बिडी काडी व्यसनमुक्ती

विकास's picture
विकास in काथ्याकूट
24 Jul 2008 - 8:36 pm
गाभा: 

मुलींच्या सिगरेटी ओढण्यावरून / दारू पिण्यावरून चर्चा चालू आहे.

पण आत्ताच वाचल्याप्रमाणे बिल गेट्स आणि न्यू यॉर्क शहराचा महापौर मायकेल ब्लूमबर्ग या दोघांनी मिळून $५०० मिलियन्स हे विकसनशील राष्ट्रातील लोकांमधून सिगरेटचे व्यसन जाण्यासाठी गुंतवायचे ठरवले आहे. बिल अँड मिलेंडा गेट्स फाउंडेशन त्यासाठी $१२५ मिलियन्स देत आहेत तर ब्लुमबर्ग (स्वतः माजी स्मोकर)ने $२५० मिलीयन्स आता आणि आधीत $१२५ मिलियन्स देण्याचे जाहीर केले आहे.

त्यांना हे काम विशेष करून भारत आणि चीन मधे करायचे आहे. त्यात त्यांना भारताकडून जास्त अपेक्षा आहेत कारण चीन मधे सरकारच सिगरेटी तयार करते :-( त्यामुळे किती शिकवता येईल यावर मर्यादा आहेत.

तर माझा प्रश्न असा:

ते पैसे देऊन प्रचार करायला मदत आहेत पण तुम्ही त्यात काय मदत करू शकाल?

  1. स्वतः ओढत असलात तर थांबवून
  2. स्वतः ओढत असलात/नसलात तरी स्वतः (जर ओढत असाल तर) आणि आपल्या आप्तेष्टांना / आजूबाजूच्यांना त्याच्या गैरपरीणामांबद्दल सांगून ओढायचे थांबवून
  3. पुढच्या पिढीस आत्तापासून त्यातील धोक्याचे शिक्षण देउन
  4. का हू केअर्स!?

समाजशिक्षण महत्वाचे असते पण ते करण्याची जबाबदारी केवळ सेवाभावी संस्था आणि सरकारचीच नसते तर ती "वर्ड ऑफ माउथ"ने पण जास्त होऊ शकते.

प्रतिक्रिया

शिप्रा's picture

24 Jul 2008 - 8:48 pm | शिप्रा

मि नक्किच ३ पर्याय वापरिन्...कारण मि स्वता ओढत नाहि..आणि मला एकुणच असे वाटते कि इतरांना गैरपरीणामांबद्दल सांगुन खुप उपयोग होणार नाहि :( कारण सिगारेट च्या बॉक्सवर इशारा असतो..ते वाचुनच सगळे सिगारेट ओढतात.. :)
म्हणुन मला असे वाट्ते कि लहानपणि च त्यातील धोके त्यांना सांगितल्यास व्यसनापासुन दुर रहातिल...कदाचित..:)

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

प्रकाश घाटपांडे's picture

24 Jul 2008 - 9:06 pm | प्रकाश घाटपांडे

समाजशिक्षण महत्वाचे असते पण ते करण्याची जबाबदारी केवळ सेवाभावी संस्था आणि सरकारचीच नसते तर ती "वर्ड ऑफ माउथ"ने पण जास्त होऊ शकते.

हे भारतात जास्त परिणामकारक होउ शकते. व्यसनाधीन होउन नंतर व्यसमुक्त झालेले अधिक चांगल्या पद्धतीने काम करु शकतात.
कष्टकरी माणुस जेव्हा थकल्या भागल्यावर बिडी चे झुरके मारतो त्या वेळी त्याला मी अन्य काय पर्याय देउ शकतो? हा विचार मनात डोकावतोच.
सिगरेट मध्ये पैशाचा चुराडा होतो. केवळ इतर पितात म्हणुन मी ही पितो अशी ती गतानुगतिकता आहे. नंतर ती त्यांच्या शरिराची गरज बनते. सिगरेट पिण्याला ग्लॅमर आहे म्हणुन तरुणवर्ग आकर्षला जातो. बंडखोरीची भुमिका त्यात असते. करके देखो हा मंत्र येथेही करुन बघण्याला प्रवृत्त करतो. नंतर आकर्षण संपल्यावर हा वर्ग विचार करु शकतो. फोलपणा नंतर उमगतो.
(माजी स्मोकर)
प्रकाश घाटपांडे

