मंडळी , येताय चिकन खायला?

आंबोळी's picture
आंबोळी in पाककृती
21 Jul 2008 - 12:21 pm

प्रेरणा : मदनबाणाची कणसे

चिकन धूवुन घ्या.

हळद, आले-लसणाची पेस्ट लाउन अर्धा-पाउण तास ठेउन द्या.

बटर गरम करून बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. मग त्यात आल्,लसूण,मिरची, कोथींबीर्,कांदा यांची पेस्ट आणि मसाला घालून परता.

चिकनचे तुकडे घालून व्यवस्थीत हलवा. आणि झाकून एक वाफ आणा.

पाणी आणि मसाला , लाल तिखट घालून झाकून ठेवा. १५ मिनिट मंद आचेवर शिजु द्या.

कोथिंबीर घालून ग्यास बंद करा व ५ मिनिट झाकून ठेवा.

चला मंडळी , पाने तयार आहेत.

वि.सु. : तात्या आजची खादाडी मधे चित्रे वापरायला हरकत नाही.

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

21 Jul 2008 - 12:25 pm | आनंदयात्री

चिकन कोंबडीचेच आहे हे पाहुन समाधान वाटले :D ..

(शार्पशुटर कंदिलफेम आंबोळ्याला घाबरणारा)

आंद्याकुक्कुट

सुनील's picture

21 Jul 2008 - 12:31 pm | सुनील

चिकन कोंबडीचेच आहे हे पाहुन समाधान वाटले

?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनस्वी's picture

21 Jul 2008 - 12:27 pm | मनस्वी

जबरदस्त आणि सोप्पी पाककृती!
चित्रे पण टेम्प्टींग आहेत! तोंडाला पाणी सुटले!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

छोटा डॉन's picture

21 Jul 2008 - 12:40 pm | छोटा डॉन

पाककॄती खरेच सोपी आणि छान आहे ...

पण एक तक्रार आहे, आमच्या "लंचच्या वेळी" अशा गोष्टी टाकणे बरोबर नाही ...
त्यात कालच्या अंमळ जड जेवणानंतर आज दुपारी "लंघन" करायचे होते असा एक विचार होता, पण आता कशाचे काय? आता जावे लागेलच ...

लगे रहो ...

स्वगत : तात्यांना सांगायला पाहिजे की "लंचच्या आधी व नंतर १ तास" असे फॉटु टाकायला बंदी करा म्हणुन ...

अतिस्वगत : लबाड्या आंबोळ्या, एवढा माझ्या गँगचा शार्पशुटर तु. पण कधी "चिकन डिश" खायला करुन घातली नाहीस ते, क्या बात है ?

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर's picture

21 Jul 2008 - 12:29 pm | विसोबा खेचर

आहाहाहा...!

सर्वच चित्रं सुरेख....! अरे आंबोळी, का असा अत्याचार करतोस रे? :)

नुसतीच चित्रं पाहणं अगदीच असह्य होतं! आणि समोर तर केवळ असतो ती चित्र दाखवणारा संगणकाचा तो निर्जीव पडदा!
त्यामुळे 'सहन होत नाही, आणि कुणाला सांगताही येत नाही!' अशी अवस्था होते बघ! :)

वि.सु. : तात्या आजची खादाडी मधे चित्रे वापरायला हरकत नाही.

अगदी अवश्य आणि आनंदाने वापरीन. बाय द वे, चित्रांचा आकार इतका लहान का? आकार लहान असल्यामुळे मजा किरकिरा होतो आहे आणि पुरेसे नयनसूख भेटत नाहीये! :)

आपला,
(कोंबडीप्रेमी) तात्या.

सूर्य's picture

21 Jul 2008 - 12:33 pm | सूर्य

चित्रे मस्त आली आहेत. मस्त टेस्टी झाले असणार. तोंडाला पाणी सुटले आहे. आज घरुन डबा आणलेला असला तरी कॅन्टीन मधे चिकन हाणावे म्हणतो ;)

आपला
(खादाड) सूर्य.

विसोबा खेचर's picture

21 Jul 2008 - 12:38 pm | विसोबा खेचर

आज घरुन डबा आणलेला असला तरी कॅन्टीन मधे चिकन हाणावे म्हणतो

हे बाकी मस्त! :)

पण सूर्या, कँटिनमध्ये जाऊन चिकन जरूर खा पण डब्यातल्या अन्नाचीही काही व्यवस्था कर हो. ते फुकट जाऊ देऊ नको. 'अन्नाचे शाप फार वाईट असतात!' असे आमचा बाप म्हणायचा! असो, आता वारला बिचारा.

राहवलं नाही, म्हणून हा सल्ला द्यावासा वाटला. बाकी, मजा करायला काहीच हरकत नाही! :)

आपला,
(सावध) तात्या.

सूर्य's picture

21 Jul 2008 - 12:54 pm | सूर्य

डब्यातल्या अन्नाची व्यवस्था म्हणजे डबा सुद्धा संपवणार आहेच. मग नंतर व्यवस्थित चिकनचा समाचार घेण्यात येईल ;).
(अन्न तसे वाया घालवत नाहीच पण डबा फुकट गेला तर घरी आमचा समाचार घेण्यात येईल ;) )

आपला
- (खादाड) सूर्य

सुनील's picture

21 Jul 2008 - 12:38 pm | सुनील

प्रकार तर सुंदर दिसतोय आणि सोप्पादेखिल!

एक सुचना - लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीच वापरली तर? हिरवाकंच रंग फिकट होणार नाही.

लगेच करून बघायचा मोह होतोय पण आज सोमवार!!! हटकेश्वर हटकेश्वर ...

(शिवराक) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

केशवसुमार's picture

21 Jul 2008 - 1:01 pm | केशवसुमार

अंबोळीशेठ,
सर्व प्रथम
खुराडा शेजारी कंदिल लावावा
ही स्टेप सांगायला विसरलात काय? :W
(प्राण्यांची प्रेते न खाणारा) केशवसुमार
स्वगतः कोंबडीच्या प्रेता ऐवजी कोंबडीचे अंडे /बटाटे घालून करून बघावे का? :? :P ..

मनस्वी's picture

21 Jul 2008 - 1:03 pm | मनस्वी

स्वगतः कोंबडीच्या प्रेता ऐवजी कोंबडीचे अंडे /बटाटे घालून करून बघावे का? ..

एका पायाची कोंबडी (३-४ वांगी) टाकून ट्राय करू शकता! :)

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

विसोबा खेचर's picture

21 Jul 2008 - 1:13 pm | विसोबा खेचर

हा हा हा! वांगं = एका पायाची कोंबडी....!

लै भारी... :)

आपला,
(दोन पायांचा मानव) तात्या.

विसोबा खेचर's picture

21 Jul 2008 - 1:11 pm | विसोबा खेचर

आता चित्रे मोठी केली आहेत परंतु त्यामुळे अजूनच त्रास होत आहे! :)

तात्या.

झकासराव's picture

21 Jul 2008 - 2:19 pm | झकासराव

चिकन कोंबडीचेच आहे हे पाहुन समाधान वाटले .. >>>>>>> =))
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao