साहित्यः
१. पालकाची जुडी - १.५
२. आलं/लसूण पेस्ट - १ चमचा
३. बारीक चिरलेला कांदा किंवा कांद्याची पेस्ट - १ मध्यम
४. ताक - १/२ लि.
५. बेसन - २ चमचे
६. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - २
७. कढीपत्ता - १ काडि
८. तेल २ पळ्या
९. चवीनुसार मीठ/साखर
१०. फोडणीसाठी २ पळ्या साजुक तूप, चिमूटभर हिंग, १ चमचा जिरं आणि २ सुख्या लाल मिरच्या
कॄती:
१. पालकाची पाने स्वच्छ धुवुन त्यांची देठे खुडुन घ्या. जुडीतलीच एक मुठभर पाने बाजूला काढुन बारीक चिरुन घ्या
२. उरलेली पाने माफक पाण्यात शिजवून गार झाली कि मिक्सरमधे बारीक प्युरी करुन घ्या. आवडत असल्यास वाटतानाच त्यात हिरव्या मिरच्या घालू शकता
३. ताकाला बेसन लावून घ्या व त्यात चवीनुसार मीठ/साखर घालून ठेवा
४. आता तयार केलेली पालकाची प्युरी बेसनमिश्रित ताकात घालुन मिक्स करा
५. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत २ पळ्या तेल तापलं की आलं/लसूण पेस्ट घालून परता
६. पेस्टचा कच्चा वास गेला कि बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कांद्याची पेस्ट घालून परता
७. कांदा जरासा लालसर झाला कि बारीक चिरलेला पालक घालून परता
८. पालक शिजला/मऊ झाला कि प्युरीमिश्रित ताक घाला
९. एक ४-५ मि. मंद आचेवर कढी उकळत ठेवा तोवर बेसन शिजून कढी घट्ट होईल
१०. तूप, हिंग, जिरं आणि लाल मिरच्यांची फोडणी करुन कढीला तडका द्या
११. गरमागरम कढी वाफाळणार्या साध्या किंवा जीरा राईस बरोबर सर्व करा.....सोबत लोणचं/पापड द्यायला विसरु नका!
ता.क.:
हि कढी
"डाएट" बनवायची असल्यास ताक लो-फॅट/स्किम घ्या! तेल/तूप अगदी(च) नगण्य वापरा!
ही तर आपली ताकातली पालकाची
+++१११
In reply to ही तर आपली ताकातली पालकाची by रेवती
सहमत!!
In reply to ही तर आपली ताकातली पालकाची by रेवती
मस्तच
मस्त, नक्कि करुन बघेन......
रेवती..
जबरा.....
नक्कीच!
In reply to जबरा..... by मुक्त विहारि
>>>आमच्या सारख्या असुग्रण पण
In reply to नक्कीच! by साती
मस्त... ही तर आपली ताकातली
आजचा सुविचारः
पालक कढीची पाकृ. वाचून...
मला गोटाभजी टाकलेली गुजराती
मस्त. नक्की करुन बघेन..