३ - धूम्रपान वाईट असते हे माझ्या मुलाला मी सांगितले आहे. तरी लोक का करतात असे तो विचारतो (वय साडेसहा वर्षे). मी त्याला समजेल अशा भाषेत व्यसनी होणे म्हणजे काय ते सांगितले आणि त्याला ते व्यवस्थित समजले. आमच्या शेजारच्या अपार्टमेंट्मधे रहाणार्‍या ओळखीच्या एक बाई स्मोकिंग करीत असताना त्याने तिथे जाऊन सांगितले की तुम्ही करता आहात ते वाईट आहे, अशाने तुम्ही लवकर मराल! :D माझ्याप्रमाणेच त्याही अचंबित झाल्या पण त्यानी तो धक्का धीराने पचवला! :O (मी त्या धक्क्यातून सावरलेलो नाही! :T )

२ - विनोदाचा भाग सोडा. बाकी लोकांना सांगून काही फार फायदा नसतो असे माझ्या लक्षात आलेले आहे. त्यांना कळते पण वळत नाही. कारण स्मोकिंगमुळे/तंबाखूसेवनामुळे मेंदूत झालेले रासायनिक बदल हे फक्त 'निश्चय' करुन सुटणे फार म्हणजे फारच अवघड (जवळजवळ अशक्य) असते. त्यासाठी व्यवस्थित औषधोपचारांची आवश्यकता असते. होमियोपॅथीत अशी औषधे आहेत. पण लक्ष कोण देतो. शिवाय लोकांना त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत लक्ष घातलेले आवडत नाही असेही लक्षात आलेले आहे. तेव्हा ते काम मी सोडून दिले आहे. शेवटी ज्याला त्याला आपले हित कशात आहे हे कळलेच पाहिजे. लोक किती सांगणार?
माझ्या अगदी जवळचे मित्र आहेत त्यांना मात्र मी ह्या बाबतीत मदत करतो. त्यांना तंबाखू, गुटखा खाऊ नका, दारु पिऊ नका असे ठणकावून सांगतो, त्यांना मदत होतील अशी औषधेही मी त्यांना सुचवली आहेत कारण माझा तेवढा अधिकार त्यांच्यावर आहे.

लहान मुलांना मात्र ह्या गोष्टी जरुर सांगाव्यात, त्यातले धोके समजावून सांगावेत. अर्थात तुम्हीच ते करत असलात तर आडात नाही तर पोहोर्‍यात कुठून हा प्रश्न कायम राहील! ;)

चतुरंग

सुनील's picture

25 Jul 2008 - 4:45 pm | सुनील

पण त्यानी तो धक्का धीराने पचवला!

पण त्यानी तो धक्का धूराने पचवला!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

24 Jul 2008 - 10:01 pm | सहज

पर्याय क्रमांक २ व ३, ओळखीच्या कोणाला ओढू देणार नाही/ देत नाही निदान माझ्या समोर.

सर्व सार्वजनीक जागी [पार्क, उद्याने, बसस्थानके, रेल्वेस्थानके, रस्ते, फूटपाथ, थिएटर, भाजीमंडई, दुकाने, कार्यालये, कचेर्‍या इ. इ.] धुम्रपानाला कायद्याने बंदी यावी. व असल्यास त्याची कडक अंमलबजावणी व्हावी.

दरवर्षी सिग्रेट, बिडी, तंबाखू अतिशय महाग व्हावी की जेणे करुन सामान्यांना परवडूच नये.

धनंजय's picture

24 Jul 2008 - 11:06 pm | धनंजय

पर्याय २ आणि ३ शक्य तसे राबवता येतील.

पर्याय ४च्या ठिकाणी सहज यांनी दिलेला पर्याय ठेवावा :

सर्व सार्वजनीक जागी [पार्क, उद्याने, बसस्थानके, रेल्वेस्थानके, रस्ते, फूटपाथ, थिएटर, भाजीमंडई, दुकाने, कार्यालये, कचेर्‍या इ. इ.] धुम्रपानाला कायद्याने बंदी यावी. व असल्यास त्याची कडक अंमलबजावणी व्हावी. दरवर्षी सिग्रेट, बिडी, तंबाखू अतिशय महाग व्हावी की जेणे करुन सामान्यांना परवडूच नये.

स्वाती दिनेश's picture

25 Jul 2008 - 12:01 pm | स्वाती दिनेश

सहज आणि धनंजय सारखेच म्हणते.
४थ्या पर्यायाला धनंजयचा पर्याय..लै भारी!
स्वाती

टारझन's picture

24 Jul 2008 - 10:44 pm | टारझन

चतुरंग काकांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या हक्काच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करू शकू...ते ही ती व्यक्ती किती ऐकते यावर अवलंबून आहे.

बाकी मग व्हू केअर्स ? आम्हाला कसलाही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला वेळ नाही... व्यसनी माणूस कधीही त्याच्या व्यसनाविरूद्ध ऐकून घेत नाही. कॉलेजात बर्‍याच लोकांच्या फुकण्या आणि बाटल्या सोडवायचा प्रयत्न केला पण ऊलट तेच मला त्यांच्या गोटात सामिल करत होते. सिगारेट स्मोक चा त्रास ओढणार्‍यापेक्षा समोरच्याला जास्त होतो. म्हणून कोणाला (मग ते कोणाचेही तिर्थरूप असोत) समोर सिगारेट ओढू देत नाही.(पण कंपनी पार्टीत गुपचूप धूराच्या घोळक्यात बसतो :( )

कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

विसोबा खेचर's picture

24 Jul 2008 - 11:05 pm | विसोबा खेचर

स्वतः ओढत असलात तर थांबवून

मी दिवसाला एखाददोनच ओढतो परंतु थांबवणं जमेलसं वाटत नाही आणि थांबवायची इच्छाही नाही. आणि मुळात का थांबवा हा प्रश्न आहेच! दो दिन की जिंदगी है. कल किसने देखा है? आणि उद्याचं उद्या बघू!

स्वतः ओढत असलात/नसलात तरी स्वतः (जर ओढत असाल तर) आणि आपल्या आप्तेष्टांना / आजूबाजूच्यांना त्याच्या गैरपरीणामांबद्दल सांगून ओढायचे थांबवून

स्वत: ओढतो, परंतु थांबवायची इच्छा नाही. आणि गैरपरिणामांबद्दल म्हणाल तर जे ओढतात त्यांना कॅन्सर होतो परंतु सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसलेली अनेक मंडळी कॅन्सरने गेलेली माझ्या पाहण्यात आहेत! योगापेक्षा भोग मोठे आहेत हेच खरं! आणि ते या जन्मीच भोगावे लागतात. ते कुणालाही टाळता येणं शक्य नाही/टाळता येत नाहीत. तेव्हा आजवर जसं चाल्लंय तसंच मी तरी सुरू ठेवीन. उद्याचं माहीत नाही! जो होगा देखा जायेगा! शेवटी काही झालंच तर मलाच भोगायचंय ना? माझी तयारी आहे!

आजूबाजूच्या लोकांनाही मी असं काही सांगायला जाणार नाही. सिगरेट, दारू, तंबाखू ही व्यसनं प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर करावीत!

पुढच्या पिढीस आत्तापासून त्यातील धोक्याचे शिक्षण देउन

पुढची पिढी आमच्यापेक्षा अधिक शिकलेली आहे, त्यांनी सिगरेटच्या पाकिटावरील वैधनिक इशारा पाहावा!

का हू केअर्स!?

