A.K.-अरविंद केजरीवाल....!(बंदे मे है दम !)
In reply to सव्यसाची धन्यवाद.... by जयनीत
पण एक महत्वाचा मुद्दा. जे सरकार त्यांनी आणलेले बिल टेबल ही करू शकत नाही त्याचा अर्थ त्या सरकार वर सभागृहाचा विश्वास नाही हाच सरळ अर्थ होतो. थोडक्यात अविश्वास प्रस्ताव.जयनीतजी, सरकार त्यांचेच विधेयक प्रस्तुत करू शकले नाही कारण ते असंवैधानिक होते. तांत्रिकदृष्ट्या अचूक विधेयक प्रस्तुत करणे हे सरकारचेच काम असते, विरोधकांचे नाही. नायब राज्यपालांनी मनाई केल्यानंतर जर त्यांनी विधेयक प्रस्तुत केले तर ते चुकीचे होते आणि कमीत कमी इथे तर भाजप आणि कॉंग्रेस चे चुकले असे मला वाटत नाही.. याच धाग्यावरच्या २-३ प्रतिसादात मी हि संवैधानिक प्रक्रिया विषद केली आहे. आता त्याच मुद्द्यावरून राजीनामा द्यायचा निर्णय त्यांनी आधीच जाहीर केला होता म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यात अविश्वास प्रस्तावाचा संबंध आहे असे मला वाटत नाही. जर अर्थ विधेयक पारित करता आले नाही तर तो अविश्वास प्रस्ताव समजला जातो आणि सरकारला पायउतार व्हावे लागते.
In reply to पण एक महत्वाचा मुद्दा. जे by सव्यसाची
In reply to भो सव्यसाची, कळायचे बंद झाले by बॅटमॅन
In reply to एइला by इरसाल
In reply to जयनीत.......एक सांगा by वेताळ
In reply to केजरीवाल आपलेच सरकार पाडु by जयनीत
In reply to काही उत्तरे आणि मुद्दे... by विकास
In reply to विकास एक सांगा केजरीवालांनी अनिल अंबांनीं ना कोणता फायदा पोहचवला by जयनीत
In reply to उत्तरे by विकास
ती बातमी वाचली म्हणूनच लिहीले होते. शीला दिक्षितांपेक्षा कमी पैसा लागलेला असताना देखील माहिती देण्याची टाळाटाळ का? त्याशिवाय या माहितीत सगळा खर्च दिलेला नाही (उ.दा. अग्निशमन दल, पाणी वगैरे) कारण २०१० च्या अध्यादेशानुसार त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या विनंत्या कराव्या लागणार आहेत. अति आणि अतिअति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठीचा खर्च पण सांगितलेला नाही. या संबंधातील मुख्यमंत्री - मंत्रिमंडळाच्या बैठकीतले मुद्दे (मिनिट्स) देखील देण्यास नकार दिला आहे. माझ्या दृष्टीने जो काही खर्च असेल मामुली आहे. मुद्दा तो नसून, पारदर्शकतेचा अभाव हा मुद्दा आहे.खरंच हे तुमचे आक्षेप आहेत? थक्क झालो आहे हे प्रतिसाद वाचुन.
In reply to उत्तरे by विकास
कधी काळी असाच एक मसिहा व्हिपि सिंग यांनी वाटोळे केलेसहमत. वाटोळे केले हा जरी कडक शब्द असला तरी, जनता पक्ष, व्हिपि आणि भाजपनेदेखिल निराशा केली हे अमान्य करण्यात काहीच अर्थ नाही. आजदेखील माझा आआपला पाठींबा असला तरी ते अपेक्षांना उतरले तर आश्चर्यच वाटेल. पण सिनिकल होऊन काहीच फरक पडणार नाही. आआप जर त्यांच्या मार्गाने जाऊन यशस्वी ठरले (स्वच्छ निवडणूक, निर्णयांमध्ये लोकांचा सहभाग) तर एकूणच राजकारणाला वेगळे वळण लागेल. जसे आज सरसकट सर्व पक्षांचे कोंग्रेसीकारण झाले आहे तसे लोकांच्या रेट्यामुळे इतर पक्षांचे आआपकरण होऊ शकेल. आजच दिल्लीतील आआपच्या यशानंतर भाजपने घोडेबाजाराला नकार देणे किंवा राहुल गांधीचा लोकसहभागाचा, लोकपालाचा आग्रह हे आआप इफ्फेक्ट आपण पाहतो आहेच. शेवटी उम्मीद पे दुनिया कायम आहे.
In reply to उत्तरे by विकास
कधी काळी असाच एक मसिहा व्हिपि सिंग यांनी वाटोळे केलेसहमत. वाटोळे केले हा जरी कडक शब्द असला तरी, जनता पक्ष, व्हिपि आणि भाजपनेदेखिल निराशा केली हे अमान्य करण्यात काहीच अर्थ नाही. आजदेखील माझा आआपला पाठींबा असला तरी ते अपेक्षांना उतरले तर आश्चर्यच वाटेल. पण सिनिकल होऊन काहीच फरक पडणार नाही. आआप जर त्यांच्या मार्गाने जाऊन यशस्वी ठरले (स्वच्छ निवडणूक, निर्णयांमध्ये लोकांचा सहभाग) तर एकूणच राजकारणाला वेगळे वळण लागेल. जसे आज सरसकट सर्व पक्षांचे कोंग्रेसीकारण झाले आहे तसे लोकांच्या रेट्यामुळे इतर पक्षांचे आआपकरण होऊ शकेल. आजच दिल्लीतील आआपच्या यशानंतर भाजपने घोडेबाजाराला नकार देणे किंवा राहुल गांधीचा लोकसहभागाचा, लोकपालाचा आग्रह हे आआप इफ्फेक्ट आपण पाहतो आहेच. शेवटी उम्मीद पे दुनिया कायम आहे.
In reply to .कधी काळी असाच एक मसिहा by संपत
- आप समर्थकांची माफ केलेली थकबाकी आता न्यायालयाच्या स्थगितीत अडकली.
- भ्रष्टाचार विरोधात ज्या काही फोन लाईन्स चालू केल्या होत्या त्यांचे आता काय होणार? त्या आणि त्यांच्यावर केला गेलेला खर्च बाराच्या भावात?
- डीसकॉमकडे करदात्यांचे पैसे वळवले आणि त्यामुळे खर्चातली तूट भरून काढण्यासाठी मुलभूत सोयीसुविधांचे पैसे कमी केले.
- सोमनाथ भारतींच्या अक्षम्य कृत्यावर पांघरूण घालणे.
- मुकेश अंबानीवर उगाच तोफ डागली. म्हणजे अंबानी गरीब बिच्चारे आहेत असे नाही, पण त्यांच्या विरोधात नौटंकी. आता यादव म्हणतात की आम्हाला त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली तर ती आम्ही घेऊ. का बरं? आता नैतिकता कुठे गेली?
- आधी म्हणाले विरोधी पक्षात बसेन, मग जनता म्हणते म्हणून सत्ताग्रहण आणि नंतर जनतेला न विचारताच राजीनामा - ह्याला पोरकटपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे?
- बाकी जे काही पाणि आणि वीजेवरून निर्णय घेतले आहेत ते देखील मागे घेतले गेले तर आश्चर्य वाटायला नको.
- थोडक्यात जनतेने निवडून दिले पण जनतेसाठी काहीच केले नाही.
In reply to खुलासा... by विकास
आता यादव म्हणतात की आम्हाला त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली तर ती आम्ही घेऊ. का बरं? आता नैतिकता कुठे गेली?बद्दल तुम्ही तो व्हिडियो पाहिला आहे कि शीर्षक बघून चिकटवलेला आहे?
In reply to प्रथम एक स्पष्ट करतो कि मी by संपत
केजरीवाल हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून ग्रेट आहेत असेही माझे म्हणणे नाही कारण केवळ ५० दिवस हे काहीही मत बनवायला अपुरे आहेत असे मला वाटते.आणि स्वतः केजरीवाल ५० दिवसात हातातली सत्ता टाकून पळ काढत असतील तर स्वतःची मूठ कायम झाकलीच ठेवावी असेच त्यांना वाटत आहे असे म्हटले तर काय चुकले? वास्तविकपणे त्यांना अभिप्रेत असलेला लोकपाल आणता येत नसेल तरी जे काही त्यांच्या हातात आहे त्यावरून त्यांना कारभारावर आपली छाप नक्कीच दाखवता आली असती. उदाहरणार्थ दिल्ली राज्य सरकारच्या हातात जेवढे काही आहे त्यात अधिक पारदर्शक, अधिक गतीमान काम करून दाखविणे, नागरिकांना तक्रारीला वाव न ठेवणे असे करायला त्यांना कोणी अडविले होते? जर केंद्र सरकारचा २००२ चा आदेश घटनाबाह्य आहे असे त्यांचे मत होते तर दिल्ली सरकारच्या वतीने त्यांना त्या निर्णयाला कोर्टात आव्हान नक्कीच देता आले असते.आणि तो निर्णय येईपर्यंत इतर सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्यांना आपला अजेंडा राबवायला कोणी अडविले होते? आता ५० दिवसात पळून गेल्यामुळे (काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढला नसतानाही) यांना खरोखरच काही करायची इच्छाच नव्हती (किंवा इच्छा असली तरी क्षमता नव्हती) म्हणून पडत्या फळाची आज्ञा घेऊन ते पळून गेले असे म्हटले तर काय चुकले?
