Skip to main content

बीट पुलाव

लेखक अनन्न्या यांनी मंगळवार, 07/01/2014 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पाव कि. तांदूळ, एक टोमॅटो, दोन कांदे, १०-१२ फरसबी शेंगा, अर्धी वाटी मटार, पाव वाटी काजूगर, एक गाजर, ५-६ लसूण पाकळ्या, आलं एक छोटा तुकडा, लाल तिखट १ चमचा, एक चमचा गरम मसाला, दोन मध्यम बीट, तूप, जिरे, ५-६ काळी मिरी, मीठ. कृती: तांदूळ धूऊन निथळत ठेवावेत. बीट शिजवून घ्यावीत. साले काढून बीट मिक्सरला फिरवून पेस्ट करून घ्यावी. काजूगर पाण्यात भिजत घालावेत. तांदूळ थोड्या तूपावर परतून मीठ, थोडे वाटलेले बीट घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. कांदे चिरून घ्यावे. गाजराचे पेरभर लांबीचे पातळ चपटे तुकडे करावे. फरसबीच्या शेंगांचे पेरभर लांबीचे तिरके तुकडे करावे. गाजर, मटार, फरसबी, काजूगर थोडे वाफवून घ्यावे. टोंमॅटोचा रस काढावा. आलं लसूण वाटून घ्यावी. कढईत तूप तापवून त्यात जिरे, काळी मिरी घालावी. त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा. कांद्यावर आलं-लसूण पेस्ट घालावी. थोडी परतून त्यावर गरम मसाला, लाल तिखट घालावे. वाफवलेल्या भाज्या घालून त्यावर भाज्यांपुरते मीठ घालावे. परतून घ्यावे. तयार भात मिसळावा. टोमॅटोचा रस घालावा. सर्व भात नीट एकत्र करून छान वाफ काढावी. एक वाफ आल्यावर वाटलेल्यापैकी उरलेला बीट रस भातात मिसळावा. ५-७ मिनिटे वाफवून गॅस बंद करावा. बीट्चा रस घातल्यावर जास्त वेळ वाफ काढली तर भाताचा रंग फिका होतो, म्हणून नंतर ५-७ मिनिटेच वाफवावा.red pulav

वाचने 5750
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मस्त कलर आलाय बीटचा. नक्की करून बघणार.

बीट आहे घरात्,करुन बघते.

एकदम रंगीबेरंगी दिसतोय. ते काचेच्या बाउल मधे काय आहे?

काय झकास रंग आलाय! सोबत टोमॅटोचं सार का?

गरमागरम खायला मस्त मजा येईल.

टोमॅटोचं सार आहे.

छान दिसतोय...! :)

ऩक्की करुन बघेन :)

छान