आजपर्यंत इतरंबद्दल नाही, तरी स्वत:बद्दल मात्र मी हेच बोलत आलोय! :)

आपला,
(बेफिकीर) तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Jul 2008 - 6:03 am | श्रीकृष्ण सामंत

(बे-फकीर)तात्यानु,
होटल मे खाना और मशीदमे सोना और जुम्मेके जुम्मे स्नान करना अशा फकीराला आगे पिच्छे नसतं.
"सडोफटिंग असलो तर म्हातारेक -आवशीक-दुखणा काढूचा लागता.आणि बाईल असली तर बायलेक नायतर एखादो झील किंवा चेडू फिकीर करणारा असलातर तेका निस्तारूचा लागता."
ह्या वयात काय कळणा नाय तात्यानु"
आणि
"आता ढेंगणा वर करून झोपलो हा!त्यावेळेक कोणाचा ऐकल्यान नाय.कसो ऐकतलो? त्यावयात तेचा पाणी पेट घेय.आता ह्याचा पेट्रोल पण पेट घेणा नाय."
असं मालवणीत "सपष्ट"म्हातार्‍याला सांगतात. ते ऐकून सहन होत नाही.पण करणार काय?
"आम्ही हवे तसे करणार!
आम्हाला कोण काय पुसणार?"
हेच खरं हे त्यावेळी वाटत असतं ना!
आणि तात्यानु,
तंबाखू मधे निकोटीन मधला एक भाग असतो ना, तो एकदा मेंदूत जाऊन स्थानापन्न झाला ना
की मग
"मी दिवसाला एखाददोनच ओढतो परंतु थांबवणं जमेलसं वाटत नाही आणि थांबवायची इच्छाही नाही. "
ह्यां असला कायतरी बोलून मनाची समाधानी करून घेवची लागतां.कारण तां हातां-भायेर गेलेला असतां.
"परंतु सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसलेली अनेक मंडळी कॅन्सरने गेलेली माझ्या पाहण्यात आहेत! "
असली उदाहरणां देऊन घ्या समाधानी करून बाबडे!
पण तात्यानु,
खंयचां उदाहरण खंय देतात.फुकणत नाय ते कॅन्सरने मरुचेच नाय असां कोण म्हणतां?.पण फुकता तेका कॅन्सर होता ह्या मात्र खरां हां!आता एखादो फुकत असून सुद्धा दुसर्‍या कशाना मेलो तर तेका अपवाद म्हणूक होयां
"योगापेक्षा भोग मोठे आहेत हेच खरं! आणि ते या जन्मीच भोगावे लागतात. ते कुणालाही टाळता येणं शक्य नाही/टाळता येत नाहीत. तेव्हा आजवर जसं चाल्लंय तसंच मी तरी सुरू ठेवीन. "
असा लिहून मात्र तात्यानु तुम्ही आध्यात्माचो आधार घेऊक लागल्यात.
"शेवटी काही झालंच तर मलाच भोगायचंय ना? माझी तयारी आहे!"
तुमका भोगूचा लागताच आणि बरोबरीन म्हातारेक आणि बायले पोरांक भोगूचा लागता तेंचा काय?तुमची सेवा करूची लागतली ना?

"आजूबाजूच्या लोकांनाही मी असं काही सांगायला जाणार नाही. सिगरेट, दारू, तंबाखू ही व्यसनं प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर करावीत!
पुढच्या पिढीस आत्तापासून त्यातील धोक्याचे शिक्षण देउन पुढची पिढी आमच्यापेक्षा अधिक शिकलेली आहे, त्यांनी सिगरेटच्या पाकिटावरील वैधनिक इशारा पाहावा! "
ह्या मात्र तात्यानु, उज्जू बोलल्यात.
मालवणी लोकांसारख्या जेच्या तेच्यात नाक खूपसीची संवय बरी नाय!
गुजर्‍याथ्यांसारख्या,
"आपडे सूं? "
ह्याच खरां.असो
बाकी काय तात्याराव?
माका तुम्ही सुको सोडुच्यात नाय ह्या माहित आसां तरीपण
खूप दिवसानी माका जरा लिहूची स्फुर्त्ति दिल्यात त्या साठी आभार तुमचे तात्यानु.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Jul 2008 - 7:29 am | डॉ.प्रसाद दाढे

साम॑त काका अभिन॑दन! को॑कणीत मस्त टाकला आहेत..
तुमका भोगूचा लागताच आणि बरोबरीन म्हातारेक आणि बायले पोरांक भोगूचा लागता तेंचा काय?तुमची सेवा करूची लागतली ना?