त्यांना ग्रेट म्हणण्यासाठी मी निदान ५ वर्षे तरी घेईन.....किंबहुना जर का आआपचा पर्याय नसता तर दगडापेक्षा वीट मउ म्हणून मी मोदिना पाठींबा दिला असता.या दोन वाक्यांमध्ये काहीही विसंगती जाणवत नाही का? काँग्रेस दगड आणि मोदी वीट इथपर्यंत मान्य. पण मग केजरीवाल हे स्पंज की लोखंड हे कोणत्या आधारावर ठरवायचे? ५० दिवस पुरे नाहीत हे मान्य पण अजून पाच वर्षे सत्तेत राहून त्यांना काहीतरी करून दाखवायचे आहे असे केजरीवाल मुख्यमंत्री असताना फारसे कधी जाणवलेले नाही.त्यांना घाई सत्तेबाहेर कधी जातो याची. म्हणजे केजरीवालांची पारख करायला एक तर पुरेसा आधार नाही आणि जो कालावधी त्यांना मिळाला होता त्यात स्वतःच बाहेर पडायची त्यांना घाई म्हणजे मतदारांना आपली पारख करायची संधीही मिळू नये!! आणि तरीही तुमच्यासारखे लोक त्यांना पाठिंबा देतात आणि लोकसभा निवडणुकीत मत द्यायचा विचार करतात हे बघून खरोखरच आश्चर्य वाटते.देशाचे पंतप्रधानपद एखाद्या जबाबदार व्यक्तीकडे जावे-त्या व्यक्तीने स्वतःला सिध्द करून दाखवले आहे आणि काहीतरी करायची इच्छा आणि क्षमता या दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीकडे आहेत अशाच व्यक्तीने पंतप्रधान बनावे असे तुम्हाला वाटत असावे असे दिसत नाही. सत्ता सांभाळले म्हणजे काहीतरी करायचे, झाले तर झाले नाही तर नाही अशा पध्दतीने घ्यायची गोष्ट नाही हे तुम्हाला पटत असावे ही अपेक्षा. इथे आआपमध्ये प्रशांत भूषण काश्मीरात सैन्य ठेवावे की नाही यावर सार्वमत घ्यायची गोष्ट करतो.मग श्रीनगरमध्ये आणि एल.ओ.सीवर काय याचे पंचे वाळत घालून दहशतवाद्यांशी सामना करायचा का? आआपमध्ये कमल मित्र चिनॉय नावाचा मनुष्य सामील होतो. हा कोण? तर हुरियत कॉन्फरन्समध्ये यासीन मलिक (की अन्य कोणी) आणि इतर नेते यात मतभेद झाल्यामुळे काश्मीरातील 'इंडियन स्टेट' विरूध्दचा लढा कमजोर होईल अशी त्याला भिती आहे. यांचे आर्थिक, परराष्ट्र धोरण, शेतीविषयक धोरण, सामाजिक धोरणे कशाचाही पत्ता नाही. एकाच छत्राखाली मेधा पाटकर सारख्या समाजवादी-डाव्या विचारांचे लोक आणि संजीव आगा-कॅप्टन गोपीनाथ यांच्यासारखे खुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा झालेले उजवे लोक.जर मोदींनी निवडणुकीआधीच मित्रपक्षांना दुखावले तर नंतर काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर असे परस्परविरोधी लोक एकत्र घेऊन आआपच्या आर्थिक धोरणाची दिशा नक्की कशी असेल हा प्रश्न तुम्हाला पडत नाही हेच आश्चर्य आहे.
