविरुद्ध सीट लढवली असती तर केजरींचा उद्देश अधीक स्वच्छ्पणे लोकांचा नजरेत आला असता. मोदिंची सध्याची इमेज भ्रष्टाचारी म्हणुन नाहि. मोदिंना अंगावर घेऊन केजरीवालांनी काहि प्रमाणात सुशासनाला प्राधान्य देणार्या मध्यमवर्गाची नाराजी ओढावुन घेतली आहे. ते काँग्रेसचे एजंट असल्याचा आरोप आणखी दृढ होईल त्यामुळे. नॉट गुड फॉर हिज लाँग रन पॉलिटिक्स.
17 Mar 2014 - 3:13 am | आत्मशून्य
आज देशाला मजबूत सुशासनासोबत कठोर विरोधी पक्षाचीही गरज आहे. आणि सध्या यासाठी एकमेव योग्य पर्याय फक्त आम आदमी पार्टीच देऊ शकेल. अरविन्दाचे सगळे उमेदवार जरी जिंकले तरी तो सत्ता स्थापन करण्या इतका मोठा पक्ष असणार नाही मग त्याला इतके फुटेज का ?
उगा त्याला फ़ुक्ट्चे प्रचंड फुटेज देऊन लक्ष कोंग्रेस वरून विचलित करायचे आणि फुटेज देताना मात्र तो कोंगी हस्तक आहे असे उठसुठ पिल्लू सोडायचे ज्यातून तो अन कोंग्रेस दोन्ही बदनाम होतील व शानुभुतिला अपात्र ठरतील इतकाच खेळ चालु आहे.
17 Mar 2014 - 3:27 am | निनाद मुक्काम प...
तुमच्यामते तो त्याचा पक्ष हयंची विरोधी पक्ष म्हणून देशाला गरज आहे त्यात ते नित्य नियमाने प्रसिद्ध व्यक्तींवर आरोप करतात.. मुलाखती देतात. सतत प्रकाश झोतात राहण्यासाठी जे काही करावे लागते ते करतात.
त्यांचा अभ्यास दौर्यातून प्रसार माध्यमांचा अभ्यास , गृहपाठ तयार होतात.
मग फुटेज तो बनता हे
त्यांच्या जीवावर सध्या प्रसार माध्यमे पोळी भाजून घेत आहेत.
काही वर्षांनी मूळ लेखात म्हटले तसे झलक दिख ला जा
सेलेब्रेटी स्पेशल मध्ये ते नक्कीच दिसतील.
एक प्रश्न उरतो
अण्णा हजारे ह्या निवडणुकीत काय करणार आहेत.
आणि त्यांनी काही केले तर देशातील राजकीय समीकरण बदलतील का
ह्यावर सुद्धा चर्चा होऊ दे
मला स्वतःला अण्णांची सध्याची भूमिका काय व का आहे हे कोडे उलघडले नाही आहे.
17 Mar 2014 - 3:36 am | आत्मशून्य
माहीत नाही पण त्यांचे दिल्लितले उपोषण खरे तर केजरिवालाचे आंदोलन होते हे सिध्द तेंव्हाच झाले जेंव्हा तसा प्रयोग अन्ना पुन्हा करू शकले नाहित आणि तुमच्या अभ्यासाप्रमाने कोंग्रेस हस्तक असलेल्या केजुने कोंग्रेसला धूळ चारली. होय धुळ आपनेच चारली कारण नया है वो.
असो विरोधी पक्षाचे काम कारभारावर वाचक असणे हे आहे. आणि तुम्ही म्हणता तो तमाशा करण्यात अरविंदा तयार असेल तर तोच एकमेव लायक पक्ष वाटतो ज्याच्या कृतिंची धास्ती सत्तधारी पक्ष कायम बाळ्गेल.
17 Mar 2014 - 7:39 pm | विवेकपटाईत
च्यायला शेरखानची राजनीती समजणे अत्यंत गरजेचे. दिल्लीत तवाकीने शिकार करून, शिकार शेरखानच्या ताब्यातच दिल्ली. तसेच पुढे ही होणार.
दिल्लीच्या आंदोलना बाबत लोक त्रासलेले होते. कुणीही मंचावर उभा राहिला असता तर लोकांनी त्याला साथ दिली असते.
सत्तापक्षाला मुळीच भीती वाटत नाही आहे त्याच्या मुळे एन डी ए ला २१० पर्यंत थांविण्यात यश आल तर शेरखान तावकीला निश्चितच पुरस्कृत करेलच.
