खूप दिवसात नवीन काही पाकृ मिपावर लिहिली नाही.. आज सालन आणि बगारा राइस बघून मलाही सुरसुरी आली लिहायची..
तर पेश है चिली गार्लिक बेबी कॉर्न-
साहित्य- १०-१२ बेबी कॉर्न,
हिरवी, पिवळी, लाल भोपळी मिरची लांब चिरुन प्रत्येकी अर्धी वाटी(रंगीत भोपळी मिरच्या उपलब्ध नसल्यास फक्त हिरव्या भोपळी मिरच्या लांब चिरुन)
१ मध्यम कांदा लांब चिरुन, १ कांदा पात बारीक चिरुन
५-६ मोठ्या किवा ८-९ लहान लसूण पाकळ्या-बारीक चिरुन अर्धी वाटी
२ हिरव्या मिरच्या मध्ये कापून लांब चिरुन
८-१० सुक्या लाल मिरच्या
थोडे मक्याचे दाणे- साधारण अर्ध्यापेक्षा कमी वाटी
२ चमचे सोयासॉस, ४ चमचे कॉर्नफ्लोअर,चमचाभर मिरपूड,१चमचा टोमॅटो केचप, अर्धा चमचा साखर,मीठ,तेल
व्हेजिटेबल स्टॉक/पाणी
कृती-
सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात भिजत घाला, नंतर निथळून घ्या व मिक्सरमधून पेस्ट करुन घ्या, ही पेस्ट फ्रिजमध्ये ४-५ दिवस तर फ्रिझर मध्ये महिना दोन महिने सहज टिकते.तिचा इतरही पावभाजी,मिसळ,चिकन किवा इतर चायनीज पदार्थात वापर करता येतो.म्हणून ८-१० सुक्या मिरच्या घेतल्यात.
टिनमधील बेबी कॉर्न असतील तर चाळणीवर टाकून मग साध्या पाण्यात १५-२० मिनिटे बुडवून ठेवा म्हणजे त्यातील व्हिनेगरचा आंबटपणा कमी होईल. नंतर परत चाळणीवर टाकून पाणी निथळून घ्या आणि टिशूपेपरवर टाकून कोरडे करुन घ्या.
फ्रेश बेबी कॉर्न असतील तर उकळत्या पाण्यातून २-३ मिनिटे काढून घ्या आणि टिशूवर टाकून कोरडे करुन घ्या.
नंतर त्याचे लांब तुकडे करुन कॉर्नफ्लोअरने डस्टिंग करुन घ्या.
एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करुन हे बेबी कॉर्नचे तुकडे लालसर शॅलो फ्राय करुन घ्या व बाजूला ठेवा,
खरं म्हणजे हे तुकडे तळून घेतात पण मी थोड्या कॅलरी कमी करण्याकरता शॅलोफ्राय करते.
आता आच मोठी ठेवा, त्याच तेलात लसूण घालून परता.कांदा घालून परता.त्यावर हिरव्या मिरच्या,रंगीत भोपळी मिरच्या घालून परता.
सुक्या लाल मिरचीची पेस्ट चमचाभर घाला. तिखट जास्त हवे असल्यास जास्त पेस्ट घालू शकता.
२ चमचे सोया सॉस घाला.
थोडा, साधारण पाऊण कप व्हेजि. स्टॉक किवा पाणी घाला.
अर्धा चमचा साखर, १ चमचा टोमॅटो केचप घाला.
एक उकळी आली की त्यात बाजूला ठेवलेले बेबीकॉर्न घाला.
मक्याचे दाणे घाला. टिनमधील मके असल्यास प्रश्न नाही, फ्रेश मके असतील तर उकळत्या पाण्यातून काढून घ्या.
१ चमचा कॉर्न फ्लोअर साध्या पाण्यात विरघळून घ्या, पाणी थंड असले की कॉर्न फ्लोअरच्या गुठळ्या होत नाहीत.हे मिश्रण त्यात घाला.
चवीनुसार मीठ घाला. हवे असेल तर चिमूटभर अजिनोमोटो घाला.
एक दोन उकळ्या आल्या की आच बंद करा.
चिरलेली कांदा पात घालून गार्निश करा.
गरम गरम चिली गार्लिक बेबीकॉर्न फ्राइड राईस बरोबर खा.


वाचने
13985
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटु?
फटू दिसत नाही (तेच बरंय)
@(तेच बरंय) >>>
In reply to फटू दिसत नाही (तेच बरंय) by आदूबाळ
दिसला फोटो!
मस्तच
वा छान दिसतय
एक ब्येस्ट चखना चिल्ड बियर बरोबर!
In reply to वा छान दिसतय by दिपक.कुवेत
ज्जे बात मुवि
In reply to एक ब्येस्ट चखना चिल्ड बियर बरोबर! by मुक्त विहारि
एल्पी अजुन मिळते??
In reply to ज्जे बात मुवि by दिपक.कुवेत
ब्रँड असा स्पेसीफिक नाहि
In reply to एल्पी अजुन मिळते?? by मुक्त विहारि
भारीच
बेष्ट!
चमचमीत!!
पा क्रु
आवडली.
मस्त दिसत आहे रेशिपी...
वॉव !
In reply to मस्त दिसत आहे रेशिपी... by मुक्त विहारि
एकदम मस्त!
_/|\_
पाकृ आवडली.
पा. कृ. आणि छायाचित्रं, खूपच
मला पा कृ आवडते . करायला नाही
दंडवत !!
मस्त
छानच दिसतय. फार दिवसांनी
झक्कास !
+१११
In reply to झक्कास ! by गणपा
छानच
गरजे नुसार...
In reply to छानच by राही
शॉलिट्ट...
वा!
कितीतरी दिवसांनी लिहिलेस
मस्तच!
भारीच
In reply to मस्तच! by पैसा
हे पण करून पाहिलं
फोटो दिसत नाहियेत.
छान पाककृती आणि फोटो !