त्यांना अजून बरेच शिकायचे पण हे शिकणे त्यांना कदाचित इतरांसारखेच बनवेल याचीही भीती वाटते.म्हणजे शिकाऊ उमेदवाराला डायरेक्ट कंपनीचा सी.ई.ओ करायचे का? आधी जे काही शिकायचे आहे ते त्यांनी शिकावे आणि मग राष्ट्रीय पातळीवरच्या महत्वाकांक्षा बाळगाव्यात.
In reply to काय सांगता राव by क्लिंटन
वास्तविकपणे त्यांना अभिप्रेत असलेला लोकपाल आणता येत नसेल तरी जे काही त्यांच्या हातात आहे त्यावरून त्यांना कारभारावर आपली छाप नक्कीच दाखवता आली असती.प्रत्येक पक्षाची राजकारणाची आपापली पद्धत असते. भाजप राम मंदिर आणि समान नागरी कायदा ह्या मुद्द्यांवर सत्तेवर आला, पण सहमतीच्या राजकारणासाठी ते मुद्दे रेटले नाहीत. आआपचा लोकपाल प्रमुख मुद्दा होता त्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. तुम्हाला भाजपची पद्धत पटते तर मला आआपची. तसेहि पुढील निवडणुकीत आप दिलीत बहुमतात येईल अशी आआप आणि मला आशा वाटते. त्यावेळी जाहीरनाम्यातील आश्वासने पाळणे त्यांना सोपे जाईल.
परस्परविरोधी लोक एकत्र घेऊन आआपच्या आर्थिक धोरणाची दिशा नक्की कशी असेलवेगवेगळ्या विचारांच्या लोकांना एकत्र घेऊन जाणे हेच खऱ्या लोकशाहीचे आणि नेत्याचे लक्षण आहे. केजरीवाल ह्या कसोटीला उतरतात कि नाही हे पुढे कळेल. आताच त्याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे? पण वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना आआपमध्ये स्थान आहे हीच गोष्ट मला अतिशय सकारात्मक वाटते.
शिकाऊ उमेदवाराला डायरेक्ट कंपनीचा सी.ई.ओ करायचे का?मोदि मुख्यमन्त्री होण्याआधी साधे राज्यमंत्रीही नव्हते. तरीही ते यशस्वी झालेच ना.. आताही त्यांना दिल्लीचा काय अनुभव आहे? कोणी ब्रांच मनेजरलादेखील सी.ई.ओ बनवत नाही. मग भाजपनेदेखील जेटली, स्वराज, अडवाणी ह्यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार वनवायला हवे होते काय?
In reply to वास्तविकपणे त्यांना अभिप्रेत by संपत
आआपचा लोकपाल प्रमुख मुद्दा होता त्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. तुम्हाला भाजपची पद्धत पटते तर मला आआपची.अर्थातच प्रत्येकाला कोणती पध्दत पटेल हा प्रत्येकाचा निर्णय झाला तरीही...
पुढील निवडणुकीत आप दिलीत बहुमतात येईल अशी आआप आणि मला आशा वाटते.आणि समजा आआपला बहुमत मिळाले नाही तर परत हे राजीनामा देऊन पळून जाणार का? दुसरे म्हणजे दिल्लीतील लोकपालचा मुद्दा विधानसभेतील बहुमताशी निगडीत होता असे खरोखरच तुम्हाला वाटते? कळीचा मुद्दा आहे केंद्र सरकारचा २००२ मधील कायदा ज्याअन्वये दिल्ली राज्य सरकारला कायदा केंद्र सरकारच्या मंजुरीनेच करता येईल हा. म्हणूनच उपराज्यपालांनी हे विधेयक विधानसभेत मांडू नये असे आआप सरकारला सांगितले.या परिस्थितीत अगदी आआपला बहुमत असते तरी काय फरक पडणार होता? जोपर्यंत तो २००२ चा कायदा आहे तोपर्यंत आआपला अगदी ७० पैकी ७० जागा मिळाल्या तरी काही फरक पडणार नाही.तेव्हा या कायद्याला न्यायालयात आव्हान देणे हा यातून बाहेर पडायचा मार्ग होता की राजीनामा देऊन पळून जाणे? तेव्हा उद्या अगदी आआपला बहुमत मिळाले तरी ही परिस्थिती कशी बदलणार आहे?
त्यावेळी जाहीरनाम्यातील आश्वासने पाळणे त्यांना सोपे जाईल.आताही जाहिरनाम्यातील ज्या मुद्द्यांविषयी काहीही वाद नव्हता ते मुद्दे पुढे का रेटले गेले नाहीत?
वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना एकत्र घेऊन जाणे हेच खऱ्या लोकशाहीचे आणि नेत्याचे लक्षण आहे. केजरीवाल ह्या कसोटीला उतरतात कि नाही हे पुढे कळेल. आताच त्याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहेपण जेव्हा ३५०-४०० जागा लढवून आपल्याला राष्ट्रीय महत्वाकांक्षा आहेत हे एखादा पक्ष स्पष्ट करतो तेव्हा अशा महत्वाच्या मुद्द्यांवर यांची भूमिका काय हे सांगायची जबाबदारी यांची नाही का?विशेषतः अनेक प्रकारचे लोक यांच्या कळपात आहेत म्हणून ही जबाबदारी जास्त आहे.
कोणी ब्रांच मनेजरलादेखील सी.ई.ओ बनवत नाही.ब्रांच मॅनेजरला सी.ई.ओ बनवायची जरातरी शक्यता आहे हो शिकाऊ उमेदवाराला सी.ई.ओ. बनवायची किती शक्यता आहे? असो. तुम्ही मुद्देसूद प्रतिसाद देत आहात यावरून तुम्हाला चर्चा करण्यात इंटरेस्ट आहे हे नक्कीच म्हणून इतके सगळे लिहित आहे.उगीचच काड्या घालणार्या इतर काही प्रतिसादांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष.
In reply to आआपचा लोकपाल प्रमुख मुद्दा by क्लिंटन
२००२ चा कायदा आहेमाझ्या अल्प माहितीप्रमाणे कायदा नव्हे तर उपराज्यपालांनी याचा काढलेला अर्थ महत्वाचा आहे. ते ह्या विधेयाकाकडे सहानुभूतीने पाहू शकले असते. पुढच्या वेळी (आलीच तर) आआप उपराज्यपालांना अधिक चांगले हाताळू शकतील असे वाटते. अर्थात लोकपाल प्रश्नावर राजीनामा हि राजकीय खेळी होती ह्यात वाद नाही पण पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता असताना त्यांनी ती का करू नये? हे घाणरडे राजकारण आहे असे मला वाटत नाही. राहिला प्रश्न निवडणुकांच्या खर्चाचा तर तो एक necessary evil आहे.
ते मुद्दे पुढे का रेटले गेले नाहीत?मला वाटते कि ते रेटले गेले. त्यांचा पाठपुरावा पुढच्या वेळेस केला जाईल असे वाटते.
महत्वाच्या मुद्द्यांवर यांची भूमिका कायते त्यांना जाहीरनाम्यात स्पष्ट करावेच लागेल. त्यावेळी आता आलेले काही पक्ष सोडतील अशीही शक्यता आहे.
तुम्ही मुद्देसूद प्रतिसाद देत आहाततुमच्याकडून ही पावती मिळाली ह्याचा आनंद झाला
In reply to २००२ चा कायदा आहे by संपत
55. (1) The Lieutenant Governor shall refer to the Central Government every legislative proposal, which (a ) if introduced in a Bill form and enacted by the Legislative Assembly, is required to be reserved for the consideration of the President under the proviso to sub-clause (c) of clause (3) of article 239 AA or, as the case may be, under the second proviso to section 24 of the act.(पूर्ण TBR पहायचे असल्यास आपण खालील संकेतस्थळावर पाहू शकता : http://www.mha.nic.in/acts) संसदेने लोकपाल कायदा पारित केल्यामुळे २३९ (AA) चे कलम ३(C) लागू होते. त्या कायद्यासाठी नायब राज्यपालांनी काय करायला हवे याचा हा नियम आहे. हे बरोबर कि चूक असा वाद तुम्ही घालूच शकता. पण जर तुम्ही चूक म्हणत असाल तर एकतर हा कायदा बदला किंवा न्यायालयामध्ये या कायद्याला आव्हान द्या. पण जोपर्यंत हा कायदा तिथे आहे तोपर्यंत तो सरकारवर बंधनकारक आहे. शिवाय अचूक विधेयक सदर करणे हे सरकारचेच काम आहे. ते दिल्ली सरकार (माजी ) करू शकले नाही. शिवाय त्यांना हा विषय अजूनही न्यायालयात नेला नाही. परंतु दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवटीच्या विरोधात मात्र ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. AAP moves Supreme Court against President’s rule in Delhi याचा अर्थ कसा लावायचा हे आता 'आप'ने सांगावे कारण मला तरी काही सुसंगती दिसत नाही.
