<<<< उपकृमी वाढे खात्यात >>>

सुहास..'s picture
सुहास.. in जे न देखे रवी...
28 Jan 2014 - 1:27 pm

कृमी हा शब्द जाणुन बजुन लिहिला आहे ..
कच्चा माल : ओळखा पाहु ;)

उपकृमी वाढे खात्यात
जिलेब्या काथ्या कुटात
कधी नवे, कधी जुने
विकार जंत ताटात ,
उपकृमी वाढे खात्यात ।। १ ।।

वाश्या : मी तुला सांगतो , इतकी वैचारिक कळवळ मी आयुष्यात बघीतलेली नाही.
सई : आणि तु ? मघाशी धागा आला तेव्हा तुझा चेहरा का पडला ?
वाश्या : माझा चेहरा कशाला पडेल ? माझा चेहरा पडायला मी शतकी धागे लेखकु आहे का ?
सई : ते मला माहीत नाही..

( मग वाश्या सईला जास्त विचार करू नको अन्यथा तुझ्या लाल पांढर्‍या स्कार्फ ने फाशी घेईन असे ईशार्‍याने दर्शवितो...कोरस गातच असतात )

नाही पडी रिप्लाय तरी
कुंथुन काढे बोर्डा वरी
सोचा त्यावर अवांतर भी
बरसे गब्बर बंदुक धारी

रोजचे लेखन बाळसे नको
जीव अडकला दर्ज्यात

उपकृमी वाढे खात्यात ।। १ ।।

( मग वाश्या सईच्या कारच्या दरवाज्यात अडकलेला स्कार्फ काढायला जातो, भर उन्हात तसे करत असल्याने दम लागतो, घाम येतो. स्कार्फ कर्वे रस्त्यावरल्या भैय्याच्या ठेल्यावरुन घेतलेला असल्याने फाटतो आणी वर वाश्या तोल जावुन खाली टिंबटिंबवर आपटतो आणि त्याच फाटक्या स्कार्फ ने घाम पुसतो. समोर लंबुटांग डिसपी आणि कट्टा गँग त्यावर हसत असतात. )

वाश्या : मला काय वाटलं तु इथलीच मिपाकर आहेत
सई : तुमच्या इथे पण विचारवंत आहेत .
वाश्या : आहेत पण जरा सामाजिक जाण असलेले पण आहेत
सई : सामाजिक जाण असलेला विचारवंत व्हायला काही करावं लागत का ?
वाश्या : नाही .. ( पण मनातल्या मनात : अक्कल आणि कॉमन सेन्स वापरावा लागतो त्याला वाय झेड !! )

धागा ही तु, कर्ता ही तु
रुदन करणारा विषय ही तु
प्रती ही तु , साद ही तु
काथ्याच काय ? पण कुट ही तु
रोज नवे प्रसव तुझे,
चिंता ही कंपु गोटात

उपकृमी वाढे खात्यात ।। १ ।।

सई : तुझे टकंन किती कन्फुज ना !! मघाशी तु डाव्या विचारांचा होतास आजच्या लेखात तु लगेच उजव्या विचारांचा ??? खच्ची आहेस तु ! खच्ची !!

गच्चीतुन
वाश्या

गरम पाण्याचे कुंडविडंबन

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

28 Jan 2014 - 1:32 pm | प्यारे१

________________/\_________________

लय बाद हाय बे तू!

जेपी's picture

28 Jan 2014 - 1:35 pm | जेपी

आमाचाबी दंडवत .

पैसा's picture

28 Jan 2014 - 1:43 pm | पैसा

ज्वलंत सामाजिक आशय असलेले नाटुकले आवडले. "गरम पाण्याचे कुंड" हा काव्यरस बरेच काही सांगून जातो आहे.

यशोधरा's picture

28 Jan 2014 - 1:49 pm | यशोधरा

मस्नी कायबी समजलं न्हाय!

जल्ला मस्नीबी काय कल्ला नाय..!
यवढाच कल्ला की कशाचं इडंबन हाय...

जल्ला म्होरा करपाटला कालीज नाय तां. ही कंची भाषा बोलताईव?

भावनाओंको समझो रे सूड तात्या. ;)

सुहास..'s picture

29 Jan 2014 - 11:58 am | सुहास..

:)

प्रचेतस's picture

28 Jan 2014 - 2:32 pm | प्रचेतस

=)) =)) =))

लै भारी.
शीर्षकात 'कृमी' हा शब्द असल्याने धाग्यात 'जंत' हा शब्द अपेक्षित होता. त्याऐवजी 'वंत' दिसल्याने अंमळ निराशा झाली.

शिद's picture

28 Jan 2014 - 3:16 pm | शिद

त्याऐवजी 'वंत' दिसल्याने अंमळ निराशा झाली.

_/\_...ज ब रा... =))

नाखु's picture

29 Jan 2014 - 12:07 pm | नाखु

लिखाण
ही जोडीने (शाल) जोडीतले मारण्याची ष्टाईल झकास.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2014 - 12:17 pm | मुक्त विहारि

ठ्ठो...

कवितानागेश's picture

30 Jan 2014 - 3:31 pm | कवितानागेश

गरम पाण्याचे कुंड ! :D

उडन खटोला's picture

30 Jan 2014 - 3:44 pm | उडन खटोला

धम्माल काव्यप्रसव !

किसन शिंदे's picture

31 Jan 2014 - 12:31 am | किसन शिंदे

वाश्या, वर्गातला सिनियर मुलगा ना रे तू?! सिनियर पोरांनी असं करायचं असतं का? ;)