चिली गार्लिक बेबी कॉर्न

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
21 Jan 2014 - 6:01 pm

खूप दिवसात नवीन काही पाकृ मिपावर लिहिली नाही.. आज सालन आणि बगारा राइस बघून मलाही सुरसुरी आली लिहायची..
तर पेश है चिली गार्लिक बेबी कॉर्न-

साहित्य- १०-१२ बेबी कॉर्न,
हिरवी, पिवळी, लाल भोपळी मिरची लांब चिरुन प्रत्येकी अर्धी वाटी(रंगीत भोपळी मिरच्या उपलब्ध नसल्यास फक्त हिरव्या भोपळी मिरच्या लांब चिरुन)
१ मध्यम कांदा लांब चिरुन, १ कांदा पात बारीक चिरुन
५-६ मोठ्या किवा ८-९ लहान लसूण पाकळ्या-बारीक चिरुन अर्धी वाटी
२ हिरव्या मिरच्या मध्ये कापून लांब चिरुन
८-१० सुक्या लाल मिरच्या
थोडे मक्याचे दाणे- साधारण अर्ध्यापेक्षा कमी वाटी
२ चमचे सोयासॉस, ४ चमचे कॉर्नफ्लोअर,चमचाभर मिरपूड,१चमचा टोमॅटो केचप, अर्धा चमचा साखर,मीठ,तेल
व्हेजिटेबल स्टॉक/पाणी

कृती-
सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात भिजत घाला, नंतर निथळून घ्या व मिक्सरमधून पेस्ट करुन घ्या, ही पेस्ट फ्रिजमध्ये ४-५ दिवस तर फ्रिझर मध्ये महिना दोन महिने सहज टिकते.तिचा इतरही पावभाजी,मिसळ,चिकन किवा इतर चायनीज पदार्थात वापर करता येतो.म्हणून ८-१० सुक्या मिरच्या घेतल्यात.

टिनमधील बेबी कॉर्न असतील तर चाळणीवर टाकून मग साध्या पाण्यात १५-२० मिनिटे बुडवून ठेवा म्हणजे त्यातील व्हिनेगरचा आंबटपणा कमी होईल. नंतर परत चाळणीवर टाकून पाणी निथळून घ्या आणि टिशूपेपरवर टाकून कोरडे करुन घ्या.
फ्रेश बेबी कॉर्न असतील तर उकळत्या पाण्यातून २-३ मिनिटे काढून घ्या आणि टिशूवर टाकून कोरडे करुन घ्या.
नंतर त्याचे लांब तुकडे करुन कॉर्नफ्लोअरने डस्टिंग करुन घ्या.
एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करुन हे बेबी कॉर्नचे तुकडे लालसर शॅलो फ्राय करुन घ्या व बाजूला ठेवा,
खरं म्हणजे हे तुकडे तळून घेतात पण मी थोड्या कॅलरी कमी करण्याकरता शॅलोफ्राय करते.
आता आच मोठी ठेवा, त्याच तेलात लसूण घालून परता.कांदा घालून परता.त्यावर हिरव्या मिरच्या,रंगीत भोपळी मिरच्या घालून परता.
सुक्या लाल मिरचीची पेस्ट चमचाभर घाला. तिखट जास्त हवे असल्यास जास्त पेस्ट घालू शकता.
२ चमचे सोया सॉस घाला.
थोडा, साधारण पाऊण कप व्हेजि. स्टॉक किवा पाणी घाला.
अर्धा चमचा साखर, १ चमचा टोमॅटो केचप घाला.
एक उकळी आली की त्यात बाजूला ठेवलेले बेबीकॉर्न घाला.
मक्याचे दाणे घाला. टिनमधील मके असल्यास प्रश्न नाही, फ्रेश मके असतील तर उकळत्या पाण्यातून काढून घ्या.
१ चमचा कॉर्न फ्लोअर साध्या पाण्यात विरघळून घ्या, पाणी थंड असले की कॉर्न फ्लोअरच्या गुठळ्या होत नाहीत.हे मिश्रण त्यात घाला.
चवीनुसार मीठ घाला. हवे असेल तर चिमूटभर अजिनोमोटो घाला.
एक दोन उकळ्या आल्या की आच बंद करा.
चिरलेली कांदा पात घालून गार्निश करा.
गरम गरम चिली गार्लिक बेबीकॉर्न फ्राइड राईस बरोबर खा.