In reply to संपतजी, by सव्यसाची
In reply to सव्यसाचीजी, माझे मत मी ह्या by संपत
"Why were the views of the Solicitor General sought when the Bill was not with the L-G? It appears from the events that have transpired that neither the Congress nor the BJP wants voting on the Delhi Jan Lokpal in the Assembly. And on what basis did the Solicitor General say that the bill, which was not even tabled in the Assembly, needs Presidential assent or permission from the Centre? This makes a mockery of the constitution and the Delhi Assembly,"खरेतर हे विधेयक सादर करण्याआधीच नायब राज्यपालांकडे सूचनांसाठी द्यायचे असते. आता केंद्रामध्ये अश्याच प्रकारचा एक कायदा असताना जनलोकपाल कायदा येऊ घातला आहे आणि त्यासाठी राज्यपालांच्या परवानगीची गरज आहे का हे राज्यपाल विचारूच शकतात. ते करून त्यांनी चूक केलीय हा जो काही प्रयत्न आहे तो कळला नाही. दिल्लीचा कायदा हे सांगतो कि केंद्रामध्ये असा कायदा असताना जनलोकपालसाठी राष्ट्रपतींची परवानगी लागणार आहेच. यात Solicitor General चे काय चुकले ते पण नाही कळले. Article २५५ मला जास्ती काही समजले नाही. पण थोडेसे कळले ते असे कि कुठलाही कायदा एखाद्या परवानगी किंवा सुचनेवाचून अडून राहणार नाही. आता तुम्ही म्हणाल कि मग हे का नाही केले राज्यपालांनी? पण राज्यपालांनी काहीतरी अनुचित केले असेही नाही.. जे दिल्लीच्या कायद्यामध्ये आहे आणि जे संविधानाचा भाग आहे तेच केले आहे. जर यावरती वाद असतील तर आप च्या सरकारने न्यायालयात जाऊन नायब राज्यपालांच्या या भूमिकेवर न्याय मागायला हवा होता. पण त्यांनी राजीनामा दिला. आता जाताना त्यांनी विधानसभा भंग करण्याचा सल्ला दिला. पण राज्यपालांनी तो मानला नाही कारण तो त्यांच्यावर बंधनकारक नाही पण त्याविरुद्ध मात्र आप सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. मग जनलोकपाल च्या मुद्द्यावर का नाही हा प्रश्न उरतोच.
In reply to संपतजी, by सव्यसाची
In reply to प्रथम एक स्पष्ट करतो कि मी by संपत
सत्ता मिळवण्याच्या आधीच त्यांनी नितीशकुमार आणि शिवसेनेसारख्या भाजपच्या मित्रांना दुखावले आहे. उद्या पंतप्रधान झाले तरी आघाडीच्या राजकारणात गुजरातमधील धडाडी त्यांना केंद्रात दाखवता येईल का याबद्दल संशयच आहे.आणि या केजरीवालांना आपल्या २८ पैकी सगळ्या आमदारांना एकत्र ठेवणेही शक्य झाले नव्हते त्याचे काय? विनोद कुमार बिन्नी काही दिवसातच त्यांना सोडून गेला.अन्य एका अपक्ष आमदाराने पाठिंबा काढून घेतला.हे सगळे ४५ दिवसांमध्ये. निदान मोदींनी गुजरातमध्ये धडाडी दाखवली हे तरी मान्य केलेत.मग एकीकडे १२ वर्षात गुजरातमध्ये दाखविलेली धडाडी आणि दुसरीकडे ५० दिवसात सत्ता सोडून पळून जाणे, रस्त्यावर रात्र घालवणे यासारखी नौटंकी आणि तरीही दुसरी बाजू वरचढ वाटते? तशी वाटत असेल तर तो एक भारतीय नागरिक आणि मतदार म्हणून प्रत्येकाला तो हक्क आहे.पण असे वाटणार्यांची मानसिकता माझ्या तरी आकलनाबाहेरची आहे. परत वरचाच मुद्दा: या केजरीवालना लोकपालाचा मुद्दा इतका महत्वाचा होता आणि सध्याच्या सेटअपमध्ये काही कायदेशीर अडचणींमुळे त्यांना तो लोकपाल आणता येत नसता तरी इतर गोष्टींमध्ये आपली कार्यक्षमता दाखवून देण्यापासून त्यांना कोणी रोखले होते? वाजपेयी सत्तेत असताना भाजपसाठी राममंदिर-कलम ३७०-समान नागरी कायदा हे मुद्दे महत्वाचे असूनही त्या सेट-अपमध्ये (लोकसभेत हे निर्णय घ्यायला लागणारे बहुमत नाही) या मुद्द्यांवर भर न देता इतर अजेंडा वाजपेयींनी राबविलाच ना? की राममंदिराला लोकसभेत पाठिंबा मिळत नाही म्हणून धरणे धरून लोकांना वेठीला धरले आणि नंतर राजीनामा देऊन पलायन केले?
