असे करु शकतो का ?

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
9 Feb 2014 - 9:57 am

मुंबईतल्या एका प्रथित यश महिला मंडळाचे इंटरनल ऑडीट सध्या करतो आहे. त्यात एक गोष्ट निदर्शनास आली कि ह्या विश्वस्थ संस्थेचे २५ लाखाचे (रुपये १०००० ते १०००००)फिक्स्ड डीपोझीट एका बँकेत आहेत. त्या बँकेने रुपये २५००० चे एक मूळ एफ.डी. टी डी एस च्या नावाखाली खाऊन टाकले आहे. बरे त्याचे सर्टिफिकेट विश्वस्थ संस्थेकडे तसेच आहेत. ह्यावर मी त्यांचा सीए आणि बँक व्यवस्थापक ह्यांना काही विचारले असता त्यांनी ते बरोबरच आहे असे सांगितले आहे. आता लिखापढी आणि बाकीचे प्रोसिजर मी चालू केले आहे (सध्या इथे त्या बाबतीत खोलात जाऊ इच्छित नाही )

आज मिपावर अनेक विषयांवर लिहिणारे अनेक विषयातले पारंगत सदस्य आहेत पण जर "कट्टा" (किंवा "ग्रुप")झाला नाही तर आपण एकमेकांना कधीच ओळखणार नाही का? जर प्रत्यकाने स्वतःची "ओळख"(नाव,व्यवसाय)जाहीर केला तर ? ? "असे करू शकतो का?"

वरील घटना आणि त्या खालील विचारणा ह्यात काय संबंध आहे ? म्हंटले तर काही नाही म्हंटले तर मला प्रत्यक्ष बँकिंगमध्ये कार्यरत व्यक्ती ह्यांना काही प्रश्न विचारून बँकेचे नियम उपनियम तसेच इतर शंका निरसन करून घेणे शक्य होईल तसेच इतरांना इतर विषयाबाबत माहितीचे आदानप्रदान करणे शक्य होईल.

वरील सर्व थोडे विस्कळीत स्वरुपात(गेले काही दिवस जनू बांडेसारखा महिला वर्गात वावरत आहे म्हणून भयंकर भेलकांडलो आहे)मांडले आहे;पण वाचकांपर्यंत भावना पोहोचल्या असतील अशी आशा करतो.

ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले नाव आणि आपला व्यवसाय ह्याची ओळख करून द्यावी अशी विनंती.(व्हर्चुअल कट्टा म्हणा हवे तर )

समाजविचार

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

9 Feb 2014 - 10:25 am | अत्रन्गि पाउस

अरे भाई केहेना क्या चाहते हो?

बॅक ते नाकारु शकत नाही.एकदम एकादी एफडी अशी दुसर्‍याच व्यक्तीला सर्टीफिकेट शिवाय तोडता येत नाही.

अस करण्यापेक्षा जो प्रश्न तो ईथे मांडायचा आणी बिनधास्त सल्ला मागायचा . कधिकधी छोटासा सल्ला ही मोठ काम करतो .

(सल्लाप्रेमी) जेपी

ज्ञानव's picture

9 Feb 2014 - 10:53 am | ज्ञानव

सध्या तसेच चालू आहे की!! पण एकमेकांशी ओळख करण्यात अडचण काय ती उत्सुकता आहे.

ज्ञानव's picture

9 Feb 2014 - 10:50 am | ज्ञानव

त्यावर व्यवस्थापकाचे उत्तर असे कि "सिस्टीममध्येच"(संगणक प्रणाली) तशी "सोय" आहे. आणि सी ए महाशय म्हणतात कि बँक चुकेलच कशी?

आणि समस्त महिलावर्ग म्हणतोय "तुम्ही खोलात शिरू नका फक्त ऑडीट रिपोर्ट द्या"

माझी उद्बत्ति झाली आहे.

पण एकमेकांशी ओळख करण्यात अडचण काय ती उत्सुकता आहे.

अडचण काय नाय . व्यनि तुन होते कि ओळ्ख.

विजुभाऊ's picture

9 Feb 2014 - 11:17 am | विजुभाऊ

सी ए महाशय म्हणतात कि बँक चुकेलच कशी?
धन्य ते सी ए महोदय.....
त्याना त्यांची व्यावसायीकतेची शपथ आठवून द्या.....
ब्यांकेला त्या संदर्भात एक स्पष्टीकरण मागा. त्यांना योग्य स्पष्टीकरण न दिल्यास ग्राहक न्यायालयात जावे लागेल असे सांगा. या दोन्ही गोष्टी ग्राहक हक्क आणि माहितीच्या हक्का अंतर्गात येतात.