.

प्रतिक्रिया

अनन्न्या's picture

21 Jan 2014 - 6:09 pm | अनन्न्या

छान वाटतेय पाकृ.

आदूबाळ's picture

21 Jan 2014 - 6:09 pm | आदूबाळ

फटू दिसत नाही (तेच बरंय)

भारी पाकृ!

पाणी थंड असले की कॉर्न फ्लोअरच्या गुठळ्या होत नाहीत

या टिपबद्दल विशेष धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2014 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा

@(तेच बरंय) >>> =))

बाकी पाककृती छान हाय हो! :)

अनन्न्या's picture

21 Jan 2014 - 6:10 pm | अनन्न्या

तोंपासू........

निवेदिता-ताई's picture

21 Jan 2014 - 6:13 pm | निवेदिता-ताई

मस्तच

दिपक.कुवेत's picture

21 Jan 2014 - 6:14 pm | दिपक.कुवेत

पण पाणि/व्हेज स्टॉक न घालता केल तर 'मंचुरीअन' टाईप होउ शकतं. एक ब्येस्ट चखना चिल्ड बियर बरोबर!

मुक्त विहारि's picture

21 Jan 2014 - 8:00 pm | मुक्त विहारि

+ १

ये हुई ना बात...

जब मिलेंगे ३ यार...

तुम , मैं और माइल्ड लंडन पिल्सनर

फक्त, त्यावेळे ह्या ग्रेव्हीत उकडलेल्या अंड्याचे काप टाकू या. (हाकानाका)

दिपक.कुवेत's picture

22 Jan 2014 - 1:25 pm | दिपक.कुवेत

आता आलो कि मग बसुच! एल्पी अजुन मिळते?? आमच्या उरण मधे फक्त किंगफिशर माईल्ड्/स्त्रोन्ग आणि हावर्ड ५०००/१०००० मिळतात.

मुक्त विहारि's picture

22 Jan 2014 - 1:48 pm | मुक्त विहारि

आयला, तुमचा पण हाच ब्रँड का?

आमच्या इथे काही ठराविक दुकानातच मिळते.

दिपक.कुवेत's picture

22 Jan 2014 - 2:17 pm | दिपक.कुवेत

जी चढेल/जीचा किक बसेल तो आपला ब्रँड. हां पण बियर हवी मात्र चिल्ड. डोंबीवलीत चक्कर होणार आहे.......मस्त बार शोधुन ठेवा. आलो कि बसुच तीन यार!

मधुरा देशपांडे's picture

21 Jan 2014 - 6:36 pm | मधुरा देशपांडे

भारीच. ऑफिस मधले मिळमिळीत जेवण केल्यानंतर ही अशी चटपटीत पाक्रु.
जेवायला येऊ का तुमच्या घरी आज रात्री? :)

प्यारे१'s picture

21 Jan 2014 - 6:54 pm | प्यारे१

बेष्ट!

सानिकास्वप्निल's picture

21 Jan 2014 - 6:59 pm | सानिकास्वप्निल

चिली गार्लिक बेबी कॉर्नची पाकृ खास आवडली :)
फोटो पण टेम्टींग आहे.
न्युड्ल्सबरोबरही छान लागेल असे वाटते.

अनिरुद्ध प's picture

21 Jan 2014 - 7:00 pm | अनिरुद्ध प

तसेच फटु सुद्धा मस्त आवडली पुलेशु

सस्नेह's picture

21 Jan 2014 - 7:48 pm | सस्नेह

ढोबळी मिरची आवडत नाही. ती न घालता करेन.

मुक्त विहारि's picture

21 Jan 2014 - 8:03 pm | मुक्त विहारि

नक्कीच करुन बघण्यात येईल.

बेबी कॉर्न बिलकूल आवडत नाही.

त्यामुळे, उकडलेले अंडे वापरून ही रेसिपी करुन बघीन.