लोकपाल ही माणूस राहणार आणि सत्तापक्षच त्याची नियुक्ती करेल. 'तोते' प्रमाणेच त्याचा वापर होईल. किंवा आपला माणूस असेल लोकपाल किती तरी वर्षे 'शांतता जाचं चल रही है'. भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सिस्टम सुधारावी लागेल. लोकपालची काहीही गरज नाही.
17 Mar 2014 - 2:01 pm | मंदार दिलीप जोशी
:D
19 Mar 2014 - 12:11 pm | वेताळ
आमचा एक मित्र आप कडुन सांगली जिल्ह्यातुन निवडणुकी उभा राहणार होता. त्याने परदेशातील नोकरी सोडुन एक वर्षापासुन सांगली जिल्ह्यत काम सुरे देखिल केले.त्याला खुप चांगला प्रतिसाद मिळत होता. सत्ताधार्यानी त्याच्या कामाची दखल आणि धडकी घेतली. त्याच्या जवळच्या लोकांना धमकी देण्यापर्यत ते गेले.सांगलीत कॉग्रेसचा खासदार व केंद्रिय मंत्री आहेत.
आता परवा त्याला लोकसभेचे तिकिट मिळणार असे असतानाच त्याचे तिकिट आप कडुन कापुन एका नवख्या उमेद्वाराला तिकिट मिळाले.कालच धुलवडीला त्याला मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीने खालील माहिती दिली ती त्याच्या शब्दात
"सांगली जिल्ह्यात " आप " चे काम करतोय अशी ओळख करून दे असे बोललो. त्यानेही तसेच सांगितले आणि नाव सांगितले नाही, तसे साहेब एकदम गंभीर झाले आणि एकदम हसु लागले. " आप " बीप काही नाही, इथे सगळे आमचेच चालते म्हणाले, मग १० मिनिट " आप " कॉंग्रेस, भाजप यांच्यातील नात्यावर लेक्चर दिले. ऐकुन जाम बोअर होत होते म्हणुन दोघेही निघतो म्हणालो, तेवढ्यात मित्राचा हात हातात पकडुन खाली बस म्हणाले, आणि आता मजा ऐक म्हणले, कुणाला बोलु नको हा फ़ेमस डायलॉग पण मारला. शेवटी नाईलाजस्तव खाली बसलो, रीतिरिवाजाप्रमाणे साहेबांनी काही घेणार बिणार का असेही विचारले आणि सर्व प्रकारचा माल आहे असे सुनावले. आणि बोलत बोलत एक पेग घश्याखाली ढकलला. आणि म्हणाले ऐक आता - " ते वडगावचे एक पोरग कोणतरी आलंय ना परदेशातन त्याला वाटल असेल कि तिकेट मिळेल आणि जोरात लढीन, तर त्याच बरोबर हुत आणि खरच जर त्याला मिळाल असत तर तगडी फाईट पण झाली असती. पण आमच्या मंत्रीमहोदयांच्या राजकारणापुढे त्याचा काय टिकाव लागणार, भले भले गुंडाळुन ठेवलेत त्यांनी. मागच्या महिन्यात मुंबईत साहेबांनी एक मिटिंग घेतली आणि काय कारभार करायचा तो पद्धतशीरपणे केला, CM होते त्या मिटींगला, CM च आणि त्या madam च चांगलंच जमते. त्यामुळे काम सोप झाल, नाहीतर तस काम अवघड झाल असते. पण एक सांगतो ते पोरग लय हुशार आहे बघ आणि त्याला चांगला स्कोप पण आहे." अजुनही काही गोष्ठी सांगितल्या ज्या इथे सांगु शकत नाही.
मग ह्यावर तुमचे म्हनणे काय आहे. आमच्या मित्राला अन्ना हजारेनी अपक्ष उभे राहण्याचा सल्ला दिला आहे. केजरीने अन्नाचां पण भ्रमनिराश्या केली आहे.
17 Mar 2014 - 10:24 pm | आनन्दा
त्याचीच तर काळजी आहे... मी श्री. केजरीवालना कमी लेखत नाही, आणि हीच माझी काळजी आहे. या तिरंगी लढतीच्या निमित्ताने भारतीय लोकशाहीची लक्तरे निघु नयेत एव्हढीच इच्छा आहे.
श्री केजरीवाल यांच्यामुळे मतविभाजन होउन जर परत कोंग्रेसला बहुमत मिळाले, तर त्यासारखे लाजीरवाणे काही नसेल.
