अरे तुझ वय काय?

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
17 Feb 2014 - 12:32 pm

अरे तुझ वय काय?
एम आय डी सी भोसरी ला असताना सकाळी १०-१०.३०च्या सुमारास आम्हि ७-८ मित्र चहा साठी एका जवळच्या उपहार जमायचो..
चहा पाणी..व्यवसाय चर्चा व गाव गप्पा असे मिटिंग चे स्वरुप असायचे..
अनेक विषय चघळायला असायचे..
त्यात आमचा एक क्ष नावाचा मित्र होता..त्याला जर एखादा विषय वा विधान पटले नाहि कि त्याची एक ठराविक म्हण होति ति तो वापरायचा..
अरे तुझ वय काय? शिक्षण काय.?.पगार काय?उंची काय ? अन लेका बोलतोय काय?
असे म्हटले कि दंगा सुरु व्हायचा अन कसे बरोबर हे पटवण्या साठी लुटुपुटीची चर्चा व्हायची..व वादळ चहाच्या पेल्यात विरुन जायचे..
खर तर मित्र जि म्हण वापरत होता त्या रोख व भावार्थ समजत होता पण उत्पत्ति व नेमका अर्थ लागत नव्हता..म्हणुन एकदा त्याला म्हणालो..
"याम्हणीचा नेमका अर्थ काय? का देतो ठोकुन?....
माहित आहे ना..असे म्हणुन त्याने खालील प्रमाणे विवरण केले....
एखादा माणुस विधान करतो त्या वेळी..

वय काय?..म्हणजे विधान करणारा जर वयस्कर असेल तर तो त्याच्या अनुभवाच्या जोरावर विधान करीत आहे असे समजुन समोरचा माणुस पटो वा न पटो विधान स्विकारतो..व जास्त खोलात जात नाहि..

शिक्षण काय.?.विधान करणारा जर उच्च विद्या विभुषित असेल तरी आपण विधान स्विकारतो..व जास्त खोलात जात नाहि..

पगार काय?..धनवान माणसा तर मान आहेच..व्यक्ति धनवान असेल तरी आपन त्याने केलेले विधान विधान स्विकारतो..व जास्त खोलात जात नाहि....

ऊंची काय? म्हणजे समोरची व्यक्ति शरीराने बलदंड असेल तर त्याच्या शारीरीक ताकदी कडे पाहुन समोरचा तु मोठ्या बापाचा असे म्हणत विधान स्विकारतो..

एकले अन हसु आले...

आजहि कुणी हि म्हण म्हटली कि जुने दिवस आठवतात

वावर

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2014 - 1:25 pm | पिलीयन रायडर

प्यार्‍या... नीट वाच रे बाबा अर्थ सगळे..!!

प्यारे१'s picture

17 Feb 2014 - 1:27 pm | प्यारे१

हो हो! =))

माझं वय किती, माझा पगार किती, माझा अनुभव किती आणि मी बोलतो किती?
बरोबर.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2014 - 1:34 pm | पिलीयन रायडर

मग काय तर...

आणि वर तोंड करुन लोकांचे पगार विचारतोस?!!

प्यारे१'s picture

17 Feb 2014 - 1:37 pm | प्यारे१

>>>आणि वर तोंड करुन

ह्याला आक्षेप आहे. अस्स्स्स्स्स्सा समोर बघत होतो बघा. जमिनीला समांतर ;)

सुनील's picture

17 Feb 2014 - 1:38 pm | सुनील

फार्फार वर्षांपूर्वी कुणा एका मिपाकराची सही अशीच होती, ते आठवले!

चिरोटा's picture

17 Feb 2014 - 1:53 pm | चिरोटा

मला वाटले केजरीवालांबद्दल धागा आहे.
आम'रस' आदमी

आत्मशून्य's picture

17 Feb 2014 - 9:50 pm | आत्मशून्य

पगार काय ?

याचे मुळ "डाँन्ट टॉक अबव युअर पेचेक." म्हणजे (नोकरीतील) आपल्या वरिष्ठाना अक्कल शिकवु नये...!