तुझी 'माया'च बाकी .......

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
16 Jan 2014 - 5:02 pm

तूच दिलीस साथ
ढासळत्या मनाला,
सावरलेस संकटात
क्षणोक्षणी जीवनाला !!

धडपडून उठतांना तो
जीव कासावीस झाला,
तुझी ‘माया’च बाकी
जीवन उणं होताना !!

ते पंख उबीचे
अन दिलासा मनाला,
दिलीस कल्पना वाईटाची
जरी क्षणिक मोह झाला !!

बोचकरलं परिस्थितीने परी
खंत नव्हती जगण्याला,
गेलो सामोरे त्याला अन
दुःखाचा पराजय केला !!

उन्मादात जगणं व्हावं
आणि पेटावं उमेदीला,
जिद्दीला मायेची जोड हवी
जीवन सफल करण्याला !!

- साजीद यासीन पठाण

धोरण

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

16 Jan 2014 - 7:09 pm | आयुर्हित

दिलीस कल्पना वाईटाची
जरी क्षणिक मोह झाला !!

किती छान लिहितोस! सर्वांना असी विवेकशील माया मिळो हीच प्रार्थना त्या सर्वेश्वराला!!

बोचकरलं परिस्थितीने परी
खंत नव्हती जगण्याला,
गेलो सामोरे त्याला अन
दुःखाचा पराजय केला !!

बहोत खुब! खूप छान! लढाऊ वृत्तीच हवी जीवन जगतांना, हेच खरे!

दोन बदल सुवावेसे वाटतात:

१) जीव कासावीस झाला
धडपडून उठतांना,
तुझी ‘माया’च बाकी
जीवन उणं होताना !!

यात यमक साधले जाईल असे वाटते.

२) उन्मादात जगणं व्हावं
साजिद पेटावं उमेदीला,
जिद्दीला मायेची जोड हवी
जीवन सफल करण्याला !!

असे जर कवीचे नाव पद्यात आले तर कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात राहते.

चू.भू.दे.घे.
आपला मिपास्नेही :आयुर्हीत

तुम्ही सुचवलेला बदल स्वागतार्ह वाटतो.

पैसा's picture

21 Jan 2014 - 9:54 pm | पैसा

शब्दयोजना जरा जास्त व्यवस्थित अशा वृत्तात करता आली तर बघा. म्हणजे चांगल्या कल्पनेचं सादरीकरण पण तसंच लयीत आणि मात्रांमधे बसणारं असेल तर जास्त छान. तुमची कविता मुक्तछंदात नाही त्यामुळे ती वृत्तबद्ध असावी ही सूचना आवडली तर पुढल्या वेळी अमलात आणून बघा!