केजरीवालांनी आधी स्वतःला कुठेतरी राज्यात सिद्ध करावे आणि मग देशव्यापी निवडणूकांमध्ये सहभाग द्यावा असे माझे पहिल्यापासून आणि अजूनही मत आहे. (जसे गुडविल मोदींकडे आहे.)
17 Mar 2014 - 3:18 am | निनाद मुक्काम प...
केजरीवालांचे आणि त्यांच्या पक्षाचे आर्थीक, परराष्ट्रीय संबंध वगैरे बाबतीत काय धोरण आहे याची फारशी पर्वा करायचे कारण नाहि. केजरीवाल म्हणतात कि चांगल्या लोकांना राजकारणात आणा, बाकि सर्व आपोआप ठीक होईल...आणि हा मुद्दा नक्कीच सेलेबल आहे.
चांगली माणसे म्हणजे मनमोहन सिंग सारखी आता त्यांच्या सारख्या सुज्ञ लोकांना राजकारणात आणायचे ,पद द्यायची
मग केजू सोनिया ची जागा घेणार , म्हणजे परत एकदा पक्षात बोलका पोपट व जो केजू विरुद्ध बोलला त्याला बाहेर चा रस्ता
नवीन हायकमांड उदयास आले आहे.
त्यांच्या पक्षातील लोक तिकीट मिळाले नाही म्हुणुन बंडखोरी केली. ह्या लोकांनी सत्ता मिळण्याआधी परिवर्तन व अ जून कसले कसले दावे केले होते.
त्यामुळे सेलेबेल मुद्दा केव्हाच निकालात निघाला आहे.
17 Mar 2014 - 5:17 am | अर्धवटराव
ममो वैयक्तीक रित्या कितीही स्वच्छ असले तरी ते चांगले राजकारणी नाहितच. काँग्रेसचे सर्व बाबतीतले धोरण जाहिर होते व लोकांनी त्यापक्षाला सत्ता दिली. म्हणजे पक्षाची धोरणं जाहिर असणं आणि पक्षाने इमानदारीने काम करणं या भिन्न गोष्टी आहेत. केजरीवालांचं इमानदार व्यक्तींना राजकारणात आणायचं धोरणच त्यांच्या पक्षाला दिल्लीत यश देऊन गेलं व आता दिवसेंदीवस त्यांचा प्रभाव वाढत चाललाय तो याच पार्श्वभूमीवर. काँग्रेस अॅक्च्युली २०१६ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करतेय असाही एक मतप्रवाह आहे. तोपर्यंत केजरीवालने भाजपचं करायच ते नुकसान केलं असेल, आआप दिल्लीमधे ठाणबंद झाला असेल, व काँग्रेसवरचा लोकांचा राग बर्यापैकी कमि झाला असेल.
अडचणीत असताना काँग्रेसला कुणाच्यातरी "बलीदानाने" फायदा होत आला आहे. सध्या केजरीसाहेब वारंवार भगतसिंहाचं बलिदान आपल्या वाट्याला यावं म्हणुन टाहो फोडताहेत. असा काहि राडा झालाच तर जनतेच्या रोषाचा पहिला वार भाजपवर बसेल. आआपला त्यांचं कुठलंही धोरण स्पष्ट करण्याची काहिच गरज नाहिए. जनतेनेच स्वच्छ लोकांच्या पाठिशी उभं राहावं असा त्यांचा प्रचार त्यांना बळ द्यायाला पुरेसा आहे.
17 Mar 2014 - 5:45 am | आत्मशून्य
17 Mar 2014 - 5:54 am | अर्धवटराव
=))
आठवलं... बहुतेक पुलंच्या पाखरांची शाळा नाटकातलं आहे.
17 Mar 2014 - 3:48 am | आत्मशून्य
करोडो चा सुपरस्टार आधीच चित्रपटात असताना वरुन नुसत्या एका गाण्यासाठी तरी का असाव्या लागतात ? लोकांना त्या हव्यात म्हणूनच ना ? मग त्यांचे आयटम सॉंग गाजतय तर तुमच्या सुपर स्टार हिरोच्या पोटात का दुखावे ?
कितीही ठुमकली तरी सिल्क स्मिता माधुरी थोडीच बनणार आहे ? मग एव्हडा वैचारिक राडा कशाला ?
17 Mar 2014 - 4:12 am | आत्मशून्य
कसला डोम्ब्लाचा हाय कमांड हो केजु ?