एकदम सहमत. कॅन्सरच्या पेश॑टचे आणि त्याहून जास्त त्याच्या नातलगा॑चे हाल पाहून मन खूप व्यथित होत॑. अस॑ वाटत॑ हा रोग वैर्‍यालासुद्धा होऊ नये.
त॑बाखूच्या भीषण विळख्यातून रूग्णा॑ना मुक्त करायचा मी आटोकाट प्रयत्न करीत असतो. सगळे जग ज्या दिवशी त्या 'दिव्य' वनस्पतीपासून मुक्त होईल तो सुदिन!

विसोबा खेचर's picture

25 Jul 2008 - 12:23 pm | विसोबा खेचर

सामंतसाहेब,

एवढा भलामोठ्ठा प्रतिसाद पाहून तुम्ही स्वत:च अंमळ दोन पेग मारून लिहायला बसलात की काय असं वाटलं! =))

असो, सर्व सल्ल्यांबद्दल धन्यवाद...

लुफ्त मै क्या कहू तुझसे जाहीद
हाय कंबख्त तुने पी ही नही! :)

तात्या.

चतुरंग's picture

25 Jul 2008 - 4:48 pm | चतुरंग

मच्छिंद्र कांबळीच्या एखाद्या मालवणी नाटकातले संवाद वाटले!

(स्वगत - पण त्या तात्याला काय फरक पडतो? साक्षात यमाला सुद्धा तो "उतर रे जरा रेड्यावरुन. बैस इथे, मस्त पैकी दोन कश मार आणि अंमळ दोन पेग लाव ग्लेनफिडिचचे आणि मग जाऊयात भैरवी म्हणत, असे म्हणायला बसलाय!" :D )

चतुरंग

II राजे II's picture

25 Jul 2008 - 6:41 pm | II राजे II (not verified)

हेच म्हणतो !!!

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

भाग्यश्री's picture

24 Jul 2008 - 11:34 pm | भाग्यश्री

मला सिगरेट ओढणार्‍यांबद्द्ल तिडीक जाते डोक्यात.. व्यसनं करायची असतील तर आपापल्या घरी किंवा स्मोकींग झोन मधे करावीत.. रस्त्यावर्,बस-स्टॉप, हॉटेल मधे बसून फुंकणार्‍यांवर माझा अतोनात राग आहे. आम्हाला का पॅसिव्ह स्मोकींगची शिक्षा? मी शक्यतो तिथल्या तिथेच माझी नापसंती दाखवते.. बर्याच जनतेला काहीही लाज वाटत नाही, एखाद -दुसराच बंद करतो.. जे माझ्या जवळचे आहेत, त्यांना मी जरूर पटवायचा प्रयत्न करते.. शेवटी ऐकणे त्याच माणसाच्या हातात आहे.. त्यामुळे हे व्यसन सुटणे केवळ त्या माणसाच्या इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे.. माझा डॉक्टर असलेला काका जेव्हा सिगरेटीच्या सिगरेटी फुंकतो तेव्हा मला खरच चिड्चिड होते!! डॉक्टर असून व्यसनाला आवर घालता येत नसेल , परिणाम व्यवस्थित माहीत असून तर सामान्य माणसाची काय कथा?

विसोबा खेचर's picture

24 Jul 2008 - 11:47 pm | विसोबा खेचर

व्यसनं करायची असतील तर आपापल्या घरी किंवा स्मोकींग झोन मधे करावीत..

ह्याच्याशी मात्र आपण सहमत आहोत. आपल्या व्यसनांचा इतरांना त्रास होऊ नये.