सस्नेह's picture

22 Jan 2014 - 10:41 pm | सस्नेह

अंडे घात्ल्यावर या पाकृचे नाव काय होईल ?

रेवती's picture

21 Jan 2014 - 8:24 pm | रेवती

एकदम मस्त!

सुहास झेले's picture

22 Jan 2014 - 8:41 am | सुहास झेले

जबरी... तोंपासू :)

इन्दुसुता's picture

22 Jan 2014 - 9:58 am | इन्दुसुता

पाकृ आवडली.

पा. कृ. आणि छायाचित्रं, खूपच छान आहे.

मला पा कृ आवडते . करायला नाही. खायला .....

सुहास..'s picture

22 Jan 2014 - 1:22 pm | सुहास..

दंडवत !!

नंदन's picture

22 Jan 2014 - 2:01 pm | नंदन

अनेक दिवसांनी स्वातीताईचा धागा पाहून बरं वाटलं. पाकृ आणि फोटू - दोन्ही झकास!

कवितानागेश's picture

22 Jan 2014 - 3:09 pm | कवितानागेश

छानच दिसतय. फार दिवसांनी स्वातीताईची पाकृ.

गणपा's picture

22 Jan 2014 - 3:59 pm | गणपा

यात थोडे वाढीव सामीश जिन्नस घालुन पदार्थ बनवून चाखण्यात येईल लवकरच. :)

शिद's picture

23 Jan 2014 - 9:31 pm | शिद

बाकी पाकृ एकदम झकास दिसते आहे.

राही's picture

22 Jan 2014 - 6:18 pm | राही

बर्‍याच दिवसांनी आलेली पा.कृ. छानच आहे. सोपीही दिसतेय. यात बेबी कॉर्नऐवजी किंवा सोबतीने मश्रूम्सही चांगले लागावेत.
एक शंका. आठ नऊ लसूण पाकळ्या चिरून : कंसात अर्धी वाटी? वाटी लहान असेल तरच अर्धी भरेल. म्हणजे मग वरचे सर्व साहित्य याच लहान वाटीच्या मापाने घ्यावे लागेल.

प्रभाकर पेठकर's picture

28 Jan 2014 - 8:31 pm | प्रभाकर पेठकर

लसूणाच्या पाकळ्या मोठ्या असतील. इथे चिनी लसूण मिळतो त्याच्या पाकळ्या मोठ्या असतात. त्या एका पाकळीत भारतिय ४ पाकळ्या सहज मावतील. मोठ्या पाकळ्यांना, भारतिय लहान पाकळ्यांपेक्षा स्वाद जरा कमी असतो. तुमच्या आवडीनुसार लसूण पाकळ्यांची संख्या ठरवायला लेखिकेची हरकत नसावी, असे वाटते.

मदनबाण's picture

23 Jan 2014 - 9:15 pm | मदनबाण

शॉलिट्ट... :)

सर्वसाक्षी's picture

24 Jan 2014 - 11:00 pm | सर्वसाक्षी

फ्राईड राईस बरोबर हा प्रकार एकदा केलाच पाहिजे. पाकृ आवडली

कितीतरी दिवसांनी लिहिलेस स्वातीताई. :) मस्त वाटतेय पाकृ.
मागे विविध केक्सच्या पाकृ लिहिल्या होत्यास तसे काही थीम घेऊन लिही ना.

पैसा's picture

28 Jan 2014 - 8:18 pm | पैसा

पाकृ आणि फोटो लै भारी!

सखी's picture

28 Jan 2014 - 10:06 pm | सखी

पाकृ आणि फोटो दोन्ही लै भारी - पटकन उचलुन खावेसे वाटतयं

अमृत's picture

3 Feb 2014 - 11:36 am | अमृत

घरी आवडल्याने सलग दोन दिवस करण्यात आलं. सूक्या लाल मिर्च्यांऐवजी विकतचा कोल्हपुरी ठेचा घातल होता थोडा एक्दम ठसकेबाज!
पाकृकरीता धन्यवाद!

दक्षिणा's picture

3 Feb 2014 - 1:08 pm | दक्षिणा

:(

छान पाककृती आणि फोटो !
करून बघायला हवी.