संपादितप्रतिसादात व्यक्तिगत पातळीची टिप्पणी टाळावी.
थोडक्यात काय तर पक्ष म्हणून एक शिस्त, व्यवस्था ही निर्माण करावीच लागते. लगेच आशा स्थितीला हायकमांड पद का बहाल करता ?
रिमोट कंट्रोल वर टिका रिमोट कंट्रोल अस्तित्वात आहे म्हणून झाली नाही असे नसून तो चुकीच्या पध्दतीने वापरला गेला नाही म्हणुन झाली नाही हे विसरु नये. अन्यथा सोनिया मोदी अरविंदाआणि इतर माननियांना पक्षावर पकड़ ठेवली म्हणून एकाच पंक्तीत बसवायची घोड़चुक कराल
17 Mar 2014 - 8:39 am | विवेकपटाईत
केजरीवालच्या संस्थाना फोर्ड फौंडेशन कडून दान मिळते (दान देताना अमेरिकन संस्थांचा काय हेतू असतो या साठी हिस्ट्री चेनेल वरचे जुने कार्यक्रम पहा. फेसबुकच्या माध्यमातून त्रस्त तरुणांना मूर्ख बनविता येत उदा: इजिप्त .
राखी सावंतची केजरीवाल बरोबर तुलना करणे राखी सावंतचा अपमान करणे असेच आहे. गादीवर येताच शीला दीक्षितच्या घोटाळ्यांची चौकशी करण्याचा दावा करणार्याने गादी वर आल्या वर या बाबतीत मौन पाळले.
बाकी 'तवाकी नावाचा तरस
21 Mar 2014 - 3:31 pm | चैतन्य ईन्या
http://news.oneindia.in/new-delhi/video-aap-leader-ashutosh-runs-away-fr...
कठीण आहे. म्हणजे दिल्लीतल्या लोकांना ह्या केजरीवाल ने चांगलाच मामा बनवले. आणि अनेक लोक ह्याच्या मागे लागली आहे. उत्तम डावपेच खेळतो आहे पण हा माणूस पण तसाच निघणार. त्यात त्याचा दोष नाहीये. मुळातच भारतीय लोकांना नियम पाळणे आणि दुसऱ्याचा विचार करणे जमत नाही. फक्त आणि फक्त स्वतःचे पाहणे फार तर आपल्या जातीचे आणि उरलेल्या वेळात सगळ्यांना दोष देणे. आधी हा केजरीवाल चांगला वाटला पण ज्या पद्धतीने लोकसभेसाठी दिल्लीतुने पळून गेला हे अजिबात क्षम्य नाह्ये. राज्य चालावायाचेच नव्हते तर फुकट शपथ घेण्यावर पैसे कशाला वाया घालवले? वर युक्तिवाद हां की बाकीचे घालवतात मग आह्मी का नाही. म्हणजे थोडक्यात सोयीचे राजकारण करायचे पण आव असा आणायचा की आपण एकमेव महान व्यक्तिमत्व. असो. गम्मत म्हणजे ज्या लोकांना मोदी आवडत नाही ते सगळे आता केज्रीवालच्या मागे उभे आहेत. हा स्वतः काहीही कमी हुमुकशह नाहीये पण मोदी एकाच लक्ष्य असल्याने केजरीवाल च्या सगळ्या चुका क्षम्य आहेत.
17 Mar 2014 - 9:23 am | वेल्लाभट
मला नाही वाटत.
परवा त्याची मुलाखतही ऐकली वागळेंनी घेतलेली. He talks sense.
17 Mar 2014 - 11:40 am | संजय क्षीरसागर
Of Course. The very fact that he intends to contest against Modi shows his Clarity & Guts. BJP has chosen the electorate with all calculations & this fellow has staked his image point blank! One single defeat ....& he will be washed-out of politics & still he is not afraid.
मला या माणसाचं सतत कौतुक वाटत आलं आहे आणि ते जर मोदींविरुद्ध उभे राहिले (२३ तारखेला निर्णय होईल) तर तो निर्णय त्यांच्या अंतरबाह्य एकसंधतेचा निर्विवाद पुरावा ठरेल. मग निकालाची फिकिर नाही.
17 Mar 2014 - 11:58 am | आयुर्हित
एक म्हण आहे "जो दुसर्यासाठी खड्डा खणतो, तो स्वत:च काद्द्यात जातो"
अजून एक म्हण आहे "विनाशकाले विपरीत बुद्धी"
या दोन्ही म्हणी लवकरच खऱ्या ठरतील अशी अपेक्षा आहे.