In reply to राहिलेला मुद्दा by क्लिंटन
In reply to राहिलेला मुद्दा by क्लिंटन
In reply to बाकी सारे मुद्दे बोलून झालेले by जयनीत
In reply to बिन्नी by क्लिंटन
In reply to खुलासा... by विकास
In reply to केजरीवालांची कारकीर्द. by अर्धवटराव
In reply to केजरीवालांची कारकीर्द. by अर्धवटराव
लोकशाहीत अशी प्रशासनीक पद्धत योग्य आहे काय? एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर "नाहि".ह्या मुद्द्याशी मी सहमत नाही, त्यामळे बाकीच्या आर्गुमेंटला माझा पास. बाकी गम्मत म्हणजे मी शिवाजी महाराजांचे उदाहरण देणार होतो ते माझ्याआधी तुम्हीच दिलेत.
In reply to लोकशाहीत अशी प्रशासनीक पद्धत by संपत
In reply to मला तेच जाणुन घ्यायचं आहे. by अर्धवटराव
In reply to केजरीवाल मध्ये खरोखर काही गटस असत्यातर by वेताळ
In reply to बदल्या by क्लिंटन
In reply to मला तेच जाणुन घ्यायचं आहे. by अर्धवटराव
लोकभावनेला सिस्टीमचा पाया बनवता येत नाहि.आआप त्यापलीकडे गेले नाही तर माझीही निराशा होईल. पण लोक सहभागाशिवाय लोकशाही म्हणजे ५ वर्षांनी आपला राजा निवाडण्याचे स्वातंत्र एवढेच राहील असे मला वाटते.
केजरीवालांच्या राजकारणातल्या व्हॅक्युमबद्दल मी जे वर म्हटलय, त्याची काहितरी सकारात्मक बाजु असण्याची शक्यता मी नाकारलेली नाहि.ते अजून बनचुके बनले नाहीत हीच सकारात्मक बाजू. सर्व राजकीय पक्ष / पत्रकार स्वच्छ निवडणूक लढून जिंकणे शक्यच नाही हे ठासून सांगत होते (आणि मलाही ते मनोमन पटले होते) तेव्हा आपने ते करून दाखवले. राजकारणात ते मुरलेले असते तर त्यांनी हा मूर्खपणा कधीही केला नसता. अर्थात रुळल्यावर ते कसे वागतील हेही बघावे लागेल. अवांतर : इथे आआप आणि केजरीवाल समानार्थी वापरले जात आहेत. तसे प्रत्यक्षात होऊ नये अशीही अपेक्षा आहे.
In reply to लोकभावनेला सिस्टीमचा पाया by संपत
In reply to पब्लीक अवेअरनेस वेगळी गोष्ट आहे. by अर्धवटराव
In reply to पब्लीक अवेअरनेस वेगळी गोष्ट आहे. by अर्धवटराव
In reply to केजरीवाल आपलेच सरकार पाडु by जयनीत
पण उद्या ऑडीट झाल्यावर काय होईल? विजेचे दर बदलतील किंवा बदलणार नाहीत.आता ऑडिट करायचा आदेश देऊनही ते पूर्ण व्हायच्या आधीच त्याच डिस्ट्रीब्युशन कंपन्यांना ३७२ कोटींची सबसिडी अॅप्रोप्रिएअशन बिलमधून भारतातील सर्वात स्वच्छ सरकारने दिली यात काहीच विसंगती नाही? http://economictimes.indiatimes.com/articleshow/30551112.cms त्यांच्या मते या कंपन्या अकाऊंटिंगमध्ये फेरफार करून तोट्यात आहोत असे दाखवितात आणि लोकांना जास्त दराने वीज विकतात. त्यातले सत्य काय ते शोधायला ऑडिट करायचा आदेश दिला होता.मग ते पूर्ण व्हायच्या आधीच अशी खैरात वाटणे कसे समर्थनीय आहे? की या आम आदमी पक्षाच्या स्वच्छ सरकारने केले म्हणजे ते योग्यच असणार आणि त्याला प्रश्न विचारणारा भ्रष्ट ठरणार?
