बीट पुलाव

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
7 Jan 2014 - 2:07 pm

साहित्यः पाव कि. तांदूळ, एक टोमॅटो, दोन कांदे, १०-१२ फरसबी शेंगा, अर्धी वाटी मटार, पाव वाटी काजूगर, एक गाजर, ५-६ लसूण पाकळ्या, आलं एक छोटा तुकडा, लाल तिखट १ चमचा, एक चमचा गरम मसाला, दोन मध्यम बीट, तूप, जिरे, ५-६ काळी मिरी, मीठ.
कृती: तांदूळ धूऊन निथळत ठेवावेत. बीट शिजवून घ्यावीत. साले काढून बीट मिक्सरला फिरवून पेस्ट करून घ्यावी. काजूगर पाण्यात भिजत घालावेत. तांदूळ थोड्या तूपावर परतून मीठ, थोडे वाटलेले बीट घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. कांदे चिरून घ्यावे. गाजराचे पेरभर लांबीचे पातळ चपटे तुकडे करावे. फरसबीच्या शेंगांचे पेरभर लांबीचे तिरके तुकडे करावे. गाजर, मटार, फरसबी, काजूगर थोडे वाफवून घ्यावे. टोंमॅटोचा रस काढावा. आलं लसूण वाटून घ्यावी.
कढईत तूप तापवून त्यात जिरे, काळी मिरी घालावी. त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा. कांद्यावर आलं-लसूण पेस्ट घालावी. थोडी परतून त्यावर गरम मसाला, लाल तिखट घालावे. वाफवलेल्या भाज्या घालून त्यावर भाज्यांपुरते मीठ घालावे. परतून घ्यावे. तयार भात मिसळावा. टोमॅटोचा रस घालावा. सर्व भात नीट एकत्र करून छान वाफ काढावी. एक वाफ आल्यावर वाटलेल्यापैकी उरलेला बीट रस भातात मिसळावा. ५-७ मिनिटे वाफवून गॅस बंद करावा. बीट्चा रस घातल्यावर जास्त वेळ वाफ काढली तर भाताचा रंग फिका होतो, म्हणून नंतर ५-७ मिनिटेच वाफवावा.red pulav

प्रतिक्रिया

michmadhura's picture

7 Jan 2014 - 2:11 pm | michmadhura

मस्त कलर आलाय बीटचा. नक्की करून बघणार.

अजया's picture

7 Jan 2014 - 4:52 pm | अजया

बीट आहे घरात्,करुन बघते.

दिपक.कुवेत's picture

7 Jan 2014 - 7:42 pm | दिपक.कुवेत

एकदम रंगीबेरंगी दिसतोय. ते काचेच्या बाउल मधे काय आहे?

रेवती's picture

7 Jan 2014 - 9:48 pm | रेवती

chhaan disatoy.

पैसा's picture

7 Jan 2014 - 10:10 pm | पैसा

काय झकास रंग आलाय! सोबत टोमॅटोचं सार का?

शिद's picture

7 Jan 2014 - 11:02 pm | शिद

गरमागरम खायला मस्त मजा येईल.

अनन्न्या's picture

8 Jan 2014 - 10:22 am | अनन्न्या

टोमॅटोचं सार आहे.

मदनबाण's picture

8 Jan 2014 - 10:28 am | मदनबाण

झकास्स्स्स... :)

मदनबाण's picture

8 Jan 2014 - 10:32 am | मदनबाण

झकास...

रुमानी's picture

8 Jan 2014 - 10:41 am | रुमानी

छान दिसतोय...! :)

टक्कू's picture

9 Jan 2014 - 2:37 pm | टक्कू

ऩक्की करुन बघेन :)

दिनेश शिन्दे.'s picture

25 Sep 2014 - 8:11 pm | दिनेश शिन्दे.

छान