दारू अवश्य प्यावी परंतु ती पिऊन शिवीगाळ, बायकापोरांना मारझोड, रस्त्यावर तमाशा इत्यादी गोष्टी करू नयेत. मस्तपैकी दोन पेग मारावेत व छानशी गाण्याची मैफल जमवावी किंवा मस्तपैकी आपलं आवडतं संगीत ऐकावं! :)

असो..

प्राजु's picture

24 Jul 2008 - 11:59 pm | प्राजु

दो दिन की जिंदगी है. कल किसने देखा है? आणि उद्याचं उद्या बघू!

तो उद्या बघण्यासाठी तरी जिंदगी असायला हवी ना तात्या. जान है तो जहांन है..(देव तुम्हाला भरपूर आयुष्य देवो)
सिगारेट फुंकुन जिंदगी भरगोस जगलेला माझ्यातरी पाहण्यात नाही आला कोणी. आणि बाकी इतर लाख चांगल्या गोष्टी आजूबाजूला असताना सिगारेट हवी कशाला??
माझ्या बघण्यामध्ये एका माणसाला गुटख्याचं व्यसन होतं. त्याला ते सोडायचं होतं. त्याने हळू हळू कमी केलं. आधी तो सुपारी किंवा बडिशेप खाऊ लागला आणि नंतर पूर्न व्यसन थांबलं. मनापासून इच्छा हवी व्यसनमुक्त होण्याची मग, सिगारच काय कोणतही वाइट व्यसन कमी होतं.. किंवा सुटतं..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

25 Jul 2008 - 12:07 am | विसोबा खेचर

मनापासून इच्छा हवी व्यसनमुक्त होण्याची मग, सिगारच काय कोणतही वाइट व्यसन कमी होतं.. किंवा सुटतं..

अगदी खरं! पण माझी तशी इच्छाच नाही! :)

तात्या.

गुंडोपंत's picture

25 Jul 2008 - 7:21 am | गुंडोपंत

अगदी खरं! पण माझी तशी इच्छाच नाही!

माझीही नाही!

आपला
गुंडोपंत दारूबाज

छोट्या's picture

25 Jul 2008 - 12:21 pm | छोट्या

अगदी खरं! पण माझी तशी इच्छाच नाही!

हा हा हा !!!

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Jul 2008 - 11:15 am | श्रीकृष्ण सामंत

प्राजुजी,
"आधी तो सुपारी किंवा बडिशेप खाऊ लागला आणि नंतर पूर्न व्यसन थांबलं. मनापासून इच्छा हवी व्यसनमुक्त होण्याची मग, सिगारच काय कोणतही वाइट व्यसन कमी होतं.. किंवा सुटतं.."
पण प्राजुजी,
"नंतर पुर्ण व्यसन थांबलं.....पुन्हा चालू करे पर्यंत!" ना?
अहो!माणूस व्यसनी झाला की त्याचं व्यसन सुटणं सोपं नाही एकच प्याला नाटक माहित आहे ना?
किती ही आणा शपथा बायकोला दिल्यातरी शेवटी
"एकच प्याला घेतो गं!"
म्हणणारा सुधाकर होता त्याचा दोष नसतो.
एकदा कुणाच्या मेंदूत तो बायप्रॉडक्ट शिरला के संपलं.ते सुटून जायला खूपच ट्रिटमेंट आहे.
मनापासून इच्छा काम करत नाही.
हे दारू,सिगरेट,इतर ड्रग हे सगळे एकाच माळेतले मणी आहेत.
ह्या व्यसनी लोकाना त्यांचा मेदू जगूंच देत नाही.आपला प्राण द्दायला हे लोक तयार होतात.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

टिउ's picture

25 Jul 2008 - 12:15 am | टिउ

मनापासून इच्छा हवी व्यसनमुक्त होण्याची मग, सिगारच काय कोणतही वाइट व्यसन कमी होतं.. किंवा सुटतं..

अगदी खरं! पण माझी तशी इच्छाच नाही!

तात्या.

