भोंडल्याचं एक गाणं
हरीच्या नैवेज्ञाला केली जिलबी बिघडली
त्यातलं घेतलं एवढंसं पीठ
त्याचं केलं थालीपीठ
नेऊन वाढलं पंगतीत, जिलबी बिघडली
त्यातला घेतला थोडासा पाक
त्याचा केला साखरभात
नेऊन वाढला पंगतीत, जिलबी बिघडली
ह्या गाण्याचं विडंबन :
आषाढी एकादशीला केली
खिचडी बिघडली
त्यातला घेतला एवढासा गोळा
त्याचे केले वडे सोळा
तळून काढले तुपात, खिचडी बिघडली
त्यातलं घेतलं एवढंसं पीठ
त्याचं केलं थालीपीठ
खरपूस भाजले तव्यावर , खिचडी बिघडली
त्यातली घेतली एवढीशी खिचडी
त्याची केली कुर्डई-पापडी
तळून काढली तेलात, खिचडी बिघडली
प्रतिक्रिया
3 Mar 2014 - 8:12 pm | यसवायजी
चान चान
3 Mar 2014 - 8:22 pm | प्रचेतस
चान चान
3 Mar 2014 - 9:23 pm | मुक्त विहारि
झक्कास