पालक कढी

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
16 Feb 2014 - 7:40 pm

kadhi

साहित्यः
१. पालकाची जुडी - १.५
२. आलं/लसूण पेस्ट - १ चमचा
३. बारीक चिरलेला कांदा किंवा कांद्याची पेस्ट - १ मध्यम
४. ताक - १/२ लि.
५. बेसन - २ चमचे
६. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - २
७. कढीपत्ता - १ काडि
८. तेल २ पळ्या
९. चवीनुसार मीठ/साखर
१०. फोडणीसाठी २ पळ्या साजुक तूप, चिमूटभर हिंग, १ चमचा जिरं आणि २ सुख्या लाल मिरच्या

कॄती:
१. पालकाची पाने स्वच्छ धुवुन त्यांची देठे खुडुन घ्या. जुडीतलीच एक मुठभर पाने बाजूला काढुन बारीक चिरुन घ्या
२. उरलेली पाने माफक पाण्यात शिजवून गार झाली कि मिक्सरमधे बारीक प्युरी करुन घ्या. आवडत असल्यास वाटतानाच त्यात हिरव्या मिरच्या घालू शकता
३. ताकाला बेसन लावून घ्या व त्यात चवीनुसार मीठ/साखर घालून ठेवा
४. आता तयार केलेली पालकाची प्युरी बेसनमिश्रित ताकात घालुन मिक्स करा
५. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत २ पळ्या तेल तापलं की आलं/लसूण पेस्ट घालून परता
६. पेस्टचा कच्चा वास गेला कि बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कांद्याची पेस्ट घालून परता
७. कांदा जरासा लालसर झाला कि बारीक चिरलेला पालक घालून परता
८. पालक शिजला/मऊ झाला कि प्युरीमिश्रित ताक घाला
९. एक ४-५ मि. मंद आचेवर कढी उकळत ठेवा तोवर बेसन शिजून कढी घट्ट होईल
१०. तूप, हिंग, जिरं आणि लाल मिरच्यांची फोडणी करुन कढीला तडका द्या
११. गरमागरम कढी वाफाळणार्‍या साध्या किंवा जीरा राईस बरोबर सर्व करा.....सोबत लोणचं/पापड द्यायला विसरु नका!

ता.क.:
हि कढी "डाएट" बनवायची असल्यास ताक लो-फॅट/स्किम घ्या! तेल/तूप अगदी(च) नगण्य वापरा!

प्रतिक्रिया

ही तर आपली ताकातली पालकाची भाजी. आपण प्युरे करून घेत नाही तर बारीक चिरून आणि घोटून घेतो एवढाच काय तो फरक! तक्केमें पालक डालके और उपरसे लसूण की फोडणी देके भाजी माझी आवडती आहे. त्यात जरा डाळ, दाणे घातल्यास अगदी आजीबाई ष्टाईल रेशिपी तैय्यार! कांदा मात्र नसतो.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2014 - 9:48 pm | अत्रुप्त आत्मा

@ही तर आपली ताकातली पालकाची भाजी. >>> आक्शी..ह्येच म्हन्नार हुतो! आमाले ती चव लै येळा आवाडते..ही नव्या श्टाइलची कोन्चा फ्लेवर देइल या इचारात पडलूया! :)

सानिकास्वप्निल's picture

17 Feb 2014 - 3:08 pm | सानिकास्वप्निल

ही तर आपली ताकातली पालकाची भाजी

सहमत.

ताकातल्या पालकाच्या भाजीत हरभरा डाळ, दाणे हवेतच त्याशिवाय मजा नाही.

सुहास झेले's picture

16 Feb 2014 - 8:56 pm | सुहास झेले

मस्तच :)

आरोही's picture

16 Feb 2014 - 9:32 pm | आरोही

मस्त, नक्कि करुन बघेन......

स्वाती दिनेश's picture

16 Feb 2014 - 10:45 pm | स्वाती दिनेश

रेवती सारखेच म्हणते, कांदा नाही आणि डाळ, दाणे हवेतच ..
आणि पालकापेक्षाही चाकवत असेल तर क्या केहेने..
स्वाती

मुक्त विहारि's picture

16 Feb 2014 - 10:50 pm | मुक्त विहारि

आले लसूण पेस्ट आणि कांद्याने...

पालकाची ताकातली भाजी आणि पालक कढी ह्यांतील चवीतला फरक पुरेसा स्पष्ट केला आहे....

मिपाचे बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन झालेच पाहिजे.....

साती's picture

17 Feb 2014 - 11:31 am | साती

नक्कीच झाले पाहिजे.
आणि या संमेलनात तयार झालेल्या पाककृतींना न्याय देण्यासाठी आमच्या सारख्या असुग्रण पण दर्दी ़खवैयांना पण आमंत्रण पाहिजे बुवा.
वाटल्यास रेसिपींना लागणारा ़कच्चा माल आम्ही आणतो.
;)

प्यारे१'s picture

17 Feb 2014 - 1:47 pm | प्यारे१

>>>आमच्या सारख्या असुग्रण पण दर्दी ़खवैयांना

आणि आमच्या सारख्या असुरगण पण दर्दी खवैयांना

>>>वाटल्यास रेसिपींना लागणारा ़कच्चा माल आम्ही आणतो.

तुम्हाला वाटतंय तेच मलाही वाटतंय. कच्चा माल 'वाटूनच' आणणं बरं. ;)

मदनबाण's picture

17 Feb 2014 - 11:52 am | मदनबाण

मस्त... :)
ही तर आपली ताकातली पालकाची भाजी.
आज्जीला अनुमोदन. ;)

(सोलकढी प्रेमी) :)

पाषाणभेद's picture

17 Feb 2014 - 1:38 pm | पाषाणभेद

आजचा सुविचारः
पालक कढी ची रेसेपी वाचणे डोळ्यांसाठी चांगले असते.

अनन्न्या's picture

17 Feb 2014 - 6:43 pm | अनन्न्या

चाकवतच्या ताकातल्या पातळ भाजीची आठवण झाली.

मला गोटाभजी टाकलेली गुजराती कढी फार आवडते त्याची पण डायवर्षन पाकृ टाकणार का ?

अक्षया's picture

18 Feb 2014 - 2:24 pm | अक्षया

मस्त. नक्की करुन बघेन.. :)