In reply to ऑडिट by क्लिंटन
की या आम आदमी पक्षाच्या स्वच्छ सरकारने केले म्हणजे ते योग्यच असणार आणि त्याला प्रश्न विचारणारा भ्रष्ट ठरणार?सहमत
In reply to ऑडिट by क्लिंटन
In reply to सबसिडी कंपन्यांना दिली कि by संपत
सबसिडी कंपन्यांना दिली कि लोकांना? म्हणजे सबसिडीमुळे कंपनीचा महसूल वाढला कि लोकांनी द्यायची रक्कम कमी झाली?बातमीमध्ये म्हटले आहे:"On Friday when Kejriwal resigned as chief minister, he also piloted the appropriation bill in the Delhi assembly to earmark Rs 372 crore towards subsidy dues to power companies." याचाच अर्थ सबसिडी कंपन्यांना द्यायची होती. बाकी सबसिडी देण्याची गोष्टच Appropriation bill मध्ये करणे ही मोठी विसंगती आहे.कारण यांच्या मते या discoms अकाऊंटिंगमध्ये फेरफार करून नसलेला तोटा दाखवतात (त्या तक्रारीची शहानिशा करायला ऑडिट करायचा आदेश त्यांनी दिला होता) म्हणजे खरे म्हणजे आआपच्या मते या कंपन्यांना सबसिडीची गरजच नाही. तरीही परत वरती त्याच कंपन्यांना सबसिडी द्यायची गोष्ट करणे म्हणजे सुध्दा स्वत:लाच contradict केल्यासारखे झाले. हे म्हणणार मुकेश अंबानी देश चालवतात आणि भाजप आणि काँग्रेस मुकेश अंबानींचे पित्ते आहेत.जर मुकेश अंबानी भ्रष्ट असतील तर अनील अंबानी सद्गुणाचे पुतळे आहेत असे म्हणता येईल असे वाटत नाही.तसेच राडिया टेपप्रकरणानंतर टाटासुध्दा जितका नैतिक मुल्यांचा उदोउदो करतात तशी सत्य परिस्थिती नाही असे म्हणायला नक्कीच जागा आहे.तरीही हे अनील अंबानींच्या दोन आणि टाटांच्या एका कंपनीला (स्वतःच्याच मते अशी कोणतीही गरज नसताना) सबसिडी देणार!! नैतिकतेचे बुरखे घालून स्वतःला भ्रष्टाचारापासून भारताला सुटका करून देणारे एकमेव तारणहार असल्याचे ढोंग करून यांना काही कारणाने काही उद्योगपतींना झुकते माप द्यायचे असेल तर त्या ढोंगामुळे खरोखरच तळपायाची आग मस्तकात जाते.या असल्या "वरून किर्तन आतून तमाशा" पेक्षा भाजप आणि काँग्रेस कधीही परवडले.
In reply to सबसिडी कंपन्यांना दिली कि by क्लिंटन
In reply to थोडीशी भर by सव्यसाची
जेव्हा जनलोकपाल विधेयक प्रस्तुत होऊ दिले नाही तेव्हाच राजीनामा देणार असे आप म्हणाल्याचे मला आठवत आहे. पण त्यानंतर appropriation bill मंजूर करून घेतले. मग विधानसभेचे कामकाज तहकूब झाले. हे असे का ते पण नाही कळले.हे असे प्रश्न सद्गुणांच्या पुतळ्याला तुम्ही विचारता? काय हा उपमर्द!! तुम्ही पण स्वतः भ्रष्ट असला पाहिजेत नाहीतर भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा मिळणारे असले पाहिजेत. तुमच्यासारख्यांना भ्रष्टाचार दूर व्हावा असे वाटतच नाही.तसे करायची कोणीतरी काहीतरी धडपड करत आहे तर त्यातच तुम्ही खोडे घालता? राजकारण म्हणजे काय लालूप्रसाद यादव, राजाभय्या यांच्यासारख्यांसाठीच का? आज आआपला विरोध करा आणि भविष्यात आपणच या देशाचे काही होणार नाही म्हणून उसासे टाकू या :) (हा उपहास आहे हे वेगळे सांगायला नको)
In reply to सबसिडी कंपन्यांना दिली कि by क्लिंटन
In reply to थोडे गुगलू पाहिले. ही सबसिडी by संपत
In reply to -१ by विकास
In reply to माझ्या समजानुसार, by संपत
पण एक महत्वाचा मुद्दा. जे