पण अजून एक म्हण आहे "बंदर कुलांटी मारना नही भूलता"
असे बंदर स्वत:तर काही काम करत नाहीच, पण दुसऱ्या चांगल्या माणसांनाही करू देत नाही.
अशाने देश बुडायला वेळ लागणार नाही.
त्यामुळे मला तुमचेही आश्चर्य वाटते, आपल्या सारखी सुज्ञ, अशा बंदरांची जाहिरात का करतात?
17 Mar 2014 - 12:23 pm | संजय क्षीरसागर
याविषयी मला शंका नाही! केजरीवालांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा का याचा विचार करा:
केजरीवाल विथ वागळे, स्ट्रेट टू द पॉइंट!
17 Mar 2014 - 12:27 pm | मंदार दिलीप जोशी
आमचा आधीच बदलला आहे दृष्टीकोन का काय तो.
केजरीवाल विथ वागळे? आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. :D
17 Mar 2014 - 1:07 pm | संजय क्षीरसागर
तर दृष्टीकोन कसा बदलेल? आणि मी विचारलं होतं की त्या फौंडेशन्स अमेरिकी विचारसरणी जगावर लादण्याचा प्रयत्न करतायंत हा तुमचा मुद्दा विवादासाठी ग्राह्य धरला तरी अरविंद केजरीवालांना मदत करुन त्यांचा हेतू कसा साधेल? यावर तुमच्याकडे उत्तर नाही.
17 Mar 2014 - 1:12 pm | मंदार दिलीप जोशी
तुम्ही प्रतिसाद पुन्हा वाचा. मुळात "आआपाला सपोर्ट करुन तो शक्य होणं असंभव आहे" हेच मुळी तुमच्या चुकीच्या गृहितकावर किंवा पूर्वग्रहदूषित असल्याने त्यावर काय बोलणार?
आप हे माध्यम आहे. साधन आहे. त्याने साध्य कसे आणि हाय होणार हे प्रतिसादातच उघड आल्याने पुन्हा फिरवून प्रश्न विचारून उत्तर आलं नाही की "जितं मया" करत जल्लोष साजरा करायचा असेल तर जरूर करा.
http://www.misalpav.com/node/27026?page=2#comment-563648
17 Mar 2014 - 1:37 pm | प्यारे१
यु एस बी फॉरमॅट केल्याशिवाय नि आधीचं डीलिट केल्याशिवाय नवीन डेटा घेत नाही. करप्ट झालीये. ;)
17 Mar 2014 - 4:38 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही (किंवा लेखकानं) म्हटलंय (आणि तिथे उधृत केलंय) :
यात केजरीवाल अजिबात बसत नाहीत.
बाय द वे, घंटीचंद आरती करता करता (अनेकदा) तोंडघशी पडलेत त्यामुळे त्यांची संपूर्ण हार्डडिस्कच फॉर्म्याट करायला लागणार आहे. त्यांना उत्तर समजणार नाही.
17 Mar 2014 - 6:02 pm | मंदार दिलीप जोशी
जरा वाट बघा, समजेल तुम्हाला. सगळं उघड होत नसतं हो, पण छुपा प्रचार ओळखायला ती नजर लागते. तुम्ही जौद्याते
17 Mar 2014 - 7:45 pm | संजय क्षीरसागर
तुमचा आधीचा प्रतिसाद असा आहे:
आणि आता तुमच्याकडे मुद्दाच नाही म्हटल्यावर:
अशी सारवासारव केलीये! हे वाचण्यापुरती नजर असली की झालं! तुमचा प्रतिसाद तिथेही व्यर्थ होता आणि इथेही व्यर्थ आहे.
18 Mar 2014 - 9:40 am | मंदार दिलीप जोशी
बरं ब्वॉ. आमचा व्यर्थ. तुमचा बरोबर आणि चान चान. झालं? :D
18 Mar 2014 - 9:41 am | मंदार दिलीप जोशी
पुन्हा सांगतो. इंग्रजीत असला तरी मूळ प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचा. त्यातच आणि त्यातच सगळे आहे. नसेल समजत तर मग आंतरराष्ट्रीय राजकारणच काय भारतीय राजकारणावरही टिप्पण्या करण्याइतपत तुम्ही क्वालिफईड नाही हेच खरे.
17 Mar 2014 - 7:18 pm | निनाद मुक्काम प...
यात केजरीवाल अजिबात बसत नाहीत.