+१

(९ ते ५ व्यसनमुक्त) टिउ

इनोबा म्हणे's picture

25 Jul 2008 - 12:29 am | इनोबा म्हणे

मनापासून इच्छा हवी व्यसनमुक्त होण्याची मग, सिगारच काय कोणतही वाइट व्यसन कमी होतं.. किंवा सुटतं..
सहमत
आम्हीही सद्ध्या धूम्रपान आणि मद्यपान सोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. नक्कीच यशस्वी होऊ.
जवळच्या व्यक्तींपेक्षा व्यसन नक्कीच मोठे नाही.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्राजु's picture

25 Jul 2008 - 12:33 am | प्राजु

आम्हीही सद्ध्या धूम्रपान आणि मद्यपान सोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. नक्कीच यशस्वी होऊ.

तुम्हाला यामध्ये नक्की यश मिळूदे हीच ईशचरणी प्रार्थना. हा तुमचा निर्णय ऐकून आनंद झाला.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

25 Jul 2008 - 1:46 am | विकास

सर्वप्रथम सर्व प्रतिसाद प्रामाणिक वाटले आणि म्हणून विशेष धन्यवाद!

माझ्या आत्ता लक्षात आले की स्वतः मला काय वाटते ते सांगायचे विसरलो!

स्वतः ओढत असलात तर थांबवून
- मी ओढत नाही. त्यामुळे लागू नाही.

स्वतः ओढत असलात/नसलात तरी स्वतः (जर ओढत असाल तर) आणि आपल्या आप्तेष्टांना / आजूबाजूच्यांना त्याच्या गैरपरीणामांबद्दल सांगून ओढायचे थांबवून ?
- आप्तेष्टांना नक्की सांगेन - विशेष करून चेन स्मोकर जर कोणी आढळले तर. तसे नात्यात /मित्रात नाहीत पण कामानिमित्त पाहीलेत. त्यांना अर्थातच अप्रत्यक्ष (सटली) सांगणे होते. आपण शहाणे आहोत ह्या भुमिकेतून शिकवत नाही तसेच "चळवळ्या/ऍक्टीव्हीस्ट" म्हणून पण शिकवत नाही. त्याचा झाला तर अपायच होऊ शकेल उपाय नाही!

पुढच्या पिढीस आत्तापासून त्यातील धोक्याचे शिक्षण देउन?
-भारतात हे नक्कीच सांगावे लागेल असे वाटते. अमेरिकेत वेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील :)

का हू केअर्स!?
- हा प्रश्न वरील प्रश्नांसंदर्भात मर्यादीत होता जगाला जाऊन शिकवाल का म्हणून नाही. पण मी ते स्पष्ट लिहीले नव्हते. पण वरील काही उत्तरे योग्य संदर्भात आलीत.

धन्यवाद!

अनिल हटेला's picture

25 Jul 2008 - 7:42 am | अनिल हटेला

अगदी खरं! पण माझी तशी इच्छाच नाही!

तात्या आणी गुन्डोपन्त !!!

सहमत आहे !!!!!!

अगदी प्रामाणीक पणे सान्गतो,

आपल सुद्द्धा हेच म्हनने आहे

जियो और जीने दो !!!

पियो और पिने दो !!!!!

पण लिमीट मध्ये !!!

जितके झेपेल तीतकेच !!!!!

( ऑल राउन्डर )
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्रकाश घाटपांडे's picture

25 Jul 2008 - 8:09 am | प्रकाश घाटपांडे


पण लिमीट मध्ये !!!

हितच तर वांधे हायेत ना! क्वॉन्ची लिमिट? आन ठरवनार कोन? तेवढा आपला आपल्या मनावर ताबा आहे का?
पिने वालोंको पिनेका बहाना चाहिये.
(कधिकधि टाकेश)
प्रकाश घाटपांडे

टिउ's picture

25 Jul 2008 - 9:04 am | टिउ

आपली लिमीट आपणच ठरवावी...पण लिमीट कळण्यासाठी एकदा ती क्रॉस करण॑ आवश्यक आहे.
२ पेग मारुन माझा टा॑गा पलटी घोडा फरार होउन वकार युनुस होत असेल तर माझी लिमीट १ पेग!