ज्ञानव's picture

9 Feb 2014 - 11:30 am | ज्ञानव

पण मला एक समाजात नाहीये टी डी एस झालाय म्हणजे पैसे कुणा बँकेच्या कर्मचार्याने किंवा सी.ए.ने किंवा विश्वस्त मंडळापैकी कुणी पैसे खाल्ले असे सकृतदर्शनी तरी दिसत नाहीये मग सगळे जाऊ देत का म्हणता आहेत?
प्रोसिजर चालू आहे. व्यवस्थापकाला एक पत्र देऊन कामाला लावले आहे पण मंडळ सीएला सुद्धा काहीच का विचारात नाही? (वार्षिक फी अडीच लाख घेतोय भौ...)आणि सगळे मलाच गप्प राहा सांगताहेत असे का? कुठे चुकते आहे?
कुणी बँकिंगवाले ह्यावर प्रकाश टाकू शकतील का?

अनुप ढेरे's picture

9 Feb 2014 - 11:47 am | अनुप ढेरे

टीडीएस कापल्याचं सर्टिफिकेट मागा ना

नगरीनिरंजन's picture

9 Feb 2014 - 11:54 am | नगरीनिरंजन

बरोबर. टीडीएस कापला तर बँकेने फॉर्म १६ पाठवणे आवश्यक आहे असे वाटते.

१०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याज असल्यास टी डी एस कापला जातो. एफ.डी. ची रक्कम २५ लाख असल्याने अर्थातच व्याज १०,००० पेक्षा जास्त आहे.
बँकेने एफ.डी. वर कर वजा केल्यावर (टी डी एस) विश्वस्थ संस्थेला टी डी एस सर्टीफिकेट (फॉर्म 16A) दिलेले असेल. त्यांचा सीए तुम्हाला ते दाखवु शकेल.
मुळ एफ.डी. रिसीट विश्वस्थ संस्थेने परत केल्याशिवाय बँक त्यांच्या (विश्वस्थ संस्थेच्या) परवानगी शिवाय ती एफ.डी. रिसीट रद्द करू शकत नाही.
जर विश्वस्थ संस्थेच्या सीए तुम्हाला बँकेकडुन मिळालेला मुळ फॉर्म 16A देऊ शकत नसेल तर तुम्ही बँक व्यवस्थापकाकडुन डुप्लिकेट फॉर्म 16A मागु शकता. त्या एफ.डी. रिसीट संदर्भात विश्वस्थ संस्था आणि बँक यांच्यात काही पत्रव्यवहार झाला आहे का हे तपासुन पहा.
माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे मी प्रतिक्रिया दिली आहे. मिपावरील इतर जेष्ठ तज्ञ आपल्याला मदत करतीलच.

ज्ञानव's picture

9 Feb 2014 - 6:56 pm | ज्ञानव

मागण्याची गरजच नाही कारण आता नेट वर तसा २६ए एस मार्फत आपला एकूण टी डी एस ची माहिती मिळते....पण मुद्दा तो नाहीच आहे कारण प्रोसिजर चालू केले आहेच मुद्दा हा कि

व्याजावर टीडीएस वजा करण्याऐवजी मुद्दलच कसे वजा केले? हे नवीनच पाहण्यात आले आहे.

मोदक's picture

9 Feb 2014 - 12:15 pm | मोदक

मी त्यांचा सीए आणि बँक व्यवस्थापक ह्यांना काही विचारले असता त्यांनी ते बरोबरच आहे असे सांगितले आहे.

हे त्यांच्याकडून लेखी घ्या.

रिझर्व बँकेचे "Tax Deduction At Source – Guidelines" नावाचे डॉक्युमेंट आहे. ते तुम्हाला तुमच्या / कोणत्याही बँकेत मिळेल. तुमची केस नीट अभ्यासून यातल्या नक्की कोणत्या सेक्शनचे उल्लंघन होत आहे ते पहा.

सगळी केस बँकेच्या संबंधीत अधिकार्‍यांला "त्यांच्या मॅनेजर समोर" समजावून सांगा (जर मॅनेजरच हे सगळे ऐकून घेणारा असेल तर या सगळ्याचे एक डॉक्युमेंट करा व त्यावर बँकेचा तारखेसह सहीशिक्का आणि सही अशी पोहोच घ्या.)

जर विन विन परिस्थितीमध्ये मान्य होत असेल तर ठीक अन्यथा रिझर्व बँकेकडे तक्रार करण्याचीही तयारी आहे असे बोलता बोलता जाणवून द्या.

cgmcsd@rbi.org.in या मेल आयडीवरती आपल्या तक्रारी ""योग्य पुराव्यांसह आणि कागदपत्रांसह"" पाठवल्यावर योग्य आणि त्वरीत पाठपुरावा होतो.

अवांतर - या संपूर्ण लिखापढीमध्ये तुम्ही इंटर्नल ऑडीटर आहात तेंव्हा "फक्त निरीक्षणे नोंदवणे" इतकेच तुमचे काम असताना या भानगडीमध्ये तुमचा नक्की इंटरेस्ट काय असा प्रश्न पडला आहे - असा प्रश्न पडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे अशा लाँग टर्म इश्श्यूमध्ये तुम्हांस लागणारा महिला मंडळाचा कितपत सपोर्ट आहे याची शंका वाटते आहे. (समस्त महिलावर्ग म्हणतोय "तुम्ही खोलात शिरू नका फक्त ऑडीट रिपोर्ट द्या")

उद्या महिला मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी "आम्हाला टीडीएस कॅल्युलेशनचा काही प्रॉब्लेम नाही" असे बँकेला तुमच्या अपरोक्ष लिहून दिले तर तुमची उदबत्ती दोन्ही बाजूनी पेट घेईल. बँकेसोबतचे संबंध बिघडतील आणि महिला मंडळ अ‍ॅज अ क्लायंट डामाडोल होईल.

सी ए महाशय म्हणतात कि बँक चुकेलच कशी?

बँक चुकणारच नाही वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवू नका. एक एक जबरा किस्से पाहिले आहेत आणि पाहत आहे. सध्या एफडी आणि टीडीएस यावरूनच एका बँकेसोबत आरबीआयच्या मदतीने भांडत आहे - डिटेल्स देता येणार नाहीत.

तुम्हाला धंदा वाढवायची संधी आहे भो तर असं का करू राह्यले?

वर मोदक म्हणतो त्याप्रमाणे इंटर्नल ऑडिटर म्हणून तुमचं काम "निरीक्षण नोंदवणे" या लेव्हलला संपतं. तुम्ही हे निरीक्षण नोंदवा रिपोर्टात आणि "योग्य त्या कार्यवाहीने मंडळासाठी पैसे वाचवणं शक्य आहे" अशी मेख मारून ठेवा. "योग्य ती कार्यवाही मी करु शकेन" असं तोंडी सांगा.

आता तुम्हाला त्यांचे पैसे वाचवणं दोन मार्गांनी शक्य आहे. पहिला बँकेशी भांडणे - आरबीआय - ग्राहक न्यायालय वगैरे मार्ग वर आले आहेतच. एक तर ते वेळखाऊ आहेत आणि त्यात मंडळाचं सहकार्य लागेल - ज्याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक आहात.

दुसरा मार्ग:
- हे महिला मंडळ रु २५ लाख ठेवी ठेवणारं आणि इंटर्नल ऑडिटरला रु. २.५ लाख फी देणारं आहे म्हणजे ते "चॅरिटेबल ट्रस्ट" आहे असं गृहित धरतो**.
- सेक्शन ११ प्रमाणे आयकरातून सूट मिळत असणार. तो "८५% मिळकत योग्य ठिकाणी खर्च झाली पाहिजे" वगैरे नियम पाळला तर शून्य कर पडत असेल.

जर असं असेल तर पहिलेछूट रिफंड मिळवा. पुढील वर्षांसाठी आयकर अधिकारी (रेंज हेड) "टीडीएस कापू नये" असं सर्टिफिकेट देतो. (बहुदा सेक्शन १९७, नक्की आठवत नाही.) ते ब्यांकेच्या तोंडावर मारा, पुढच्या वर्षीपासून ते कापाकापी करणार नाहीत!

तुम्हाला धंदा वाढवायची संधी आहे भो तर...

------
**नसेल तर तो तसा करून देणे, ८०-जी मिळवून देणे, चॅरिटी कमिशनरकडची कागदी घोडेबाजी, वगैरे बरंच रान मोकळं मिळेल!

ज्ञानव's picture

9 Feb 2014 - 6:22 pm | ज्ञानव

धंदा वाढवण्याचे गुपित आत्ताच नको न फोडायला....

इंटर्नल ऑडिटरला रु. २.५ लाख फी देणारं आहे

नाही हो ते सी ए ला
आमचे पैसे गुलदस्त्यात असू देत.....