काहीतरी गैर समज झाला आहे.
अमेरिकन जीवन शैली ,चंगळवाद हा कोणत्याही देशात प्रगती सोबत आपसूकच कमी अधिक प्रमाणात झिरपला आहे.
केजरीवाल ह्यांची त्यासाठी गरज नाही.
मात्र अमेरिकेचा स्वतःचा एक अजेंडा आहे ,उर्वरीत जगात विशेतः तिसर्या जगात त्यांना लुडबुड करायची असते. ह्यासाठी त्यांना लोकशाही असलेल्या देशात राजकारणी लोकांमध्ये आपले हस्तक घुसवावे लागतात तर वेळप्रसंगी ते हुकुमशाही सुद्धा उत्तेजन व पाठिंबा देतात जसा सुरवातीला मुशरफ ला दिला.
आज पाकिस्तानी राजकारणात अमेरिकी आशीर्वादाशिवाय
पंतप्रधान व राष्ट्रपती निवडला जात नाही ह्या मानाने भारतात इतके दिवस त्यांना लुडबुड करता येत नव्हती ,
17 Mar 2014 - 7:59 pm | संजय क्षीरसागर
तुमचा! कारण मंदार जोशींचा शोध असायं की फोर्ड फौंडेशन केजरीवालांना मदत करतंय कारण त्यांना अमेरिकी जीवनशैली भारतावर लादायचीये. आणि मी म्हणतो केजरीवालांच्या थ्रू कोणत्याही तर्कानं ते अशक्य आहे.
आणि तुम्ही माझाच मुद्दा मला सांगतायं
पुढे तुम्ही लुडबूड वगैरे कायकाय लिहीलंय ते अगम्य आहे कारण त्याचा माझ्या प्रतिसादाशी काहीही संबंध नाही.... मुक्काम कुठे का असेना!
18 Mar 2014 - 12:29 am | निनाद मुक्काम प...
@ ते अगम्य आहे
भारताबाहेर कधी पडलात तर अगम्य अश्या अनेक गोष्टी
तुम्हाला प्रगत देश तिसर्या जगातील देशात करतांना आढळून येतील.
तिसर्या जगात परकीय पैशावर अनेक एनजीओ कुत्र्याच्या छत्री सारखे उगवलेले आढळतील.
पण ह्या पैकी काही तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती करून ग्यायाचे नसेल तर अज्ञातात सुख असते हेच खरे
18 Mar 2014 - 9:48 am | मंदार दिलीप जोशी
पण ह्या पैकी काही तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती करून ग्यायाचे नसेल तर अज्ञातात सुख असते हेच खरे
अगदी अगदी.
21 Mar 2014 - 3:58 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो अज्ञान नाही ते. ती आंधळी भक्ती.
18 Mar 2014 - 5:50 pm | श्रीगुरुजी
>>> मात्र अमेरिकेचा स्वतःचा एक अजेंडा आहे ,उर्वरीत जगात विशेतः तिसर्या जगात त्यांना लुडबुड करायची असते. ह्यासाठी त्यांना लोकशाही असलेल्या देशात राजकारणी लोकांमध्ये आपले हस्तक घुसवावे लागतात तर वेळप्रसंगी ते हुकुमशाही सुद्धा उत्तेजन व पाठिंबा देतात जसा सुरवातीला मुशरफ ला दिला.
सहमत! अमेरिकेला जम्मू-काश्मिर हे भारताच्या नियंत्रणातून मुक्त असे हवे आहे, जेणेकरून लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या भागात स्वतःला लष्करी तळ उभारून आपला ताबा ठेवता येईल किंवा या प्रदेशाला स्वत:च्या अंकित ठेवता येईल. हा भाग भारताच्या ताब्यात असेपर्यंत हे शक्य नाही. म्हणूनच अरूंधती रॉय, प्रशांतभूषण, दिलीप पाडगावकर निधर्मांधांच्या तोंडातून "काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे" अशी मागणी वदवून घेतली जाते. ही मंडळी अमेरिकेच्या अजेंड्यानुसार वागत असतात. केजरीवालांच्या पक्षाला अमेरिकास्थित संस्थांकडून निधी मिळणे व त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे अशी मागणी करणे व पक्षाच्या वेबसाईटवर भारताचा नकाशा काश्मिरविरहीत दाखविणे हा योगायोग नव्हे. हा अमेरिकेच्या अजेंड्याचाच भाग आहे.