(लिमीटमधे राहणारा) टिउ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jul 2008 - 11:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण लिमीट कळण्यासाठी एकदा ती क्रॉस करणं आवश्यक आहे.
=))

पण शिग्रेटला माझा विरोध आहे. स्वतः फिल्टर लावायचा आणि इतरांना नको असताना बिना-फिल्टरचा धूर द्यायचा.
काही फुक्या मित्रांच्या अनुभवावरून -- धूम्रपान कमी करवायचं असेल तर फुक्याला (किंवा फुकीला) इतर फुके असलेल्या, धूर भरलेल्या स्मोकिंग झोन मधे रोज थोडा वेळ सोडायचं.

विसोबा खेचर's picture

25 Jul 2008 - 12:23 pm | विसोबा खेचर

२ पेग मारुन माझा टा॑गा पलटी घोडा फरार होउन वकार युनुस होत असेल तर माझी लिमीट १ पेग!

हा हा हा! हे मस्त..!

आपला,
(दोन पेगचं लिमिट गेली अनेक वर्ष पाळणारा!) तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Jul 2008 - 3:08 pm | प्रकाश घाटपांडे


२ पेग मारुन माझा टा॑गा पलटी घोडा फरार होउन वकार युनुस होत असेल तर माझी लिमीट १ पेग!


काही दिसांनी
३पेग मारुन माझा टा॑गा पलटी घोडा फरार होउन वकार युनुस होत असेल तर माझी लिमीट २ पेग!

आजुन काही दिसांनी
४ पेग मारुन माझा टा॑गा पलटी घोडा फरार होउन वकार युनुस होत असेल तर माझी लिमीट ३पेग!

आजुन काहि दिसांनि
........
......
:T
प्रकाश घाटपांडे

अनिल हटेला's picture

25 Jul 2008 - 2:55 pm | अनिल हटेला

तसा प्रमाणीक प्रयत्न मी पण केला बर का!!!

दारू सोडली ,

म्हणजे बीयर चालू केली !!!

सिगारेट चा धूत इतर कुणालाही त्रास्दायक होणार नाही ह्याची काळाजी घेतो...
(म्हणजे घ्यावी लागते,इकडे चायना मध्ये सार्वजनीक स्थळी स्मोकिन्ग झोन मध्येच ओढता येते )

(सुधरण्या्च्या प्रयत्नात)

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळ॥

हा व्यसनमुक्तीचा एकमेव मार्ग आहे. मेलो तरी चालेल पण सिगारेट ओढणार नाही..... हा विचार मनात बिंबला तर सिगारेट सोडणे कठीण नाही. आम्ही वीसएक वर्षांपूर्वी सोडली. आजवर स्पर्श केलेला नाही.

पहिल्या दिवशी त्रास होतो . मग हळूहळू शरीराला निकोटीन शिवाय जगायची सवय होते.
कोणतेही व्यसन सुटायला २१ दिवस लागतात असे मानसशास्त्रातले तज्ज्ञ सांगतात असे ऐकले होते.

धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सुनील's picture

25 Jul 2008 - 4:52 pm | सुनील

स्वतः ओढत असलात तर थांबवून
मुद्दा माझ्यापुरता गैरलागू कारण मी स्वतः धूम्रपान करीत नाही.

स्वतः ओढत असलात/नसलात तरी स्वतः (जर ओढत असाल तर) आणि आपल्या आप्तेष्टांना / आजूबाजूच्यांना त्याच्या गैरपरीणामांबद्दल सांगून ओढायचे थांबवून
आताशा नेहेमीच करतो. परंतु काही फायदा झाल्याचे दिसले नाही. पण आशा सोडणार नाही.

पुढच्या पिढीस आत्तापासून त्यातील धोक्याचे शिक्षण देउन
अद्याप असे काही केले नाही. परंतु यापुढे करण्याचा निश्चय आहे.

का हू केअर्स!?
नक्कीच नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

25 Jul 2008 - 4:59 pm | सुनील

एक चेन स्मोकर : सिगरेट सोडणे ही सर्वात सोप्पी गोष्ट आहे. मी आजपर्यंत अनेकवेळा सोडलीय!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.