पैसा's picture

9 Feb 2014 - 1:30 pm | पैसा

महिला मंडळाला जर टॅक्समधे सूट नसेल तर बँक टीडीएस कापेल. बँकेने टीडीएस कापायला नको असेल तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला फॉर्म १५जी/१५एच जो आवश्यक असेल तो द्यावा लागेल. (एकतर आपल्याला टॅक्स लागत नाही किंवा टॅक्स आपण स्वतंत्रपणे भरत आहोत यापैकी जे लागू असेल ते)

असा फॉर्म दिलेला नसल्यास बँक त्यांच्या ताब्यात असलेल्या पैशांतून टीडीएसची रक्कम कापून तुम्हाला तसे सर्टिफिकेट देईल. मात्र सर्वात आधी असा टीडीएस बचत्/चालू खात्यात उपलब्ध जमेतून कापला जाईल. तेवढी जमा रक्कम बचत्/चालू खात्यात नसेल तर फिक्स्ड डिपॉझिटमधून कापला जाईल. खातेदाराच्या सर्व फिक्स्ड डिपॉझिट्सवरील टीडीएस कोणत्याही एका खात्यातून किंवा आवश्यकतेनुसार त्या त्या खात्यातून कापला जाईल. फिक्स्ड डिपॉझिटची मॅचुरिटी रक्कम टीडीएस त्या खात्यातून कापला गेल्यास टीडीएसच्या प्रमाणात कमी होत जाईल.

ज्ञानव's picture

11 Feb 2014 - 1:02 pm | ज्ञानव

बँक त्यांच्या ताब्यात असलेल्या पैशांतून टीडीएसची रक्कम....... मात्र सर्वात आधी असा टीडीएस बचत्/चालू खात्यात उपलब्ध जमेतून कापला जाईल. तेवढी जमा रक्कम बचत्/चालू खात्यात नसेल तर फिक्स्ड डिपॉझिटमधून कापला जाईल.

अशी वेळच का यावी? जेव्हा एफ.डी.वर मिळणारे व्याज जमा करायची वेळ येते तेव्हा बँक टी.डी.एस.येणार्या व्याजातून वजा करून मगच खात्यात व्याज जमा करते न?

पैसा's picture

11 Feb 2014 - 1:15 pm | पैसा

निदान आमच्या बँकेच्या सॉफ्टवेअरमधे फॉर्म१५ एच्/जी त्या वर्षाच्या सुरुवातीला किंवा कधीही दिल्याची नोंद खात्यात केल्यानंतर टीडीएस कापला जात नाही. इतरांची लिस्ट येते आणि त्याप्रमाणे बॅलन्स पाहून टीडीएस हा तिमाहीच्या शेवट कापला जातो. तो वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवींवर वेगळ्या प्रकारे येतो. काही ठेवींवर दर महिना/तिमाही व्याज बचत खात्यावर जमा होत रहाते आणि मुदत संपल्यावर मुद्दल फक्त परत मिळते तर काही ठेवी मुदतीनंतर व्याजासहित सगळे पैसे परत मिळणार्‍या अशा प्रकारच्या असतात. त्या त्या प्रकारानुसार टीडीएस कोणत्या खात्यातून आणि कसा कापला जाईल हे ठरते.

सुबोध खरे's picture

9 Feb 2014 - 2:25 pm | सुबोध खरे

एक बाळबोध शंका -- बँक मुदत ठेवीच्या मुदलावर तर कर कापत नाही. ती कापते ती त्याच्या व्याजावर . मग हा कर त्या व्याजातूनच वळता होत नाही काय ? आणि दुसर्या मुदत ठेविला बँक हात कसा लावू शकते ? माझी बँक माझ्या मुदत ठेविवर कर कापूनच व्याज मुदलात बेरीज करून देत असते.

दुसर्‍या मोठ्या ठेवीवरचे टीडीएस त्यावरच्या व्याजातून कापले जायला हवे होते. निदान २५००० ही मूळ रक्कम तरी कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित असली पाहिजे. संपूर्ण ठेव टीडीएससाठी परस्पर रद्द केली असे होता कामा नये. इतकी ढोबळ चूक बँक करील असे वाटत नाही. कदाचित त्या मंडळाने तसे करावे म्हणून बँकेला लिहून दिले असेल.

संपूर्ण ठेव टीडीएससाठी परस्पर रद्द केली असे होता कामा नये. इतकी ढोबळ चूक बँक करील असे वाटत नाही. कदाचित त्या मंडळाने तसे करावे म्हणून बँकेला लिहून दिले असेल.

