सप्रेम नमस्कार रसिक आणि कलाप्रेमी मि.पा.कर,
आज बर्याच दिवसांनी काही लिहित आहे.मूळ गाणे हिंदी आहे , त्यावरून - अर्थ तोच ठेवून लिहिण्याचा प्रयत्न केलाय.पाहुया कुणी ओळखतय का मूळ गाणे.
ना कुणाचा मी ना कोणीच झाले माझे इथे,
परके तर जाऊद्या, सख्ख्यांचा आधार नाही जिथे !
एरवी लोक जिथे रडकेही जिणे जगती की,
अन् माझ्या हसण्याचा ही लागला निभाव कुठे?
हाय मी काय असे प्रेमाखेरीज मागितले?
तेव्हढेही का न समाजास झाले मान्य इथे?
बघ किती तारका चमचमती तुझ्या ठायी नभा,
ना कधी न्हायले हे भाग्य चांदण्यात इथे!
पुढील कडवे मात्र नवीन आहे
बघ तुझा हात फिरे, आंधळ्यास ये दृष्टी,
ये फिरुन परतुनी, डोळ्यांस ना काहीच दिसे !
----------------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे.
प्रतिक्रिया
6 Feb 2014 - 6:26 pm | आतिवास
नाही कळलं मूळ गाणं :-(
6 Feb 2014 - 7:01 pm | कवितानागेश
मूळ गाणं कळत नाहीये अजून तरी.
पण छान आहे. :)
6 Feb 2014 - 8:00 pm | सानिकास्वप्निल
इस भरी दुनिया में कोई हमारा ना हुआ
गैर तो गैरे थे अपनों का सहारा ना हुआ....
7 Feb 2014 - 1:41 pm | पैसा
रूपांतर छान झालंय.
7 Feb 2014 - 1:46 pm | उदय सप्रे
ज्योति,
तुम्ही या मूळ गाण्याची चाल माहित असेल तर मराठी गाणे त्याच चालीत म्हणून बघा, त्याच मीटरवर आहे हे गाणे ! बघा आणि कळवा कसं वाटतंय ते.
धन्यवाद,
उदय सप्रेम