मी हि हेच म्हणतोय केव्हापासून....माझ्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत (कोण हसले कोण हसले ते!!!) मीही ha प्रकार पाहिला नव्हता कधी....म्हणजे व्यवसाय म्हणून जे प्रोसिजर करावयाचे आहे ते मी करतोच आहे.आत्ता इथे हात बांधले आहेत त्यामुळे काही गोष्टी लिहिता येत नाहीयेत पण बँक, सिए आणि महिला मंडळ सगळेच मला गप्प् बसा असा सल्ला का देत आहेत? (आणि मी गप्प बसणार?) बँकेने कोणत्या कलमा नियमानुसार हे केले? सिएला का पाठीशी घालताहेत (माझा सिए बसविनच...)बाकी महिला मंडळाने किंवा पूर्वी कुणी काही लिहून दिलेले नाही...नव्हे हि गोष्टच मी निदर्शनास आणून दिली आहे. "अग्ग बाई!! असे कसे हो केले बँकेने?" " आम्हाला त्यातले काही कळत नाही हो" ...कट टू "रचना कधी जातेयेस यु एस ला कितवा लागला ग सुनेला?" भर मिटिंगमध्ये मी हिशेब वह्या हातात घेऊन बसलोय आणि मी तिथे नाहीच आहे अशी चर्चा चालू झाली...

सुबोध खरे's picture

9 Feb 2014 - 7:33 pm | सुबोध खरे

साहेब,
या प्रकरणात साटे लोटे स्पष्टपणे दिसत आहेत.
असे बरॆच प्रसंग ( चौकशी कोर्टाचा वैद्यकीय सदस्य म्हणून काही नैसर्गिक आणि अनैसर्गिक मृत्यू मध्ये ) माझ्या आयुष्यात सरकारी नोकरीतही आले होते. मी मला जे योग्य वाटले ते सरळ लिहून दिले. एखादे वेळी इतर सदस्यांच्या विरोधात जाऊनसुद्धा भिन्नमत टिप्पणी (dissenting note ) मग ती वरिष्ठांना पटो व न पटो. शेवटी आपण आपली पाटी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
आजही असे प्रसंग माझ्या व्यवसायात येतात. सरोगेट (बदली मातृत्व)च्या स्त्रियांची सोनोग्राफी करीत असताना मूळ आयांना सोनोग्राफी आपल्या नावावर करून हवी होती. (कारण आपण गरोदर आहोत हे सासू सासर्यांना सिद्ध करणे सोपे जाते). त्यासाठी त्यांची कितीही पैसे देण्याची तयारी होती. मी याला स्पष्ट शब्दात नकार दिला मग माझे रुग्ण दुसरीकडे गेले तरी चालतील.
मी अजूनही व्यवसायाचा धंदा केला नाही. शेवटी आयष्यात रात्री शांतपणे येणारी झोप मला जास्त महत्त्वाची वाटते.
प्रत्येकाने स्वतः चा निर्णय स्वतः घेणे आवश्यक आहे.जनमत फार उलट सुलट येते आणि त्यात तुमच्या मानसिक जडण घडणीचा विचार नसतो.

आत्मशून्य's picture

9 Feb 2014 - 4:37 pm | आत्मशून्य

आज मिपावर अनेक विषयांवर लिहिणारे अनेक विषयातले पारंगत सदस्य आहेत पण जर "कट्टा" (किंवा "ग्रुप")झाला नाही तर आपण एकमेकांना कधीच ओळखणार नाही का? जर प्रत्यकाने स्वतःची "ओळख"(नाव,व्यवसाय)जाहीर केला तर ? ? "असे करू शकतो का?"

या गोष्टी ऐच्छीक नकोत.

ज्ञानव's picture

9 Feb 2014 - 6:18 pm | ज्ञानव

चला आपली ओळख द्या....काय नाव आपले?

घाबरत तर आपण कोणाच्या, कशाच्या बापाला नाही...! पण म्हणने असे आहे की मी नाव जाहिर करत असेन कारण प्रत्येक सदस्याने ते जाहीर केले पाहिजे ही सक्ति आहे म्हणून.... आणी तरच त्याला अर्थ आहे. अन्यथा काही कंपुबाज ऐच्छिकतेचा गैरफायदा नक्कि घेण्याची शक्यता कायम राहते.

ज्ञानव's picture

9 Feb 2014 - 6:58 pm | ज्ञानव

म्हणजे काम्पुबाजांना आपण घाबरतो कि काय ?

आत्मशून्य's picture

9 Feb 2014 - 7:53 pm | आत्मशून्य

पण त्यांचे बापास नाही!

प्यारे१'s picture

9 Feb 2014 - 8:42 pm | प्यारे१

___/\___

मस्त रे!

सरजी सोडुन द्या सगळच साटलोट दिसतय .

(CAG) जेपी